अगदी परवाची गोष्ट,कुठलासा मराठी चित्रपट पहायला गेलेलो..वाह..!! काय सिनेमा बनवला होता..!!,कथानकापासून ते विषंय हाताळायच्या पद्धतीपर्यंत ,सारंच कसं नाविन्यपूर्ण...काही प्रसंग तर खरंच मनाला चटका लावून जाणारे..पाण्याने डोळ्यांच्या कडा पाणावल्या..ईच्छा झाली की आता रडावं आणि मोकळं करावं मन...पण रडूच येईना...माझ्या स्वतःच्या बाबतीत तर कित्येकवेळा असं होतं, की काही काही प्रसंग,काही घटना ईतक्या भावनाविवश करतात की वाटतं बास्स..सगळ विसरून मनमोकळेपणाने रडावं...पण रडूच येत नाही...आम्हा मुलांना तुम्हा मुलींसारखं ईतक्या सहजासहजी नाही रडंता येत...घरी येऊन विचार केला की शेवटंचा कधी रडलो होतो बरं...?? तर पाचवी सहावीत कोणत्याशा कारणामुळे बापाने तुडव तुडव तुडवला होता त्यावेळी...तेसुद्धा काही भावनीक वगैरे होऊन नव्हे तर मार कमी पडावा म्हणून...मग हे असं आम्हा मुलांच्याच बाबतीत का होत असावं बरं...?? ऐवढ्याशा कारणाने ओक्साबोक्शी रडणार्या मुली बघितल्या की मग स्वतःचीच लाज वाटते मलातरी...
खोलवर जाऊन या गोष्टीचा विचार केला तर लक्षात येईल की याचं मूळ कारंण दडलंय ,ते म्हणजेआपल्या पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत...या नकली समाजात पुरूषांनी रडणं कमीपणाचं मानलं जातं...किंबहुना ते त्याच्या पौरूषत्वावरंच प्रश्नचिन्ह ऊभं करतं...त्यातून चुकून ऐखादा रडलाच तर अगदी आई बाबासुद्धा घरात त्याची समजूत काढताना रडतोस काय मुलींसारखं ..?? असं दरडावून विचारतात आणि अशाप्रकारे अगदी लहानपणीच त्याच्या भावनांची वेळोवेळी सुंता केली जाते ,त्यातून तयार होतात आमच्यासारखे भावनाशुन्य बैल,ज्यांना भावना असतात पण त्या दाखंवता येत नाहीत..,रडावंस वाटतं पण रडंताही येत नाही...,प्रेम करावसं वाटतं पण त्यातला आपलेपणा मात्र दाखवता येत नाही...
आता आमच्या चालीरीतिंकडे लक्षपूर्वक बघा.. पत्नीनेच पतीच्या पाया पडायचं नेहमी...नवरा कधीतरी चुकून बायकोच्या पाया पडताना पाहिलंत का आपण..?? बहिणीने भावाला राखी बांधायची आणि म्हणायचं माझी रक्षा कर...मग ती बहीण पार कलेक्टर असुदेत, दहावी पास भावाला ती म्हणणार माझं रक्षण कर...काय संबंध..?? ऊलंटपक्षी मी कित्येक ऊदाहरणं सांगू शकतो जिथे बहीणिने नुसत्या भावाचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा तंबू तोलून धरलाय...नवर्याला मालंक किंवा पतीदेव म्हणायची पद्धतदेखील अशीच...ऐकाला मालकाचा दर्जा दिलात की मग आपसुकच दुसरा त्याचा दास अथवा नोकर बनतोच...करवा चौथ,वटपौर्णिमा यांसारख्या पद्धतींमधूनदेखील याच पुरूषी अहंकाराची, वेळोवैळी देखभाल करून त्याची मर्जी राखली जाते...का नाही कोणी नवरा आपल्या बायकोसाठी वडाला प्रदक्षिणा घालंत..??? का नाही कुणी आपल्या बायकोसाठी करवा चौथ ठेवत..?? कशाची लाज वाटते आम्हाला..?? तर समाजाची..अगदी परवाचंच ताजं ऊदाहरण सांगतो.. माझ्याकडे दवाखान्यात ऐक महिला आली मूलबंदीची शस्त्रक्रिया करून घ्यायला ,तर तिला ह्रदयाचा त्रास असल्याकारणाने मी तिला शस्त्रक्रिया टाळण्याचा सल्ला दिला..आणि नवर्याला नसबंदी करून घेण्याचा सल्ला दिला..नवर्याची नसबंदी ही तुलनेने कमी जटील,कमी वेळात आणि कमी खर्चात होणारी, तर कुठंचं काय.. नवरा जागेवरून थेट ऊठून म्हणाला, डाॅक्टरसाहेब आमच्या अख्या खानदानात है असलं काम कुणी केलं नाही..मी कसं करू..?? काय बोलायचं अशा बहाद्दरांना.?? या अशा निर्णायक क्षणी कुठे जातो या बैलांचा पुरूषार्थ...??
पण मग आमची संस्क्रुती खरंच अशी पुरूषप्रधान होती का..?? तर नाही...आमच्या हिंदू संस्क्रुतीत दुर्गामाता,पार्वती,लक्ष्मी या अशा ऐक ना अनैक देवतांची पूर्वापार ऊपासना केली जाते..राणी लक्ष्मीबाई सारख्या समाजाचं नेत्रुत्व करणार्या,बहिणाबाईंसारख्या प्रतिभावान स्त्रिया आमच्याच संस्क्रुतीने जगाला दिल्या..,मग हे मधेच सगळं बदलून वारं ऊलट्या बाजूने कसं सुरू झालं...?? तर पुरूष नेसर्गिकरीत्याच स्त्रियांच्या तुलनेत अधिक ताकदवर असल्याने, अर्थाजनाची व अवजंड अशी सारी कामे नकळंत त्याच्या वाट्याला चालली गेली तर तुलनेने भारतीय संस्क्रुतीत दुय्यम मानली गेलेली बालसंगोपनासारखी कामे स्त्रियांच्या वाट्याला आली... त्यातून हळूहळू आम्ही स्त्रियांची काळजी घेऊ,त्यांची जबाबदारी घेऊ ही सारी बेगडी भावना निर्माण झाली...ऐकावर ऐक दगड रचले गेले,त्यावरं विविध रूढी परंपरांचा मुलामा दिला गेला आणि हा आजचा पुरूषप्रधान संस्क्रुतीचा महाल ऊभा राहिला...पण आजही जर तुम्ही ईतर पाश्चात्य संस्क्रुतींमधे बघाल तर पुरूष स्त्री असा भेदभाव फार अपवादात्मकरीत्या बघायला मिळेल..तिथल्या स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात...पुरूष आनंदाने किंवा दुःखाने ओक्साबोक्शी चार चौघात रडताना दिसतात...थोडक्यात काय तर स्त्री-पुरूष हा भेद विसरून माणसं माणसांसारखी जगतात...
मग आता हे प्रकरण कसं संपवायचं...?? तर ईतक्या वर्षांच्या या प्रथा - परंपरा संपवणं म्हणजे काही ऐकदोन लोकांचं काम नाही...सगळ्यांनीच खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे..स्त्रियांकडे केवळ ऊपभोगाची वस्तू अथवा कमजोर पणाचं प्रतिक म्हणून पहाणं पहिल्यांदा बंद करा...आणि स्रियांनीदेखील हे असले अशास्त्रीय सण,प्रथा,परंपरा पाळणं बंद करा..स्वतः स्वतःची किंमत नाही करणार तर मग ईतरांनी तरी का करावी आणि कशासाठी करावी..?? आईवडिलांनी लहान वयातंच मुलांवर समानतेचे संस्कार करावेत...लहान वयातंच जर या गोष्टी मनावर बिंबवल्या गेल्या तर मोठेपणी हे असले विखारी न्यूनगंड पाळणारी पिढीच तयार होणार नाही...आणि मुळात केवळ पुरूषंच याला जबाबदार आहेत असंही मला वाटंत नाही,..कित्येक शिकलेल्या मुली,दवाखान्यात येऊन मला म्हणतात, " डाॅक्टर मला पहिल्या दोन मुली आहेत म्हणून अजून ऐक शेवटंचा चान्स मुलगा व्हावा म्हणून "...काय बोलायचं अशा मुलींना...?? या अशा मानसिकतेतून बाहेर पडणं खरंच शक्य आहे का..?? डाॅक्टर,ईंजिनिअर झालेल्या मुली जर असा विचार करणार असतील तर मग समाज कुणी आणि कसा बदलायचा..?? आणि अशा या भ्रष्ट शिक्षणव्यवस्तेतदेखील आपल्याला बदल हा करावाच लागेल...
बघा विचार करा आणि नुसता विचार करू नका, विचार पटला तर त्यावर अंमल करायला मात्र विसरू नका...मनावर बिंबवल्या गेलेल्या पुरूषार्थाच्या या खोट्या व्याख्येला फाटा देऊन समानतेच्या मार्गावर चालणं अवघंड आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही...