" लहानपण अगदीच खास असतं..त्याच्यासारखं दुसरं तिसरं काही नाही असं म्हणतात..अगदी तंतोतंत खरंय ते...कुणीही काहीही सांगायचं लहानपणी आणि आमचा अलगद विश्वासही बसायचा...किती निष्पाप होतो आपण सगळैच नाही का..??...तुझं घर ऊन्हात बांधणार ,असं नुसतं ऐकलं, तरी चटकन डोळ्यांत पाणी यायचं...याहून कोणती कठोर शिक्षा असूच शकंत नाही जगात असंच वाटायचं...जेवता जेवता ताटातला ऐखादा घास अलगद चिऊ काऊला द्यायचो ईतके ऊदार होतो आपण सगळेच....आईवडिलांच्या पाया पडल्याशिवाय आमचा दिवस सुरूच व्हायचा नाही,दारातल्या तुळशीसमोर पणती लावून रोज सायंकाळी शुभंकरोती म्हणायलादेखील आम्हाला कधीच लाज वाटली नाही...
शाळेतला प्रत्येक मुलगा अथवा मुलगी आमच्यासाठी प्रचंड महत्वाचा असायचा...वर्गात काही कारणाने मित्राला शिक्षा झाली की अगदी दोनेक दिवस कशातंच मन रमायचं नाहि...खेळाच्या नावाखाली मित्रांबरोबर दिवसभर नुसतं बागडायचो, पायाला भिंगरी लावल्यासारखं,अगदी बागेतल्या फुलपाखरांनादेखील हेवा वाटावा ईतकं...रविवारी दारावर विकायला आलेले म्हातारीचे केस विकंत घेण्यासाठी अगदी आठवडाभर आमची तयारी चालायची...खेळाच्या नावाखाली हजारो रूपयांची महागडी ऊपकरणं लागलीच नाहीत आम्हाला कधी,त्यासाठी केवळ कवड्या आणि चिंचूकेच पुरायचे...
पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीला कुणा ना कुणाची नजंर लागतेच,तशीच ती आमच्या या गोड दिवसांनादेखील लागली आणि ईच्छा नसताना आम्हालादेखील मोठं व्हावं लागलं...आणि मोठं म्हणजे केवळ हातापायांनी,कपड्यांनी मोठं नव्हे तर लहानपणी मनात असलेले सारे चांगले वाईट मापदंड पायदळी तुडवणारं ,आसुरी मोठेपण आम्हाला अनुभवायला मिळालं...आता ते पूर्वीचे शाळेतले मित्र रस्त्यात भेटले, तरी आम्हाला ओळंख दाखवावीशी वाटंत नाही कारंण त्यातला कुणी दुसर्या जातीधर्माचा निघतो तर कुणी पैशांनी गरीब असतो,कुणी स्वभावाने पटंत नाही तर कुणी विचारांनी...लहानपणीच्या या जिवाभावाच्या मित्रांमधे आजमितीला मैत्री कमी आणि हेवेदावेच जास्त दिसतात...
लहानपणी चिऊकाऊला आपल्या ताटातलं जेवू घालणारे आम्ही आज मात्र दारावर आलेल्या भिकार्याला हाकलून लावतो....दारावरच्या तुळशी,पणतीमधे हमखास देव शोधणारे आम्ही आज मात्र देवाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करतो आणि हात हलवत माघारी येतो..लहानपणीच्या आमच्या मैदानी खेळांची जागा केंव्हाच काॅम्पुटर आणि लॅपटाॅपनी व्यापून टाकली...ऊन्हात घर बांधणार म्हटल्यावर रडणारे आम्ही ईतके निर्ढावलोय की आम्हाला कशाचंच काहीच वाटेनासं झालंय....सकाळी ऊठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अधिक पैसे कसे कमवायचे..?? या निरंतर चिंतेने आम्ही ग्रासलेले असतो...ईतकं व्यापून टाकलंय आम्हाला या पैशाने की आमच्या सुखदुःखाच्या,बर्या-वाईटाच्या सार्या व्याख्या या पैशाभोवतीच फिरतात...
अजून अर्धंच आयुष्य जगलोय त्यातंच हे ऐवढं सगळं बदलून गेलं...ऊरलेलं आयुष्यदेखील काही याला अपवाद असेल असंं वाटंत नाही...मग आपणही केवळ मोठे झालोय म्हणून ईतरांसारखं वागायचं का..?? लहानपणीचेच नियम,भाव भावना का बरं नाही चिरंतन टिकंत ?? सुख म्हणजेतरी नेमकं काय..?? त्याची व्याख्या काय आणि कोण ठरवणार..?? या सगळ्यांचा सारासार विचार केल्यावर वाटतं, लहानपणानंतर मोठं होणं खरंच अनिवार्य आहे का...?? अजून संसारीपण, म्हातारपण अनुभवायचंय..या सगळ्या अवस्थांची बेरीज केली तर सुखाच्या नावाखाली बाकी शुन्य तर राहणार नाही ना..??

-©- निरागस