Thursday, 2 November 2017

लब्यू शाहरूख



                


"                           जेंव्हापासून हिंदी सिनेमा पहायला चालू केला अगदी तेंव्हाच सुरूवातीला यानं भूरळ घातली,ईतकी की ती आजवर टिकून आहे...म्हणतात ना पहिलं प्रेम हे खासंच असतं,अगदी त्यातला प्रकार....कुठेतरी आम्हाला जे जमंत नव्हतं किंबहुना करणं शक्य नव्हतं ,ते आम्ही याच्यात शोधंत  राहिलो आणि याच्या प्रेमात अधिकाधिक गुंतत राहिलो...मुलींशी बोलायची त्याची लकब,ऊत्साह आणि त्याचा पडद्यावरंचा वावर सगळंच अगदी खास...जवळपास मागील वीस वर्षे यानं माझ्या मनावर राज्य केलंय आणि पुढेही करील...आमच्या आयुष्यात याचं स्थान किती मोठं आहे हे दाखविण्याची संधी आम्हाला त्याच्या चित्रपटांच्या निमित्ताने का होईना वर्षातून ऐकदा,फार फार तर दोनदा मिळते आणि ती आम्ही कधीच चुकवंत नाही...अशाच काही आठवणी पुन्हा ऐकदा आठवतोय आणि शब्दरूपांनी आपल्यासमोर मांडतोय...
                            शाहरूख,रजनी यांचे चित्रपट मी हमखास पहिल्या दिवशी पहिला शो बघतो आणि बहुतांशवेळा ऐकापेक्षा अधिकवेळा पहातो...कारंण माणसाने आपलं प्रेम व्यक्त करायला अजिबात मागे-पुढे पाहू नये या मताचा मी आहै....आपणंच यांना मोठं करायचं आणि नंतर यांच्याकडे पहात पहात आपणही मोठं व्हायचं...अगदी दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट सध्या कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे याचा नवा सिनेमा  IMAX वडाळाला पाहिला ...पहिल्या दिवशी पहिला शो....ईतका आवडला की संध्याकाळी परंत त्याच सिनेमात संध्याकाळचा शो पहायला गेलो..लहान शहरात लहानाचा मोठा झालेलो असल्यामुळे, आमच्या प्रेम व्यक्त करावयाच्या पद्धती या शहरी लोकांपेक्षा थोड्याशा हटके असतात...तर संध्याकाळच्या शोला फारंच जास्त सभ्य ,अथवा सभ्यपणाचा आव आणणारं ऐक मध्यमवर्गीय जोडपं माझ्याशेजारी बसलं होतं...शाहरूखची ऐन्ट्री झाली आणि मी ऐक जोरदार शिट्टी टाकली... आश्चर्याने की रागाने माहिती नाही पण सिनेमाग्रुहातले सगळेच जण माझ्याकडे पाहू लागले आणि हे असं सिनेमा संपेपर्यंत तीन तास सुरू होतं...मधेच शैजारी बसलेली महिला आपल्या नवर्‍याला म्हणाली," हा माणूस पहिल्यांदा ऐवढ्या मोठ्या ठिकाणी चित्रपट पहायला आलाय वाटतं..!! " आणि अशा ईतरही अनेक कमेंट्स.. मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं ,कारंण त्यावैळी माझ्यासाठी चित्रपट जास्त महत्वाचा होता...चित्रपट संपल्यानंतर मात्र आवर्जून गेलो त्यांच्याजवळ,त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी...म्हटलं," मॅडम आजच्या दिवसातला हा दुसरा शो आहे आणि वेळ मिळाला तर ऊद्या पुन्हा येणारे " मी स्रीरोगतज्ञ आहे आणि अमुकअमूक ठिकाणी काम करतो असं सांगितल्यावर मग तिलाच जास्त ओशाळल्यासारखं वाटलं..ती म्हणाली," Sorry ,i dint mean it in a wrong way  ". मग मीही थोडंसं भाव खाऊनंच  म्हणालो, " As if i care "...मग माझ्या शिट्यांमुळे झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून ,वर माझं विझिटिंग कार्ड देऊन मी त्यांचा निरोप घेतला...

                        MBBS च्या दुसर्‍या वर्षात असतानाची गोष्ट...याचा "रब ने बनादी जोडी" यायला आणि माझी Final University प्रात्यक्षिक परीक्षा यायला ऐकवेळ...शुक्रवारी पहिलं प्रात्यक्षिक होतं आणि त्यानंतर ऐकेक दिवस सोडून अशी चार प्रात्यक्षिकं...आणि याचा चित्रपटही आला शुक्रवारीच..पहिल्या दिवशीचा पहिला खेळ काहि परीक्षेमुळे पाहता आला नाही, पण त्यादिवशीची संपूर्ण परीक्षा संपेपर्यंत मात्र आमचं संपूर्ण लक्ष याच्या चित्रपटाकडेच....सहावाजले संध्याकाळचे प्रात्यक्षिक संपायला आणि आम्ही साडेसहाच्या शोला थिएटरबाहेर हजंर...तेंव्हा कोल्हापूरात अजून मल्टीप्लेक्स नावाची संकल्पना आली नव्हती ,सिंगल स्क्रीनचा जमाना...आजही सिंगल स्क्रीन सिनेमाग्रुहाबाहेर ब्लॅकने तिकीटविक्रीची परंपरा जोपासणार्‍या काही निवडंक शहरांमधे कोल्हापूरचा समावेश आहे...तर मग ऐनवेळी तिकीट ऊपलब्ध नसल्याने , मूळ तिकीटाच्या दुप्पट पैसे खर्च करून अगदी पहिल्या रांगेत बसून चित्रपट पाहिला....त्यावर्षी ऊरलेल्या प्रत्येक प्रात्यक्षिकांनंतर हाच दिनक्रम ठरलेला, फक्त तिकीट मात्र सकाळी परीक्षेला जातानाच काढून ठेवायचो...चार प्रात्यक्षिकांनंतर चारवेळा "रब ने बनादी जोडी" बघितला....


                      तिसर्‍या वर्षी अगदी माझ्या वाढदिवशीचं शाहरूखचा डाॅन -२ प्रदर्शित झाला...नेहमीप्रमाणे महिनाभर आगोदरपासून तिकिटांसाठी आमची लाॅबिंग सुरू...कारंण पहिल्या दिवशी पहिला खेळ बघणं महत्वाचं...मग यातंच ऐकदिवशी थिएटरमधला तिकीट कर्मचारीच आला Casualty विभागात काहीशा कारणाने...त्याने स्वतःची ओळंख करून दिली," मी म्हमदू,ईथे पद्मा थिएटरात तिकिटांच्या टेबलला आहे ",मनात स्वतःलाच म्हटलं ,जमलं काम...!!! ऊपचारानंतर डिस्चार्जच्यावेळी  हात जोडून म्हमदू धन्यवाद म्हणाला...मी म्हटलं, "अरे म्हमदू ,धन्यवाद नको पहिल्या दिवसाच्या दोन लागोपाठच्या शोजचे हे घे पैसे आत्ताच आणि तिकीटं राखून ठेवायची..." आणि अगदी अॅडवान्स बुकींग सुरू झाल्या झाल्या म्हमदूचा फोन ," सर ऐका शोची दोघांची तिकीटं..?? की लागोपाठच्या दोन शोजची ऐका माणसाची दोन तिकीटं..?? " तोही गोंधळला होता बिचारा...अशाप्रकारे हा चित्रपट ऐकाच चित्रपटग्रुहात ऐकाच खुर्चीवर बसून सलंगचे दोन खेळ पाहिले...पहिला खेळ संपल्यावर शैजारचा म्हणाला," अहो चला की संपला चित्रपट आता,काय झोप लागली की काय...?? "...मी म्हटलं ," पुढच्या खेळाचं पण तिकीट काढलंय मी,तुम्ही निघा...", भोवळ येऊन पडायचाच बाकी राहिला होता बिचारा....!!


                          मग आलं MBBS चं अंतिम वर्ष...( आठवणींचा क्रम मागे पुढे होऊ शकतो ) शाहरूखची स्वतःची निर्मिती असलेला ,"रा-वन" हा चित्रपट नेमका दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच प्रदर्शित होणार होता...पंधरा दिवस आगोदर चित्रपटाचं बुकींग सुरू झालं...नैहमीप्रमाणे लागोपाठच्या दोन शोजची तिकीटं काढली...आणि दोन दिवसांनंतर कळालं ,की चित्रपट २-D व ३- D मधे प्रदर्शित होणार आहे..माझ्याकडे ज्या ठिकाणची तिकीटं होती ,तिथे केवळ २-D मधेच दाखविण्यात येणार होता चित्रपट...झालं मग शाहरूखचा पहिला ३-D चित्रपट येणार आणि आपण तो २-D मधेच पाहणार याचं शल्य  मीतरी आजीवन वाहू शकंत नाही,नेमक्या याच विचारांनी ग्रासून काढलं तिसरं तिकीट...ऐकंच चित्रपट ऐका दिवशी तीनवेळा पाहिला...दुपारी बारा वाजता पहिला शो आणि नंतर लागोपाठ साडे तीन,साडे सहा असे ऐकून तीन शोज...घरी जायला दहा वाजले...लक्ष्मीपूजन होऊन गेलं होतं...आईचा ओरडाही खाल्ला...लक्ष्मीपूजनापेक्षा महत्वाचा होता का चित्रपट...?? काय सांगणार तिला..?? 


                        तेंव्हा शिकंत असताना सुट्ट्यांचा प्रश्न नसायचा,आता नोकरी करताना सुट्ट्या काढणं अवघड असतं,पण तरी आजही या माणसाचा चित्रपट पहिल्याच दिवशी पहिल्याच शोला बघतो...सुट्टी मिळाली तर छानंच नाहीतर सरळ रजा टाकतो...कारण माहिती नाही...पण मला तो आपलासा वाटतो...त्याच्याकडे पाहून मला ऐक सामान्य माणूस परिस्थितीवर मात करून कसा यशस्वी होऊ शकतो याची शिकवण मिळते...त्याच्या अभिनय क्षमतेबद्यल शंका ऊपस्थित करणारेदेखील त्याच्या कामसू व मनमिळावू स्वभावाची व कष्ट करून मिळवलेल्या यशाची स्तुती करतात....मी सिनेमाग्रुहात जातोच मुळी याला पहायला.. त्यासाठी मला चांगल्या कथानंकाची अथवा ऊत्क्रुष्ठ अभिनयाची गरंजच भासंत नाही...आणि अभिनयाबद्दलही म्हणाल तर याचा " चक दे "," राजू बन गया जंटलमॅन "," स्वदेस " किंवा " कल हो ना हो " पाहिला की याच्या अभिनयाची स्केल आपल्याला कळून जाते....तर शाहरूख खरंच तू ग्रेट आहेस...आमच्या आख्या पिढीला कुणावरही मनापासून प्रेम करताना तूच आठवतोस...असंच काम करंत रहा आणि आम्हाला प्रेम करायला शिकवत रहा...जाता जाता फक्त ऐकंच गौष्ट सांगतो...
" खांडीलकरको कल्टी,गुरूनारायण गया,अमोल शुक्ला तुभी ऊपर.....अरे कोई है क्या..?? कोई नहीं....मुंबईका किंग कोन...?? शाहरूख खान...!! 
                               -©- निरागस