Wednesday, 20 February 2019

अमेझिंग Seychelles - भाग पहिला

"                         सगळी मिळून ईनमीन ऐकलाख लोखसंख्या असलेला देश,पण शिस्त म्हणाल तर भल्या भल्या देशांना लाजवणारी...
                          ऊदाहरण म्हणून ऐक छोटंसं निरीक्षण सांगतो बाकी सविस्तर लिहीणंच,मागील आठवडाभर ईथे कारने फिरतोय...अगदी दूर्गमातल्या दुर्गम अशा वस्त्यांमधे जाऊन फिरून आलो,रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट झाडी,दोन्ही बाजूंना पायी चालणार्‍या लोकांसाठी फूटपाथ,घासून गुळगुळीत केल्यासारखे काळेशुभ्र छान रस्ते आणि दर थोड्या अंतरावर प्रवाशांच्या सोयीकरीता बांधलेली प्रशस्त प्रसाधनग्रुहे..  रस्त्यांवर खड्डा तर लांबचीच गोष्ट ,साधा ऐक कपटा दिसणार नाही...
                           वाहतुकीची शिस्त म्हणाल तर अगदीच कमाल,ऊगाच विनाकारण हाॅर्न वाजवणे हा प्रकार नाही की भरधाव वेगात ओवरटेक करावयाची घाई नाही.. सगळं कसं अगदीकाम्पीटरमधल्या विडिओगेम मधे असतं अगदी तसं....
                          पण मला आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे रस्त्यावरून पाई चालणार्‍या लोकांना ईथे दिली जाणारी खास वागणूक...पायी रस्ते पार करण्यासाठी जागोजागी Zebra क्राॅसींग आखून दिलेलं आहे,नुसतं आखूनंच दिलेलं नाही तर तसे सिग्नलही ईथे लावण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते काटेकोरपणे ईथे पाळले जातात...त्यासाठी प्रत्येक चौकात ईथे पोलीस ऊभा करावा लागंत नाही की चलान फाडावं लागंत नाही...
                          समजा तुम्हाला सिग्नल नसतानाही पलिकडे जावयाचं आहे आणि तुम्ही नकळंत दोन पावलं चुकून रस्त्यावर टाकलीत, तर मग दोन्ही बाजूंनी येणार्‍या गाड्या कितीही वेगात असूद्यात, तुमच्यापासून साधारण ५० फूट अंतरावर थांबल्याच पाहिजेत...समजा तुमची धांदल झालीये पुढे जाऊ की मागे जाऊ असं तुमच्या ऐकंदरीत चेहर्‍यावरून समोरच्याला वाटलं,किंवा तुम्ही निमुटपणे रस्त्याच्या बाजूला ऊभे राहून पलीकडे जावयाची संधी शोधताय असं त्यांना वाटलं..तर तो वाहनचालंक स्वतःची गाडी थांबवेल आणि खिडकीतून मान बाहेर काढून किंवा खाली ऊतरून "After u Sir " म्हणून रस्त्याच्या पलीकडे जाण्यास म्हणेल....रस्त्यावर पाई चालणार्‍यांचा सर्वात आधी हक्क आहे हे जणू ईथे सगळ्यांनी मान्यच केलं आहे...
                                   
(तळटीप - नसेल या देशाकडे आमच्यासारखा अणूबाॅम्ब,नसतील चांद्र मोहीमा पार करणासाठी लागणारी बौद्धीक कुवंत...पण माणूस म्हणून ऐकमेकांचा आदंर कसा करावयाचा आणि माणसाचं माणूसपण कसं साजरं करावयाचं ते यांना आपल्यापेक्षा जास्त कळलंय...
                   आयुष्याच्या या स्पर्धैत आपण भारतीय नुसते मागेच आहोत असं नाही तर अक्षरशः चुकीच्या मार्गावर आहोत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही )
                                               -©- निरागस