Tuesday, 18 July 2017

अजमल कसाब आणि मी

 "                    घाबरू नका ही काही राजकीय किंवा संवेदनशील अशी पोस्ट नाही..पण हा प्रसंग मात्र नक्कीच खास,सांगण्याजोगा आहे आणि या प्रसंगाचा कर्ता आणि करविता दुसरा तिसरा कोणी नसून थेट पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब हा असल्यानेच या लेखाला त्याचंच नाव देणं मला संयुक्तिक वाटलं.. आजवरच्या माझ्या लिखाणावरून,विचारांवरुन तुमच्या ऐवढं निश्चित लक्षात आलं असेलं की मी त्या ईतर पुस्तकी डाॅक्टरांसारखा नाही..किंबहुना बनू ईच्छित नाही...व्यवसायाने डाॅक्टर असलो, तरीही माझी वैयक्तिक अशी राजकीय,सामाजीक मतं आहेत आणि मी ती मांडतोच..कधीकधी लोकं मला विचारतात हे असं कसं जमतं तुम्हाला..?? त्यांना मी नेहमी ऐवढंच सांगतो, की मी दहा वर्षांचा डाॅक्टर आणि तीस वर्षांचा माणूस आहे..तर हे वेगळेपण टिकविण्यासाठी मी माझे मित्रसुद्धा फार काळजीपूर्वक निवडतो..तर हा असाच mbbs करतेवेळच्या मित्रांसोबतचा ऐक किस्सा...
                        mbbs च्या दुसर्‍या वर्षातली गोष्ट..आमचं दुसरं वर्ष म्हणजे दीड वर्षाचं...दीड वर्षात शिकलेलं,वाचलेलं सगळं काही डोक्यात ठेऊन परीक्षच्या दिवशी ओकायचं..त्यात दुसरं वर्ष म्हणजे आम्ही organisers..  गॅदरींग,नाटंक,कल्चरल प्रोग्राम,स्पोर्ट्स वगैरे सांभाळता सांभाळता नाकी नऊ यायची...अभ्यासाच्या पुस्तकांशी माझं तसं विशेष कधि जमलंच नाही..मी पुस्तकं वाचायचो पण ती पुलंची,अत्र्यांची..कारंण त्यातून आयुष्य कळायचं...आम्ही वर्षभर सगळीकडे अडकायचो..हजेरीत,भांडणात,पाॅलिटिक्स मधे..काॅलेजची ब्लॅकलीस्ट तर कधी आमच्याविना बनलीच नाही..त्यात मी काॅलेजचा General Secretary..आमचा अभ्यासंच मुळी चालू व्हायचा युनिवर्सिटीच्या महिनाभर आधि...पण पास मात्र आम्ही व्हायचोच...अगदी नेहमी न चुकंता,तेही कोणतेही ग्रेसमार्क्स  न वापरता...तर अशीच आमची युनिवर्सिटीची अंतिम परीक्षा चालू होती...पहिले तीन विषयांचे प्रत्येकी दोन पेपर होऊन केवळ Forensic Medicine चा शेवटंचा ऐक छोटासा पेपर शिल्लंक होता..रात्रभर जागून अभ्यास केला..सकाळी लवकर ऊठून अभ्यासाला बसणार तोच कुठूनतरी बातमी आली की मुंबईवर अतिरेकी हल्ला झालाय..घरी फोन लावून बातमीची खात्री केली..तेवढ्यातून आईने सल्ला दिलाचं,घरातून बाहेर निघू नकोस...मी खेकसलोच तिच्यावर,म्हटलं "  अगं मुंबईवर हल्ला झालाय, कोल्हापूरवर नाही..आणि मी बाहेर नाही पडलो तर काय माझ्या रूमवर येणार आहे का पेपर,सकाळच्या वर्तमानपत्रासारखा...?? " आणि मी फोन ठेवला...
                      ऐव्हाना पूर्ण हाॅस्टेलभर बातमी पसरली होती...सगळीच मुलं ऐकत्र जमली..मुंबईच्या हल्ल्याचं दुःख होतंच पण जो तो आपल्या परीक्षेचं काय याच विचारात व्यस्त होता...कुणालाच काही कळंत नव्हतं..माझं तर डोकंच बधीर झालं होतं...रात्रभर वाचलेलं तर केंव्हाच सपाट झालेलं सगळं..तेवढ्यात मुंबईच्या ऐका मित्राचा निरोप आला की मुंबईत परीक्षा पुढे ढकललीये.."अरे पेपर तर महाराष्ट्रभर ऐकंच असतो..त्यांचा नाही तर आपला पण नाही.." अजून ऐकाचं डोकं चाललं..पण खात्री कशी करायची...मग सर्वानुमते ठरलं की काॅलेजच्या डीनला जाऊन विचारायचं..झालं तर ,आम्ही सगळी मुलं सकाळ सकाळी डीन बंगल्यावर...दाराची बेल वाजवली तर डीन डोळे चोळंत लुंगी सावरंत बाहेर आला..मुंबईवर हल्ला झालाय हेच मुळी त्याला आमच्याकडून कळालं.. " काही कॅन्सल वगैरे नाही परीक्षा..माझ्याकडे जोपर्यंत तशी काही सूचना येत नाही तोवर मी काही सांगू शकंत नाही.." असं म्हणून आम्हाला हाकलून देण्यात आलं..आईशप्पथ सांगतो..त्यावेळी क्षणभर मुंबईवरंच का हल्ला झाला..??   कोल्हापूरवर का नाही..?? असंच वाटलं..सगळेजण मुकाट्याने आपापल्या खोलीत जाऊन वाचंत बसले..पण शेवटी तासाभरातंच अपेक्षीत बातमी आली..संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षा तीन दिवंस पुढे ढकलण्यात आली..
                      ऐव्हाना अभ्यासात बुडालेली मुलं मग मात्र बाहेर पडली..अगदी बिळात पाणी शिरलेल्या उंदरांसारखी..आमचाही आठ-दहा लोकांचा ग्रुप होताच..बसलो ऐकत्र...आता तीन दिवंस काय करायचं...?? मी म्हटलं आजंचा दिवस करू टाईमपास..पुढंचे दोन दिवंस करू परंत अभ्यास...तसं मला मधेच कुणीतरी अडवंत म्हणालं..." केला की आता अभ्यास...आज जर हल्ला नसता झाला तर परीक्षा झाली असती आपली..कितीवेळा वाचायचं तेच तेच...?? फालतु विषंय आहे हा.." आणि ते ऐकून संपूर्ण रूममधै भयाण शांतता पसरली...मी माझ्या दोन्ही बाजूस बघितलं..कुणीच काही बोलायला तयार नव्हतं..मग तिसरा कुणीतरी म्हणाला, " चला गोव्याला...!!.." हे म्हणजे अगदीच थोर होतं..पुन्हा मीच त्याला आडवंत म्हणालो.., " अरे आपण वर्षभर अभ्यास नाहीच ना करंत मग आता निदान ऐन परीक्षेआधी तरी करूयात की थोडाफार..." पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं..ऐव्हाना माझ्याही लक्षात आलेलं की विषंय हाताबाहेर गेलाय म्हणून...पण मी माझ्या मतावर ठाम होतो..आतून कुठेतरी मला हे पटंत नव्हतं.." मी काही येत नाही तुम्ही सगळे जा...!! "मी म्हटलं आणि मी निघून गेलो.. पण आम्हा मित्रांचा ऐक कटाक्ष होता..गेलो तर सगळे ऐकत्र जायचं..,नाहितर कुणीच नाही..मग नानाविध हत्यारं वापरून माझंही मतपरीवर्तन केलं गेलं आणि आम्ही गाड्या काढून गोव्यात दाखल झालो..
                           गोव्याची ऐक खासियंत तुम्हाला मान्य करावीच लागेल...तिथे गेल्यावर तुम्ही तिथलेच होउन जाता..मागे काय घडलंय,ऊद्या काय घडणारे या असल्या फालतु प्रश्नांना गोव्यात स्थान नाही...तीन दिवंस मस्त,तुफान मजा केली..आपण विद्यार्थी आहोत आणि तीन दिवसांनी आपली अंतिम परीक्षा असणार आहे याचाच मुळी आम्हाला विसर पडला.. हे तीन दिवंस भुर्रकन निघूनसुद्धा गेले आणि समोर पुन्हा ऐकदा ऊभी राहिली परीक्षा...झालं ऊद्या सकाळी दहा वाजंता पेपर आणि आदल्या रात्री देखील आम्ही गोव्यातंच पडलोय...मग कुणीतरी पुढाकार घेऊन परंत जायचा विषंय काढला आणि आम्ही खडबडून जागे झालो..नाईलाजास्तव आम्ही सर्वजण आपापल्या सामानाची आवराआवर करून परतीच्या प्रवासाला निघालो...
                               तुम्हाला आश्चर्य वाटेल दहा वाजताच्या परीक्षेसाठी दुचाकीवरून साधारंण दोनैकशे किमी चा प्रवास करंत आम्ही सकाळी आठ वाजंता वसतिग्रुहात पोहोचलो..जेमतेम आंघोळ करून थेट परीक्षेसाठी रवाना व्हावं लागलं..वाचलेलं काहीच आठवेनासं झालेलं,नवीन वाचायला वेळही नव्हता आणि ताकदही..तशाच गलितगात्र अवस्थेत परीक्षा दिली...जे आठवेल ते बरोबर लिहिलं ऊरलेलं चुकीचं का असेना पण तेही लिहिलंच...परीक्षेचा निकाल लागंला..ईतर अभ्यास केलेल्या विषयांपेक्षा जास्त मार्क्स या विषयाने मिळवून दिले...आमचा ऐक मित्र गचकला...वातावरंण थोडंस निराशाजनंक झालेलं पण तोही पुढे re-evaluation मधे महिन्याभरातंच पास झाला...ऐकंदरीत सगळा आनंदी आनंद...
                              आज मागे वळून पाहिलं की स्वतःचंच आश्चर्य वाटतं..कसे काय आलो ईथवर आपण..?? क्षणभर विश्वासंच बसंत नाही स्वतःवर...पुढे पदवी अभ्यासक्रमासाठी खूप अभ्यास करावा लागंला...पण हे mbbs चे दिवंस,मित्रांसोबत केलेल्या टवाळक्या आयुष्यभर लक्षात राहतील....आज बरोबरच्या डाॅक्टर मित्रांना सांगितल्या ह्या गोष्टी तर विश्वासंच बसंत नाहि त्यांचा...कारण त्यांनी पुस्तकं सोडून कधी केलंच नाही काही दुसरं...या सगळ्या मस्तीत mbbs कधी संपलं कळलंच नाही...पुढे काळानुरूप बरेचसे मित्र तुटले...यातले अगदी बोटावर मोजण्याईतके मोजंकेच मित्र आज बोलण्यात आहेत ...प्रत्येकजण आपापल्या अभ्यासात व प्रपंचात अडंकला..काहि वैचारीक मतभेद झाले..काही मला पचले नाहीत तर काहिंना मी....पण या अशा चिरकाल टिकणार्‍या आठवणी दिल्याबद्दल चांगल्या,वाईट,ऊपयोगी व निरूपयोगी  सर्वच मित्रांना हात जोडून अभिवादंन.....!!




                              -©- निरागस


Thursday, 13 July 2017

पोस्टमाॅर्टम

"             नुकतंच mbbs पुर्ण झालं होतं..पदव्युत्तर शिक्षणासाठीची परीक्षा संपवून निकालाची वाट पहात होतो...निकालाला साधारण चार- पाच महिने अवधी होता..mbbs नंतर ऐक वर्ष करावयाची सक्तीची सरकारी नोकरी मानगुटीवर होतीच..म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा निकाल येईपर्यंत ऐखाद्या जवळच्याच सरकारी प्राथमिक ऊपचार केंन्द्रात तात्पुरती नोकरी करू...नोकरीचं ठिकाण शहरापासून तसं जवळंच .,टेकडीवर वसलेलं..दुचाकीवरून जाता येता गंमत वाटायची...रस्त्याच्या दोन्ही बाजूला यथेच्छ हिरवळ,अवतीभोवती प्राणी आणि पक्षांची रेलचेल..कामही तसं बेताचंच..ऐकंदरीत मस्त नयनरम्य ठिकाणी नोकरी सुरू होती....
                      साधारण महिनाभर सगळं व्यवस्थित सुरू होतं..पण तो दिवसंच मुळी सुरू झाला त्रास देण्यासाठीच...सकाळपासून ऐकही गोष्ट मनासारखी होत नव्हती..कसेबसे पेशंट संपवून घरी निघायच्या तयारीत होतो तर तालुका वैद्यकीय अधिकार्‍याचा फोन आला..ऐक ईमर्जन्सी पोस्टमाॅर्टम आहे..जागेवर जाऊन करावं लागेल...!! झालं दुपारी ऐक वाजला होता..मरणाची झोप येत होती त्यात आता हे काम...पण केल्याशिवाय काहि गत्यंतर नव्हतं...mbbs मधे वर्षभरासाठी ऐक विषय होता फाॅरेन्सिक मेडिसिन नावाचा पण प्रत्यक्ष शवविच्छेदनाचा मात्र कधी अनुभव आला नव्हता...थोडावेळ विचार केला आणि परंत तालुका अधिकार्‍याला फोन केला...म्हटलं सर मला अनुभव नाहिये...तसं तो खेकसुनंच म्हणाला..." कशाला लागतोय अनुभव....?? मी बघुन आलोय बाॅडी ...its a clear cut case of murder..चेहर्‍यावर अॅसिड टाकून मारलंय..  विषय पास झालायस ना...?? जा आणि कर..." आणि असं बोलून धाडंकन फोन ठेवला त्याने...ठेवला कसला आदळलाच..नंतर कदाचित माझीच दया येऊन त्यानेच काही वेळाने फोन केला परंत आणि म्हणाला...,दुसरा ऐक सिनिअर डाॅक्टर पाठंवतो सोबतीला, तू जाऊन फक्त ऊभा रहा तिथे..मी सांगतो तसंच लिही नंतर रिपोर्टमधे...ऐकून थोडं हायसं वाटलं...
                 साधारंण दुपारी दोन वाजंता पोलिस चौकीतून फोन आला...समोरून चौकीप्रमुख म्हणाला नमस्कार सर...कधी येताय...?? म्हटलं कुठे..?? तर म्हणाला शवविच्छेदनाला...म्हटलं हो पण नक्की जागा कुठे..?? मग त्याने जागेचं वर्णन सांगितलं...कुठेसं आडजंगलात झाडींमधे म्रुतदेह होता...जागेचं नाव आयुष्यात पहिल्यांदाच ऐकंत होतो...म्हटलं मला ऐकट्याला येणं शक्य नाही गाडी पाठंवा..!! तसं काहीसं नाराज होऊनंच तो म्हणाला, बरं,, ठीक आहे....!! आणि त्याने फोन ठेवला...मग पुढे तास दोन तास नुसतेच सगळ्यांचे फोन येत राहिले...जिल्हा वैद्यकीय अधिकारी,अमुक सरपंच,अमुक राजकारणी वगैरे वगैरे ..पण न्यायला गाडी मात्र आलीच नाही...पाच वाजंता कंटाळून मीच परंत फोन केला चौकीत...म्हटलं गाडी पाठंवताय की मी निघू घरी...कितीवेळ थांबू ईथे ताटंकळंत...तसा समोरून चौकीप्रमुख गयावया करंत म्हणाला , " साहेब गाडीची व्यवस्थाचं होत नाहिये...!! सगळ्या गाड्या कामावर आहैत...ऐक काम करतो मी स्वतःच येतो माझी गाडी घेऊन..." आणि तो म्हटल्याप्रमाणे आलाही अर्ध्या तासात...त्याच्या मागे बसलो आणि निघालो...जाता जाता तोही सागू लागला...म्हणाला सर खूप वाईट मर्डर आहै...अॅसिड टाकून मारलंय वगैरे वगेरे...मग ईकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करंत करंत ऐकदाचा पोचलो जागेवर...
                             जे वैद्यकीय क्षेत्रातले नाहीत त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय...शवविच्छेदनासाठी लागणारी चिरफाड करण्यासाठी सरकारने नेमलेला कर्मचारी असतो...डाॅक्टर सांगेल तसं तो डाॅक्टरच्या सल्यानुसार चिरफाड करंत असतो...मी जागेवर पोचलो तर हा कर्मचारी गायंब...पोलीस हैराण होऊन म्हणाला " नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न आहेत साहेब...आत्ता तर ईथेच होता..." नंतर शोधाशोध झाली पण तो काही कुणाला सापडेचना, सगळेचजण हैराण होऊन त्याची वाट पाहंत बसलेले... अर्ध्या पाऊन तासांनी कुठुनतरी ऐक काॅन्स्टेबल ऐका माणसाची बकोटी पकडून घेऊन आला...म्हणाला हा बघा साहेब तिथे त्या झाडामागे दारू पीत बसलेला...चौकीप्रमुखाने त्याला चांगल्या अस्खलित भाषेत चार पाच शिव्या हासडल्या..आणि माझ्याकडे वळून म्हणाला साहेब आता तरी सुरू करा...तोवर सूर्य दिसनासा होऊन काळा-कुट्ट अंधार पडला होता...मी घड्याळात पहात म्हटलं...सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करणं कायद्याने मना आहै..मी नाही करू शकंत...तसं त्या चौकीप्रमुखाने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला.." साहेब सकाळपासून जेवलो पण नाही..सगळ्यांना घेऊन ये , आणून सोड ह्यातंच सगळा वेळ गेला...मी सोडून जागेवर कुणीच नाही...आज लेकराच्या शाळेत कराचा कार्यक्रम होता...जाता नाहि आलं तिकडेपण...पलिकडच्या गावात दारूबंदी असूनदैखील दारू विकताना कुणीतरी सापडलाय...गावकरी घेऊन आलेत त्याला स्टेशनात...असं नका करू..हवंतर पाया पडतो तुमच्या " म्हणून तो वाकलाच....त्याला मधेच थांबवत मी म्हटलं, ठीक आहे पण लाईटच काय करायच...?? थोडावेळ डोकं खाजवून मग त्यानैच ऊपाय शोधला...दोन पोलीस जीप ऊभ्या करून त्यांच्या लाईट्स सुरू करून दिल्या आणि अशाप्रकारे या क्रुत्रीम प्रकाशात आमचं शवविच्छेदन सुरू झालं...
                        सोबतीला दिलेला सिनिअर डाॅक्टर BAMS  होता...ऐक असा डाॅक्टर मला मार्गदर्शन करणार होता, ज्याने हा विषंय आयुष्यात कधीच अभ्यासला नव्हता...मग म्हटलं जाऊदे स्वतःच सुरूवात करू...मी सांगेल तशी तो कर्मचारी चिरफाड करत होता..आवश्यक त्या गोष्टी माझ्या वहीत मी टिपंत होतो...असं हे साधारण तासभर चाललं..नियमाप्रमाणे मी म्रुतदेहाचा viscera जतन करून पुढे पुण्याला पुढील तपासणीसाठी पाठविण्याची व्यवस्था केली..आणि आवरतं घेतलं..पोलीस चौकीप्रमुखाने पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था केली..त्याचे आभार मानून निघालो..घरी पोचतो तोच तालुकाप्रमुखाचा फोन...काय वाटतंय...?? म्हटलं प्रथमदर्शनी तर अॅसिड हल्ला वगैरे वाटंत नाहिये..decomposition changes होते ते आणि त्यामुळे पूर्ण शरीरावर blisters,रक्त साकळून तयार झालेले काळे डाग वगैरे होते...मग म्हणाला r u sure doctor ?? if u need ny help u can ask me..यावेळी मात्र मीच चिडून म्हटलं त्याला, सर मला गरज नाहिये..खात्री आहे..दोन तीन दिवसात रिपोर्ट जमा करतो..रात्रभर जागून सगळी जुनी पुराणी पुस्तकं चाळून रिपोर्ट तयार केला...बंंद लिफाफ्यातला तो रिपोर्ट दुसर्‍या दिवशी पोलिसांच्या ताब्यात दिला...मी माझा अहवाल दिलाय...पुण्याच्या तपासशाळेचा अहवाल आज पाच वर्षांनंतर अजूनही प्रतिक्षेत आहे...
                       तर मित्रांनो सांगायचा मुद्दा हा की आजही काही मोजकी मोठी वैद्यकीय महाविद्यालयं सोडली तर बहुतेक ठिकाणी शवविच्छेदनातील तज्ञ डाॅक्टरांची वानवाच आहे...पुरेशा सुविधा...म्रुतदेह संवर्धन केंद्रे,रासायनीक तपासणी केंद्रे फक्त आणि फक्त पुणे किंवा मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणीच ऊपलब्ध आहेत...त्यातून त्यांच्यावर पडणार्‍या बोजातून पाच पाच वर्षै त्यांचे अहवालंच पुरवले जात नाहीत....ऐकंदरीत काय तर शवविच्छेदनाचा अहवाल सदोष असू शकतो...ऐखाद्या गुन्हेगाराचं अथवा संपूर्ण केसचंच भवितव्य या अशा सदोष अहवालामुळे पूर्णतः बदलू शकतं....होणार्‍या विलंबाला किंवा चुकीच्या निर्णयांसाठी आपण पोलिस यंत्रणा,न्यायव्यवस्था यांनाच दोषी ठरवंत असतो पण या ईतर अज्ञात पण तितक्याच महत्वाच्या कारणांकडे मात्र सरकारपासून सगळ्यांचंच दुर्लक्ष झालंय....असौ ही व्यवस्था सुधरेल तेंव्हा सुधरेल...वाट बघण्याव्यतिरीक्त सध्यातरी आपण काहीच करू शकंत नाही...पुढे पदव्युत्तर अभ्यासासाठी रूजू होण्यानिमित्त सरकारी नोकरी सोडली...मी केलेलं हे पहिलं व शेवटचं शवविच्छेदन...कायमस्वरूपी अनुभवाच्या गाठोड्यात घर करून राहिलेलं....
                      

                                   -©-निरागस

Saturday, 1 July 2017

अडगळ

मानवी भावनांना,ईच्छा,आकांक्षा अन् ऊमेदीला..
ऐकरूप होऊ पहाणार्‍या मनांना दुभंगणारी जातीची अडगळ....


ईवल्याशा खांद्यांवर ईमारतीऐवढ्या पुस्तकांचं ओझं लादणारी..
कोवळ्या मुलांचं बालपण कोमेजून टाकणारी शिक्षणाची अडगळ....


पोटच्या पिलाच्या पंखातलं बळ कमी करणारी,त्याला स्वतःचं अस्तित्वंच  सापडू न देणारी..
प्रसंगी परावलंबी बनवणारी मायेची अडगळ....


हातात हात घालून भरचौकात मिरवणारी,सूर्य-चंद्राची भूरळ घालणारी..
खर्‍या-खोट्याचा आपसूक विसर पाडणारी,प्रेमाची अडगळ....
                                 -©- निरागस