मानवी भावनांना,ईच्छा,आकांक्षा अन् ऊमेदीला..
ऐकरूप होऊ पहाणार्या मनांना दुभंगणारी जातीची अडगळ....
ऐकरूप होऊ पहाणार्या मनांना दुभंगणारी जातीची अडगळ....
ईवल्याशा खांद्यांवर ईमारतीऐवढ्या पुस्तकांचं ओझं लादणारी..
कोवळ्या मुलांचं बालपण कोमेजून टाकणारी शिक्षणाची अडगळ....
कोवळ्या मुलांचं बालपण कोमेजून टाकणारी शिक्षणाची अडगळ....
पोटच्या पिलाच्या पंखातलं बळ कमी करणारी,त्याला स्वतःचं अस्तित्वंच सापडू न देणारी..
प्रसंगी परावलंबी बनवणारी मायेची अडगळ....
प्रसंगी परावलंबी बनवणारी मायेची अडगळ....
हातात हात घालून भरचौकात मिरवणारी,सूर्य-चंद्राची भूरळ घालणारी..
खर्या-खोट्याचा आपसूक विसर पाडणारी,प्रेमाची अडगळ....
खर्या-खोट्याचा आपसूक विसर पाडणारी,प्रेमाची अडगळ....
-©- निरागस
No comments:
Post a Comment