" परवा रविवारी मित्राचे नातेवाईक रूमवर आल्याने कंटाळून रुमबाहेर पडलो,पण जायचं कुठे...?? थोडाथोडका नव्हे तर दोनेक तास वेळ वाया घालवायचा होता...मग काय ईथल्याच जवळच्या ऐका हनुमान मंदिरात जाऊयात म्हटलं...मंदिराबद्दल ऐकून होतोच,पण वर्ष दीडवर्षात कधीच जाणं झालं नव्हतं...म्हणून मग म्हटलं चला आज जाऊयात बजरंगबलीच्या दर्शनाला...मंदिरात जाऊन दर्शन घेतलं व नंतर तिथल्याच ऐका पारावर जाऊन बसलो...
हळूहळू लोकं जमा होत गेली आणि पारावर माझ्या अवतीभोवती आठ-दहा वयोव्रुद्ध लोकांचा घोळका जमला...छान हास्यकल्लोळ सुरू होता..माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने मीही मग खिशातील HeadPhone काढून त्यावर गाणी वगैरे ऐकत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला...मग त्यांच्यातल्या ऐकाने सगळ्यांसाठी चहा मागवला,चहाचं निमित्त झालं आणि मी चहा पीत नाही हे सांगायला म्हणून मी कानातले HeadPhone काढले...
तर त्या घोळक्यातले सगळ्यांची फिरकी घेणारे राणे नावाचे ऐक सद्ग्रस्थ अलगद माझ्याशेजारी येऊन बसले आणि त्यांनी माझी विचारपूस केली...कुठून आहात..?? नाव काय...?? अरे वाह,डाॅक्टर असून मंदिरात कसे...?? तेही ईतका वेळ वगैरे वगैरे शंभर प्रश्न त्यांनी मला विचारले..मीही केवळ हसून सगळ्या प्रश्नांना निव्वळ टाळायचा प्रयत्न केला...मी सहसा कुण्या अनोळख्या माणसाबरोबर ऊगाच आपलं ज्ञान पाजळायला जात नाही,पण ईथे समोरूनच प्रश्नांचा ऐवढा भडिमार होता की दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता...
मग त्यांनी स्वतःची ओळंख करून दिली...मी कणकवलीचा,राणे...म्हणजे ९६ कुळी मराठा...पूर्वाश्रमीच्या सो काॅल्ड " राणा " घराण्यातील वगैरे वगैरे जाहीरातबाजी त्यामागून आपसुकंच आली..तोंडातून निघणार्या प्रत्येक शब्दातून स्वतःच्या जातीबद्दलचा अहंकार ऊसासे घेऊन बाहेर पडंत होता...माझ्यापुढे ऐकण्याचं ढोंग करण्यावाचून काहीऐक पर्याय शिल्लक नव्हता..आणि खरं विचाराल तर मला या अशा नतद्रष्ट लोकांच्या मनातील भावविष्व जाणून घ्यायला खरंच खूप आवडतं...कुणाच्या मनात काय चुकीचं चाललंय ..?? हे माहिती झाल्याशिवाय त्यावर ऊपाय तरी कसा शोधून काढणार...??
मग आम्ही आजवर आमचं खानदान कसं प्युअर ठेवलंय...आत्ता नुकताच आमच्या ऐका दूरच्या पाहुण्याने आंतरजातीय विवाह करुन आम्हा सर्वांचं नाव कसं धुळीस मिळवलं आणि आम्ही सर्वांनी त्याला समाजातून बहिष्क्रुत करुन कसा धडा शिकवला वगैरे गोष्टी ते अगदीच समरस होऊन मला सांगत होते...ऐव्हाना माझी हे सगळं ऐकण्याची सहनशीलता संपत आली होती पण केवळ त्यांच्या वयाचा मान ठेवून व माझ्या अडचणीमुळे मला घरी परतता येत नसल्याने , मी त्यांची ही असंबद्ध बडबड ऐकत होतो... कदाचित त्यांनीही माझ्या चेहर्यावरील भाव ओळखले,थोडीशी विश्रांती घेऊन दबक्या आवाजात त्यांनी मला विचारलं,सर तुम्ही कोणत्या जातीचे...??
ईतका वेळ मी मला बोलायची संधी कधी मिळतेय या विचारात होतो,आणि हा तर माझ्यासाठी सरळ सरळ फुलटाॅसंच होता..याला ग्राऊंडच्या बाहेर टोलवणे अगदीच गरजेचे होते...नव्हे ते मी माझे आद्य कर्तव्य समजतो...हातातला मोबाईल खिशात ठेवंत मी त्यांना म्हणालो,काका मी डाॅक्टर आहे आणि माझ्या पाहण्यात डाॅक्टरला जात वगैरे नसते...मी माणसाची योग्यता पहातो आणि माणसाची योग्यता त्याच्या विचारांवरून ठरते जातीवरून नाही....
ऐव्हाना काका बधीर झाले होते,ते तोंड वाकडं करून पायात चपला घालंत घालंत पुढे म्हणाले,जाऊद्या तुम्हाला नाही कळणार,आरक्षणामुळे आम्ही किती सहन केलंय ते ...त्यांच्या पायातील त्या फाटक्या चपलांकडे पाहंत मी म्हणालो,काका मी पण तुमच्याच जातीचा आहे..पण मी मेहनंत करतो,रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो..चांगल्या लोकांमधे रहातो,चांगली पुस्तकं वाचतो आणि चांगले विचार जोपासण्याचा प्रयत्न करतो..मग तर ते अवाक् होऊन माझ्याकडे पहातंच बसले...भोवळ येऊन जमीनीवर पडायचे काय ते बाकी होते...त्यांच्याशी अधिक काही वाद घालायच्या भानगडीत न पडता मी तडंक मंदिरातून बाहेर निघून आलो....
अंगात चुरगळलेला सदरा,पायात फाटकी चप्पल घातलेला माणूस ,स्वतःच्या जातीचा ईतका माज करून किती सहजरीत्या दुसर्यांना कमी लेखंत असतो नाही का..??आणि याचंच मला अतिशय आश्चर्य वाटतं...ईतरांनी कष्ट करून मिळवलेलं यश यांच्या जातीसमोर येऊन सपशेल फोल ठरतं...कीव येते मला अशांची...ही अशी लोकं स्वतः आयुष्यात काहीही करीत नाहीत आणि आपलं अपयश झाकून ठेवण्यासाठी ते दरवेळी षंढासारखे आपल्या जातीच्या मागे जाऊन लपंतात...
ही केवळ ऐक प्रातिनिधीक स्वरूपाची गोष्ट झाली,असे नग तुम्हाला पावलोपावली पहायला मिळतील...तर अशांना मिळतील तिथे,शक्य तितक्या वेळा अपमानित करा...त्यांना त्यांची पात्रता दाखवून द्यायला अजिबात कमी करू नका...समाजसुधारणा केवळ पुस्तकं लिहून अथवा वाचून होत नसते,त्यासाठी स्वतः हाती झाडू घेऊन गटारात ऊतरावं लागत असतंय....!!

-©- निरागस