" शिक्षणानिमित्त राजस्थानमधे तीन वर्ष राहण्याचा अनुभव घेता आला,त्यात मी पडलो स्त्रीरोगतज्ञ त्यामुळे मग त्यातल्या त्यात ईतर सहकार्यांपेक्षा माझा तेथील महिलांशी जास्त संबंध आला...त्यातलीच काही प्रासंगिक निरीक्षणे ईथे मांडतोय....
वसुंधराराजे यांच्यारूपाने राजस्थानला महिला मुख्यमंत्री मिळाला असला, तरी ईथल्या महिलांची अवस्था गोठ्यात बांधलेल्या गुरांपेक्षा काही वेगळी नाही...घरातील कोणत्याही निर्णयांमधे महिलांना विचारात घेतलं जात नाही..चूल आणि मूल याव्यतिरिक्त देखील महिलांची ऊपयुक्तता असू शकते, यावर येथील सुशिक्षित पुरूषांचादेखील विश्वास नाही,बाकी न शिकलेल्यांबद्दल काही न बोललेलंच बरं.. .
बर्याचदा घरातला पुरूष ऐकटाच ओपीडीत येऊन महिलांच्या आजारपणाविषयी विचारपूस करून जायचा,मग कधीतरी महिन्या दोन महिन्यांनी ऐखाद्या सुट्टीच्या दिवशी ऐखादी मोठाली गाडी करून घरातील व आजूबाजूच्या सगळ्या महिलांना ऐकत्र करून दवाखान्यात आणलं जायचं..तोपर्यंत सगळ्यांनी आपापली आजारपणं तशीच सहन करायची...अगदी सुरूवातीलाच सांगितलं जायचं फुकटात होईल तितकेच ऊपचार करा...त्यातून ऐखादीला काही मोठं आजारपण निघालंच ,तर सरळ त्या महिलेला तिच्या आई-वडिलांकडे पाठवलं जायचं आणि प्रसंगी मुलग्याचं दुसरं लग्न लावून दिलं जायचं,म्हणजे आजारपणासाठी लागणारे पैसेही वाचायचे आणि नवीन लग्नात भरभक्कम हुंडाही घेता यायचा....
आजकाल आपल्या देशात बालविवाह होत नाहीत असा गोड गैरसमज बाळगून असणार्यांनी फक्त ऐकदा माझ्यासोबंत राजस्थानला यावं...अगदी वीस ,बावीसाव्या वर्षी तीन चार मुलांना जन्म देऊन गर्भपिशवी काढून टाकावयास आलेल्या असंख्य महिलांना पाहून कित्यैकवेळा माझं डोकं सुन्न झालेलं आहे,तर कित्येकवेळा मी अक्षरश: ढसाढसा रडलोदेखील आहे..
बाजारात जाऊन क्रोसीनची गोळी घेणं जितकं सोप्पं आहे अगदी त्याच सहजतेने राजस्थानमधे लोकं गर्भपिषवी आॅपरेशन करवून घेण्यासाठी दवाखान्यात येतात...गर्भपिशवी काढणे ही आणि हीच ऐकमेव गर्भनिरोधंनाची पद्धत ईथल्या लोकांना माहिती आहे आणि यात सुशिक्षित अशिक्षित असा काही फरंक होत नसतो...सगळे ऐकजात ऐका माळेचे मणी..सूज्ञ डाॅक्टर म्हणून तुम्ही जर त्यास नकार दिलात तर ईतर दहा डाॅक्टर तीच शस्त्रक्रिया तुमच्यापेक्षा कमी दरात करून मोकळे होतात..घुंघट घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही,घरातील पुरूष मंडळी जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही या असल्या वातावरणात राजस्थानातील या स्रिया आपलं आयुष्य जगताहेत..
कुणीऐक निर्मला सितारामण संरक्षणमत्री झाली म्हणून,कुणीऐक प्रतिभाताई राष्ट्रपती झाली म्हणून आणि कुणीऐक ईंदिरा या देशाची पंतप्रधान झाली म्हणून शर्टाची काॅलर वर करून खूष होणारे आपण राजस्थानसारख्या कित्येक राज्यांमधे होणारी महिलांची कुचंबणा सोयीस्कररीत्या विसरून जातो...निर्मला सितारामण संरक्षणमंत्री होण्यापेक्षा या सार्या महिलांना घरात मिळणारी सापत्न वागणूक बंद व्हायला हवी...कारण महिला राष्ट्रपती असोत वा संरक्षणमंत्री या आमच्या भारतीय महिलांच्या हलाखीचं प्रतिनिधित्व करीत नाहीत...बोलण्यासारखं वा लिहिण्यासारखं खूप काही आहे,पण आता नुसतं लिहून अथवा बोलूनही चालणार नाही...प्रत्यैकाने आपापल्या घरातल्या,आॅफीसातल्या आणि संपर्कातल्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे...

-©- निरागस
No comments:
Post a Comment