" शाळेतला पहिला दिवस आठवतो काहो तुम्हाला..??,, हो, बालवाडीतला पहिला दिवस..ऊलट्या पायांनी चालत गेलेलो आपण सगळैचजण..रडतरडत..क्षणभरासाठी वाटूनदेखील गेलं मनात, की आई-बाबांना ईतके नकोसे झालोत का आपण.??.तुमच्यापैकी काही विसरलेदेखील असतील हे सगळं, पण मी नाही विसरू शकत...कारण माझ्या मास्तरसारखा हरहुन्नरी मास्तर सगळ्यांच्या नशीबात असूच शकत नाही...
माझं बालपण चिपळूण जवळच्या एका खेड्यात गेलं..घरची परिस्थिती सामान्य होती...म्हणजे मुबलक जेवण मिळायचं,अंगभर घालायला कपडे मिळायचे आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासाबाबतीत कोणतीही तडजोड नसायची..सांगायचं कारण असं, की माझ्या शाळेतल्या निम्याहून अधिक मुलांना दोनवेळचं जेवण मिळायची भ्रांत असायची..कुणीतरी राजकारणी निवडणुकीच्या मुहुर्ताला पाच वर्षांतून कधीतरी गणवेशाचं वाटप करायचा...मग पुढील पाच वर्षै चिंध्या झाल्या तरी मुलांना घरातून नवीन गणवेश मिळायचे नाहीत...पण तिथे श्रीमंत गरीब असा भेदभाव नव्हताच मुळी कधी..सगळ्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतंच जायची...हो खरंच..आमच्या गावात आजही ते काय म्हणतात ना junior kg,senior kg हे असले फाजील लाड पसरलेले नाहीत...
असो,तर पहिल्या दिवशी माझा बाप मला सोडायला आलेला शाळैत..शाळेच्या आवारात गेलो तर संपूर्ण शाळा शेणाने सारवण्याचा कार्यक्रम चालू होता...टोकदार नाकाचा,घार्या डोळ्यांचा, विजार मांडीपर्यंत दुमडलेला एक अनोळखी माणूस हातात खराटा घेऊन मुलांचं नेत्रुत्व करत होता..बाप जवळ जाऊन विचारता झाला..,अमुक अमुक गुरूजी कुठे भेटतील..??,हातातला खराटा बाजूला टाकत, विजार खाली घेत तो माणूस ऊत्तरला,बोला मीच...!! बापाचा लगेच पुढचा प्रश्न.., मुलांना असं कामाला जुंपणं सरकारदरबारी मान्य आहे का..?? साहेब ..!! पोरं स्वतःचं घर समजून करताहेत काम..स्वतःच्या घराची निगा राखणं चुकीचं असतं का कधी..?? बापाचा विश्वास बसला शाळा कशीही असूदे मास्तर अवलिया आहे..आणि बाप माझा हात सोडून घराकडे चालायला लागला..
पहिले काही दिवस केवळ रडण्यात गेले..नंतर मात्र ओळखी झाल्या,मित्र,मैत्रिणी झाले..मास्तरशी परिचय झाला आणि मनातली भीती दूर झाली..पहिली ते चौथी चार ईयत्तांना मिळून ऐक मास्तर..विश्वास नाही बसंत..?? पण खरंच...चारही ईयत्तांना तो ऐकटाच शिकवायचा...मध्यभागी स्वतः बसायचा आणि सभोवताली विद्यार्थ्यांना बसवायचा..तल्लीन होऊन शिकवायचा...पोरांना जीव लावायचा..पार जीव ओतून द्यायचा प्रत्येक गोष्टीत..ऐखादी गोष्ट केवळ करायची म्हणून कधीच केली नाही त्याने...दहाची शाळा असायची पण मास्तर आठ वाजताच हजर.., दहा किलोमीटर चालंत यायचा.., सायकल ढकलंत ढकलंत आणायचा पण चालवायला कधीच वर बसला नाही..चालवायची नसते तर आणायचा कशाला ?? आज प्रश्न पडतो मला..तेंव्हा मनात आला असता प्रश्न,तर कदाचित ऊत्तर मिळालं असतं..सायकलला डबा बांधला की निघाला मास्तर..
ईतिहास शिकवण्यात मास्तरचा हातखंडा,प्रसंग असे काही वर्णन करून शिकवायचा की वाटायचं ऊचलावी तलवार आणि जावं पावनखिंड लढवायला...तो काही फार मोठा ग्रेट शिक्षक म्हणून माझ्या लक्षात नाही..पण तो एक आगळावेगळा,कलंदर,जगावेगळा आणि अदभुत माणूस म्हणून माझ्या लक्षात आहे...शाळैतल्या प्रत्येक पोरावर मास्तरचा विलक्षण जीव..शाळा आणि शाळैतली मुलं यापलिकडे त्याचं जगंच नव्हतं मुळी दुसरं..एखादा मुलगा दोन- तीन दिवस शाळेत नाही आला की मास्तर चौकशी करायला घरी पोचायचा...शाळैचा पट कमी होऊ नये यापेक्षा गावातल्या गरीबांच्या मुलांनी शिकावं यावर त्याची भिस्त जास्त असायची...
ऐकदा विज्ञान मेळाव्यात भाग घ्यायला घेऊन गेला जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हा दोघा-तिघांना..काहिबाही करून घेतलेलं आमच्याकडून त्यानं त्याला जमेल तसं..त्याच्या बुद्धीला पटेल तसं...जिल्ह्याचा सरडा येऊन आमची थट्टा करून निघून गेला...आम्ही तिसरी चौथीतली नाकाचा शेंबूड पुसता न येणारी पोरं काय बोलणार..?? हसं झालं आमचं..मास्तर दूरूनंच पहात होता...पण आज तो काहीतरी वेगळं करणार याची मला आतून चाहूल लागली होती...त्याच्या कपाळावरची धमणी कधी नव्हे ती धडाधडा ऊडंत होती..बक्षिस समारंभ सूरू झाला..बक्षिस वाटपानंतर मास्तर ऊभा राहिला, मला बोलायचंय म्हणाला ऊपस्थित असलेल्या सगळ्यांशी...आणि परवानगी घेऊन बोलायला ऊभा राहिला...आणि काही बोलायच्या आतंच रडायला लागला...मग रडू आवरंत कठोर शब्दात म्हणाला..शाब्बास..!! व्वा काय प्रोत्साहन दिलंय मुलांना...याचा त्यांना त्यांच्या ऊर्वर्रीत आयुष्यात झालाच तर फायदाच होईल...मी ईतिहासाचा शिक्षक आहै,मला नाही कळंत विज्ञानातलं फारसं..सरकारकडून एक छदाम मिळालेला नाहिये आम्हाला मदत म्हणून.. स्वतःची पदरमोड करून घेऊन आलो ईथवर यांना ..जिंकायला नव्हे तर तुमच्यासारखी कागदी माणसं दाखवायला..!! मग आमच्या तिघांकडे बघून म्हणाला,बाळांनो ही अशी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतील,टोचून बोलतील,अपमान करतील ,तेंव्हा हरून जाऊ नका...माझी आठवण काढा, डोळे बंद करा व पुढे चालंत रहा..रस्ता संपत नाही तोवर चालत रहा..!! आवाज ऐकू येत नाही तोवर चालू रहा..!! चालून चालून छाती फुटत नाही तोवर चालत रहा...त्या तिघांपैकी ऐक अवेळीच वारला काहीसा आजार होऊन,दुसरा चिपळूणातल्याच एका मोठाल्या हाॅटेलात भांडी घासायचं काम करतो आणि तिसरा मी आज डाॅक्टर झालोय...
नंतर शाळा सुटली तशा भेटीगाठी कमी झाल्या...पण रस्त्यात भेटला की आवर्जून थांबायचा..विचारपूस करायचा..पोरांनो परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही पण तुम्ही मात्र भरपेट शिका..!! सांगायला विसरायचा नाही अजिबात...मग घरापासून लांब कोल्हापूरला आलो mbbs च्या शिक्षणासाठी..मास्तर कुठेसा आजारी होता त्या दरम्यान, सुट्टीवर होता...घरी निरोप ठेवला...आठवणीत होता ,पण भेटीगाठी पूर्णतः थांबल्या होत्या...मग ऐकेदिवशी मास्तर थेट माझ्या काॅलेजच्या वाचनालयात आला...विचारत विचारत..मला मित्राने फोनवर सांगितलं तुला शोधतंय कुणीतरी..त्याने केलेल्या वर्णनावरून पक्क माहिती पडलं मास्तरंच असणार...!!! अंगावरल्या कपड्यांनिशी जसा होतो तसा धावंत आलो..बघतोय तर मास्तर आंब्याच्या झाडाखाली कापंड पसरवून झोपला होता...घोरत होता..बसलो तिथेच त्याच्या पायाशी तासभर...नाही ऊठवलं...माहिती नव्हतं शेवटचा कधी झोपला असेल ईतका निवांत...त्याचाच पाय लागला मला आणि तो दचकून जागा झाला...दोघांचेही डोळे पाणावले...मी विचारलं मास्तर ईकडे कसं काय..?? तर म्हणाला माझ्या गुरूंकडे न्यायचंय तुला...मला काहीच कळेना...मला घेऊन गेला कुठल्याशा खेडेगावात त्याच्या गुरूंकडे...त्यांच्या हस्ते सत्कार केला माझा..मग त्या दोघांच्या अध्यात्मावरल्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या...मला काहीचं कळंत नव्हतं..मी केवळ मास्तरकडे ऐकटक बघत होतो..अधूनमधून डोळ्यांतल्या अश्रूंना वाट करून देत होतो..
डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं..नसेल माझी शाळा माझ्या ईतर मित्रांच्या शाळेऐवढी मोठी..,हो मी शिकलोय शेणाने सारवलेल्या, डोक्यावर पत्रे घातलेल्या शाळेत...पण हे जे काही मी मिळंवलंय ते अद्वितीय आहै...तुमच्या लाखो रूपये डोनेशन घेणार्या शाळांमधे हे प्रेम,ही आपुलकी असूचं शकत नाही...माणूस म्हणून घडलोय मी ईथे...आयुष्य काय असतं...ते ईथे ऊमजलंय मला...आजही मास्तरचा मधेच फोन येतो...ऐकायला कमी येतं त्याला आजकाल...पण मनात काळजी असते, आपला विद्यार्थी ठीक तर आहे ना...?? कुठे सापडतात हे असे शिक्षक..?? ही असली मोह,मत्सर,लोभ न शिवलेली माणसं..?? सांगा ना..!!..काय करायचं ह्यांचं.?? कसं सांभाळून ठेवायचं यांना..?? बंदिस्त काडेपेटीच्या डब्यात कोंडलेल्या मुंगळ्यासारखं आयुष्य जगणारे आपण या अशा अद्भुत माणसांकडून काहीतरी शिकणार आहोत का...?? "

-©- निरागस
Khupach chan....!!
ReplyDelete