" बर्याच दिवसांपासून डोक्यात होता विषय.,विषय म्हणजे अनुभवंच म्हणा की..!! बर्याच म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी आठ नऊ वर्षै..आज नको, ही योग्य वेळ नाही,ऊद्या बोलू .!! करत करत ईतके दिवस वाया गेले..का तर मित्रांना काय वाटेल..?? तुटणार तर नाहीत ना ?? वगैरे वगैरे...पण हल्ली मनावरंच घेतलंय मी तसं..जे ईतर कुणीही बोलत नाहीत, ते आपण बोलायचं...सगळ्यांच्या फाटक्यात पाय घालायचा..दररोज , दिवसभर वेड्यासारखं वागायचं...लोकं काय म्हणतील ?? ,दुखावली तर जाणार नाहीत ना..?? यासारख्या तकलादू प्रश्नांना मूठमाती द्यायची..आणि म्हणून लिहितोय यावर..
बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती..बापाची ईच्छा होती पोराने डाॅक्टरंच व्हावं..आणि मला जे आयुष्यात करायचंय त्यातून माझ्या पोटापाण्याची काही सोय होईल असं मलाही वाटंत नव्हतं ,म्हणून मग आधी डाॅक्टर होऊ नंतर आपलं काय ते करू, या निर्धाराने मुंबईत दाखल झालो...मुंबईत विले-पार्लै भागात महिना दोन महिने बापाने राहण्याची सोय केली होती..आता खरी गोष्ट सुरू..सोसायटीमधे बहुतांश नव्हे तर सगळैच ब्राह्मण...खोली भाड्याने देतानाच बजावण्यात आलं होतं मांस,मासे घरात आणून खाल्लेले चालणार नाहीत वगैरे वगैरे..मीही अभ्यासासाठी आल्याने या क्षुल्लक अटी मान्य केल्या आणि अभ्यासाला सुरूवात झाली...mbbs ला प्रवेश मिळवायचा याच ईर्षैने अभ्यास सुरू झाला...
शेजारी कोण राहतं कळायला पंधरा-वीस दिवस गेले..दोन शेजारी लाभलेले...ऐक महाप्रौढी आणि दुसरा तितकाच समंजस...आणि या दोघांमधे राहणारा,घरातून पहिल्यांदा बाहेर राहणारा, सतरा अठरा वर्षांचा मी..घरी आईने जशा चांगल्या सवयी लावल्या, तशा वाईट सवईदेखील जडवल्या..जसं आजही मला जेवण नावाचा प्रकार बनवता येत नाही...maggy बनवण्यापुरतंदैखील पाककौशल्य आमच्यात नाही...कपड्यांना ईस्त्री करतो कशीबशी पण त्यांची घडी घालता येत नाही वगैरे वगैरै..आलं असेल लक्षात तुमच्या...तर अशा या माझा अभ्यास करत करत ईतर गोष्टी करतानाचा संघर्ष शेजारच्या काकूंच्या लक्षात आला..तू आमच्याकडे जेवायला येत जा..!! असं त्यांनी मला स्वतःहून बजावलं...मी नको म्हटल्यावर म्हणाल्या डब्याचे पैसे आम्हाला देत जा हवं तर..!! जर तुला पटंत नसेल तर..मग मीदेखील विचार केला..घरचं जेवण मिळणार असेल तर काय वाईट आहै..आणि हळू हळू जेवणासकट,कपडे धुणे,ईस्त्री वगैरे वगैरे माझ्या गरजेच्या सार्या गोष्टी त्या काकू करू लागल्या...त्याचा मोबदलादेखील घेत होत्या...एकंदरीत कसं छान सुरू होतं...
मग अचानक ऐके दिवशी त्यांनी बोलावून सांगितलं..की ऊद्यापासून जेवण वगैरे देता येणार नाही तुला...मला काही कळायला मार्ग नाही..न रहावून मी विचारलं माझं काही चुकलं का...?? त्या काही न बोलताचं निघून गेल्या...दोनैक दिवसानंतर त्यांच्या मुलाकडून मला कळलं ,की मी ब्राह्मण नसल्यामुळे त्यांनी माझे कपडे धुवू नयेत किंवा माझी ईतर कामे करू नयेत वगैरे त्यांना सोसायटीतल्या लोकांकडून बजावण्यात आलं होतं..आणि यावर चक्क चर्चा होत होती सोसायटीमधै..किती बिनडोक लोकं असू शकतात नाही का..?? .क्षणभर डोकं सुन्न झालं..रडावसं वाटलं..जातीभेदाबद्दल ऐकलं होतं,वाचलं होतं पण तो अनुभवला नव्हता ,कधीच...कधी विचारदैखील केला नव्हता की हे असं ईतकं भयंकरपणे आजही रूजवलं आणि पोसलं जातंय...सोसायटीत काहीही कार्यक्रम असेल तर मला सोडून सगळ्यांना बोलावलं जायचं...हातात दिलेल्या निमंत्रण पत्रिका मी ब्राह्मण नाहिये म्हटल्यावर काढून घेतल्या जायच्या...या व अशा अनेक गोष्टी...
आत्ता हिंमत करावी कुणी,दात घशात घालीन..पण तेंव्हा लहान होतो...फार विचित्र वाटायचं...आपल्यासारखीच दिसणारी पण आपल्यातली नसणारी माणसं,पदोपदी त्यांच्या तुच्छतापूर्ण नजरा, पचवणं किती अवघड होतं त्याकाळी..मग काही दिवसांनी शेजारच्या काकूंच्या मनाला पुन्हा पाझर फुटला आणि त्यांनी पुन्हा जेवणासाठी विचारलं..पण यावेळी मात्र मी साफ नकार दिला...स्वतःचे कपडे स्वतः धुवायला,ईस्त्री करायला लागलो...जेवणासाठी बाहैर खाणावळ बघितली...आणि अभ्यास केला..स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या ईर्षैनै..
गणरायाच्या क्रुपेने आज डाॅक्टर आहै..पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे वैचारीक गोष्टींवर बोलू अथवा विचार करू शकतो..मी जात पात मानत नाही..धादांत खोटं आहे हे...मूठभर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बहुतांश लोकांना वेठीस धरण्याचा त्यांच्या ईच्छा,आकांक्षा दडपण्याचाच हा प्रकार आहै..तसा मी खुल्या प्रवर्गात मोडतो...मलाच जर या गोष्टींचा ईतका त्रास सहन करावा लागत असेल तर वर्षानुवर्षै वाळीत टाकलैल्या,मंदिरात देवाचं दर्शन,विहिरीत पिण्याचं पाणी नाकारलं गेलेल्या माझ्या ईतर बांधवांचं दुःख आपण कधीतरी समजून घेऊ शकतो का..??आजच्या भारतात जातीयवाद नाही असं म्हणणारे ऐकतर गाढव आहैत किंवा अज्ञानी आहेत...आणि यात केवळ ऐकाच समाजाला दोष देण्यात अर्थ नाही...मराठ्यांचे आरक्षणासाठी निघणारे मोर्चै,त्याला प्रत्युत्तर म्हणून निघणारे दलितांचे मोर्चै हेदेखील तितकेच जातीयवादी आहेत...माझ्या संदर्भात म्हणाल तर मला कमीपणा दाखवणारे जसे ब्राह्मण होते तसेच किंवा त्याहून अधिक ब्राह्मण केवळ माझी गैरसोय न व्हावी म्हणून मला स्वतःच्या घरी जेवायला वाढणारे होते..मूठभर नालायक लोकांच्या अनुभवावरून संपूर्ण समाजाला दोषी ठरवायचं, की चांगल्या लोकांकडे अधिक लक्ष देऊन चांगल्या प्रव्रुत्ती अधिकाधिक पुढे न्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न...!! "

( तळटीप - ब्राह्मण्यवादाला विरोध आहे,ब्राह्मणांना मुळीच विरोध नाहि )
-©- निरागस
No comments:
Post a Comment