Tuesday, 13 June 2017

मोरया

                       गणेशोत्सवाला साधारण चार पाच महिने शिल्लक राहिले, की आमच्या घरी तयारी चालू होतै...चर्चा चालू होते ,की यावेळी नेमकं वेगळं काय करायचं..?? कोणती मूर्ती आणायची वगैरे वगैरे..तसा मी अगदी अलिकडे म्हणजे चारऐक वर्षांपासून साजरा करतोय गणेशोत्सव...म्हणजे आधीदेखील करायचो पण घरी मूर्ती आणून वगैरे नाही...ईतरांच्या घरी आरतीला वगैरे जाणं..सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती बघायला जाणं..त्यांनी प्रयत्नपूर्वक बनवलेले देखावे बघणं...त्यातल्या चुका काढणं..ईथवरंच आमचं गणेशप्रेम सीमित होतं...पण आज जवळपास मागील चार - पाच वर्षात माझ्या विचार करण्यात..किंवा मानन्या न मानण्यात ईतका फरंक पडलाय,यावर माझांच कधीकधी विश्वास बसंत नाही...
                      ईतर अनैकविध देव असताना गणपतीच का...?? याचं खरंच काही विशिष्ठ ऊत्तर असेल असं वाटंत नाही मला..पण तरीही आठवून जर सांगायचंच म्हटलं तर...साधारंण चारेक वर्षांपूर्वी ,म्हणजे mbbs संपल्यावर, मी आयुष्याचा गांभीर्याने विचार करणं चालू केलं.. आयुष्य म्हणजे काय..?? देव खरंच अस्तित्वात असतो का..?? आईवडीलांचं आयुष्यातलं स्थान काय..?? माणसाचं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे ..?? वगैरे वगैरे...फार कमी लोकं होती त्यावेळी माझ्या आयुष्यात, ज्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकत होतो या सगळ्याबद्दल...अगदी घरीसुद्धा ईतकी मोकळीक नसायची..ऐकटं वाटायचं अगदीच..अशात मला हा भेटला..मजेशीर वाटायचाचं तो मला पहिल्यापासून..म्हणजे बघा ना माणसाचं धड आणि त्यावर हत्तीचं डोकं..आणि चक्क सोंड सुद्धा..बरं बाकी सगळे देव बघा कसे पीळदिर शरीरयष्टी असलेले..आणि या माझ्या गणूचं मात्र पोट बाहैर आलेलं..अगदी तुमच्या माझ्यासारखं..
                       अभ्यास करताना समोर याला आधी बसवायचो माझ्यासमोर अभ्यासाला...मग वाचायचो रात्रभर...खोड्या काढायचा माझ्या...सोंडेने गुदगुल्या करायचा मला..पण रात्रभर जागायचा माझ्यासोबंत, कोणतीही तक्रार न करता..कोणतं पुस्तंक वाचायचा.. ?? गणितं सोडवायचा की कोडी..? माहिती नाहि..मधैच पेंगायचा..भूक लागली की लोळायचा...ऐकंदरीत काय तर मी या माझ्या मित्राबरोबर मोकळेपणाने बोलू शकत होतो..माझ्या अडीअडचणी,खाजगी गोष्टी,आवडीनिवडी सगळं सगळं सांगायचो याला..आणि याचे कान आणि पोट ऐवढं मोठं, की हा सगळं ऐकून घ्यायचा आणि स्वतःकडेच ठेवायचा..ऐकंदरीत काय तर मला माझ्या आयुष्यभराचा सवंगडी मिळाला याच्यारूपाने..आणि मग दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे आमची मैत्री अशीच बहरंत गेली...आणि  ऐकेदिवशी मी घरी विषय काढला, की याला आपण वाजंत गाजंता घरी आणूयात का..?? वडिलांनी बजावून सांगितलं...गणपती म्हणजे ऊग्र,फार काळजी घ्यावी लागते..तुझाच्याने होणार असेल, तर तू कर..नाहीतर राहूदेत..मला ऐवढंच हवं होतं..मग मी पुढाकार घेतलाआणि पाच वर्षांपूर्वी आमच्या घरी रीतसर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली...
                       त्याला ही गोष्ट कळल्यावर रागावला माझ्यावर..म्हणाला मित्र ना आपण..?? मग ही असली थेरं कशाला..?? मी तुझा हात पकडून तुझ्या शेजारी बसतो रोज..गळ्यात गळा घालून आपण बागडतो ऐकत्र.. मग कशाला मला ऊगाच त्या पाटावर बसवतोस..?? त्या रंगीबेरंगी झालरी,सुवासिक ऊदबत्या,चौरंग यांमधे जीव घुटमळतो माझा..नको तो अत्याचार असं वाटतं..मलादेखील क्षणभर पटलं त्याचं..मग मी समोर बसवलं त्याला..दोन्ही हात हातात घेतले त्याचे आणि समजावलं त्याला..म्हटलं अरे तू ऐवढा मोठा प्रकांडपंडीत,सगळ्या जगाचा रक्षणकर्ता..आमची सगळ्यांची ऐवढी मदत करतोस...म्हणून या तुझ्या ऊपकारांतून ऊतराई होण्यासाठी म्हणून करतो रे आम्ही हे सगळं..तुला पटवून द्यायला..!! की मित्रा आम्ही तुला ग्रुहीत धरंत नाही...तु खरंच खूप महत्वाचा आहेस आमच्या सगळ्यांसाठी..आणि तुलारे काय झालंय..?? गोडगोड मोदंक मिळतात ना तुला खायला..?? मग..?? मोदकांचं नाव काढताचं हसला बिचारा...!!
                           नित्यनेमाने न चुकता दोन दिवस आधिच मी घरी पोचतो..घराची साफसफाई करण्यापासून ते रंगरंगोटी,देखावे सगळं सगळं स्वतः करायचा प्रयत्न करतो..नसेल जमंत ईतरांईतकं चांगलं..पण जसं आणि जितकं जमेल तितकं स्वतः करतो...त्याला घरी आणताना कसलं भारी वाटतं..खरंच..पाच दिवस तो घरी असला की घरातून पाय बाहेर निघंत नाही..रात्री हाॅलमधे त्याच्या समोरंच झोपतो चटई टाकून.. पणतीच्या मंद प्रकाशात त्याच्याकडे ऐकटक बघता बघता झोप कधी लागते कळंतच नाही..असं वाटतं की हे चिरकाल असंच चालू रहावं...संपूच नये कधि...मग असेच बघता बघता ते पाच दिवस संपतात आणि विसर्जनाचा दिवस ऊजाडतो...त्या दिवसाचा प्रत्यैक मिनिट खरंतर तासाऐवढा वाटतो...आता ही गंमत,हे आपलेपण,आईवडील,नातेवाईकांची गजबज सगळं सगळं संपणार...या विचारांनीच मुळी गहिवरून येतं...वडीलांची सकाळपासूनंच घाई सुरू होते..लवकर जाऊयात .!! नंतर गर्दी होईल म्हणून...पण माझं मनंच तयार होत नाहि..शक्य तितका वेळ विसर्जन लांबवण्याचा निष्पाप प्रयत्न मी करतो..पण त्यालासुद्धा जायचीच घाई झालेली असते...त्याला पाण्यात बुडवताना मला मात्र गुदमरल्यासारखं होतं...चुकल्यासारखं वाटतं आणि जड पावलांनी मी माघारी फिरतो...
                     काय बोलायचं या माझ्या मित्राबद्दल...माझ्या प्रत्येक अडीअडचणीत माझ्या हाताला घट्ट पकडून माझ्याबरोबर तो सदैव ऊभा असतो...रस्ता पार करताना माझ्याबरोबर गर्दीत चालतो,भूक लागली की भरवतो मला,रडू आलं की घट्ट मिठी मारतो...देव असतो की नाही मला खरंच माहिती नाही...त्या वादातदेखील मला पडायचं नाही..माझ्यासाठी हाच माझा देव..हीच माझी श्रद्धा आणि हाच माझा आत्मा...!!


                                 -©- निरागस

5 comments:

  1. अप्रतिम लेखन... ज्युलीयस सीझर प्रमाणे मी ब्रुटस
    यु टू.... मी म्हणेन "राकेश तु पण"


    🌺🙏👍🇮🇳❤

    ReplyDelete
  2. सर्वोत्तम राकेश.....गणपती म्हणजे सर्वंचा हककाचा बाप्पा...सुखदुःखात नेहमीचा सोबती....फारच छान शब्दांकन

    ReplyDelete
  3. Khuppp chan Sir..... Kharch Ganu ahech tsa.... Very nice....👌👌🙏

    ReplyDelete