" घाबरू नका ही काही राजकीय किंवा संवेदनशील अशी पोस्ट नाही..पण हा प्रसंग मात्र नक्कीच खास,सांगण्याजोगा आहे आणि या प्रसंगाचा कर्ता आणि करविता दुसरा तिसरा कोणी नसून थेट पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब हा असल्यानेच या लेखाला त्याचंच नाव देणं मला संयुक्तिक वाटलं.. आजवरच्या माझ्या लिखाणावरून,विचारांवरुन तुमच्या ऐवढं निश्चित लक्षात आलं असेलं की मी त्या ईतर पुस्तकी डाॅक्टरांसारखा नाही..किंबहुना बनू ईच्छित नाही...व्यवसायाने डाॅक्टर असलो, तरीही माझी वैयक्तिक अशी राजकीय,सामाजीक मतं आहेत आणि मी ती मांडतोच..कधीकधी लोकं मला विचारतात हे असं कसं जमतं तुम्हाला..?? त्यांना मी नेहमी ऐवढंच सांगतो, की मी दहा वर्षांचा डाॅक्टर आणि तीस वर्षांचा माणूस आहे..तर हे वेगळेपण टिकविण्यासाठी मी माझे मित्रसुद्धा फार काळजीपूर्वक निवडतो..तर हा असाच mbbs करतेवेळच्या मित्रांसोबतचा ऐक किस्सा...
mbbs च्या दुसर्या वर्षातली गोष्ट..आमचं दुसरं वर्ष म्हणजे दीड वर्षाचं...दीड वर्षात शिकलेलं,वाचलेलं सगळं काही डोक्यात ठेऊन परीक्षच्या दिवशी ओकायचं..त्यात दुसरं वर्ष म्हणजे आम्ही organisers.. गॅदरींग,नाटंक,कल्चरल प्रोग्राम,स्पोर्ट्स वगैरे सांभाळता सांभाळता नाकी नऊ यायची...अभ्यासाच्या पुस्तकांशी माझं तसं विशेष कधि जमलंच नाही..मी पुस्तकं वाचायचो पण ती पुलंची,अत्र्यांची..कारंण त्यातून आयुष्य कळायचं...आम्ही वर्षभर सगळीकडे अडकायचो..हजेरीत,भांडणात,पाॅलिटिक्स मधे..काॅलेजची ब्लॅकलीस्ट तर कधी आमच्याविना बनलीच नाही..त्यात मी काॅलेजचा General Secretary..आमचा अभ्यासंच मुळी चालू व्हायचा युनिवर्सिटीच्या महिनाभर आधि...पण पास मात्र आम्ही व्हायचोच...अगदी नेहमी न चुकंता,तेही कोणतेही ग्रेसमार्क्स न वापरता...तर अशीच आमची युनिवर्सिटीची अंतिम परीक्षा चालू होती...पहिले तीन विषयांचे प्रत्येकी दोन पेपर होऊन केवळ Forensic Medicine चा शेवटंचा ऐक छोटासा पेपर शिल्लंक होता..रात्रभर जागून अभ्यास केला..सकाळी लवकर ऊठून अभ्यासाला बसणार तोच कुठूनतरी बातमी आली की मुंबईवर अतिरेकी हल्ला झालाय..घरी फोन लावून बातमीची खात्री केली..तेवढ्यातून आईने सल्ला दिलाचं,घरातून बाहेर निघू नकोस...मी खेकसलोच तिच्यावर,म्हटलं " अगं मुंबईवर हल्ला झालाय, कोल्हापूरवर नाही..आणि मी बाहेर नाही पडलो तर काय माझ्या रूमवर येणार आहे का पेपर,सकाळच्या वर्तमानपत्रासारखा...?? " आणि मी फोन ठेवला...
ऐव्हाना पूर्ण हाॅस्टेलभर बातमी पसरली होती...सगळीच मुलं ऐकत्र जमली..मुंबईच्या हल्ल्याचं दुःख होतंच पण जो तो आपल्या परीक्षेचं काय याच विचारात व्यस्त होता...कुणालाच काही कळंत नव्हतं..माझं तर डोकंच बधीर झालं होतं...रात्रभर वाचलेलं तर केंव्हाच सपाट झालेलं सगळं..तेवढ्यात मुंबईच्या ऐका मित्राचा निरोप आला की मुंबईत परीक्षा पुढे ढकललीये.."अरे पेपर तर महाराष्ट्रभर ऐकंच असतो..त्यांचा नाही तर आपला पण नाही.." अजून ऐकाचं डोकं चाललं..पण खात्री कशी करायची...मग सर्वानुमते ठरलं की काॅलेजच्या डीनला जाऊन विचारायचं..झालं तर ,आम्ही सगळी मुलं सकाळ सकाळी डीन बंगल्यावर...दाराची बेल वाजवली तर डीन डोळे चोळंत लुंगी सावरंत बाहेर आला..मुंबईवर हल्ला झालाय हेच मुळी त्याला आमच्याकडून कळालं.. " काही कॅन्सल वगैरे नाही परीक्षा..माझ्याकडे जोपर्यंत तशी काही सूचना येत नाही तोवर मी काही सांगू शकंत नाही.." असं म्हणून आम्हाला हाकलून देण्यात आलं..आईशप्पथ सांगतो..त्यावेळी क्षणभर मुंबईवरंच का हल्ला झाला..?? कोल्हापूरवर का नाही..?? असंच वाटलं..सगळेजण मुकाट्याने आपापल्या खोलीत जाऊन वाचंत बसले..पण शेवटी तासाभरातंच अपेक्षीत बातमी आली..संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षा तीन दिवंस पुढे ढकलण्यात आली..
ऐव्हाना अभ्यासात बुडालेली मुलं मग मात्र बाहेर पडली..अगदी बिळात पाणी शिरलेल्या उंदरांसारखी..आमचाही आठ-दहा लोकांचा ग्रुप होताच..बसलो ऐकत्र...आता तीन दिवंस काय करायचं...?? मी म्हटलं आजंचा दिवस करू टाईमपास..पुढंचे दोन दिवंस करू परंत अभ्यास...तसं मला मधेच कुणीतरी अडवंत म्हणालं..." केला की आता अभ्यास...आज जर हल्ला नसता झाला तर परीक्षा झाली असती आपली..कितीवेळा वाचायचं तेच तेच...?? फालतु विषंय आहे हा.." आणि ते ऐकून संपूर्ण रूममधै भयाण शांतता पसरली...मी माझ्या दोन्ही बाजूस बघितलं..कुणीच काही बोलायला तयार नव्हतं..मग तिसरा कुणीतरी म्हणाला, " चला गोव्याला...!!.." हे म्हणजे अगदीच थोर होतं..पुन्हा मीच त्याला आडवंत म्हणालो.., " अरे आपण वर्षभर अभ्यास नाहीच ना करंत मग आता निदान ऐन परीक्षेआधी तरी करूयात की थोडाफार..." पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं..ऐव्हाना माझ्याही लक्षात आलेलं की विषंय हाताबाहेर गेलाय म्हणून...पण मी माझ्या मतावर ठाम होतो..आतून कुठेतरी मला हे पटंत नव्हतं.." मी काही येत नाही तुम्ही सगळे जा...!! "मी म्हटलं आणि मी निघून गेलो.. पण आम्हा मित्रांचा ऐक कटाक्ष होता..गेलो तर सगळे ऐकत्र जायचं..,नाहितर कुणीच नाही..मग नानाविध हत्यारं वापरून माझंही मतपरीवर्तन केलं गेलं आणि आम्ही गाड्या काढून गोव्यात दाखल झालो..
गोव्याची ऐक खासियंत तुम्हाला मान्य करावीच लागेल...तिथे गेल्यावर तुम्ही तिथलेच होउन जाता..मागे काय घडलंय,ऊद्या काय घडणारे या असल्या फालतु प्रश्नांना गोव्यात स्थान नाही...तीन दिवंस मस्त,तुफान मजा केली..आपण विद्यार्थी आहोत आणि तीन दिवसांनी आपली अंतिम परीक्षा असणार आहे याचाच मुळी आम्हाला विसर पडला.. हे तीन दिवंस भुर्रकन निघूनसुद्धा गेले आणि समोर पुन्हा ऐकदा ऊभी राहिली परीक्षा...झालं ऊद्या सकाळी दहा वाजंता पेपर आणि आदल्या रात्री देखील आम्ही गोव्यातंच पडलोय...मग कुणीतरी पुढाकार घेऊन परंत जायचा विषंय काढला आणि आम्ही खडबडून जागे झालो..नाईलाजास्तव आम्ही सर्वजण आपापल्या सामानाची आवराआवर करून परतीच्या प्रवासाला निघालो...
तुम्हाला आश्चर्य वाटेल दहा वाजताच्या परीक्षेसाठी दुचाकीवरून साधारंण दोनैकशे किमी चा प्रवास करंत आम्ही सकाळी आठ वाजंता वसतिग्रुहात पोहोचलो..जेमतेम आंघोळ करून थेट परीक्षेसाठी रवाना व्हावं लागलं..वाचलेलं काहीच आठवेनासं झालेलं,नवीन वाचायला वेळही नव्हता आणि ताकदही..तशाच गलितगात्र अवस्थेत परीक्षा दिली...जे आठवेल ते बरोबर लिहिलं ऊरलेलं चुकीचं का असेना पण तेही लिहिलंच...परीक्षेचा निकाल लागंला..ईतर अभ्यास केलेल्या विषयांपेक्षा जास्त मार्क्स या विषयाने मिळवून दिले...आमचा ऐक मित्र गचकला...वातावरंण थोडंस निराशाजनंक झालेलं पण तोही पुढे re-evaluation मधे महिन्याभरातंच पास झाला...ऐकंदरीत सगळा आनंदी आनंद...
आज मागे वळून पाहिलं की स्वतःचंच आश्चर्य वाटतं..कसे काय आलो ईथवर आपण..?? क्षणभर विश्वासंच बसंत नाही स्वतःवर...पुढे पदवी अभ्यासक्रमासाठी खूप अभ्यास करावा लागंला...पण हे mbbs चे दिवंस,मित्रांसोबत केलेल्या टवाळक्या आयुष्यभर लक्षात राहतील....आज बरोबरच्या डाॅक्टर मित्रांना सांगितल्या ह्या गोष्टी तर विश्वासंच बसंत नाहि त्यांचा...कारण त्यांनी पुस्तकं सोडून कधी केलंच नाही काही दुसरं...या सगळ्या मस्तीत mbbs कधी संपलं कळलंच नाही...पुढे काळानुरूप बरेचसे मित्र तुटले...यातले अगदी बोटावर मोजण्याईतके मोजंकेच मित्र आज बोलण्यात आहेत ...प्रत्येकजण आपापल्या अभ्यासात व प्रपंचात अडंकला..काहि वैचारीक मतभेद झाले..काही मला पचले नाहीत तर काहिंना मी....पण या अशा चिरकाल टिकणार्या आठवणी दिल्याबद्दल चांगल्या,वाईट,ऊपयोगी व निरूपयोगी सर्वच मित्रांना हात जोडून अभिवादंन.....!!
-©- निरागस

Apratim..dolyasamor agdi prasang ubha rahila.
ReplyDeleteधन्यवाद भाव..!!
ReplyDelete