Saturday, 2 December 2017

या देशाला स्मारकांची खरंच गरज आहे का

"                                        या सबंध भारतवर्षात अनेकथोर महात्मे,वैचारीक स्त्री-पुरूष होऊन गेले आणि त्यांचं कार्य केवळ भारतातंच नाही ,तर संपूर्ण जगभरात नावाजलं गेलं..संपूर्ण मानवजातीला दिशा दाखवणारे ईतके सारे महापुरूष होऊन गेलेला हा देश खरंच किती महान असायला हवा होता...?? पण वस्तुस्थिती खरंच तशी आहे का...?? आणि नसेल तर मग यामागची कारणं तरी काय असतील...??
                                          पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारंण म्हणजे आम्हाला समाजसुधारंक,स्वातंत्र्यसैनिक,थोर पराक्रमी हवे होते आमच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी..जोवर आमचा फायदा होता, तोवर आम्ही त्यांना डोक्यावर घेतलं,मग आमचा फायदा संपला आणि आम्ही दिलं त्यांना फेकून अडगळीत...वर कुणी या आमच्या स्वार्थीलोलूप व्रुत्तीबद्दल आम्हाला दूषण देऊ नये, म्हणून मग आम्ही ईतरांना दाखविण्यासाठी व स्वतःच्या समाधानासाठी यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजर्‍या करावयास सुरू केल्या...त्यातूनही मग काहींचं मन भरलं नाही, मग ऊभी राहिली ती अतिभव्य,गगनचुंबी स्मारकं...अमाप पैसा ओतून बांधलेली,मनाला नाही तर थेट आकाशाला भिडणारी स्मारकं आणि  यातून सुरू झाल्या हिणकस चढाओढी...आमच्या जातीचा,पंंथाचा अथवा राज्याचा महापुरूष ईतरांच्या महापुरूषांपैक्षा किती सरस अथवा महान आहे हे दाखविण्यासाठी सुरू झाली जीवघेणी स्पर्धा...महापुरूषांना त्यांच्या विचारांनी अथवा कार्याने ओळखण्याऐवजी त्यांच्या स्मारकांच्या भव्यतेनुरूप ओळखलं जाऊ लागलं आणि याला जबाबदार तुम्ही,आम्ही,राजकारणी,सरकार सगळेच...
                                        मुळात स्मारकं असावीत की नाहीत यावर थोडं नंतर बोलूयात पण जर ती असतील तर ती कशी असावीत यावर आधी बोलू....!!  आता बघा ना शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात होणारं स्मारंक आणि त्यावर होणारा करोडोंचा खर्च यावर मतमतांतरं असूच शकतील..मला या राजकारणात पडायचंच नाहिये...हा महाराष्ट्र हेच मूळी आमच्या महाराजांचं स्मारंक आहे...आपण सगळे मराठी भाषिक " ऐकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ  " या भावनेने जरी ऐकत्र राहिलो..ऐकमेकांची ऊणीदुणी काढण्यापेक्षा अडीअडचणीत ऐकमेकांच्या कामी पडलो,ऐकत्रितपणे या मराठीभाषिक राज्याचा नावलौकिक वाढवला, तर त्या जाणत्या राजाला त्याहून मोठी दुसरी श्रद्धांजली असूच शकंत नाही.. आणि समजा जर महाराजांचं स्मारंक बांधावयाचं असेलंच तर त्याआधी महाराजांची यशोगाथा सांगणार्‍या,त्यांच्या पराक्रमाची जीवंत साक्ष देणार्‍या गडकिल्यांची डागडुजी,त्यांचं नुतनीकरंण करावयास नको का...?? आता येऊयात बाबासाहेबांच्या स्मारकाकडे...बाबासाहेब म्हणजे कठीण परिस्थितीत स्वतःचं बुद्धिकौशल्य वापरून समाजातल्या गांजलेल्या लोकांसाठी लढलेला असा लढवय्या नेता, की ज्याच्या विद्वतैचा डंका अगदी साता समुद्रापार पोहोचला...मग अशा या विद्वान महापुरूषाचा पुतळा ऊभारण्यापेक्षा त्यांच्या नावाने त्याच पैशांत जगातलं ऐखादं सर्वोत्क्रुष्ठ वाचनालंय ऊभारणं अधिक संयुक्तिक ठरेल की नाही..?? आणि हे ईतर सगळ्याच महापुरूषांना लागू पडतं..मग ते गांधीजी असोत वा टिळंक,सावरकर...
                                  आता दुसरी बाजू .. मग ईतकं असताना तुम्ही म्हणाल की स्मारकांची नेमकी  गरंजंच काय...?? ७० % लोक दारिद्र्यरेषेखाली असणार्‍या या देशात कित्येक लोकं दोनवेळचं पोटभर खाऊ शकंत नाहीत...मग स्मारकांसाठी वापरला जाणारा खर्च अनावश्यक नाही का...?? तोच खर्च ईतर चांगल्या योजनांसाठी राबवून गरीबांचं जीवन अधिक सुखकर बनवता येईलंच की....तर मित्रांनो गरीबी दूर करणं हे फार कठीण आणि कीचकट काम आहे...यामागची कारणंही खूपंच जटील आहेत आणि यासाठी काही दशकांचा अवधी निश्चितंच लागणार आहे..,म्हणजे बघा ना आपण पोखरंणची अणुचाचणी केली त्यावेळी देशात गरीबी नव्हती का...?? अवकाशमोहिमा राबवल्या त्यावेळी देशात गरीबी नव्हती का..?? देशात गरीबी आहे म्हणून सैन्यावर अवास्तव खर्चच करावयाचा नाही का...?? तर असं नाही...गरीबी हटवण,देशातील नागरीकांचं जीवन अधिक सुखकर करणं याला प्राधान्य देत असतानाच,ऐक परिपक्व ,परिपूर्ण ,प्रगतीशील देश म्हणून जगासमोर ऊभं राहणंही तितकंच महत्वाचं असतं...प्रत्येक ठिकाणी गरीबी हाच ऐक निकष लावून चालंत नसतं...त्यामुळे आरोग्य,विज्ञान,संरक्षण,शिक्षण,सुशोभीकरण ईत्यादी सर्वच विषयांवर नियोजनबद्ध खर्च करावाच लागतो..
                             तर काही काही देश,राज्यं अथवा प्रादेशिक विभाग हे ऐखाद्या व्यक्ति,वस्तू अथवा नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळेच ओळखले जातात...जसं भारत परदेशात गांधीजींमुळे ओळखला जातो,महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळखला जातो,भारतीय संविधान म्हटलं की मग आमच्या डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे बाबासाहेब,समाजसुधारणा म्हटली की चटकन आठवतात ते आमचे महात्मा जोतीबा फुले...मग अशा थोर लोकांची आठवण म्हणून किंवा त्यांच्या कार्याचा व त्यागाचा येणार्‍या पिढीला विसर पडू नये म्हणून त्यांची स्मारकं असावीतंच..जगभरात सर्वत्र आपणाला ती दिसतातच..पण त्यामागे काही ठोस नियोजन असावं लागतं...ऐखाद्या स्मारकावर करोडो रूपये ऊधळायचा निर्णय आतताईपणे,निवडणुकीच्या मतांवर डोळा ठेऊन,आपल्या कुवतीकडे व त्याच्या होणार्‍या दूरगामी परिणामांकडे दुर्लक्ष करून आपण घेऊच शकंत नाही...त्यासाठी त्यामागे कित्येक वर्षांचं नियोजन असावं लागतं...हा पैसा आम्ही कुठून ऊभारणार आहोत,स्मारकांचं स्वरूप काय असणार आहे आणि ऐकंदर याचा आपल्याला कसा लाभ होणारे या सगळ्यांचंच पारदर्शी नियोजन असावं लागतं...जे दुर्दैवाने आपल्याकडे बघावयास मिळंत नाही...आल्या निवडणुका की द्या स्मारकांची आश्वासनं,झाली आंदोलनं की द्या स्मारकांची आश्वासनं.. मग तो खर्च कुठून करणार..?? कसा करणार ..?? काही नियोजन नाही...नुसती आश्वासनं...अशा आश्वासनांवर आणि आततायीपणावर तेलाचा घाणा चालू शकतो देश नाही...
                               म्हणजे विचार करा..,ऊद्या नुसतीच स्मारकं ऊभी राहिली पण त्या थोरपुरूषांचे विचारंच लोकांपर्यंत पोहोचले नाहित तर काय ऊपयोग...?? म्हणजे शिवरायांचं स्मारंक ऊभं राहिलं पण कुणाला स्वराज्याचं महत्वच कळलं नाही तर...?? बाबासाहेबांचं स्मारंक ऊभं राहिलं पण कुणाला शिक्षणाचं महत्वच नाही कळालं तर...?? जोतीबा फुल्यांचं,आगरकरांचं स्मारंक ऊभं राहिलं पण समाजसुधारणेला जनमानसात किंमतंच नाही राहिली तर...?? मग नुसतीच पुतळे स्मारकं ऊभारण्याची चढाओढ किंवा स्पर्धा लावून काय साध्य होणार आहे..?? त्यांचे विचार या भव्य स्मारकांमागे लपून तर राहणार नाहीत ना..?? बघा विचार करा...पटलं तर  ठीक, नाहितर द्या सोडून.....
                                                  
                                               



                                      -©- निरागस





                                        

No comments:

Post a Comment