" चला नव्या वर्षाची सुरूवात आम्ही चांगली केली..गाड्या फुंकून,ऐकमेकांची डोकी फोडून अजून आमच्यातला लढवय्यापणा शाबूत आहे, याची प्रचिती आम्ही जगाला आणून दिली.नवीन येणार्या प्रत्येक वर्षागणीक आपण अधिकाधिक समाजाभिमुख व्हायला हवं,ऐकमेकांच्या अधिक जवळ यायला हवं,पण कुठलं काय..आम्ही व्यस्त आहोत ऐकमेकांच्या नाकात जातीची वेसन घालण्यात..होय मी भीमा कोरेगाव बद्दलंच बोलतोय..भीमा कोरेगावमधे जो काही जातीय तणावाचा भडका ऊडाला,परीणामतः जी काही जाळपोळ ,हाणामारी झाली ,ती या पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच भूषणावह नव्हती..पण हे सगळं का झालं..?? यामागचा खरा ईतिहास काय आहै..?? खोट्या ईतिहासामागून जातीय स्वार्थ रेटून कसा पुढे नेला जातोय...?? या सर्व गोष्टींची शहानिशा करण्यासाठी मीच स्वतः या चिखलात ऊतरायचं ठरवलं..ईतरांवर चिखलफेक करण्याआधी स्वतः त्या चिखलात ऊतराव लागतं म्हणतात अगदी त्यातला प्रकार..संवेदनशील विषयावर प्रतिक्रीया द्यायची म्हटल्यावर अभ्यास महत्वाचा,अभ्यासाबरोबरंच ऐकंदर समाजव्यवस्था त्यांच्यामधले खाचखळगे सगळेच माहिती हवेत..म्हणून मागील दहा दिवस कुठेही काही लिहिलं नाही,की बोललो नाही...मित्रांनी प्रतिक्रिया विचारली, पण ती देण्याचीही कोणतीही घाई किंवा गडबड केली नाहि..काही नेमकी पुस्तकं ऊलगडली,फेसबुकच्या कट्यांवरल्या चर्चांमधे मूकपणाने वावरलो,थोरा मोठ्यांच्या मनातले विचार जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि आज मोठ्या आत्मविश्वासाने या जटील आणि किचकट अशा प्रश्नाला मी सामोरा जातोय...मी जे लिहिलंय, ते केवळ आणि केवळ सत्य आहे,पुराव्यांवर आधारीत आहे,पण मी जे लिहिलंय तेवढं आणि तेवढंच सत्य आहे असं अजिबात नाही..ईतिहास हा ज्ञानाच्या कसोटीवर ऊतरणाराच असला पाहिजे,जो समाज सामाजीक अथवा जातीय प्रतिष्ठा जपण्यासाठी खोट्या ईतिहासाचा आधार घेतो, तौ वरकरणी जरी भक्कम दिसंत असला तरी, आतून तौ तितकाच तकलादू असतो...शाहू,फुले,आंबेडकरांचा जप करणारा सध्याचा महाराष्ट्र हे त्याचं मूर्तिमंत ऊदाहरण आहे...
हजारो वर्ष पारतंत्र्यात असणार्या या प्रदेशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्याचं ऐक सोनेरी स्वप्न पडले..त्यांच्या नेत्रुत्वाखाली मराठ्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला..भारतवर्षाच्या ईतिहासात क्वचितंच ऐखाद्या राजाच्या वाट्याला ईतकी लोकप्रियता आली असेल..शिवरायांबद्दल आज अधिक लिहित नाही,कारण ऐकतर ते सर्वज्ञात आहे आणि आजच्या आपल्या या विषयाला अनुसरून नाहीये..तर शिवरायांनंतर गादीवर आलेले छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा साम्राज्याचा अधिक जोमाने व जोशाने प्रसार केला..भीमा कोरेगाव समजून घेण्यासाठी आधी आपणाला संभाजी महाराजांपासून पुढचा मराठा साम्राज्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे सर्वमान्य छत्रपती होत..त्यांचा जन्म १४ मे १६५७ साली पुण्याजवळील पुरंदर या किल्यावर झाला. शिवरायांनंतर ९ वर्षै संभाजीराजांनी समर्थपणे स्वराज्याची धुरा वाहिली..या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुघलांबरोबरंच,पोर्तुगीज,सीद्धी आदींची अनेक आक्रमणे परतावून लावली.ऐन ऊमेदीच्या काळात अंतर्गत फंदफितुरी व दगाफटक्यामुळे संभाजी महाराज संगमेश्वरजवळ बेसावध असताना औरंगजेबाच्या तावडीत सापडले,संगमेश्वरमधून त्यांना बहादुरगडावर नेऊन नंतर ११ मार्च १६८९ रोजी वडू-बुद्रुक येथे महाराजांची निर्घ्रुण हत्या करण्यात आली.त्यांचं शीर भाल्यावरून गावोगावी मिरविण्यात आलं,जीभ छाटण्यात आली,शरीराचे शेकडो तुकडे करण्यात आले...त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार तिथल्याच स्थानीक लोकांनी केले,पण ते नेमके कोणी केले..?? कशापद्धतीने केले यासंदर्भात मात्र कोणतेही संदर्भ आपणास ऊपलब्ध नाहित..त्यासंदर्भात ज्यांनी त्यांच्या शरीराचे तुकडे अंत्यसंस्कारापूर्वी वेचले, त्यांना वेचले पाटील व ज्यांनी ते तुकडे शिवले त्यांना शिवले पाटील, अशी नावं पडली अशी आख्यायिका आहे,पण याला ईतिहासात कोणताही संदर्भ नाही..अशा ईतरही अनेक आख्याईका रूढ आहेत ज्या निव्वळ भाकडकथा असून सत्यापासून कोसो दूर आहेत..
असो, तर संभाजी महाराजांच्या म्रुत्यूनंतर त्यांचे सावत्र बंधू राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणून गादीवर बसले.राजाराम महाराजांना शत्रूपेक्षा स्वतःच्या तब्येतीनेच अधिक बेजार केलं आणि यातंच १७॰॰ साली ऐन तारूण्यात राजाराम महाराजांचा म्रुत्यू झाला.राजाराम महाराजांच्या म्रुत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी महाराणी ताराराणींनी स्वराज्याची सारी सुत्रे आपल्या हाती घेतली आणि मराठेशाहीची घोडदौड पुढे चालू ठेवली..यातंच १७॰७ साली औरंगजेबाचा देहांत झाला..मराठा साम्राज्याचे खरे वारसदार व संभाजीराजांचे चिरंजीव शाहू महाराज ऐव्हाना मुघलांच्या ताब्यात होते.औरंगजेबाच्या म्रुत्युनंतर मुघलांनी मराठा साम्राज्यात दुफळी माजवण्यासाठी शाहू महारांची सुटका केली..शाहू महाराज राज्यात परंत आले,अपेक्षेप्रमाणे त्यांनी राज्यावर आपला हक्क सांगितला,संभाजीराजांवर श्रद्धा असणारे अनेक मराठा सरदार त्यांच्या बाजूने ऊभे राहीले व यानिमित्ताने मराठा साम्राज्यात ऊभी फूट पडून सातारा व कोल्हापूर अशा मराठ्यांच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या..सुरूवातीच्या काळात या दोन गाद्यांमधे आपापलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी लढायादेखील झाल्या..तर मित्रांनो शिवरायांचा जन्म ते शाहू महाराजांचा सातारच्या गादीवरला अभिषेक , हा मराठा साम्राज्याचा काळ म्हणून आळखला जातो..शाहू महाराज अगदी तरूणवयात गादीवर बसल्यामुळे राजकारणात नवखे होते..अनेक वर्षे मुघलांच्या कैदेत राहिल्यामुळे मराठा साम्राज्याची पाळेमुळे व डावपेच त्यांना माहिती नव्हते..अशातंच स्वराज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथ यांची त्यांनी नेमणुक केली..बाळाजी विश्वनाथांनी शाहूंना मुघलांच्या व जनतेच्या मनात स्वराज्याचे खरे छत्रपती म्हणून मान्यता मिळवून दिली.तसेच १७१९ साली शाहूंच्या मातोश्री येसुबाई यांचीसुद्धा मुघलांच्या तावडीतून सुटका केली..पण हे करता करता पेशवा शाहूंना डोईजड झाले आणि ऐकप्रकारे मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती गेले...
११ मार्च १६८९ ते १७१५ सालापर्यंत ,म्हणजे शाहू महाराज गादीवर बसल्यानंतरदेखील काही वर्षे वडू-बुद्रुक येथे संभाजीराजांची समाधी बांधली गेली नव्हती.. म्हणजेच ऐका अर्थाने या महाराष्ट्राला या महान योद्ध्याचा ऐकप्रकारे विसरंच पडला होता.शाहू महाराजांची पहिली काही वर्षे ही स्वराज्याची घडी बसवण्यात गेली आणि त्यामुळे कदाचित हा ऊशीर झाला असावा..१७१५ साली शाहूमहाराजांनी संभाजी महाराजांच्या प्रित्यर्थ वडू-बुद्रुक येथे व्रुंदावन बांधले व त्याची देखभाल करण्यासाठी गोसावी व कुलकर्णी नावाच्या ग्रुहस्थांच्या नावाने सनदा काढल्या व त्यांना त्यांच्या प्रपंचासाठी म्हणून काही भाग बक्षीस म्हणून दिला.१७२३ मधे शाहू महाराजांनी व्रुंदावनाचा सेवेकरी म्हणून गोविंद गोपाळ ढगोजी मेघोजी यांची नेमणूक केली व त्यांना पाबळच्या रानात काही जमीन बक्षीस म्हणून दिली.येथे ढगोजी व मेघोजी या शब्दांचा अर्थ म्हणजे महार समाजाचे गुरू असा होतो..महार समाजातील तत्कालीन पूजा अर्चा व ईतर प्रथा हे लोक करीत असंत.म्हणजे संभाजी महाराजांच्या म्रुत्यूनंतर किमान ३४ वर्षे गोविंद गायकवाड या नावाचा साधा ऊल्लेखही ईतिहासात आढळंत नाही..गोविंद गायकवाडांनी संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले अशा काही विशिष्ठ समाजाकडून केल्या जाणार्या प्रचाराला काडीचाही पुरावा ऊपलब्ध नाही,ऊलटपक्षी सारे पुरावे हे धादांत खोटे कसे आहे हे पटवून सांगतात..यासंदर्भात पुरावे म्हणून काही दस्तावेज ईथे जोडंत आहे.
बाळाजी विश्वनाथांपासून सुरू झालेला पेशव्यांचा मराठेशाहीमधील प्रभाव ऊत्तरोत्तर वाढंतच गेला.ईतका की छत्रपती हे केवळ नाममात्र राहिले व मराठा साम्राज्याचा सारा गाडा पेशव्यांनी हाकण्यास सुरूवात केली..मराठेशाहीमधे अगदी तुरळंक प्रमाणात असणार्या जातीयवादाने पेशव्यांच्या काळात पुन्हा ऐकदा ऊचंल खाल्ली..ब्राह्मण्यवादाने पेशवाईमधे चरंम सीमा गाठली..अतिशयोक्तीपणाने काही ईताहासकारांनी लिहून ठेवलंय की पेशवाईमधे दलितांची अवस्था ईतकी वाईट होती की त्यांच्या गळ्यात माठ व कमरेखाली झाडू बांधला जायचा, त्यांना समाजाच्या कोणत्याही महत्वाच्या गोष्टींमधे स्थान नसायचं,मंदिरात जायची परवानगी नसायची वा विहिरीवर पाणी भरायची मुभा नसायची..
शिवरायांनी व ईतर मराठा छत्रपतींनी या ऊपेक्षीत वर्गाला आपल्या राजकारभारात व ऐकूणंच समाजव्यवस्थेत सामावून घेतलं होतं व त्यामुळेच समाजाची घडी टिकून राहिली होती..पण पेशव्यांच्या काळात ही घडी ऊसवली गेली...परिणामतः ऐका मोठ्या समाजामधे राज्यकर्त्यांविरोधात ,म्हणजेच पेशव्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला..ईंग्रजांनी आपल्या फायद्यासाठी या असंतोषाचा यथोचित फायदा करून घेतला व १८१८ साली ईंग्रजांना सामील झालेल्या महार सैनिकांनी ईंग्रजी सैन्याच्या मदतीने पेशव्यांचा पराभव केला..ईंग्रजांनी त्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ तिथे दीपस्तंभ ऊभारला...तर मित्रांनो बाळाजी विश्वनाथांपासून ते १८१८ मधे ईंग्रजांकडून हरण्यापर्यंतचा काळ हा पेशवाई म्हणून ओळंखला जातो..१८१८ ची ही लढाई शोषितांची शोषण करणार्यांविरोधातली लढाई होती.पेशवाई आगोदर मराठा साम्राज्यात वा स्वातंत्र्यानंतर महार रेजीमेंटच्या रूपाने महार समाजाने ईथल्या प्रदेशाच्या अस्मितेसाठी अतिशय दैदिप्यमान असा पराक्रम गाजवला आहेच...त्यामुळे केवळ जातीय विषमतेपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पेशव्यांसमोर ऊभे ठाकलेल्या या समाजाला तुम्ही दोषी ठरवू शकंत नाही ,तर त्यांच्यावर ही परिस्थिती का आली हेदेखील आपणाला तपासून पहावं लागेल..
तर मित्रांनो हा झाला भीमा कोरेगावचा ईतिहास..आता आपण जाणून घेऊयात की दरवर्षी शांततेत पार पडणार्या विजयोत्सवाला यावर्षी गालबोट का लागल.??? तर यावर्षी १ तारखेला या विजयोत्सवाला २॰॰ वर्षे पूर्ण होणार असल्याने ,यावर्षी कित्येक पटीने अधिक जनसमुदाय तेथे ऊपस्थित होता..२५ ते २६ डिसेंबरच्या दरम्यान " स्वतःच्या राजाचे अंत्यसंस्कार करू शकले नाहीत,हे कसले भैकड मराठा " अशा प्रकारचे फ्लेक्स वडू-बुद्रुकमधे समाजकंटकांकडून ऊभारण्यात आले..त्यातून दोन समाजांमधे तणाव निर्माण होऊन गोविंद गायकवाडांच्या समाधीवरील छत्रीची नासधूस करण्यात आली,२८ ते २९ डिसेंबरच्या दरम्यान ४९ लोकांवर अॅट्राॅसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले..त्यातंच १ जानेवारीरोजी विजयोत्सवाचं निमित्त झालं आणि सरकारचा गाफिलपणा कारणीभूत झाला आणि दंगल ऊसळली..नंतर विविध राजकीय संघटणांनी ऐकमैकांवर आरोपांची धुळधाण ऊडवली व सगळा गिचमीट काला झाला....
झालं ते झालं,पण या झाल्या प्रकरणातून आपण काहीतरी शिकणार आहोत का...?? ऐखाद्या समाजाची खोटी सामाजीक प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण खोटा ईतिहास नव्या पिढीच्या माथी मारणार आहोत का..?? कितीदिवस जातीची ही वल्कलं घालून आपण मिरवणार आहोत..?? या अशा दंगली भडकवणार्या समाजकंटकांना आपण किती दिवस जातीच्या सदर्याखाली लपवून ठेवणार आहोत...?? स्वातंत्रोत्तर काळात कित्येक वर्षे आम्हाला संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे हे माहिती नव्हतं,वा. सी. बेंद्रे नामंक सद्ग्रुहस्थांनी अथंक प्रयत्नांनी ती जगासमोर आणली,शिवरायांच्या समाधीचंही तसंच महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली नसती तर...?? तर आम्हाला कळलंच नसतं कधी की आमचा राचा कुठे अस्त पावला ...?? यातून आपणास काय दिसतं,तर आम्ही आमच्या महापुरूषांचा केवळ स्वार्थासाठी मर्यादित वापर करतो..त्यांचा फक्त ऊदो ऊदो करतो,त्यांच्या विचारांना मात्र सोयीस्कररीत्या फाट्यावर मारतो...प्रत्येक जातीचा ईतिहास गौरवशाली आहै..अहो शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे काही केवळ मराठ्यांचं होतं का..?? तिथे शिवरायांसोबत जसे आमचे बाजीप्रभू देशपांडे लढले तसेच जीवा महाला,शिवा काशीदही लढलेच की ?? आणि तो तर चारशे वर्षांपूर्वीचा काळ,मग आज काॅम्पुटरयुगात ही कोणती अवदसा पाळतोय आपण..?? माझी श्रद्धा आहे महाराज नक्की वरून निमूटपणे पहात असतील,मूकपणे अश्रू ढाळंत असतील आणि स्वतःलाच विचारंत असतील, याचसाठी केला होता हा अट्टाहास..?? बघा अजूनही वेळ गेलेली नाहिये,या जातीयवादाच्या कीडेला समाजातून वेळीच हद्दपार करा नाहितर ती संपूर्ण देशाला पोखरून नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही.. "
-©- निरागस
No comments:
Post a Comment