दोनेक महिन्यांपूर्वी बहिणीकडे गेलो होतो, निवांत सुट्टी टाकून आठवडाभरासाठी...भाच्याची परीक्षा सुरू होती,म्हणून मग बहीणंच म्हणाली, घे आता याचा अभ्यास...ईनमीन तिसर्या ईयत्तेत शिकणारं पिल्लू ते...पण त्यानं त्याचं दप्तर ऊघडलं आणि मला भोवंळंच आली....पंधरा वीस पाठ्यपुस्तकं आतमधे....ईंग्लिश काय,Environmental Scince काय,चित्रकला काय,ज्या वयात आकड्यांची अथवा भाषेची जुजबी ओळंख असणे अपेक्षित आहे, त्या वयात ईथे मात्र संपूर्ण ब्रह्मांड या कोवळ्या मनांवर कोरण्याचा प्रयत्न चालू आहे..आणि या प्रत्येक विषंयाच्या परीक्षा घ्यायच्या...दर आठवड्याला काही ना काही प्रोजेक्ट्स,परीक्षा...धुरंळा ऊडवून दिलाय नुसता..पण मग माझ्याच मनात विचार आला,की या सगळ्याची खरंच आपल्याला गरंज आहे का..??
म्हणजे बघा ना बॅकेत गेल्यावर आजही अर्ध्याहून अधिक गोष्टी आम्हाला माहिती नसतात,काही मोजकी जीवनावश्यक औषधं,आजार आम्हाला माहिती नकोत का..?? ,स्वतःच्याच शरीराबद्दल आम्हाला विशेष असं काही ज्ञान दिलंच जात नाही...तुम्हाला खोटं वाटेल पण हे काॅमर्स किंवा आर्ट्स विषयातले पदवीधर तर opd मधे अशा शंका घेऊन येतात,की मला खरंच खूप वाईट वाटतं...वाटतं की हा माणूस महिन्याला लाखो रूपये कमवंत असेलही, पण याला ही ईतकी साधी गोष्ट माहिती नसावी...पण यात त्याची तरी काय चूक...?? त्याला शिकवलंच गेलं नाही हे कधी..अगदी तसंच आम्हा विज्ञान क्षेत्रातील पदवीधरांचं..बॅंकामधले साधे फाॅर्म आम्हाला कसे भरायचे माहिती नाहीत,किंवा काॅम्पुटर क्षेत्रातलंही आम्हाला ओ की ठो काही कळंत नाही ,शेअर मार्कैट,शेती,कला यातलं किमान जुजबी ज्ञान तरी आम्हाला हवं की नको...?? ऊगाच त्या अवघड आणि कीचंकट अशा भूमितीच्या प्रमेयांऐवजी ही अशी life sciences का नाही शिकवंत तुम्ही आम्हाला...??
म्हणजे बघा ना आज मी डाॅक्टर आहे...गणिताशी माझा दूरदूरवर काहीही संबंध नाही,पण तरीही मी दहावी,अकरावी,बारावी मधे नसते पॅराबोला,हायपरबोला शिकावं अशी यांची अपेक्षा का बरं असते....?? अरे मुर्खांनो काय करू मी या अनावश्यक ज्ञानाचं..?? लोणचं घालू का..?? का केलात माझा अगणित छळ गणित नावाचा विषंय शिकवण्याच्या नावाखाली ..? त्याचा कुठेतरी माझ्या उर्वरीत आयुष्यात मला ऊपयोग होणार आहे का...?? sin,cos,tan आणि ऐकंदरीतंच trigonometry नावाची गोष्ट किती बेचंव आणि बिभत्स...?? पण ज्याला आयुष्यात चित्रकार व्हायचंय,लेखंक व्हायचंय,कवी व्हायचंय त्यांनीही हे शिकलंच पाहिजे का..?? ऐखाद दिवशी डोकं फिरलं, तर खरंच केस करेन या अभ्यासमंडळांवरतीच आणि या असल्या भंपक, नाही त्या आचरंट गोष्टींवर निरर्थक खर्ची घातलेला माझा वेळ परंत द्या म्हणून ठणकावून सांगेन
खरं सांगू का..?? अगदी मनापासून सांगतो....भारतात शिक्षण दिलं ,अथवा घेतलं जातं तेच मुळी पोट भरण्यासाठी अथवा नोकर्या मिळवण्यासाठी...शिक्षणातून लोकांचं आयुष्य सम्रुद्ध व्हावं,त्यांची विचारसरणी बदलावी ,किंवा समाज म्हणून असलेलं त्याचं अस्तित्व अधिकाधिक प्रगल्भ व्हावं ,असं ना सरकारला वाटतं ना तुम्हा आम्हाला... नाक्यावर ऊभे राहून पचापचा गुटख्याच्या पिचकारी मारणारे,सिगारेटच्या पाकिटावर मोठ्या अक्षरांत लिहिलेला धोका वाचू न शकणारे,वाहंन चालंवताना आपल्याचसाठी असणारे सिग्नल फाट्यावर मारणारे,किंवा वंशाचा दिवा हवाय म्हणून स्त्रीभ्रुणहत्या करणारे सुशिक्षित लोक्स पाहिले की मला कीव येते आपल्या शिक्षणपद्धतीची...दर सहा महिन्याला मोबाईलंच नवीन वर्जन काढणारे आम्ही भारतीय शिक्षणपद्धतीमधे मात्र किचींतही बदंल करण्यास ऊत्सुक नाही....
कुठेतरी, कुणीतरी यावर बोलावयास हवं,हे असंच सुरू राहिलं तर मात्र काही खरं नाही...जातीच्या,धर्माच्या नावाखाली द्वेश करायला शिकवणारी शिक्षणपद्धती काय कामाची...?? स्वतःलाच नेमून दिलेलं काम वेळेत करण्यासाठी टेबलाखालून पैसे घेणारे अधिकारी निर्माण करणारी शिक्षणपद्धती काय कामाची..?? हे कसंकाय बदलणार...?? कोण बदलणार...?? आणि कुणी काही बोललंच, तर मग आम्ही आर्यभट्ट,सी वी रमण यांच्याकडे बोटं दाखवतो...या महान लोकांनी त्यांच्या आयुष्यात जे साध्य केलं ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केलंय..त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेखाली आपल्या शिक्षणपद्धतीचं नागवेपण लपवणं क्रुपया थांबवा...आपली शिक्षणपद्धती जर ईतकी ऊच्चप्रतीची असतीच, तर मग आजवर ईतक्या वर्षांत काही मोजके हाताच्या बोटांवर मोजता येण्याईतपत अपवाद वगळता ईतर विद्वान का तयार झाले नाहीत...?? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे...
आता तुम्ही म्हणाल नुसते प्रश्न विचारून,दुषणं देऊन कसं चालेल..?? हे बदलायचा काहीतरी मार्ग सांगा.....तर सांगतो मित्रांनो...मी काही तज्ञ वगैरे नाही या विषंयातला पण माझ्याकडे काही कल्पना आहेत...काही सूचना आहेत...

१) सगळ्यात पहिलं म्हणजे शिक्षणपद्धती बदलायची म्हणजे काही ऐक दोन लोकांचं किंवा ऐकदोन दिवसांचं काम नाही...ती ऐक कीचकट आणि खूप वर्षै चालणारी प्रक्रिया आहे...त्यात सरकारच्या बरोबरीनेच,या विषयातले तज्ञ लोक व तुम्ही आम्ही सगळ्यांचाच समावेश असायला हवा
२) आज बारावीला करीअरची वाट निवडण्यासाठी जे महत्व आहे ते दहावी किंवा त्याआधीच देण्यात यावं...यातून वाचलेली वर्षै त्यांना त्यांच्या आवडत्या विषंयांतलं अधिक ज्ञान मिळवण्यासाठी वापरता येतील
३) मूल्यशिक्षणाच्या नावाखाली आज जे थातूर मातूर पुस्तकी शिक्षण दिलं जातंय ते संपूर्णतः बंद करून, त्याऐवजी संपूर्ण अभ्यासक्रमंच मूल्यशिक्षणावर आधारीत ठेवावा आणि त्यात फिल्ड विझिट्स,विविध विषयांवरील चर्चासत्रे,वादविवाद स्पर्धा,प्रोजेक्ट्स यांचा समावेश असावा
४) अभ्यासक्रमामधे life sciences च्या नावाखाली आरोग्य,बॅंकिंग,वर्तमान राजकारण यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचा मुबलंक प्रमाणात समावेश करण्यात यावा
५) परीक्षापद्धती अधिकाधिक conceptual करण्यात यावी....मुलांना काय येत नाही, यापेक्षा त्यांना काय चांगलं येतं हे शोधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करून त्यांना त्याच विषयांमधे अधिकाधिक प्रगती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात यावं...
६) चित्रकला,गायन,खेळ यांसारख्या कला यांचा अभ्यासक्रमात विषंय म्हणून समावेश व्हावा..पण हे विषंय ऐच्छिकंच असावेत...सगळ्यांवर लादण्यात येऊ नयेत
७) प्रत्येक व्यावसाईक कोर्समधे communication skills किंवा survival skills शिकविण्यात यावीत..ऊदा -डाॅक्टरांना केवळ आजारांबाबत माहिती न देता रूग्णांशी बोलावं कसं,त्यांच्या भावनांना कसं हाताळावं याचं प्रशिक्षण देण्यात यावं किंवा त्यांच्या अभ्यासक्रमात अधिक्रुतरीत्या याचा सामावेश करण्यात यावा...
८) दरवर्षी ऊपलब्ध शिक्षकांचा व त्यांनी मुलांवर केलेल्या मेहनतीचा आढावा घेण्यात यावा...त्यांच्या अडचणी समजून त्यांना अधिकाधीक प्रोत्साहन देण्यात यावा..
९) दरवर्षी सरकारच्या बजेटमधील शिक्षणखात्यावरील खर्च वाढविण्यात यावा आणि दरवर्षी प्राधान्याने यामधे व्रुद्धि करण्यात यावी...
१॰) नवनवीन शाळा,महाविद्यालये,काॅलेजेस,व्यावसाईक शिक्षण देणार्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्था मुलांसाठी ऊपलब्ध करून देण्यात याव्यात...
या काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या सूचना माझ्यावतीने मी मांडल्या आहेत...आपणही सगळेच या शिक्षणपद्धतीतूनच बाहेर पडला आहात...आपणाकडे कदाचित याहूनही अधिक चांगले ऊपाय असतील...नक्की सुचवा....यावर ऊघडपणे चर्चा झाली पाहिजे....कारंण अशा विधायंक चर्चांमधूनच मार्ग सापडतात....कोणताही बदंल घडवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतौ आहोत हे आधी मान्य करायला शिकलं पाहिजे....बघा पटलं तर नक्की विचार करा....
-©- निरागस
No comments:
Post a Comment