आजही अगदी नीट आठवतंय...मे महिन्यातला कोणतासा शुक्रवार होता...ANC Day (गर्भार महिला तपासणीचा दिवस) असल्याने सकाळी लवकर ऊठून,आवरून धावंतपळंत ओपीडीत गेलो होतो..ज्युनियरने काही मोजकेच रूग्ण माझ्यासाठी बाजूला काढून ठेवले होते...तेवढे तपासता तपासता ऐक वाजंला.. मग वाॅर्ड राऊंडसाठी ऊठणार ,ऐवढ्यात ऐक पेशंट कपाळावरचा घाम पुसंत आत आली...मी थोडं चिडूनंच विचारलं..." ईतक्या ऊशीरा का येता...?? वेळेत येता येत नसेल तर दुसरा डाॅक्टर बघा..." मग थोडीशी घाबरूनंच ती म्हणाली.."sorry डाॅक्टर मुलीचा शेवटचा पेपर होता,तिला शाळेत सौडून आत्ता तशीच तडंक ईकडे आलेय " आणि असं म्हणून हातातल्या पिशवीतून काही रिपोर्ट काढून तिने माझ्यासमोर धरले...
रिपोर्ट पाहिले,तक्रार ऐकून घेतली..रक्तस्त्राव जास्त होत होता..तिसर्या चौथ्या महिन्यात ईतका रक्तस्त्राव पाहून माझ्या कपाळावर आट्या पसरल्या आणि माझ्या कपाळावरील आठ्यांचं जाळं पाहून तिच्या तोंडातून शब्द फुटेना...प्राथमिक ऊपचार करून लागलीच तिला तात्काळ सोनोग्राफीसाठी पाठवलं आणि मी निघालो....रूमवर येऊन डब्याचं झाकंण ऊघडणार, ईतक्यात ज्युनिअरचा फोन आला,तिने फोनवरूनंच रिपोर्ट कळंवला..Incomplete Abortion झालेलं होतं आणि चालू असलेला रक्तस्त्राव थांबवण्यासाठी लगेचंच आॅपरेशन करावं लागणार होतं...मी तात्काळ वाॅर्डमधे पोहोचलो..तिला सांगितलं भरती व्हावं लागेल,तेही अगदी आजच्या आज नव्हे आत्ताच्या आत्ता...ज्युनिअरला सांगितलं, लगेचंच हिची पूर्वतयारी पूर्ण करून हिला Operation Theatre मधे हलवा मी आलोच.. तिने नवर्याकडे पाहून थोडे आढेवेढे घेतले,पण शेवटी तयार झाली...
आता आॅपरेशन करायचं म्हणजे रक्त हातात हवं...त्यात हिचा रक्तगट आला O (— Ve), अख्या मुंबईत कुठेही या रक्तगटाची सोय झाली नाही...याआधीदेखील तिने कोणत्याही तपासण्या केलेल्या नसल्याने ऐकंदरीत सगळाच सावळा गोंधळ होता,अगदी माझ्याकडेही पहिल्यांदाच आलेली...काय करणार...?? क्षणभर मनात विचार आला,हिने काही आपल्याला याआधी कधीही दाखविलेलं नाही,कोणत्याही तपासण्या केलेल्या नाहीत, हिला सरळ दुसर्या हाॅस्पीटलमधे पाठवुयात...पण का कुणास ठाऊक.. मी नाही पाठवलं दुसरीकडे,स्वतःच आमच्या रूग्णालयामधे आॅपरेशन करावयाचा निर्णय घेतला...सगळ्या तपासण्या ईतक्या तातडीने करणं शक्य नव्हतंच,म्हणून मग काही मोजक्या शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक तपासण्या करून व रक्त तयार ठेवून आॅपरेशन करण्याचा निर्णय घेतला...Incomplete Abortion नंतर लागणार्या आॅपरेशनला Dilatation and Curretage असं म्हणतात,यामधे पेशंटला Short General Anaesthesia म्हणजेच थोड्या कालावधीसाठी पूर्ण भूल दिली जाते व तज्ञांना या आॅपरेशनसाठी १५ ते २॰ मिनिटांचा अवधी लागतो...छोटेखानी असलं तरी Life Saving आॅपरेशन म्हणून ते खूप महत्वाचं आहे...
साधारंण अशी छोटेखानी शस्त्रक्रिया आमच्या रूग्णालयात ज्युनिअर डाॅक्टर करतात..त्याप्रमाणे याही शस्त्रक्रियेची जबाबदारी मी माझ्या ज्यूनिअर डाॅक्टरवर सोपवली..आजवर अशा अनेक शस्त्रक्रिया यापूर्वी तिने केलेल्या असल्याने मी तसा निर्धास्त होतो.पण मी आॅपरेशन थिएटरमधे अर्थात ऊपस्थित होतोच....झालं भूल दिली गेली आणि प्रत्यक्ष आॅपरेशनला सुरूवात झाली..बघता बघता सफाई संपली आणि ज्युनिअर डाॅक्टरने मला जोरात हाक मारली..." sir,shes bleeding profusely " मी अगदी तिथेच ऊपस्थित असल्याने, दुसर्या क्षणाला टेबलजवळ पोहोचलो..तिला बाजूला व्हायला सांगून मी तिच्याजागी आलो..ऐव्हाना आॅपरेशनची सगळी सुत्रे मी स्वतःच्या हातात घेतली होतीच...बघतोय तर अक्षरशः नळाची तोटी ऊघडी राहिल्यावर जसं पाणी वहातं तितका रक्तस्त्राव चालू होता....दोनेक मिनिटं रक्तस्त्राव थांबवायच्या अजून काही प्राथमिक ऊपचारपद्धती म्हणजे pressure tamponade,bimanual massage वगैरे करून पाहिलं,रक्तस्त्राव थांबवणारी औषधं ऐव्हाना भूलतज्ञाकडून दिली गेली होतीच...पण कशाचाही गुण येत नव्हता...
Atonic Uterus नावाचा ऐक प्रकार असतो...साधारणतः डिलिवरी नंतर, अथवा गर्भपातानंतर गर्भपिशवीचे स्नायू आकुंचन पावतात व आतल्या रक्तवाहिण्या त्यामधे दाबल्या गेल्यामुळे रक्तस्त्राव नैसर्गिकरीत्या थांबवला जातो,काही काही रूग्णांमधे हे स्नायू काही केल्या आकुंचन पावंत नाहीत आणि परिणामी या रूग्णांना अतिरीक्त रक्तस्त्राव होतो..त्याला Atonicity of Uterus असं म्हणतात...अगदीच नाईलाज झाल्यास अशा रूग्णांमधे गर्भपिशवी काढून टाकावी लागते...तर असौ
भूलतज्ञाला बोलवलं,रक्तस्त्राव दाखवला...त्याच्या तर पायाखालची जमीनंच सरकली....दोघांनीही दोन क्षण नुसतं ऐकमैकांकडे पाहीलं आणि मला काय म्हणायचंय हे नेमकं त्याला कळालं...न बोलता त्याने पुढची तयारी सुरू केली...गर्भपिशवी काढावयाचं आॅपरेशन करावं लागणार होतं...त्याची तयारी होईपर्यंत मी ज्युनिअरला तिच्या नवर्याशी बोलावयास सांगितलं...लागणार्या आॅपरेशनची त्याला थोडक्यात माहीती देऊन त्याची संमती घेतली आणि दोनंच मिनिटांत पुढील आॅपरेशन सुरू केलं....आॅपरेशन सूरू करेपर्यंत पेशंट पांढरी फटंक पडली होती...नातेवाईक ब्लड घेऊन यायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता..ईकडे दीड दोन लीटर रक्तस्त्राव अवघ्या पाचेक मिनिटांत झाला होता..पेशंटचं Blood Pressure 60 पर्यंत खाली गेलं होतं,व Pulse तर अगदी प्रयत्न करूनदेखील लागतंच नव्हता...थोडक्यात काय तर हातात अवघी काही मिनिटे काही सेकंद ऊरले होते.
पोटावर incision घेऊन अगदी दोनंच मिनिटांत दोन्ही बाजूंच्या Uterine Arteries क्लॅम्प केल्या...रक्त येईपर्यंत ईतर कामचलावू IV Fluids देण्यात आली...Arteries क्लॅम्प केल्याने रक्तस्त्राव थोडासा कमी झाला...पण ईथून पुढचं आॅपरेशनही अगदी कमी वेळात करणं आवश्यक होतं....साधारण दहा ते पंधरा मिनिटांतच गर्भपिशवी यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात यशस्वी झालो...आता रक्तस्त्राव पुर्णतः थांबलेला असूनही ब्लड मात्र अजूनही हाती लागलं नव्हतं...साधारण पाच किंवा दहा मिनिटं मेंदूला आॅक्सीजनचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला नाही, तर Irreversible Brain Damage होण्याची शक्यता असते...त्यामुळे यशस्वी आॅपरेशन होऊनदेखील रूग्णाची तब्येत कशी राहील याची खात्री देता येत नाही...ऊरलेलं आॅपरेशनही अगदी कमीत कमी वेळात संपवून पेशंटला Operation Theatre मधून बाहेर आणण्यात आलं...आॅपरेशनपूर्वी रूग्णाचं Hb 12 होतं ते आॅपरेशन नंतर म्हणजे केवळ अर्ध्या तासांत अवघं दोन इतकं कमी झालं होतं...म्हणजे अगदीच कमी...ईतक्यात रक्ताची ऐक पिशवी नातेवाईकाने आणली .ती तिला चढविण्यात आली,आता जेवढं करता येण्यासारखं होतं ते करून झालं होतं...रात्रभर आम्ही सर्वांनी जागून अख्या मुंबईतल्या सार्या रक्तपेढ्यांना विनवण्या करून रक्त ऊपलब्ध करून रूग्णाला ते चढवलं...ज्युनिअर सिनिअर ,नर्स किंवा डाॅक्टर हा भेद विसरून सगळेच तिच्या जीवासाठी खांद्याला खांदा लावून रात्रभर लढले...
मला तर रात्री झोप येणं शक्यंच नव्हतं...तिथेच वाॅर्डमधे खुर्ची टाकून बसून राहिलो...मीच बसून राहील्यामुळे ईतरांना जागेवरून हलण्याची मुभा नव्हतीच....साधारंण चारेक तासानंतर Blood Pressure आणि Pulse हळूहळू नाॅर्मल होऊ लागली...सकाळी सहा सातच्या सुमारास पेशंटला शुद्ध आली,तिने नवर्याला हातानेच ईशारा केला आणि आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला...तरीही ऊरलेले चार पाच दिवंस वाॅर्डबाॅय पासून ते सिस्टर्स पर्यंत सार्यांनीच तिची मनापासून काळजी घेतली..ऐरव्ही दिवसातून ऐकदा वाॅर्ड राऊंड घेणारा मीही दिवसातून चार पाच वेळा वाॅर्डात चकरा मारून तिच्या तब्येतीची विचारपूस करायचो....मग पाचव्या दिवशी ड्रेसिंग केलं ऐकदम छान आणि Healthy टाके असल्याने तिला डिस्चार्ज करावयाचा निर्णय घेतला,तसं तिला सांगितलं...डिस्चार्जचं नाव ऐकलं तरी रूग्णांचा चेहरा कसा स्मितहास्याने फुलून जातौ, पण हिचा मात्र अगदीच धीरगंभीर झाला... मी म्हटलं " काय झालं...??" तशी म्हणाली ,"काही नाही डाॅक्टरसाहेब ,आता मी परंत कधीही आई बनू शकणार नाही या विचारानेच मी अर्धमेली झालेय...." मी अगदी समजावणीच्या सुरात तिला म्हणालो आधीच्या दोन मुली आहैतंच की त्यांची नीट काळजी घे....तशी हात जोडून धन्यवाद म्हणाली," सांगितलं माझ्या नवर्याने मला,तुम्ही नसता तर नसते जगले मी म्हणाला...." मी तिच्या या बोलण्याकडे हसून दुर्लक्ष केलं ,आठवडाभरानंतर ये दाखवायला असं म्हणून निघून गेलो...
आठवडाभरानंतर तीच पेशंट अगदी आरामात चालंत मला भेटायला आली....लांबूनंच मी तिला ओळखलं,चाळीस पन्नास रूग्ण होते तिच्या आधी पण मावशींना पाठवून तिला आधीच आत बोलावून घेतलं...तिला असं स्वतःच्या पायावर चालताना पाहून माझा ऊर किती भरून आला असेल ,याची आपण सर्व कल्पनादेखील करू शकणार नाही...म्हटलं सांगावं हिला की काय थोर नशीब घेऊन जन्माला आलीये ही....अगदी थोडक्यात जीव बचावलाय हिचा,हिच्यासाठी दोन दिवंस अगदी प्रत्येकानेच कशी जीवापाड तहान भूक विसरून मेहनंत घेतलीये...पण मग नाही सांगितलं,म्हटलं हेच तर आपल्याला आयुष्यात करायचं होतं...याचसाठी तर केला होता हा अट्टाहास...यासाठीच तर रात्ररात्र जागून अभ्यास करीत ईतवर आलो...मग यात ऐवढा काय मोठेपणा..??
मी पुढे काही बोलायच्या आतंच तिने पेढ्यांचा बाॅक्स समोर ठेवला आणि म्हणाली," सर माझ्या लेकीचा पहिला क्रमांक आला शाळेत....तिलासुद्धा तुमच्यासारखंच डाॅक्टर बनवीन म्हणते..." तिच्या त्या लेकीकडे मी क्षणभर पाहीलं आणि माझे डोळे भरून आले...अवघं सात आठ वर्षांचं पिल्लू ते...चापून चोपून तेल लावून,लाल रिबीनी बांधून वेण्या घातल्या होत्या तिने..,काय केलं असतं हिने आईविना...?? या ईतक्या कोवळ्या वयात कशी काय सामोरी गेली असती ऐकटीच या जगाला ...?? शेजारी तिचा नवरा हात जोडून मंद हास्य करीत होता....खूप काही बोलण्यासारखं होतं, सांगण्यासारखं होतं पण आवरलं स्वतःला...डोळ्यांतून चटंकन अश्रूंचे दोन थेंब ओघळले...मग त्या चिमूरडीच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं,चांगले पैसे मिळतात म्हणून डाॅक्टर होऊ नको,लोकांसाठी झटायची ईच्छा असेल तर आणि तरंच डाॅक्टर हो...दुसर्या हाताने अलगद पुढील रूग्णाला हात करून आत बोलावलं आणि त्या चिमुरडीचा निरोप घेतला....त्यानंतर दर महिन्या दोन महिन्यांनी तीच रूग्ण कुणा ना कुणा नातेवाईकांना घेऊन येते माझ्याकडे आणि दोन्ही पायांवर चालणार्या तिला पाहुन माझा मलाच खूप अभिमान वाटतो...

-©- निरागस
GreGr job
ReplyDeleteWow gr8 job . Wachata wachata angawar kata ala, hats off to you all doctors.
ReplyDeleteChan lihilay...vachatana Dole bharun aale
ReplyDeleteसलाम अशा dedication ला. आणि अर्थातच सुन्दर रचना लेखाची.
ReplyDelete