" 9 मार्च २॰॰६ रोजी राज ठाकरे नावाच्या ऐका तरूण नेत्याने बाळासाहेबांच्या आधिपत्याखाली असणार्या शिवसेनेसारख्या प्रस्थापित पक्षाला रामराम ठोकून ,स्वतःचा नवा पक्ष ऊघडण्याचं धारिष्ट्र्य केलं आणि त्यांच्याबरोबरंच माझ्यासारखे अनेक तरूण या नवीन पक्षात भरपूर अपेक्षांचं ओझं घेऊन सामील झाले...
या नवीन पक्षाची मतं जगजाहीर होती,चाळीस वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी मराठीच्या ज्या मुद्याभोवती राजकारण करून शिवसेना ऊभारली, त्याच मुद्याकडे नंतर सेनेचं काही कारणास्तव दुर्लक्ष झालं..पण मराठीचा मुद्दा मात्र महाराष्ट्रात अगदी तसाच होता, किंबहूना त्याहून अधिक प्रखर झाला होता...राजसाहेबांसारख्या चाणाक्ष राजकारण्याने हे हेरून त्याभोवती आपल्या नवीन पक्षाची ऊभारणी केली आणि त्यात अल्पावधीत त्यांना यशही आलं...
सुरूवातीच्या काही काळात पक्षाला मिळालेला प्रतिसादही तितकाच ऊत्स्फूर्त होता..पक्षाध्यक्ष श्रीयुत राजसाहेबांची शिवतीर्थावरील पहिली जाहीर सभा आजवरच्या स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वोच्च गर्दी जमवणार्या सभांपैकी ऐक मानली जाते...नंतरच्याही प्रत्येक सभेला व त्यातील प्रत्येक भूमिकेला लोकांनी ऊत्स्फूर्त प्रतिसाद दिला..टोलविरोधातील आंदोलन असो, अथवा रेल्वे भरतीमधील परप्रांतियांविरोधातील आंदोलन असो, मनसेची ताकद लोकांनी रस्त्यावर पाहिली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले...अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीत जरी पक्षाचा खासदार निवडून आला नसला, तरी पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी विलक्षण होती आणि मनसेने राजकारणाची सारी गणितं बिघडवून टाकली
मात्र मागील लोकसभा निवडणूकीत आलेल्या मोदीलाटेत ईतर प्रादेशीक राजकीय पक्षांसारखीच मनसेची अक्षरशः वाताहत झाली आणि मग त्यानंतर हा पक्ष पुन्हा मार्गावर येऊच शकला नाही...वास्तविक पाहता नरेंन्द्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना,मोदींसारखा नेता देशाला पंतप्रधान म्हणून लाभावा, अशी मागणी सर्वप्रथम स्वतः राजसाहेबांनीच केली,पण नंतरच्या राजकीय समीकरणांनुसार मात्र त्यांनी मोदींना विरोध करण्यातंच धन्यता मानली ...पण स्वतःचं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी त्यांना मोदींना विरोध करणं गरजेचं होतं किंवा आहे...माझ्यापद्धतीने याची मी केलेली मीमांसा खाली मांडतोय...बघा पटतेय का...!!
शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मतदान करणारा मतदार कमी अधिक प्रमाणात ऐकंच आहे..या दोन्ही पक्षांमधील कोणत्याही ऐका पक्षाला जर महाराष्ट्रात पुढे जायचं असेल, तर ते दुसर्या पक्षाच्या छाताडावर पाय रोवूनंच पुढे जावं लागेल...भाजपा आणि शिवसेना हिंदूत्वाचे राजकारण करीत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात का असेना ,पण ऐकमेकांना नैसर्गिकरीत्या पूरक मॅच आहेत( Natural Match ). शिवाय मनसेची ऊत्तर भारतीयांविरोधातील भूमिका भाजपाला देशाच्या राजकारणात त्रासदायंक ठरू शकते...त्यामुळे भाजपा मनसेसोबंत जाणं कदापी शक्य नाही आणि मनसेला जर भाजपा - शिवसेनेला मागे लोटून स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार करावयाचं असेल, तर मग भाजपा आणि पर्यायाने मोदींविरोधात बोलावंच लागेल...
पण आजवर ऐकला चलो रे असं म्हणून स्वतःच्या ताकदीवर चाललेली मनसेची घोडदौड अगदी कालपरवापर्यंत खरंच वाखाणण्याजोगी होती..काॅंग्रेस आणि भाजपा दोघांविरोधात गर्जणारी मुलूखमैदानी तोफ म्हणून राजसाहेबांची ख्याती अख्या महाराष्ट्रातंच नाही तर संपूर्ण भारतात होती आणि अगदी आजही आहे,पण लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार साहेबांच्या पुढाकाराने मनसे पहिल्यांदाच मोदीविरोधी आघाडीत सामील होते की काय अशी धुसर शक्यता निर्माण झाली आणि मग सरतेशेवटी काॅंग्रेसने नकार दिल्याने मनसे आघाडीतून बाहेर झाल्याची बातमी आली..मग लगेचंच दोन दिवसांनी मनसेनेही आपण लोकसभा लढविणार नसल्याची जाहीर घोषणा करून टाकली आणि सार्या...
ऐकंदरीत मागील दोन तीन वर्षांमधील पक्षाची मार्गक्रमणा पाहता हा पक्ष आपल्या मूळ रस्त्यापासून भरकटंत चालला आहे, हे सांगायला कोण्या राजकीय विश्लेषकाची अजिबात गरंज नाहिये..,मग ती विरोधाला विरोध म्हणून सर्जिकल स्ट्राईक वर शंका ऊपस्थित करण्याची भूमिका असोत ,वा आजवर काॅंग्रेसला व त्यांच्या भूमिकेला केलेला विरोध विसरून आघाडीत जाण्यासाठी केलेली वैचारीक तडजोड असोत...त्यातंच आधी मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला जाहीर पक्षप्रवेश आणि निवडून आलेल्या ऐकुलत्या आमदाराने पक्ष सोडून पक्षनेत्रुत्वावर दाखविलेला अविश्वास यावरून मनसे अगदीच बिकंट परिस्थितीतून मार्गक्रमणा करीत असल्याचा प्रत्यय येतो...
असो संकटं येतात,संकटं जातात,नेते कार्यकर्ते येतात जातात, पक्ष मात्र आपल्या जागी ठाम असतो...राजसाहेब जातीपातीचं ,धर्माचं राजकारण न करता,केवळी मराठी जनांच्या हितासाठी झटणारा ऐक लढवय्या नेता म्हणून आम्ही सर्वजण आपल्याला ओळखतो...क्रुपया मतांसाठी स्वतःच्या आणि पक्षाच्या तत्वांशी तडजोड करू नका..कारण तडजोडी तात्पुरत्या असतात ,पक्षाला दीर्घकालीन वाटचालीसाठी तडजोडी नाही, तर पक्षाची ध्येयधोरणेच कामी येतील....येणारी लोकसभा न लढविण्याचा आपला निर्णय मनसैनिकांसाठी अतिशय निराशाजनंक असला तरीही आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही...येणार्या विधानसभा निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीनिशी ऊतरून निवडणुकीचं मैदान मारावं व आपल्या हातून या महाराष्ट्राचं व पर्यायाने मराठी माणसाचं भलं व्हावं हीच माफंक अपेक्षा...

खूपच छान मार्मिक तसेच चोख परखडपणे राजसाहेबांबद्दल आपले मत मांडण्यात आपण यशस्वी झाला आहात.
ReplyDelete