Monday, 13 February 2017

आयुष्य म्हणजे आहे तरी काय ?

आयुष्य म्हणजे  केसांचा  गुंता, कधीही न सुटणारा,
स्वतः न सुटता सोडवणार्‍यालाही आपल्यात गुरफटणारा....

आयुष्य म्हणजे जटाधारी साधू ,चिलिम ओढणारा,
स्वतःचं नागवंपण विसरून ऊघड्यावर आंघोळ करणारा....

आयुष्य म्हणजे कागद, करकचून चुरगळलेला,
पडलेल्या घड्यांमधून आपलं अस्तित्व ऊलगडून सांगणारा....

आयुष्य म्हणजे  शुन्य,भोपळ्याएवढा,
कुणाकडूनही भाग घालून न घेणारा,स्वतःच्याच मस्तीत जगणारा....

आयुष्य म्हणजे कावळा, आकाशात ऊडणारा,
स्वतः कुरूप असूनही दुसर्‍याच्या सौंदर्यावर शिंतोडे ऊडवणारा....

आयुष्य म्हणजे वेडावाकडा वेल काकडीचा,
दुसर्‍याचा आधार घेत सदैव प्रगती करणारा....

आयुष्य म्हणजे नापीक जमीन,दूर माळावरली,
ईतरांच्या पिकाकडं बघून अश्रू ढाळणारी...

आयुष्य म्हणजे पुस्तक..,जुन्या रद्दीतलं..,वाळवी लागलेलं,
स्वतःकडील भरगच्च ज्ञान दुसर्‍याच्या हवाली करून सुखावलेलं....

आयुष्य म्हणजे लपंडाव मानवी भावनांचा,स्वप्नांचा,आकांक्षा आणि ईच्छांचा..
                       

                                                  -©- निरागस


No comments:

Post a Comment