..नुकताच पावसाळा सुरू झाला होता..मुसळधार पाऊस पडायला मात्र अजून अवकाश होता..आकाश ढगांनी पूर्णतः व्यापून गेलं होतं...मित्राच्या घरी पुस्तक आणायला म्हणून जायचं होतं...सायकल काढली आणि निघालो...घरापुढच्या चौकातून थोडं पुढे गेलो तर पाऊस सुरु..सायकल झाडाखाली घेतली आणि चडफडत ऊभा राहिलो...शिव्या पुटपुटलो तोंडातल्या तोंडात हे वेगळं सांगायची गरजंच नाही...नंतर ओझरतं लक्ष गेलं तर झाडाखाली छत्री घेऊन एक छानशी मुलगी ऊभी होती...दिलेल्या शिव्या बहुतेक तिने ऐकल्या असाव्यात...पण ऐकल्या तर ऐकल्या गेली ऊडत, आपल्याला काय फरक पडतो..?? या अविर्भावात मी ऊभा राहिलो...स्वतःहून प्रथम बोलायचा तर प्रश्नंच नव्हता...कारण त्याने आमची नसलेली ईभ्रत कमी होणार होती...
बराच वेळ ऊभा होतो पण पाऊस थांबायचं मात्र काही लक्षण नव्हतं...एव्हाना पावसात पूर्ण भिजून थंडीने गारठलो होतो..त्या मुलीकडे असलेल्या छत्रीचा खरंच खूप हेवा वाटत होता पण आमचा दुटप्पी स्वभाव काही केल्या तिच्याकडे मदत मागायची परवानगी देत नव्हता...तसाच ऊभा होतो आकाशाकडे बघंत..शेवटी तिलाच दया आली आणि तिनेच विचारलं छत्री हवीये का...?? हवी तर होती पण आपसुकंच तोंडातून निघून गेलं..नाही नको..!! मी ठीक आहे...ती पुन्हा म्हणाली अरे भिजतोयस तू किती..आणि तिने छत्री सरळ डोक्यावर धरली...
आतापर्यंत खरंच माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं पण आता मात्र रहावलं नाही ,लक्ष गेलंच...साधारण माझ्यापेक्षा वयाने एक-दोन वर्षै मोठी असेल..पावसात भिजल्यामुळे मोकळै सोडलेले केस,लांबसडक नाक,डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा असा काहीसा तिचा पेहराव होता...आता ईतक्या वर्षांनंतर नीटसं आठवत नाही पण एकंदरीत खूप गोड दिसत होती ती...तिनेच विचारलं पुढे..काय करतोस..?? म्हटलं अभ्यास करतो,खेळतो,जेवतो आणि झोपतो...हसली ती...आवडलं असावं ऊत्तर तिला..आणि मग पुढील दहा मिनिटं गप्पा मारल्या...गप्पा कसल्या ती प्रश्न विचारत होती आणि मी ऊत्तरं देत होतो...वेळ कसा गेला कळलंच नाही...
एव्हाना पावसाचा जोर सरला होता..आकाश पुन्हा एकदा स्वच्छ झालं होतं..लोकं पुन्हा घराबाहेर पडू लागली होती...मला मात्र हा पाऊस कधीच थांबू नये असं वाटत होतं..आयुष्यात पहिल्यांदा मी पावसाचं महत्व मान्य केलं होतं..निर्विवाद महत्व...शेवटी तिच बोलली निघूयात का...?? मनातून नकळत आवाज आला...नको..!! पण तो दाबून मी म्हटलं हो नक्की आणि छत्रीबद्दल धन्यवाद..तिने पुन्हा विचारलं तुला छत्री हवीये का..?? मनातून पुन्हा आवाज आला, मी तुला घरापर्यंत सोडू का..??पुन्हा मी प्रयत्नपूर्वक तो दाबला आणि म्हणालो, नको मला..!! जाईन मी.... भेटूयात परत असं म्हणून ती निघाली...माझे पायंच ऊचलंत नव्हते..तिथेच थांबलो तिच्या पाठमोर्या आक्रुतीकडे पहात...सुंदर,गोड,अशक्य मुलगी होती ती...आणि ती पुन्हा कधीच मला दिसणार नव्हती...काहीतरी चुकीचं घडंत होतं पण ते मला हवं हवंसं वाटंत होतं...काहीतरी हातून निसटंत होतं पण त्याचं शल्य मला वाटंतच नव्हतं...एव्हाना पुन्हा रिमझीम पाऊस सुरू झाला होता..वीज पुन्हा कडाडू लागली होती...सायकल काढली आणि थेट घर गाठंल...दहा वर्ष झाली त्यानंतर पुन्हा कधींच भैट नाही झाली पण आजही पहिला पाऊस पडला की आठवण निघतेच...काय करणार माणूस म्हणून माझ्या मर्यादा आहेतंच की...

( तळटीप - माझ्या नातेवाईक आणि मित्रांसाठी ही घटना काल्पनीक आहे..,हिचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही आणि असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...ईतरांसाठी ही घटना खरी आहे.... )
©- निरागस
©- निरागस
Chaan..
ReplyDeleteधन्यवाद
Delete