देवांचे गुणगाण गाणारे शब्द, असुरांची मिमांसा करणारे शब्द,
मायेची फुंकर घालणारे शब्द,वैशाख- वणव्यासारखे पोळणारे शब्द,
वाल्याचा वाल्मिकी करणारे शब्द, क्षणार्धात कर्णाला सामान्य करणारे शब्द,
आकाशाचं मोजमाप करणारे शब्द,चंद्रतार्यांशी लाघवी बोलणारे शब्द,
वार्याला बांधून घालणारे शब्द,पालापाचोळ्याला दिशा दाखवणारे शब्द,
लेकराला साद घालणारे शब्द, मनातून हरलेल्याला धीर देणारे शब्द,
चंद्राला मोहक बनवणारे शब्द,सुर्याला कुरूप म्हणून हिणवणारे शब्द,
आईची माया ऊलगडणारे शब्द,बापाच्या काळजात डोकावणारे शब्द,
झरा,पाणी,वार्याची झुळूक,सूर्याचा कवडसा,म्रुदगंध या व ईतर अनैक खर्या खोट्या कल्पनाविलासांना प्रत्यक्षात आणणारे शब्द आणि शब्दंच...!!
-©- निरागस
No comments:
Post a Comment