Monday, 11 September 2017

टाईम बाॅम्ब

                            मला कित्येकदा राहून राहून असं वाटंत रहातं नेहमी, की मी माझ्या संपूर्ण ऊर्जेतली १॰% ऊर्जादेखील खर्च करीत नाही दिवसभरात.. माझ्या जवळच्या काही निवडंक मित्र मैत्रिणींसमोर मी ही खंत बोलूनदेखील दाखविली आहे कैकवेळा..आणि आता तर फारसा अभ्यासदेखील नसतो करायला..दिवंसभरातले आपले ओपीडीतले शे दोनशे पेशंट बघितले की झालं...महिन्याच्या दोन तारखेला खात्यात गलेलठ्ठ पगार जमा होतो..मग परंत पुढंचा महिना ये रे माझ्या मागल्या...!! पण हे काही खरं नाही..या गोष्टींचा मला आज ना ऊद्या वीट येईलंच..मग काहीतरी नवीन करायला घेईन..चांगलं वाईट काहीतरी करेन पण नक्कीच वेगळं काहीतरी करेन..
                           तर मग ही वरची अवाजवी ऊर्जा जिरवायची कशी...?? आता स्वतःच्याच शिक्षणाच्या व ईतर लोक काय म्हणतील ?? या दबावाखाली म्हणून , फार काही ऊपद्व्याप करंता येत नाहीत..माझ्याच स्वतःच्या विद्यार्थ्यांकडे बघून कधीकधी मनात विचार यैतात ,की किती भोळी भाबडी मुलं आहेत ही..!! किती सरळमार्गी...!! मी याजागी असतो तर असं केलं असतं, तसं केलं असतं.. वगैरे वगैरे..पण आता नाही तसं वागता येत ,म्हणून मग नाईलाजाने , कुठे व्यायामशाळेत जाऊन कसरंत कर,फेबुवर ऊगाच नाही त्या शाब्दीक कोट्या कर किंवा ऐखादा बहुचर्चीत विषंय पकडून वैचारीक धुमशान घाल, अशा गोष्टींमधे ही ऊर्जा खर्च करण्याचा मी प्रयत्न करतो...पण MBBS ला असताना मात्र अशी बंधनं नसायची...दिवसभर नुसता ऊच्छाद मांडायचो...चांगलं की वाईट हे विचार ढुंकूनसुद्धा मनाला शिवायचे नाहीत...त्यात भर म्हणून माझ्याचसारखी अजून आठ दहा मुलं MBBS ला ऐकाच वर्गात आलो आणि मग आमच्या या तांडवाला पाहून प्रत्यक्ष परमेश्वरानेदेखील हात टेकले असतील वर आभाळात...
                              तर झालं असं...की नुकतीच दिवाळीची सुट्टी संपवून ,आम्ही सगळे मित्र-मंडळी परत काॅलजात आलो...मग कुणीकुणी कायकाय केलं यावर्षी घरी, त्याची जाहिरातबाजी सुरू झाली..कुणी म्हणालं मी शेजारच्या घरासमोर मुद्दाम मोठाले फटाके फोडले..तर कुणी शेजारच्या लहान मुलांनी बनवलेल्या किल्याचं सकाळी लवकर ऊठून  लक्ष्मीबाॅम्ब लावून सगळ्यांच्या आधी ऊद्घाटन करून आलं होतं...चर्चा सुरू असताना मधैच कुणीतरी म्हणालं ,की मी यावर्षी टाईम बाॅम्ब बनवला...आता ही संकल्पना मात्र जरा फारंच हटके आणि विलक्षण अशी होती...सगळ्यांनी ऐकसुरात आश्चर्याने विचारलं,अरे टाईम बाॅम्ब कसा बनवायचा रे...?? मग मित्रानेच सांगितली प्रक्रिया..तर काही नाही ..चांगला मोठा सुतळी बाॅम्ब घ्यायचा,त्याची वात अगरबत्तीच्या बरोबर मध्यभागी येईल, अशारीतीने बांधायची आणि आपल्या आवडीची जागा हेरून तिथे तो ठेवून अगरबत्ती पेटवून द्यायची...अशाने आपण आरामात दूरवर कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊ शकतो आणि पकडले जाण्याचा धोका नाहीसा होऊन , न आवडत्या लोकांना असं करून आपल्याला मनसोक्त त्रास देता येतो...मग काय आता नुकतीच नवीन विद्या अवगंत झाली होती..आता तिचा ऊपयोग कधी आणि कुणावर करायचा यावर खलबतं सुरू झाली..
                          आता कोणत्याही काॅलेजात जर ऐखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, की कारे बाबा तुला संपूर्ण काॅलेजातल्या कुणाकुणाचा म्हणून सगळ्यात जास्त राग येतो ते सांग..तर तो अगदी हमखास सांगेल, वसतीग्रुह प्रमुखाचा म्हणजेच Hostel Warden चा, काॅलेजप्रमुखाचा म्हणजेच Dean चा आणि त्याच्याच काॅलेजातल्या सिनिअर विद्यार्थ्यांचा..आम्हीही याला अपवाद नव्हतोच...फक्त या तिघांव्यतिरीक्त आमच्या यादीत अजून ऐका नावाची भर होती ती म्हणजे आमच्या वसतीग्रुह सुरक्षारक्षकाची...रात्री ऊशीरा का येता...?? ईतका गोंधळ का घालता ..?? वगैरे वगैरे तद्दन फालतू प्रश्न विचारून व प्रसंगी आमच्या तक्रारी करून, वेळोवेळी त्याने आम्हाला त्रास दिला होताच...आता आमची पाळी होती...हाहाहा
                          झालं..!! ठरलं तर मग...येता रविवार गाजवायचा पक्का निर्धार करून आम्ही सगळेच मावळे कामाला लागलो..बाजारात मिळणारे ऊच्चप्रतीचे सुतळी बाॅम्ब,अगरबत्ती,चिकटपट्ट्या वगैरे सामान खरेदी करून रीतसर टाईम बाॅम्ब बनविण्यात आले.. सर्वजण आता रविवार ची वाट पाहू लागले आणि तो दिवंस ऊजाडला..दिवसभर फोनवर बोलायच्या व ईतर काही निमित्ताने गटागटाने सर्वत्र फिरून मोक्याच्या जागा हेरण्यात आल्या..सगळं काही ठरवून त्याची आखणी चालू होती तर आमच्यातल्याच अजून ऐकाचं डोकं चाललं..काय तर म्हणे सगळीकडे ऐकाच वेळी आवाज झाला पाहिजे...ऐव्हाना आमची सारासार विचार करण्याची कुवंत आम्हाला कधीच सोडून गेली होती..हाती राहिला होता तो केवळ आणि केवळ मस्तीखोरपणा..हीदेखील संकल्पना आमच्या मूळ प्लॅनमधे अगदी आयत्या वेळी ऐकमताने सामाविष्ठ करून घेण्यात आली..आणि मग जेवण करून चार जणं चार टाईम बाॅम्ब घेऊन ठरवून दिलेल्या आपापल्या जागांच्या दिशेने कूच करते झाले..माझ्याकडे वसतीग्रुहरक्षकाच्या खोलीसमोर बाॅम्ब ठेवायची जबाबदारी होती, ती मी पार पाडली,ईतर मित्रांनीदेखील आपापल्या जबाबदार्‍या लीलया पार पाडून Dean,Warden आणि सिनिअर विद्यार्थी हाॅस्टेल या ठिकाणी रीतसर बाॅम्ब ठेवले...साधारण ऐकाच वेळी हे सगळे बाॅम्ब ठेवण्यात आले...
                         आता फक्त गंमत बघण्याचं काम ऊरलं होतं..अर्ध्या पाऊण तासात काम फत्ते होणार होतं..गंमत बघण्यासाठी म्हणून सगळे वसतीग्रुहाच्या गच्चीवर जमलो..ऊरलेला अर्धा तास काही केल्या पुढे सरकेना...मग मनात चलबिचल सुरू झाली..अगरबत्ती विझली तर नसेल ना..?? कधी वाजणार वगैरे वगैरे आणि ईतक्यात मोठ्ठा आवाज झाला.. धूम..!! धड्डाम...!! धूम...!! डीनच्या बंगल्याच्या खिडकीत ठेवलेला बाॅम्ब काचा फोडून फुटला होता..त्याबरोबर धावंत बाहेर आलेला डीन चा चपराशी आणि डोळे चोळंत बाहेर आलेला डीन बघून केलेल्या परिश्रमांचं सार्थक झाल्यासारखं झालं..क्षणभर आता Dean वसतीग्रुहाची झाडाझडंती घेणार असं वाटून अंगावर काटा आला पण तसं काही झालं नाहीच...अजून पाच मिनिटांनी सिनिअर हाॅस्टेलमधला बाॅम्ब फुटून तिकडे धावपळ झाली, ते पाहून हसता हसता पुरेवाट होते तोच वाॅर्डनच्या दरवाजासमोर मोठ्ठा आवाज झाला धुम...!! धडाम...!!धुम्म...!! तोही घाबरून बाहेर आला..झालं चारपैकी तीन बाॅम्ब अगदी ठरवल्याप्रमाणे फुटले होते पण नेमका मी लावलेला चौथा बाॅम्ब काही केल्या फुटेना..अजून पाच-दहा मिनिटं वाट पाहून झालं पण काहीच ऊपयोग झाला नाही..मग शेवटी मित्राला म्हटलं, चल जाऊन बघू काय झालंय ते..आम्ही दोघे खाली त्या रूमबाहेर बाॅम्ब लावलेल्या जागी जायला आणि आमचा वसतीग्रुहरक्षक बाहेर यायला ऐकंच वेळ झाली..मग ऊगाच ऊसनं अवसान आणून त्याला म्हणालो काय मामा सगळं व्यवस्थित ना..?? तो ऊत्तर देईपर्यंत बाॅम्बकडे बघितलं तर तो केंव्हाही फुटायच्या बेतात...माझ्यामागोमाग त्याचंही लक्ष गेलं तिकडे आणि तो ओरडलाच पळा पळा पळा...!! बाॅम्ब...!! बाॅम्ब .!! आणि धावंत जाऊन त्याने पाण्याची बादली आणून ओतली त्यावर...झालं आमचा ऊरलेला चौथा बाॅम्ब मात्र निकामी करण्यात आला..पण त्या सुरक्षरक्षकाची झालेली धावपळ आजही आठवली की हसून हसून पुरेवाट होते...पुढे कित्येक दिवंस वसतीग्रुह प्रमुखाने या प्रकरणाचा तपास लावायचा प्रयत्न केला..पण आम्ही काही सापडलो नाही..नाही म्हणायला आमचं नियोजनंच तितकं चोख होतं..
                          आज ईथे मुंबईत ऐका प्रथितयश महाविद्यालयात कन्सल्टंट म्हणून काम करताना जेंव्हा मागे वळून पहातो तेंव्हा या अशा गोष्टी विलक्षण सुख देऊन जातात...आयुष्य सुंदर आहे ते या अशा जीवाला जीव देणार्‍या निष्पाप निरागस मित्रांमुळे...आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त ते सौंदर्य पाहण्याची द्रुष्टी पाहिजे आणि जे आवडलं ते आपलंसं करावयाची जिद्द पाहिजे...अनपेक्षीतपणे आयुष्यात येऊन माझ्या आयुष्याचा परीघ ऊंचावणार्‍या या अशा निवडंक मित्रांना दिलसे सलाम.....!!
                                  

                                       -©- निरागस

No comments:

Post a Comment