Sunday, 24 September 2017

आयुष्यावर लिहू काही

"                       तसं लिहायला चालू करून बरीच वर्ष झाली...म्हणजे मला आजही आठवतंय पाचवीमधे मी लिहिलेला सर्कशीतल्या सिंहाचं आत्मव्रुत्त हा निबंध माझ्या मास्तरीनबाईंनी पार लॅमिनेट करून कित्येक महिने पोर्चमधे लावून ठेवला होता...ती नेहमी म्हणायची पाचवीतल्या मुलग्याला ईतकी समंज कुठून आणि कशी आली...?? आणि नंतर क्वचित ऐखादा अपवाद वगळता दरवर्षीच हे झालं..मराठीच्या पेपरात  सगळ्यात शेवटी निबंध लिहिणार्‍या ईतर मुलांमधे माझा पेपर ऊठून दिसायचा तो पहिल्या पानावर लिहिलेल्या माझ्या निबंधामुळे...नंतर MBBS च्या प्रथम वर्षात नथुराम गोडसेंवर लिहिलं तर माझा सिनिअर मला शोधत माझ्या रूमवर आला...काॅलेजच्या मॅगझीन प्रमुखांनी खाजगीत भेटायला बोलवून सांगितलं की ईतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवातला हा सर्वोत्क्रुष्ठ लेख...
                            असो..ऐव्हाना मला स्वतःला कळून चुकलं होतं की मी चांगलं लिहितो...पण मग तेच तेच रटाळ विषंय आई,बाबा,सुर्योदय,सुर्यास्त,कांदा लसून यांवर लिहिण्याचा कंटाळा येऊ लागला...कुठेतरी अलगद वाटायला लागलं की या लिखाणाचा ऊपयोग समाजाला होणार नाही...आधीच मोठमोठ्या रथी महारथींनी लिहून किंवा रचून ठेवलेल्या रद्दीत अजून भर म्हणायची नुसती....फेबुवर लिहिणं चालू केलं..काहीबाही लिहायचो,शाब्दिक कोट्या करायचो पण योग्य दिशा नव्हती....स्वतःचं वेगळं मैदान नव्हतं आणि या फेबुच्या मैदानावर मनसोक्त खेळता येत नव्हतं...थोडक्यात काय तर आकाशात वार्‍याच्या झोताप्रमाणे स्वतःची दिशा बदलणार्‍या त्या कापसाच्या म्हातारीसारखं होतं माझं लिखाण..अगदी दिशाहीन..
                           पण मग स्वतःच ठरवलं की आता फालतू विषयांवर लिहायचं नाही..ज्या गोष्टींवर लिहून स्वतःचे शब्द आणि वाचून ईतरांचा वेळ वाया जाईल असं काहीच लिहायचं नाही..म्हणून मग स्वतः अनुभवलेल्या अथवा पाहिलेल्या गोष्टींवर लिहिणंं चालू केलं..माझ्या अनुभवातून मला जाणवलेल्या आयुष्यातल्या निरर्थक गोष्टींची निरर्थकता असेल किंवा आयुष्याकडे बघायचा द्रुष्टिकोन असेल सारंच मी आपल्या परीने लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला..काहींना ते पटलं तर काहींना नाही पण बहुतेक सगळ्यांनी किमान ते वाचलं आणि त्यावर विचार केला आणि माझ्या शब्दांचं चीज झालं
                           विचार तेंव्हाहि अनैसर्गिक होते आजही अनैसर्गिकंच आहेत आणि ऊद्याही ते अगदी तसेच राहतील पण आज विषयांचा परीघ किंवा लिखाणाची व्याप्ती म्हणाल तर खूप वाढली आहे..कधीकधी स्वतःच लिहिलेली ऐखादी कविता किंवा लेख कुठेतरी दुसर्‍याच जागी पहायला मिळतो , अथवा मलाच whatsapp फाॅरवर्ड म्हणून येतो..छान वाटतं..कधी कधी माझं नाव हटवून कुणीतरी स्वतःचंच नाव नावलेलं असतं त्यावर पण हरकत नाही...शब्दांवर अधिकार सांगणार्‍यांपैकी मी नाही...ज्याला जिथे आणि जसं माझं लिखाण ऊपयोगात आणायचंय ते त्याने तसं आणावं..
                            हे माझं लिखाण,हे तुमचं लिखाण असं म्हणून शब्दांना बांधून घालता येत नाही.अर्थावर हक्क सांगा, शब्दांवर नाही कारण शब्द तुमच्या मनातल्या अर्थाला जीवंत बनवतात..आणि शब्द शब्द म्हणजे तरी नेमकं काय हो..?? पुढून वाचला तर शब्द,मागून वाचला तर लहाणपणी शिकलेली बाराखडीच ना..? असो लिहिता लिहिता अशीच ऐकामागून ऐक वर्षे सरावीत..लिहिताना मी थकू नये आणि वाचताना आपण..आणि ही शब्दरूपी प्राक्तनं ऊधळायची प्रक्रिया निरंतर चालावी..
 
                                         

                                          -©- निरागस




No comments:

Post a Comment