Monday, 18 September 2017

लिहिता लिहिता

लिहिता लिहिता ....

आभाळाचा कागद व्हावा आणि पावसाची व्हावी शाई....
माझ्या शब्दांतून कुणी त्याचा बाप हुडकावा ,तर कुणी त्याची आई..


लिहिता लिहिता....

मन अगदी हरवून जावे अन् डोके व्हावे बधीर....
शब्दांतून माझ्या कुणी आठवावी बहिणाबाई ,तर कुणी आठवावा कबीर..


लिहिता लिहिता....

शब्दांतूनंच बोलंत रहावं, जगत रहावं ,जोवर नाही होत गलितगात्र....
भावनांचा हा खेळ सारा ,शब्द केवळ निमित्तमात्र..


लिहिता लिहिता....

मग ऐकेदिवशी अचानक शब्द हे जावेत संपून....
डोळे मिटून चालतं व्हावं लगोलग आपणही ,मग केवळ शब्दरूपी ऊरून..
                                   


                                         -©- निरागस


No comments:

Post a Comment