" सोमवारपासून काही दिवंस सुट्टी घ्यायचं नक्की केलं होतं,घरी निघणार होतौ...पुढील आठवड्यात काही सर्जरीज होत्या पोस्ट केलेल्या ,त्या आता माझी सहयोगी डाॅक्टर करेल..तर आज दोन पेशंट त्यांचे रीपोर्ट दाखवायला आले असता, तसं त्यांना सांगितलं की मी नाहिये ऊद्यापासून दुसर्या डाॅक्टर मॅडम आहेत, त्या करतील आपलं आॅपरेशन...
तर त्यातली ऐक रडायलाच लागली..पश्चिम बंगालची पेशंट,लग्नानंतर मुंबईत आलेली,धड हिंदी बोलता येत नव्हतं..मराठी किंवा ईंग्रजी बोलणं तर लांबची गोष्ट, समजंत ही नाही तिला...याआगोदर चार वेळा प्रेग्नन्सी राहूनदेखील काही ना काही कारणाने abortions झालेली...blood pressure जास्त,thyroid च्या तपासण्या बिघडलेल्या आणि हे ईतकं कमी होतं म्हणून की काय घरी अठरा विश्व दारिद्र्य,नवरा दारूडा कुठेसा वाळू ऊपसायला जायचा...
पण ही मात्र समझदार होती...नवर्याच्या खिशातून अलगंद पैसे काढून स्वतःच्या केसपेपरला वाचवून ठेवायची..वेळच्यावेळी दाखवायला येणार..रात्री दहा बारा कितीही वाजता blood pressure मोजायला बोलवा ,अगदी वेळेत यायची...ऐक मूल होऊद्या नीट डाॅक्टर ..!! बाकी काहीच नको म्हणायची...बाहेर कुठे दाखवायची ऐपंत नाही,ईथेच जेवढं होईल तेवढे ऊपचार करा...प्रयत्न करूयात ..!! बघू काय होतंय..?? म्हणून ऊपचार सुरू केले...काही महागाची औषधे द्यावी लागणार होती...कधी स्वतःकडील दिली, तर कधी Medical Representative लोकांना बोलवून ती सगळी त्यांना sponsor करायला लावली..,बघता बघता दिवस पूर्ण झाले...blood pressure चा त्रास असल्यामुळे व ईतर गोष्टी बघून डिलिवरी आॅपरेशनद्वारे करावयाचं नक्की केलं...तसं तिला सांगितलं...खूष होती बिचारी..
सोमवारची तारीख ठरली होती,पण नेमकं सुट्टीसाठी सोमवारीच घरी जाणं ठरलं...आज तसं बोलून दाखवलं ,तर रडायलाच लागली...म्हणाली की ,' सर तसं असेल तर मग आजंच करा,किंवा तुम्ही आल्यावर करा मी वाट पाहीन....!! 'मी समजावून पाहिलं की , दुसरे डाॅक्टरही चांगले आहेत,त्यांच्याकडून करून घे,चांगलंच होईल तेही..पण अगदीच गयावया करायला लागली...ऐव्हाना डोळ्यांत पाणी भरलेलं...बंगालीमधून काही बाही बोलून विनवण्या करीत होती...मी दरडावून सांगितलं , ' प्रत्येकाप्रमाणे सुट्ट्या अॅड्जस्ट करावयाच्या म्हटलं, की मग आम्ही सुट्या घ्यायच्या तरी कधी आणि कशा..?? ' आणि सिस्टरना सांगितलं,' यांना बाजूला करा आणि पुढचा पेशंट आतमधे पाठवा...!!" तशी पाणावलेले डोळे घेऊन मग opd बाहेर जाऊन बसली..
opd संपवून मी निघालो ward चा राऊंड घ्यायला,तर ही तिथेच बसलेली..मला पाहीलं आणि ऐकदम पायाच पडली..काय बोलावं काहीच सुचेना..वरकरणी कितीही कडंक वाटंत असलो तरी ऐखाद्याची आगतिकता माझ्याच्यानं पहावली जात नाही...म्हटलं,या हिच्या आगतिकतेपेक्षा माझी सुट्टी जास्त महत्वाची आहे का...?? ' बरं ठीक आहे,हो अॅडमीट रविवारी संध्याकाळी , बघूयात कसं काय जमतंय ते..!! ' हाताखालच्या ज्युनिअर डाॅक्टरला सांगितलं ऊर्वरीत तपासण्या करायला...रविवार संध्याकाळचे बाहेर जाण्याचे सारे प्लॅन्स रद्द केले आणि रात्री ऊशीरा जागून केलं सीझर...आॅपरेशन ऐकंदरीत चांगलंच झालं...कधी नव्हे ते तिचा नवराही आलेला,दोघांनी हात जोडून धन्यवाद दिले आणि त्यांच्या सद्भावना सोबंत घेऊन मी सुट्टीवर निघालो..
जेंव्हा डाॅक्टर व्हायचं ठरवलं ,तेंव्हा काही मोजके प्रथितयश डाॅक्टर डोळ्यांसमोर होते,त्यांना मिळणारा आदर,त्यांनी कमावलेला पैसा दिसंत होता...त्यामागील त्यांची मेहनंत मात्र दिसंत नव्हती...आज स्वतः डाॅक्टर झाल्यावर कळतंय,की हे वाटंत होतं, दिसंत होतं , तितकं सोप्प नाहिये...कित्येकदा रूग्णांसाठी तुमचे स्वतःचे निर्णय बदलावे लागतात,रात्र रात्र जागावं लागतंय ..केवळ त्यांनी टाकलेल्या विश्वासापोटी...!! आज मान मिळतोय,आदर मिळतोय...ऊद्या कदाचित पैसाही मिळेल पण त्यासाठी अमाप कष्ट करावे लागणार आहेतंच...
पण खरं सांगु का...?? त्रासात असलेला रूग्ण आपल्यामुळे बरा होऊन उपचार संपवून हसंत खेळंत जेंव्हा घरी जातो ना, तेंव्हा मिळणारा तो आनंद हे सगळे कष्ट सोसण्याची ऊमेद अलगंद देऊन जाते.....

U r great sirji
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteWaah waah!!
ReplyDeleteधन्यवाद
DeleteFeels proud that u r my best friend.. love u. God bless u
Deleteधन्यवाद
Deleteग्रेट डॉक्टर
ReplyDeleteधन्यवाद
Delete