तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...
वार्यावर ऊडणार्या तुझ्या केसांची,त्यामधे गोवलेल्या चाफ्याची....
तुझ्या गोड,स्मित हास्याची आणि तुझ्या तिरकस नजरेची....
तुझ्या गोड,स्मित हास्याची आणि तुझ्या तिरकस नजरेची....
तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...
सायकलवरून तुझ्यामागे घातलेल्या येरझार्यांची,तुझ्या हटकण्याची....
तुझ्या लडिवाळ रागवण्याची आणि तुझ्या नकळत नाक मुरडण्याची....
तुझ्या लडिवाळ रागवण्याची आणि तुझ्या नकळत नाक मुरडण्याची....
तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...
मुठीत पकडलेल्या काजव्यांची,तुझ्यासमवैत अवकाशातल्या तार्यांच्या मांडलेल्या हिशोबाची....
तुझ्या मिश्कील बोलण्याची आणि सदाबहार विनोदबुद्धिची....
तुझ्या मिश्कील बोलण्याची आणि सदाबहार विनोदबुद्धिची....
तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...
तुझ्या आठवणीत बुडवलेल्या प्रत्यैक रात्रीची, अनवधानाने झालेल्या तुझ्या स्पर्शाची....
महिरूपी कंसासारख्या तुझ्या डोळ्यांची आणि त्या डोळ्यांत स्वतःचं अस्तित्व शोधणार्या माझी....
महिरूपी कंसासारख्या तुझ्या डोळ्यांची आणि त्या डोळ्यांत स्वतःचं अस्तित्व शोधणार्या माझी....
©- निरागस
No comments:
Post a Comment