"..माणूस म्हणून जगण्यात काय राम ऊरला नाही..''
वाटतं कधीकधी गोचीड व्हावं..बैलाच्या अंगावरली.. मनसोक्त रक्त प्यावं आणि कुणी साधी दखलदेखील न घ्यावी...
वाटतं कधीकधी कावळ्याचं पिल्लू व्हावं..आणि कोकिळेनेदेखील स्वतःच्या पिलासारखं आपल्यालादेखील जपावं...
वाटतं कधीकधी व्हावं त्या माळावरल्या पिवळ्याशार धामणासारखं ... मध्यान्हाच्या ऊन्हात भररस्त्यात पहुडावं आणि डोळे वर करुन बघायची कुणाची हिम्मतही न व्हावी....
वाटतं कधीकधी व्हावं त्या घारीसारखं आणि ऊगाच त्या निरभ्र आकाशावर आपल्या पंखांनी रेघोट्या माराव्यात...
वाटतं कधीकधी त्या बाभळीसारखं ईतकं र्हाट व्हावं की ऊन पावसाचा सोस जाणवूच नये मुळी...
वाटतं कधीकधी व्हावं त्या चंद्रासारखं..आणि आपल्याकडे बघुन सगळ्या जगाने खुष व्हावं...
वाटतं कधीकधी वाळवी व्हावं आणि ही सगळी मानवी अस्प्रुश्यताच गिळून टाकावी...
''पण झालो दोन हात आणि दोन पायांचा, स्वतःचा परीघ स्वतःच ठरवून निरंतर त्याभोवती फिरणारा माणूस,
श्या माणूस म्हणून जगण्यात काही राम ऊरला नाही..."
निरागस
|
Tuesday, 15 November 2016
"..माणूस म्हणून जगण्यात काय राम ऊरला नाही..''
Subscribe to:
Post Comments (Atom)
अप्रतीम....लिखाणशैली साजेशी आहे.
ReplyDeleteअप्रतीम....लिखाणशैली साजेशी आहे.
ReplyDeleteKhup chan....
ReplyDelete..धन्यवाद मित्रांनो
ReplyDelete