मी माझा माझ्यासाठी
मी चित्रं काढत नाही सहसा..,,नुसत्याच रैघोट्या मी मारतो...
त्यात सुखाचे रंग भरायचे की दुःखाचे या नेहमीच्या वादात थकून मी जातो
त्यात सुखाचे रंग भरायचे की दुःखाचे या नेहमीच्या वादात थकून मी जातो
मी रडत नाही सहसा...,नुसताच भिंतीकडे रोखून बघत बसतो...
त्या ठिबकलेल्या आसवांची किंमत कळेल की नाही जगाला याचंच गणित मी मांडत बसतो
मी वाद घालत नाही सहसा....नुसतीच बोटं मी मोडतो .
बोचरी शल्य मनात साचवून बिछान्यावर मी पहुडतो...
मी माया करत नाही कुणावर सहसा नुसताच हसतो स्वतःशी.....
या आपुलकीने बांधला नाही जायचं मरेपर्यंत मला लोकांशी....
मी प्रवासदेखील करत नाही सहसा...बाहेर जायला मी घाबरतो
बाहैर गेलेली पाऊलं माघारी वळतील की नाही या भीतीने स्वतःला बांधून मी घालतो
- निरागस
Kadak....
ReplyDelete