होय मी तुमच्यातलाच आहे...
..माझे कित्येक मित्र रूसलेत माझ्यावर माझ्या लिखाणामुळे त्या सर्वांसाठी...
होय मी तुमच्यातलाच आहे...
काय करु करोडो रुपये कमावणार्या ऐशोआरामात जगणार्या तेंडुलकरला आमच्या अण्णा हजारेंआगोदर दिलेला भारतरत्न नाही पटत मला...
होय मी तुमच्यातलाच आहे...
काय करु व्यापम घोटाळा,गोध्रा कांड,बंगारु लक्ष्मण,अदानी अंबानी यांच्याकडे दुर्लक्ष करुन भाजपा सर्वश्रेष्ठ बिनचूक पक्ष आहे असं ईतरांसारखं नाही म्हणू शकत मी.
होय मी तुमच्यातलाच आहे...
काय करु लोकशाहीचा अतिरैक झालेल्या या देशात हाणामारी केल्याशिवाय कामंच होत नाहीत पटापटा म्हणून कधीमधी समर्थन करतो अशा पक्षांचं...
होय मी तुमच्यातलाच आहे...
काय करू देशापेक्षा व्यक्ति मोठी होणं नाही पटत मला म्हणून करतो मोदींच्या चुकीच्या न पटलेल्या धोरणांवर टीका... "
-निरागस
No comments:
Post a Comment