"..मास्तर Anup Subhash Bharati ईंटर्नशिपला होता..मी असेन mbbs च्या पहिल्या वर्षाला..GS (general secretory) च्या निवडणुका होणार होत्या त्यासंदर्भात माझा मित्र Bhushan Wankhede घेऊन गेलेला मला भेटायला..भुषण मास्तरचा पहिल्यापासूनचा मित्र..मी मास्तरबद्दल ऐकून होतो...प्रत्यक्ष भेटायची संधी आली नव्हती कधी....त्यावेळचं ईटर्न होस्टेल म्हण्जे रुग्णांचा वाॅर्ड खाली करुन त्यात मधे चादरी पडदे टाकून तात्पुरत्या खोल्या तयार केलेल्या...पहिल्या वर्षाच्या मुलग्यासाठी ईंटर्न म्हणजे आजी म्या ब्रह्म पाहिल्याचा अनुभव...घाबरत घाबरत पायर्या चढत वर गेलो...प्रत्येक पायरीवर तोच रॅगिंग वाला intro,कुठून आलायस काय , करायला आलायस..कुणाला भेटायला आलायस वगैरे प्रश्नांची सरबत्ती झाली.चार मजले चालत चढायला तास लागला..पण मास्तरचं नाव सांगितलं की समोरचा गप्प...तेंव्हाच चुणूक लागली की आमचा मास्तर म्हणजे काय साधी गोष्ट नव्हती...होस्टेलवर कुणीच पुर्ण कपड्यात नव्हतं...मी भुषणला म्हटलं हे लोकं medicine कसं पास झाले असतील यार...?? यांना कसं लक्षात रहात असंल सगळं..,?? भूषण गप्प..तो पण वैतागला असेल एव्हाना...एवढ्यात तो एका रूम मधे घुसला आणि त्याच्या मागोमाग मी आत गेलो..आणि मास्तरला पहिल्यांदा बघितलं..,सडपातळ बांधा..अंगात पुर्ण formal dress..गळ्यात stethoscope...विंचरलेले केस असलेला मास्तर मेसच्या डब्याशी खेळत होता...डाळीतलं पाणी डाळ सांडू न देता काढायचा आटोकाट प्रयत्न चालू होता...भूषणने ओळख करून दिली मास्तरने पहिला घास खाता खाता चष्म्यातून एक कटाक्ष टाकला आणि म्हटला काय काम आहे...काम ऐकल्यावर म्हटला...एवढंच ना..?? करूया की....हातानंच बस म्हणला...कुठुन आलास वगैरे प्राथमिक चौकशी केली...धीर दिला...आपल्या internship चे चार पाच किस्से सांगितले आणि परत पाठवताना अभ्यास करा रे असं दरडावून सांगायला विसरला नाही...
..आता मास्तर शिकून खूप मोठा मानसोपचारतज्ञ झालाय...लई मोठा डाॅक्टर झालाय पण माझ्या मनात मात्र तोच डाळीतून पाणी काढणारा मास्तरंच कोरला गेलाय...मास्तर विसरला असेल आमची पहिली भेट पण माझ्या आयुष्यात ती भेट कायम माझ्याबरोबर राहिल...."
..आता मास्तर शिकून खूप मोठा मानसोपचारतज्ञ झालाय...लई मोठा डाॅक्टर झालाय पण माझ्या मनात मात्र तोच डाळीतून पाणी काढणारा मास्तरंच कोरला गेलाय...मास्तर विसरला असेल आमची पहिली भेट पण माझ्या आयुष्यात ती भेट कायम माझ्याबरोबर राहिल...."
- निरागस
No comments:
Post a Comment