"..mbbs ला प्रवेश घेतल्यावर college चा dean कोण आहे हे माहिती पडायच्या आगोदर मास्तरचं नाव माहिती पडलं...पहिलं वर्षभर मास्तरकडं नजर वर करून बघायची हिंम्मत नव्हती १॰॰ मुलांपैकी एकाचिही...शेवटी मास्तर कंटाळून स्वतःच सांगायचा अरे माझ्याकडे बघून बोल...मास्तर सुरूवातीपासूनच चारचौघांपेक्षा वेगळा होता रात्री ऊडणार्या स्वयंप्रकाशी काजव्यासारखा..
मास्तर म्हणजे दोन हात दोन पाय असणारं चालतं फिरतं महाविद्यालय होतं...काही काम घेऊन जावा , दोन मिनिटांत काम करणार...मास्तरची ओळख पार त्या security guard पासून dean पर्यंत..पण आम्हीच घाबरायचो जायचोच नाही कधी....असंच एकदा पाणी भरायला म्हणून मास्तरच्या हाॅस्टेलला गेलो आणि मास्तरच्या तावडीत सापडलो..मास्तरनं रुमवर बोलावून घेतलं...मास्तरचा दुसर्या दिवशी मेडिसीनचा पेपर होता...आत गेल्या गेल्या मास्तरनं सांगितलं अभ्यास हाताबाहेर गेलेला आहे म्हणून गप्पा मारायला बोलंवलंय...आणि गप्पा सुरू झाल्या...गप्पांना काहि विषय नव्हता..म्हणजे पु.लं.देशपांडे क्रिकेट का खेळले नाहित पासून ते तू डाॅक्टरंच का झालास यापैकी मास्तरला जो आवडेल तो विषय..आणि मास्तरला जी पटतील ती ऊत्तरं...पण मजा आली...मधेच भिंतीवर लक्ष गेलं तर zinadin zidane चं पोस्टर आणि त्यावर मास्तरनं स्वतः लिहिलेली कविता ( my religion is zizouism zizouism )...एकंदरित काय तर मास्तर म्हणजे माझ्या आकलन शक्तिच्या पलिकडचा प्रकार होता....त्या भेटीनंतर मास्तर कुठे हरवला कळलंच नाही...
...नंतर एकेदिवशी अचानक मास्तर पुण्यात भेटला...मास्तर व मी दोघेही एकाच परीक्षेसाठी आलो होतो..मास्तरला म्हटलं मास्तर अभ्यास कसा करू सांग...मास्तर परीक्षा संपल्यावर हाॅटेलात घेऊन गेला...आधि खायला घातलं नंतर स्वतःची वही काढली आणि आपुलकीने समजवायला लागला...काय गरज होती मास्तरला...?? दरवर्षि १॰॰ मुलं जात असतील मास्तरच्या हाताखालनं...पण माणसाचा स्वभाव असतो...आणि हाच मास्तरचा स्वभाव मास्तरला मोठं करून जाईल एकदिवस...त्यादिवशीनंतर मास्तर परत हरवला तो आजतागायत सापडलाच नाही...,
..मास्तर कुठे आहे काय करतो काहीच माहिती नाही...प्रुथ्वीवर आहे की नेपच्युनवर जाऊन स्थाईक झालाय हेदेखील माहिती नाही...आमचा मास्तर आहे समुद्राच्या रेतीसारखा हातात न येणारा...असो..पण तो जिथं कुठं असणार, माणसं जोडत असणार..जग बदलवत असणार....."

-निरागस
No comments:
Post a Comment