Saturday, 2 December 2017

या देशाला स्मारकांची खरंच गरज आहे का

"                                        या सबंध भारतवर्षात अनेकथोर महात्मे,वैचारीक स्त्री-पुरूष होऊन गेले आणि त्यांचं कार्य केवळ भारतातंच नाही ,तर संपूर्ण जगभरात नावाजलं गेलं..संपूर्ण मानवजातीला दिशा दाखवणारे ईतके सारे महापुरूष होऊन गेलेला हा देश खरंच किती महान असायला हवा होता...?? पण वस्तुस्थिती खरंच तशी आहे का...?? आणि नसेल तर मग यामागची कारणं तरी काय असतील...??
                                          पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारंण म्हणजे आम्हाला समाजसुधारंक,स्वातंत्र्यसैनिक,थोर पराक्रमी हवे होते आमच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी..जोवर आमचा फायदा होता, तोवर आम्ही त्यांना डोक्यावर घेतलं,मग आमचा फायदा संपला आणि आम्ही दिलं त्यांना फेकून अडगळीत...वर कुणी या आमच्या स्वार्थीलोलूप व्रुत्तीबद्दल आम्हाला दूषण देऊ नये, म्हणून मग आम्ही ईतरांना दाखविण्यासाठी व स्वतःच्या समाधानासाठी यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजर्‍या करावयास सुरू केल्या...त्यातूनही मग काहींचं मन भरलं नाही, मग ऊभी राहिली ती अतिभव्य,गगनचुंबी स्मारकं...अमाप पैसा ओतून बांधलेली,मनाला नाही तर थेट आकाशाला भिडणारी स्मारकं आणि  यातून सुरू झाल्या हिणकस चढाओढी...आमच्या जातीचा,पंंथाचा अथवा राज्याचा महापुरूष ईतरांच्या महापुरूषांपैक्षा किती सरस अथवा महान आहे हे दाखविण्यासाठी सुरू झाली जीवघेणी स्पर्धा...महापुरूषांना त्यांच्या विचारांनी अथवा कार्याने ओळखण्याऐवजी त्यांच्या स्मारकांच्या भव्यतेनुरूप ओळखलं जाऊ लागलं आणि याला जबाबदार तुम्ही,आम्ही,राजकारणी,सरकार सगळेच...
                                        मुळात स्मारकं असावीत की नाहीत यावर थोडं नंतर बोलूयात पण जर ती असतील तर ती कशी असावीत यावर आधी बोलू....!!  आता बघा ना शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात होणारं स्मारंक आणि त्यावर होणारा करोडोंचा खर्च यावर मतमतांतरं असूच शकतील..मला या राजकारणात पडायचंच नाहिये...हा महाराष्ट्र हेच मूळी आमच्या महाराजांचं स्मारंक आहे...आपण सगळे मराठी भाषिक " ऐकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ  " या भावनेने जरी ऐकत्र राहिलो..ऐकमेकांची ऊणीदुणी काढण्यापेक्षा अडीअडचणीत ऐकमेकांच्या कामी पडलो,ऐकत्रितपणे या मराठीभाषिक राज्याचा नावलौकिक वाढवला, तर त्या जाणत्या राजाला त्याहून मोठी दुसरी श्रद्धांजली असूच शकंत नाही.. आणि समजा जर महाराजांचं स्मारंक बांधावयाचं असेलंच तर त्याआधी महाराजांची यशोगाथा सांगणार्‍या,त्यांच्या पराक्रमाची जीवंत साक्ष देणार्‍या गडकिल्यांची डागडुजी,त्यांचं नुतनीकरंण करावयास नको का...?? आता येऊयात बाबासाहेबांच्या स्मारकाकडे...बाबासाहेब म्हणजे कठीण परिस्थितीत स्वतःचं बुद्धिकौशल्य वापरून समाजातल्या गांजलेल्या लोकांसाठी लढलेला असा लढवय्या नेता, की ज्याच्या विद्वतैचा डंका अगदी साता समुद्रापार पोहोचला...मग अशा या विद्वान महापुरूषाचा पुतळा ऊभारण्यापेक्षा त्यांच्या नावाने त्याच पैशांत जगातलं ऐखादं सर्वोत्क्रुष्ठ वाचनालंय ऊभारणं अधिक संयुक्तिक ठरेल की नाही..?? आणि हे ईतर सगळ्याच महापुरूषांना लागू पडतं..मग ते गांधीजी असोत वा टिळंक,सावरकर...
                                  आता दुसरी बाजू .. मग ईतकं असताना तुम्ही म्हणाल की स्मारकांची नेमकी  गरंजंच काय...?? ७० % लोक दारिद्र्यरेषेखाली असणार्‍या या देशात कित्येक लोकं दोनवेळचं पोटभर खाऊ शकंत नाहीत...मग स्मारकांसाठी वापरला जाणारा खर्च अनावश्यक नाही का...?? तोच खर्च ईतर चांगल्या योजनांसाठी राबवून गरीबांचं जीवन अधिक सुखकर बनवता येईलंच की....तर मित्रांनो गरीबी दूर करणं हे फार कठीण आणि कीचकट काम आहे...यामागची कारणंही खूपंच जटील आहेत आणि यासाठी काही दशकांचा अवधी निश्चितंच लागणार आहे..,म्हणजे बघा ना आपण पोखरंणची अणुचाचणी केली त्यावेळी देशात गरीबी नव्हती का...?? अवकाशमोहिमा राबवल्या त्यावेळी देशात गरीबी नव्हती का..?? देशात गरीबी आहे म्हणून सैन्यावर अवास्तव खर्चच करावयाचा नाही का...?? तर असं नाही...गरीबी हटवण,देशातील नागरीकांचं जीवन अधिक सुखकर करणं याला प्राधान्य देत असतानाच,ऐक परिपक्व ,परिपूर्ण ,प्रगतीशील देश म्हणून जगासमोर ऊभं राहणंही तितकंच महत्वाचं असतं...प्रत्येक ठिकाणी गरीबी हाच ऐक निकष लावून चालंत नसतं...त्यामुळे आरोग्य,विज्ञान,संरक्षण,शिक्षण,सुशोभीकरण ईत्यादी सर्वच विषयांवर नियोजनबद्ध खर्च करावाच लागतो..
                             तर काही काही देश,राज्यं अथवा प्रादेशिक विभाग हे ऐखाद्या व्यक्ति,वस्तू अथवा नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळेच ओळखले जातात...जसं भारत परदेशात गांधीजींमुळे ओळखला जातो,महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळखला जातो,भारतीय संविधान म्हटलं की मग आमच्या डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे बाबासाहेब,समाजसुधारणा म्हटली की चटकन आठवतात ते आमचे महात्मा जोतीबा फुले...मग अशा थोर लोकांची आठवण म्हणून किंवा त्यांच्या कार्याचा व त्यागाचा येणार्‍या पिढीला विसर पडू नये म्हणून त्यांची स्मारकं असावीतंच..जगभरात सर्वत्र आपणाला ती दिसतातच..पण त्यामागे काही ठोस नियोजन असावं लागतं...ऐखाद्या स्मारकावर करोडो रूपये ऊधळायचा निर्णय आतताईपणे,निवडणुकीच्या मतांवर डोळा ठेऊन,आपल्या कुवतीकडे व त्याच्या होणार्‍या दूरगामी परिणामांकडे दुर्लक्ष करून आपण घेऊच शकंत नाही...त्यासाठी त्यामागे कित्येक वर्षांचं नियोजन असावं लागतं...हा पैसा आम्ही कुठून ऊभारणार आहोत,स्मारकांचं स्वरूप काय असणार आहे आणि ऐकंदर याचा आपल्याला कसा लाभ होणारे या सगळ्यांचंच पारदर्शी नियोजन असावं लागतं...जे दुर्दैवाने आपल्याकडे बघावयास मिळंत नाही...आल्या निवडणुका की द्या स्मारकांची आश्वासनं,झाली आंदोलनं की द्या स्मारकांची आश्वासनं.. मग तो खर्च कुठून करणार..?? कसा करणार ..?? काही नियोजन नाही...नुसती आश्वासनं...अशा आश्वासनांवर आणि आततायीपणावर तेलाचा घाणा चालू शकतो देश नाही...
                               म्हणजे विचार करा..,ऊद्या नुसतीच स्मारकं ऊभी राहिली पण त्या थोरपुरूषांचे विचारंच लोकांपर्यंत पोहोचले नाहित तर काय ऊपयोग...?? म्हणजे शिवरायांचं स्मारंक ऊभं राहिलं पण कुणाला स्वराज्याचं महत्वच कळलं नाही तर...?? बाबासाहेबांचं स्मारंक ऊभं राहिलं पण कुणाला शिक्षणाचं महत्वच नाही कळालं तर...?? जोतीबा फुल्यांचं,आगरकरांचं स्मारंक ऊभं राहिलं पण समाजसुधारणेला जनमानसात किंमतंच नाही राहिली तर...?? मग नुसतीच पुतळे स्मारकं ऊभारण्याची चढाओढ किंवा स्पर्धा लावून काय साध्य होणार आहे..?? त्यांचे विचार या भव्य स्मारकांमागे लपून तर राहणार नाहीत ना..?? बघा विचार करा...पटलं तर  ठीक, नाहितर द्या सोडून.....
                                                  
                                               



                                      -©- निरागस





                                        

Thursday, 2 November 2017

लब्यू शाहरूख



                


"                           जेंव्हापासून हिंदी सिनेमा पहायला चालू केला अगदी तेंव्हाच सुरूवातीला यानं भूरळ घातली,ईतकी की ती आजवर टिकून आहे...म्हणतात ना पहिलं प्रेम हे खासंच असतं,अगदी त्यातला प्रकार....कुठेतरी आम्हाला जे जमंत नव्हतं किंबहुना करणं शक्य नव्हतं ,ते आम्ही याच्यात शोधंत  राहिलो आणि याच्या प्रेमात अधिकाधिक गुंतत राहिलो...मुलींशी बोलायची त्याची लकब,ऊत्साह आणि त्याचा पडद्यावरंचा वावर सगळंच अगदी खास...जवळपास मागील वीस वर्षे यानं माझ्या मनावर राज्य केलंय आणि पुढेही करील...आमच्या आयुष्यात याचं स्थान किती मोठं आहे हे दाखविण्याची संधी आम्हाला त्याच्या चित्रपटांच्या निमित्ताने का होईना वर्षातून ऐकदा,फार फार तर दोनदा मिळते आणि ती आम्ही कधीच चुकवंत नाही...अशाच काही आठवणी पुन्हा ऐकदा आठवतोय आणि शब्दरूपांनी आपल्यासमोर मांडतोय...
                            शाहरूख,रजनी यांचे चित्रपट मी हमखास पहिल्या दिवशी पहिला शो बघतो आणि बहुतांशवेळा ऐकापेक्षा अधिकवेळा पहातो...कारंण माणसाने आपलं प्रेम व्यक्त करायला अजिबात मागे-पुढे पाहू नये या मताचा मी आहै....आपणंच यांना मोठं करायचं आणि नंतर यांच्याकडे पहात पहात आपणही मोठं व्हायचं...अगदी दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट सध्या कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे याचा नवा सिनेमा  IMAX वडाळाला पाहिला ...पहिल्या दिवशी पहिला शो....ईतका आवडला की संध्याकाळी परंत त्याच सिनेमात संध्याकाळचा शो पहायला गेलो..लहान शहरात लहानाचा मोठा झालेलो असल्यामुळे, आमच्या प्रेम व्यक्त करावयाच्या पद्धती या शहरी लोकांपेक्षा थोड्याशा हटके असतात...तर संध्याकाळच्या शोला फारंच जास्त सभ्य ,अथवा सभ्यपणाचा आव आणणारं ऐक मध्यमवर्गीय जोडपं माझ्याशेजारी बसलं होतं...शाहरूखची ऐन्ट्री झाली आणि मी ऐक जोरदार शिट्टी टाकली... आश्चर्याने की रागाने माहिती नाही पण सिनेमाग्रुहातले सगळेच जण माझ्याकडे पाहू लागले आणि हे असं सिनेमा संपेपर्यंत तीन तास सुरू होतं...मधेच शैजारी बसलेली महिला आपल्या नवर्‍याला म्हणाली," हा माणूस पहिल्यांदा ऐवढ्या मोठ्या ठिकाणी चित्रपट पहायला आलाय वाटतं..!! " आणि अशा ईतरही अनेक कमेंट्स.. मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं ,कारंण त्यावैळी माझ्यासाठी चित्रपट जास्त महत्वाचा होता...चित्रपट संपल्यानंतर मात्र आवर्जून गेलो त्यांच्याजवळ,त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी...म्हटलं," मॅडम आजच्या दिवसातला हा दुसरा शो आहे आणि वेळ मिळाला तर ऊद्या पुन्हा येणारे " मी स्रीरोगतज्ञ आहे आणि अमुकअमूक ठिकाणी काम करतो असं सांगितल्यावर मग तिलाच जास्त ओशाळल्यासारखं वाटलं..ती म्हणाली," Sorry ,i dint mean it in a wrong way  ". मग मीही थोडंसं भाव खाऊनंच  म्हणालो, " As if i care "...मग माझ्या शिट्यांमुळे झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून ,वर माझं विझिटिंग कार्ड देऊन मी त्यांचा निरोप घेतला...

                        MBBS च्या दुसर्‍या वर्षात असतानाची गोष्ट...याचा "रब ने बनादी जोडी" यायला आणि माझी Final University प्रात्यक्षिक परीक्षा यायला ऐकवेळ...शुक्रवारी पहिलं प्रात्यक्षिक होतं आणि त्यानंतर ऐकेक दिवस सोडून अशी चार प्रात्यक्षिकं...आणि याचा चित्रपटही आला शुक्रवारीच..पहिल्या दिवशीचा पहिला खेळ काहि परीक्षेमुळे पाहता आला नाही, पण त्यादिवशीची संपूर्ण परीक्षा संपेपर्यंत मात्र आमचं संपूर्ण लक्ष याच्या चित्रपटाकडेच....सहावाजले संध्याकाळचे प्रात्यक्षिक संपायला आणि आम्ही साडेसहाच्या शोला थिएटरबाहेर हजंर...तेंव्हा कोल्हापूरात अजून मल्टीप्लेक्स नावाची संकल्पना आली नव्हती ,सिंगल स्क्रीनचा जमाना...आजही सिंगल स्क्रीन सिनेमाग्रुहाबाहेर ब्लॅकने तिकीटविक्रीची परंपरा जोपासणार्‍या काही निवडंक शहरांमधे कोल्हापूरचा समावेश आहे...तर मग ऐनवेळी तिकीट ऊपलब्ध नसल्याने , मूळ तिकीटाच्या दुप्पट पैसे खर्च करून अगदी पहिल्या रांगेत बसून चित्रपट पाहिला....त्यावर्षी ऊरलेल्या प्रत्येक प्रात्यक्षिकांनंतर हाच दिनक्रम ठरलेला, फक्त तिकीट मात्र सकाळी परीक्षेला जातानाच काढून ठेवायचो...चार प्रात्यक्षिकांनंतर चारवेळा "रब ने बनादी जोडी" बघितला....


                      तिसर्‍या वर्षी अगदी माझ्या वाढदिवशीचं शाहरूखचा डाॅन -२ प्रदर्शित झाला...नेहमीप्रमाणे महिनाभर आगोदरपासून तिकिटांसाठी आमची लाॅबिंग सुरू...कारंण पहिल्या दिवशी पहिला खेळ बघणं महत्वाचं...मग यातंच ऐकदिवशी थिएटरमधला तिकीट कर्मचारीच आला Casualty विभागात काहीशा कारणाने...त्याने स्वतःची ओळंख करून दिली," मी म्हमदू,ईथे पद्मा थिएटरात तिकिटांच्या टेबलला आहे ",मनात स्वतःलाच म्हटलं ,जमलं काम...!!! ऊपचारानंतर डिस्चार्जच्यावेळी  हात जोडून म्हमदू धन्यवाद म्हणाला...मी म्हटलं, "अरे म्हमदू ,धन्यवाद नको पहिल्या दिवसाच्या दोन लागोपाठच्या शोजचे हे घे पैसे आत्ताच आणि तिकीटं राखून ठेवायची..." आणि अगदी अॅडवान्स बुकींग सुरू झाल्या झाल्या म्हमदूचा फोन ," सर ऐका शोची दोघांची तिकीटं..?? की लागोपाठच्या दोन शोजची ऐका माणसाची दोन तिकीटं..?? " तोही गोंधळला होता बिचारा...अशाप्रकारे हा चित्रपट ऐकाच चित्रपटग्रुहात ऐकाच खुर्चीवर बसून सलंगचे दोन खेळ पाहिले...पहिला खेळ संपल्यावर शैजारचा म्हणाला," अहो चला की संपला चित्रपट आता,काय झोप लागली की काय...?? "...मी म्हटलं ," पुढच्या खेळाचं पण तिकीट काढलंय मी,तुम्ही निघा...", भोवळ येऊन पडायचाच बाकी राहिला होता बिचारा....!!


                          मग आलं MBBS चं अंतिम वर्ष...( आठवणींचा क्रम मागे पुढे होऊ शकतो ) शाहरूखची स्वतःची निर्मिती असलेला ,"रा-वन" हा चित्रपट नेमका दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच प्रदर्शित होणार होता...पंधरा दिवस आगोदर चित्रपटाचं बुकींग सुरू झालं...नैहमीप्रमाणे लागोपाठच्या दोन शोजची तिकीटं काढली...आणि दोन दिवसांनंतर कळालं ,की चित्रपट २-D व ३- D मधे प्रदर्शित होणार आहे..माझ्याकडे ज्या ठिकाणची तिकीटं होती ,तिथे केवळ २-D मधेच दाखविण्यात येणार होता चित्रपट...झालं मग शाहरूखचा पहिला ३-D चित्रपट येणार आणि आपण तो २-D मधेच पाहणार याचं शल्य  मीतरी आजीवन वाहू शकंत नाही,नेमक्या याच विचारांनी ग्रासून काढलं तिसरं तिकीट...ऐकंच चित्रपट ऐका दिवशी तीनवेळा पाहिला...दुपारी बारा वाजता पहिला शो आणि नंतर लागोपाठ साडे तीन,साडे सहा असे ऐकून तीन शोज...घरी जायला दहा वाजले...लक्ष्मीपूजन होऊन गेलं होतं...आईचा ओरडाही खाल्ला...लक्ष्मीपूजनापेक्षा महत्वाचा होता का चित्रपट...?? काय सांगणार तिला..?? 


                        तेंव्हा शिकंत असताना सुट्ट्यांचा प्रश्न नसायचा,आता नोकरी करताना सुट्ट्या काढणं अवघड असतं,पण तरी आजही या माणसाचा चित्रपट पहिल्याच दिवशी पहिल्याच शोला बघतो...सुट्टी मिळाली तर छानंच नाहीतर सरळ रजा टाकतो...कारण माहिती नाही...पण मला तो आपलासा वाटतो...त्याच्याकडे पाहून मला ऐक सामान्य माणूस परिस्थितीवर मात करून कसा यशस्वी होऊ शकतो याची शिकवण मिळते...त्याच्या अभिनय क्षमतेबद्यल शंका ऊपस्थित करणारेदेखील त्याच्या कामसू व मनमिळावू स्वभावाची व कष्ट करून मिळवलेल्या यशाची स्तुती करतात....मी सिनेमाग्रुहात जातोच मुळी याला पहायला.. त्यासाठी मला चांगल्या कथानंकाची अथवा ऊत्क्रुष्ठ अभिनयाची गरंजच भासंत नाही...आणि अभिनयाबद्दलही म्हणाल तर याचा " चक दे "," राजू बन गया जंटलमॅन "," स्वदेस " किंवा " कल हो ना हो " पाहिला की याच्या अभिनयाची स्केल आपल्याला कळून जाते....तर शाहरूख खरंच तू ग्रेट आहेस...आमच्या आख्या पिढीला कुणावरही मनापासून प्रेम करताना तूच आठवतोस...असंच काम करंत रहा आणि आम्हाला प्रेम करायला शिकवत रहा...जाता जाता फक्त ऐकंच गौष्ट सांगतो...
" खांडीलकरको कल्टी,गुरूनारायण गया,अमोल शुक्ला तुभी ऊपर.....अरे कोई है क्या..?? कोई नहीं....मुंबईका किंग कोन...?? शाहरूख खान...!! 
                               -©- निरागस





Sunday, 22 October 2017

फसव्या जीवनाचे बदलते संदर्भ

"                              लहानपण अगदीच खास असतं..त्याच्यासारखं दुसरं तिसरं काही नाही असं म्हणतात..अगदी तंतोतंत खरंय ते...कुणीही काहीही सांगायचं लहानपणी आणि आमचा अलगद विश्वासही बसायचा...किती निष्पाप होतो आपण सगळैच नाही का..??...तुझं घर ऊन्हात बांधणार ,असं नुसतं ऐकलं, तरी चटकन डोळ्यांत पाणी यायचं...याहून कोणती कठोर शिक्षा असूच शकंत नाही जगात असंच वाटायचं...जेवता जेवता ताटातला ऐखादा घास अलगद चिऊ काऊला द्यायचो ईतके ऊदार होतो आपण सगळेच....आईवडिलांच्या पाया पडल्याशिवाय आमचा दिवस सुरूच व्हायचा नाही,दारातल्या तुळशीसमोर पणती लावून रोज सायंकाळी शुभंकरोती म्हणायलादेखील आम्हाला कधीच लाज वाटली नाही...
                       शाळेतला प्रत्येक मुलगा अथवा मुलगी आमच्यासाठी प्रचंड महत्वाचा असायचा...वर्गात काही कारणाने मित्राला शिक्षा झाली की अगदी दोनेक दिवस कशातंच मन रमायचं नाहि...खेळाच्या नावाखाली मित्रांबरोबर दिवसभर  नुसतं बागडायचो, पायाला भिंगरी लावल्यासारखं,अगदी बागेतल्या फुलपाखरांनादेखील हेवा वाटावा ईतकं...रविवारी दारावर विकायला आलेले म्हातारीचे केस विकंत घेण्यासाठी अगदी आठवडाभर आमची तयारी चालायची...खेळाच्या नावाखाली हजारो रूपयांची महागडी ऊपकरणं लागलीच नाहीत आम्हाला कधी,त्यासाठी केवळ कवड्या आणि चिंचूकेच पुरायचे...
                            पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीला कुणा ना कुणाची नजंर लागतेच,तशीच ती आमच्या या गोड दिवसांनादेखील लागली आणि ईच्छा नसताना आम्हालादेखील मोठं व्हावं लागलं...आणि मोठं म्हणजे केवळ हातापायांनी,कपड्यांनी मोठं नव्हे तर लहानपणी मनात असलेले सारे चांगले वाईट मापदंड पायदळी तुडवणारं ,आसुरी मोठेपण आम्हाला अनुभवायला मिळालं...आता ते पूर्वीचे शाळेतले मित्र रस्त्यात भेटले, तरी आम्हाला ओळंख दाखवावीशी वाटंत नाही कारंण त्यातला कुणी दुसर्‍या जातीधर्माचा निघतो तर कुणी पैशांनी गरीब असतो,कुणी स्वभावाने पटंत नाही तर कुणी विचारांनी...लहानपणीच्या या जिवाभावाच्या मित्रांमधे आजमितीला मैत्री कमी आणि हेवेदावेच जास्त दिसतात...
                            लहानपणी चिऊकाऊला आपल्या ताटातलं जेवू घालणारे आम्ही आज मात्र दारावर आलेल्या भिकार्‍याला हाकलून लावतो....दारावरच्या तुळशी,पणतीमधे हमखास देव शोधणारे आम्ही आज मात्र देवाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करतो आणि हात हलवत माघारी येतो..लहानपणीच्या आमच्या मैदानी खेळांची जागा केंव्हाच काॅम्पुटर आणि लॅपटाॅपनी व्यापून टाकली...ऊन्हात घर बांधणार म्हटल्यावर रडणारे आम्ही ईतके निर्ढावलोय की  आम्हाला कशाचंच काहीच वाटेनासं झालंय....सकाळी ऊठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अधिक पैसे कसे कमवायचे..?? या निरंतर चिंतेने आम्ही ग्रासलेले असतो...ईतकं व्यापून टाकलंय आम्हाला या पैशाने की आमच्या सुखदुःखाच्या,बर्‍या-वाईटाच्या सार्‍या व्याख्या या पैशाभोवतीच फिरतात...
                              अजून अर्धंच आयुष्य जगलोय त्यातंच हे ऐवढं सगळं बदलून गेलं...ऊरलेलं आयुष्यदेखील काही याला अपवाद असेल असंं वाटंत नाही...मग आपणही केवळ मोठे झालोय म्हणून ईतरांसारखं वागायचं का..?? लहानपणीचेच नियम,भाव भावना का बरं नाही चिरंतन टिकंत ?? सुख म्हणजेतरी नेमकं काय..?? त्याची व्याख्या  काय आणि कोण ठरवणार..??  या सगळ्यांचा सारासार विचार केल्यावर वाटतं, लहानपणानंतर मोठं होणं खरंच अनिवार्य आहे का...?? अजून संसारीपण, म्हातारपण अनुभवायचंय..या सगळ्या अवस्थांची बेरीज केली तर सुखाच्या नावाखाली बाकी शुन्य तर राहणार नाही ना..??
                                   
                                -©- निरागस


Sunday, 24 September 2017

आयुष्यावर लिहू काही

"                       तसं लिहायला चालू करून बरीच वर्ष झाली...म्हणजे मला आजही आठवतंय पाचवीमधे मी लिहिलेला सर्कशीतल्या सिंहाचं आत्मव्रुत्त हा निबंध माझ्या मास्तरीनबाईंनी पार लॅमिनेट करून कित्येक महिने पोर्चमधे लावून ठेवला होता...ती नेहमी म्हणायची पाचवीतल्या मुलग्याला ईतकी समंज कुठून आणि कशी आली...?? आणि नंतर क्वचित ऐखादा अपवाद वगळता दरवर्षीच हे झालं..मराठीच्या पेपरात  सगळ्यात शेवटी निबंध लिहिणार्‍या ईतर मुलांमधे माझा पेपर ऊठून दिसायचा तो पहिल्या पानावर लिहिलेल्या माझ्या निबंधामुळे...नंतर MBBS च्या प्रथम वर्षात नथुराम गोडसेंवर लिहिलं तर माझा सिनिअर मला शोधत माझ्या रूमवर आला...काॅलेजच्या मॅगझीन प्रमुखांनी खाजगीत भेटायला बोलवून सांगितलं की ईतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवातला हा सर्वोत्क्रुष्ठ लेख...
                            असो..ऐव्हाना मला स्वतःला कळून चुकलं होतं की मी चांगलं लिहितो...पण मग तेच तेच रटाळ विषंय आई,बाबा,सुर्योदय,सुर्यास्त,कांदा लसून यांवर लिहिण्याचा कंटाळा येऊ लागला...कुठेतरी अलगद वाटायला लागलं की या लिखाणाचा ऊपयोग समाजाला होणार नाही...आधीच मोठमोठ्या रथी महारथींनी लिहून किंवा रचून ठेवलेल्या रद्दीत अजून भर म्हणायची नुसती....फेबुवर लिहिणं चालू केलं..काहीबाही लिहायचो,शाब्दिक कोट्या करायचो पण योग्य दिशा नव्हती....स्वतःचं वेगळं मैदान नव्हतं आणि या फेबुच्या मैदानावर मनसोक्त खेळता येत नव्हतं...थोडक्यात काय तर आकाशात वार्‍याच्या झोताप्रमाणे स्वतःची दिशा बदलणार्‍या त्या कापसाच्या म्हातारीसारखं होतं माझं लिखाण..अगदी दिशाहीन..
                           पण मग स्वतःच ठरवलं की आता फालतू विषयांवर लिहायचं नाही..ज्या गोष्टींवर लिहून स्वतःचे शब्द आणि वाचून ईतरांचा वेळ वाया जाईल असं काहीच लिहायचं नाही..म्हणून मग स्वतः अनुभवलेल्या अथवा पाहिलेल्या गोष्टींवर लिहिणंं चालू केलं..माझ्या अनुभवातून मला जाणवलेल्या आयुष्यातल्या निरर्थक गोष्टींची निरर्थकता असेल किंवा आयुष्याकडे बघायचा द्रुष्टिकोन असेल सारंच मी आपल्या परीने लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला..काहींना ते पटलं तर काहींना नाही पण बहुतेक सगळ्यांनी किमान ते वाचलं आणि त्यावर विचार केला आणि माझ्या शब्दांचं चीज झालं
                           विचार तेंव्हाहि अनैसर्गिक होते आजही अनैसर्गिकंच आहेत आणि ऊद्याही ते अगदी तसेच राहतील पण आज विषयांचा परीघ किंवा लिखाणाची व्याप्ती म्हणाल तर खूप वाढली आहे..कधीकधी स्वतःच लिहिलेली ऐखादी कविता किंवा लेख कुठेतरी दुसर्‍याच जागी पहायला मिळतो , अथवा मलाच whatsapp फाॅरवर्ड म्हणून येतो..छान वाटतं..कधी कधी माझं नाव हटवून कुणीतरी स्वतःचंच नाव नावलेलं असतं त्यावर पण हरकत नाही...शब्दांवर अधिकार सांगणार्‍यांपैकी मी नाही...ज्याला जिथे आणि जसं माझं लिखाण ऊपयोगात आणायचंय ते त्याने तसं आणावं..
                            हे माझं लिखाण,हे तुमचं लिखाण असं म्हणून शब्दांना बांधून घालता येत नाही.अर्थावर हक्क सांगा, शब्दांवर नाही कारण शब्द तुमच्या मनातल्या अर्थाला जीवंत बनवतात..आणि शब्द शब्द म्हणजे तरी नेमकं काय हो..?? पुढून वाचला तर शब्द,मागून वाचला तर लहाणपणी शिकलेली बाराखडीच ना..? असो लिहिता लिहिता अशीच ऐकामागून ऐक वर्षे सरावीत..लिहिताना मी थकू नये आणि वाचताना आपण..आणि ही शब्दरूपी प्राक्तनं ऊधळायची प्रक्रिया निरंतर चालावी..
 
                                         

                                          -©- निरागस




Monday, 18 September 2017

लिहिता लिहिता

लिहिता लिहिता ....

आभाळाचा कागद व्हावा आणि पावसाची व्हावी शाई....
माझ्या शब्दांतून कुणी त्याचा बाप हुडकावा ,तर कुणी त्याची आई..


लिहिता लिहिता....

मन अगदी हरवून जावे अन् डोके व्हावे बधीर....
शब्दांतून माझ्या कुणी आठवावी बहिणाबाई ,तर कुणी आठवावा कबीर..


लिहिता लिहिता....

शब्दांतूनंच बोलंत रहावं, जगत रहावं ,जोवर नाही होत गलितगात्र....
भावनांचा हा खेळ सारा ,शब्द केवळ निमित्तमात्र..


लिहिता लिहिता....

मग ऐकेदिवशी अचानक शब्द हे जावेत संपून....
डोळे मिटून चालतं व्हावं लगोलग आपणही ,मग केवळ शब्दरूपी ऊरून..
                                   


                                         -©- निरागस


Monday, 11 September 2017

टाईम बाॅम्ब

                            मला कित्येकदा राहून राहून असं वाटंत रहातं नेहमी, की मी माझ्या संपूर्ण ऊर्जेतली १॰% ऊर्जादेखील खर्च करीत नाही दिवसभरात.. माझ्या जवळच्या काही निवडंक मित्र मैत्रिणींसमोर मी ही खंत बोलूनदेखील दाखविली आहे कैकवेळा..आणि आता तर फारसा अभ्यासदेखील नसतो करायला..दिवंसभरातले आपले ओपीडीतले शे दोनशे पेशंट बघितले की झालं...महिन्याच्या दोन तारखेला खात्यात गलेलठ्ठ पगार जमा होतो..मग परंत पुढंचा महिना ये रे माझ्या मागल्या...!! पण हे काही खरं नाही..या गोष्टींचा मला आज ना ऊद्या वीट येईलंच..मग काहीतरी नवीन करायला घेईन..चांगलं वाईट काहीतरी करेन पण नक्कीच वेगळं काहीतरी करेन..
                           तर मग ही वरची अवाजवी ऊर्जा जिरवायची कशी...?? आता स्वतःच्याच शिक्षणाच्या व ईतर लोक काय म्हणतील ?? या दबावाखाली म्हणून , फार काही ऊपद्व्याप करंता येत नाहीत..माझ्याच स्वतःच्या विद्यार्थ्यांकडे बघून कधीकधी मनात विचार यैतात ,की किती भोळी भाबडी मुलं आहेत ही..!! किती सरळमार्गी...!! मी याजागी असतो तर असं केलं असतं, तसं केलं असतं.. वगैरे वगैरे..पण आता नाही तसं वागता येत ,म्हणून मग नाईलाजाने , कुठे व्यायामशाळेत जाऊन कसरंत कर,फेबुवर ऊगाच नाही त्या शाब्दीक कोट्या कर किंवा ऐखादा बहुचर्चीत विषंय पकडून वैचारीक धुमशान घाल, अशा गोष्टींमधे ही ऊर्जा खर्च करण्याचा मी प्रयत्न करतो...पण MBBS ला असताना मात्र अशी बंधनं नसायची...दिवसभर नुसता ऊच्छाद मांडायचो...चांगलं की वाईट हे विचार ढुंकूनसुद्धा मनाला शिवायचे नाहीत...त्यात भर म्हणून माझ्याचसारखी अजून आठ दहा मुलं MBBS ला ऐकाच वर्गात आलो आणि मग आमच्या या तांडवाला पाहून प्रत्यक्ष परमेश्वरानेदेखील हात टेकले असतील वर आभाळात...
                              तर झालं असं...की नुकतीच दिवाळीची सुट्टी संपवून ,आम्ही सगळे मित्र-मंडळी परत काॅलजात आलो...मग कुणीकुणी कायकाय केलं यावर्षी घरी, त्याची जाहिरातबाजी सुरू झाली..कुणी म्हणालं मी शेजारच्या घरासमोर मुद्दाम मोठाले फटाके फोडले..तर कुणी शेजारच्या लहान मुलांनी बनवलेल्या किल्याचं सकाळी लवकर ऊठून  लक्ष्मीबाॅम्ब लावून सगळ्यांच्या आधी ऊद्घाटन करून आलं होतं...चर्चा सुरू असताना मधैच कुणीतरी म्हणालं ,की मी यावर्षी टाईम बाॅम्ब बनवला...आता ही संकल्पना मात्र जरा फारंच हटके आणि विलक्षण अशी होती...सगळ्यांनी ऐकसुरात आश्चर्याने विचारलं,अरे टाईम बाॅम्ब कसा बनवायचा रे...?? मग मित्रानेच सांगितली प्रक्रिया..तर काही नाही ..चांगला मोठा सुतळी बाॅम्ब घ्यायचा,त्याची वात अगरबत्तीच्या बरोबर मध्यभागी येईल, अशारीतीने बांधायची आणि आपल्या आवडीची जागा हेरून तिथे तो ठेवून अगरबत्ती पेटवून द्यायची...अशाने आपण आरामात दूरवर कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊ शकतो आणि पकडले जाण्याचा धोका नाहीसा होऊन , न आवडत्या लोकांना असं करून आपल्याला मनसोक्त त्रास देता येतो...मग काय आता नुकतीच नवीन विद्या अवगंत झाली होती..आता तिचा ऊपयोग कधी आणि कुणावर करायचा यावर खलबतं सुरू झाली..
                          आता कोणत्याही काॅलेजात जर ऐखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, की कारे बाबा तुला संपूर्ण काॅलेजातल्या कुणाकुणाचा म्हणून सगळ्यात जास्त राग येतो ते सांग..तर तो अगदी हमखास सांगेल, वसतीग्रुह प्रमुखाचा म्हणजेच Hostel Warden चा, काॅलेजप्रमुखाचा म्हणजेच Dean चा आणि त्याच्याच काॅलेजातल्या सिनिअर विद्यार्थ्यांचा..आम्हीही याला अपवाद नव्हतोच...फक्त या तिघांव्यतिरीक्त आमच्या यादीत अजून ऐका नावाची भर होती ती म्हणजे आमच्या वसतीग्रुह सुरक्षारक्षकाची...रात्री ऊशीरा का येता...?? ईतका गोंधळ का घालता ..?? वगैरे वगैरे तद्दन फालतू प्रश्न विचारून व प्रसंगी आमच्या तक्रारी करून, वेळोवेळी त्याने आम्हाला त्रास दिला होताच...आता आमची पाळी होती...हाहाहा
                          झालं..!! ठरलं तर मग...येता रविवार गाजवायचा पक्का निर्धार करून आम्ही सगळेच मावळे कामाला लागलो..बाजारात मिळणारे ऊच्चप्रतीचे सुतळी बाॅम्ब,अगरबत्ती,चिकटपट्ट्या वगैरे सामान खरेदी करून रीतसर टाईम बाॅम्ब बनविण्यात आले.. सर्वजण आता रविवार ची वाट पाहू लागले आणि तो दिवंस ऊजाडला..दिवसभर फोनवर बोलायच्या व ईतर काही निमित्ताने गटागटाने सर्वत्र फिरून मोक्याच्या जागा हेरण्यात आल्या..सगळं काही ठरवून त्याची आखणी चालू होती तर आमच्यातल्याच अजून ऐकाचं डोकं चाललं..काय तर म्हणे सगळीकडे ऐकाच वेळी आवाज झाला पाहिजे...ऐव्हाना आमची सारासार विचार करण्याची कुवंत आम्हाला कधीच सोडून गेली होती..हाती राहिला होता तो केवळ आणि केवळ मस्तीखोरपणा..हीदेखील संकल्पना आमच्या मूळ प्लॅनमधे अगदी आयत्या वेळी ऐकमताने सामाविष्ठ करून घेण्यात आली..आणि मग जेवण करून चार जणं चार टाईम बाॅम्ब घेऊन ठरवून दिलेल्या आपापल्या जागांच्या दिशेने कूच करते झाले..माझ्याकडे वसतीग्रुहरक्षकाच्या खोलीसमोर बाॅम्ब ठेवायची जबाबदारी होती, ती मी पार पाडली,ईतर मित्रांनीदेखील आपापल्या जबाबदार्‍या लीलया पार पाडून Dean,Warden आणि सिनिअर विद्यार्थी हाॅस्टेल या ठिकाणी रीतसर बाॅम्ब ठेवले...साधारण ऐकाच वेळी हे सगळे बाॅम्ब ठेवण्यात आले...
                         आता फक्त गंमत बघण्याचं काम ऊरलं होतं..अर्ध्या पाऊण तासात काम फत्ते होणार होतं..गंमत बघण्यासाठी म्हणून सगळे वसतीग्रुहाच्या गच्चीवर जमलो..ऊरलेला अर्धा तास काही केल्या पुढे सरकेना...मग मनात चलबिचल सुरू झाली..अगरबत्ती विझली तर नसेल ना..?? कधी वाजणार वगैरे वगैरे आणि ईतक्यात मोठ्ठा आवाज झाला.. धूम..!! धड्डाम...!! धूम...!! डीनच्या बंगल्याच्या खिडकीत ठेवलेला बाॅम्ब काचा फोडून फुटला होता..त्याबरोबर धावंत बाहेर आलेला डीन चा चपराशी आणि डोळे चोळंत बाहेर आलेला डीन बघून केलेल्या परिश्रमांचं सार्थक झाल्यासारखं झालं..क्षणभर आता Dean वसतीग्रुहाची झाडाझडंती घेणार असं वाटून अंगावर काटा आला पण तसं काही झालं नाहीच...अजून पाच मिनिटांनी सिनिअर हाॅस्टेलमधला बाॅम्ब फुटून तिकडे धावपळ झाली, ते पाहून हसता हसता पुरेवाट होते तोच वाॅर्डनच्या दरवाजासमोर मोठ्ठा आवाज झाला धुम...!! धडाम...!!धुम्म...!! तोही घाबरून बाहेर आला..झालं चारपैकी तीन बाॅम्ब अगदी ठरवल्याप्रमाणे फुटले होते पण नेमका मी लावलेला चौथा बाॅम्ब काही केल्या फुटेना..अजून पाच-दहा मिनिटं वाट पाहून झालं पण काहीच ऊपयोग झाला नाही..मग शेवटी मित्राला म्हटलं, चल जाऊन बघू काय झालंय ते..आम्ही दोघे खाली त्या रूमबाहेर बाॅम्ब लावलेल्या जागी जायला आणि आमचा वसतीग्रुहरक्षक बाहेर यायला ऐकंच वेळ झाली..मग ऊगाच ऊसनं अवसान आणून त्याला म्हणालो काय मामा सगळं व्यवस्थित ना..?? तो ऊत्तर देईपर्यंत बाॅम्बकडे बघितलं तर तो केंव्हाही फुटायच्या बेतात...माझ्यामागोमाग त्याचंही लक्ष गेलं तिकडे आणि तो ओरडलाच पळा पळा पळा...!! बाॅम्ब...!! बाॅम्ब .!! आणि धावंत जाऊन त्याने पाण्याची बादली आणून ओतली त्यावर...झालं आमचा ऊरलेला चौथा बाॅम्ब मात्र निकामी करण्यात आला..पण त्या सुरक्षरक्षकाची झालेली धावपळ आजही आठवली की हसून हसून पुरेवाट होते...पुढे कित्येक दिवंस वसतीग्रुह प्रमुखाने या प्रकरणाचा तपास लावायचा प्रयत्न केला..पण आम्ही काही सापडलो नाही..नाही म्हणायला आमचं नियोजनंच तितकं चोख होतं..
                          आज ईथे मुंबईत ऐका प्रथितयश महाविद्यालयात कन्सल्टंट म्हणून काम करताना जेंव्हा मागे वळून पहातो तेंव्हा या अशा गोष्टी विलक्षण सुख देऊन जातात...आयुष्य सुंदर आहे ते या अशा जीवाला जीव देणार्‍या निष्पाप निरागस मित्रांमुळे...आयुष्य खरंच खूप सुंदर आहे फक्त ते सौंदर्य पाहण्याची द्रुष्टी पाहिजे आणि जे आवडलं ते आपलंसं करावयाची जिद्द पाहिजे...अनपेक्षीतपणे आयुष्यात येऊन माझ्या आयुष्याचा परीघ ऊंचावणार्‍या या अशा निवडंक मित्रांना दिलसे सलाम.....!!
                                  

                                       -©- निरागस

Tuesday, 15 August 2017

पुरूषार्थ

                        अगदी परवाची गोष्ट,कुठलासा मराठी चित्रपट पहायला गेलेलो..वाह..!! काय सिनेमा बनवला होता..!!,कथानकापासून ते विषंय हाताळायच्या पद्धतीपर्यंत ,सारंच कसं नाविन्यपूर्ण...काही प्रसंग तर खरंच मनाला चटका लावून जाणारे..पाण्याने डोळ्यांच्या कडा पाणावल्या..ईच्छा झाली की आता रडावं आणि मोकळं करावं मन...पण रडूच येईना...माझ्या स्वतःच्या बाबतीत तर कित्येकवेळा असं होतं, की काही काही प्रसंग,काही घटना ईतक्या भावनाविवश करतात की वाटतं बास्स..सगळ विसरून मनमोकळेपणाने रडावं...पण रडूच येत नाही...आम्हा मुलांना तुम्हा मुलींसारखं ईतक्या सहजासहजी  नाही रडंता येत...घरी येऊन विचार केला की शेवटंचा कधी रडलो होतो बरं...?? तर पाचवी सहावीत कोणत्याशा कारणामुळे बापाने तुडव तुडव तुडवला होता त्यावेळी...तेसुद्धा काही भावनीक वगैरे होऊन नव्हे तर मार कमी पडावा म्हणून...मग हे असं आम्हा मुलांच्याच बाबतीत का होत असावं बरं...?? ऐवढ्याशा कारणाने ओक्साबोक्शी रडणार्‍या मुली बघितल्या की मग स्वतःचीच लाज वाटते मलातरी...
                          खोलवर जाऊन या गोष्टीचा विचार केला तर लक्षात येईल की याचं मूळ कारंण दडलंय ,ते म्हणजेआपल्या पुरूषप्रधान समाजव्यवस्थेत...या नकली समाजात पुरूषांनी रडणं कमीपणाचं मानलं जातं...किंबहुना ते त्याच्या पौरूषत्वावरंच प्रश्नचिन्ह ऊभं करतं...त्यातून चुकून ऐखादा रडलाच तर अगदी आई बाबासुद्धा घरात त्याची समजूत काढताना रडतोस काय मुलींसारखं ..?? असं दरडावून विचारतात आणि अशाप्रकारे अगदी लहानपणीच त्याच्या भावनांची वेळोवेळी सुंता केली जाते ,त्यातून तयार होतात आमच्यासारखे भावनाशुन्य बैल,ज्यांना भावना असतात पण त्या दाखंवता येत नाहीत..,रडावंस वाटतं पण रडंताही येत नाही...,प्रेम करावसं वाटतं पण त्यातला आपलेपणा मात्र दाखवता येत नाही...
                          आता आमच्या चालीरीतिंकडे लक्षपूर्वक बघा.. पत्नीनेच पतीच्या पाया पडायचं नेहमी...नवरा कधीतरी चुकून बायकोच्या पाया पडताना पाहिलंत का आपण..?? बहिणीने भावाला राखी बांधायची आणि म्हणायचं माझी रक्षा कर...मग ती बहीण पार कलेक्टर असुदेत, दहावी पास भावाला ती म्हणणार माझं रक्षण कर...काय संबंध..?? ऊलंटपक्षी मी कित्येक ऊदाहरणं सांगू शकतो जिथे बहीणिने नुसत्या भावाचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा तंबू तोलून धरलाय...नवर्‍याला मालंक किंवा पतीदेव म्हणायची पद्धतदेखील अशीच...ऐकाला मालकाचा दर्जा दिलात की मग आपसुकच दुसरा त्याचा दास अथवा नोकर बनतोच...करवा चौथ,वटपौर्णिमा यांसारख्या  पद्धतींमधूनदेखील याच पुरूषी अहंकाराची, वेळोवैळी देखभाल करून त्याची मर्जी राखली जाते...का नाही कोणी नवरा आपल्या बायकोसाठी वडाला प्रदक्षिणा घालंत..??? का नाही कुणी आपल्या बायकोसाठी करवा चौथ ठेवत..?? कशाची लाज वाटते आम्हाला..?? तर समाजाची..अगदी परवाचंच ताजं ऊदाहरण सांगतो.. माझ्याकडे दवाखान्यात ऐक महिला  आली मूलबंदीची शस्त्रक्रिया करून घ्यायला ,तर तिला ह्रदयाचा त्रास असल्याकारणाने मी तिला शस्त्रक्रिया टाळण्याचा सल्ला दिला..आणि नवर्‍याला नसबंदी करून घेण्याचा सल्ला दिला..नवर्‍याची नसबंदी ही तुलनेने कमी जटील,कमी वेळात आणि कमी खर्चात होणारी, तर कुठंचं काय.. नवरा जागेवरून थेट ऊठून म्हणाला, डाॅक्टरसाहेब आमच्या अख्या खानदानात है असलं काम कुणी केलं नाही..मी कसं करू..?? काय बोलायचं अशा बहाद्दरांना.?? या अशा निर्णायक क्षणी कुठे जातो या बैलांचा पुरूषार्थ...??
                          पण मग आमची संस्क्रुती खरंच अशी पुरूषप्रधान होती का..?? तर नाही...आमच्या हिंदू संस्क्रुतीत दुर्गामाता,पार्वती,लक्ष्मी या अशा ऐक ना अनैक देवतांची पूर्वापार ऊपासना केली जाते..राणी लक्ष्मीबाई सारख्या समाजाचं नेत्रुत्व करणार्‍या,बहिणाबाईंसारख्या प्रतिभावान स्त्रिया आमच्याच संस्क्रुतीने जगाला दिल्या..,मग हे मधेच सगळं बदलून वारं ऊलट्या बाजूने कसं सुरू झालं...?? तर पुरूष नेसर्गिकरीत्याच स्त्रियांच्या तुलनेत अधिक ताकदवर असल्याने, अर्थाजनाची व अवजंड अशी सारी कामे नकळंत त्याच्या वाट्याला चालली गेली तर तुलनेने भारतीय संस्क्रुतीत दुय्यम मानली गेलेली बालसंगोपनासारखी कामे स्त्रियांच्या वाट्याला आली... त्यातून हळूहळू आम्ही स्त्रियांची काळजी घेऊ,त्यांची जबाबदारी घेऊ ही सारी बेगडी भावना निर्माण झाली...ऐकावर ऐक दगड रचले गेले,त्यावरं विविध रूढी परंपरांचा मुलामा दिला गेला आणि हा आजचा पुरूषप्रधान संस्क्रुतीचा महाल ऊभा राहिला...पण आजही जर तुम्ही ईतर पाश्चात्य संस्क्रुतींमधे बघाल तर पुरूष स्त्री असा भेदभाव फार अपवादात्मकरीत्या बघायला मिळेल..तिथल्या स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात...पुरूष आनंदाने किंवा दुःखाने ओक्साबोक्शी चार चौघात रडताना दिसतात...थोडक्यात काय तर स्त्री-पुरूष हा भेद विसरून माणसं माणसांसारखी जगतात...
                     मग आता हे प्रकरण कसं संपवायचं...?? तर ईतक्या वर्षांच्या या प्रथा - परंपरा संपवणं म्हणजे काही ऐकदोन लोकांचं काम नाही...सगळ्यांनीच खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे..स्त्रियांकडे केवळ ऊपभोगाची वस्तू अथवा कमजोर पणाचं प्रतिक म्हणून पहाणं पहिल्यांदा बंद करा...आणि स्रियांनीदेखील हे असले अशास्त्रीय सण,प्रथा,परंपरा पाळणं  बंद करा..स्वतः स्वतःची किंमत नाही करणार तर मग ईतरांनी तरी का करावी आणि कशासाठी करावी..?? आईवडिलांनी लहान वयातंच मुलांवर समानतेचे संस्कार करावेत...लहान वयातंच जर या गोष्टी मनावर बिंबवल्या गेल्या तर मोठेपणी हे असले विखारी न्यूनगंड पाळणारी पिढीच तयार होणार नाही...आणि मुळात केवळ पुरूषंच याला जबाबदार आहेत असंही मला वाटंत नाही,..कित्येक शिकलेल्या मुली,दवाखान्यात येऊन मला म्हणतात, " डाॅक्टर मला पहिल्या दोन मुली आहेत म्हणून अजून ऐक शेवटंचा चान्स मुलगा व्हावा म्हणून "...काय बोलायचं अशा मुलींना...?? या अशा मानसिकतेतून बाहेर पडणं खरंच शक्य आहे का..?? डाॅक्टर,ईंजिनिअर झालेल्या मुली जर असा विचार करणार असतील तर मग समाज कुणी आणि कसा बदलायचा..?? आणि अशा या भ्रष्ट शिक्षणव्यवस्तेतदेखील आपल्याला बदल हा करावाच लागेल...
                बघा विचार करा आणि नुसता विचार करू नका, विचार पटला तर त्यावर अंमल करायला मात्र विसरू नका...मनावर बिंबवल्या गेलेल्या पुरूषार्थाच्या या खोट्या व्याख्येला फाटा देऊन समानतेच्या मार्गावर चालणं अवघंड आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही...
                                     

                                 -©- निरागस




Saturday, 5 August 2017

मैत्री

मैत्री असावी फुलपाखरासारखी
बागेतल्या फुलांशी नातं सांगणारी

मैत्री असावी रांजणासारखी
तहानलेल्याची तहान ओळखणारी

मैत्री असावी वहाणेसारखी
पावलांशी स्पर्धा करणारी

मैत्री असावी त्या दूरवरल्या चंद्रासारखी
लहानग्यांना खुणावणारी

मैत्री असावी गुलमोहरासारखी
काळाची पर्वा न करंता सदैव बहरणारी

तर मैत्री असावी कर्णासारखी
मित्रासाठी अधर्माची बाजू घेणारी
                             

                                -©- निरागस




Tuesday, 18 July 2017

अजमल कसाब आणि मी

 "                    घाबरू नका ही काही राजकीय किंवा संवेदनशील अशी पोस्ट नाही..पण हा प्रसंग मात्र नक्कीच खास,सांगण्याजोगा आहे आणि या प्रसंगाचा कर्ता आणि करविता दुसरा तिसरा कोणी नसून थेट पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब हा असल्यानेच या लेखाला त्याचंच नाव देणं मला संयुक्तिक वाटलं.. आजवरच्या माझ्या लिखाणावरून,विचारांवरुन तुमच्या ऐवढं निश्चित लक्षात आलं असेलं की मी त्या ईतर पुस्तकी डाॅक्टरांसारखा नाही..किंबहुना बनू ईच्छित नाही...व्यवसायाने डाॅक्टर असलो, तरीही माझी वैयक्तिक अशी राजकीय,सामाजीक मतं आहेत आणि मी ती मांडतोच..कधीकधी लोकं मला विचारतात हे असं कसं जमतं तुम्हाला..?? त्यांना मी नेहमी ऐवढंच सांगतो, की मी दहा वर्षांचा डाॅक्टर आणि तीस वर्षांचा माणूस आहे..तर हे वेगळेपण टिकविण्यासाठी मी माझे मित्रसुद्धा फार काळजीपूर्वक निवडतो..तर हा असाच mbbs करतेवेळच्या मित्रांसोबतचा ऐक किस्सा...
                        mbbs च्या दुसर्‍या वर्षातली गोष्ट..आमचं दुसरं वर्ष म्हणजे दीड वर्षाचं...दीड वर्षात शिकलेलं,वाचलेलं सगळं काही डोक्यात ठेऊन परीक्षच्या दिवशी ओकायचं..त्यात दुसरं वर्ष म्हणजे आम्ही organisers..  गॅदरींग,नाटंक,कल्चरल प्रोग्राम,स्पोर्ट्स वगैरे सांभाळता सांभाळता नाकी नऊ यायची...अभ्यासाच्या पुस्तकांशी माझं तसं विशेष कधि जमलंच नाही..मी पुस्तकं वाचायचो पण ती पुलंची,अत्र्यांची..कारंण त्यातून आयुष्य कळायचं...आम्ही वर्षभर सगळीकडे अडकायचो..हजेरीत,भांडणात,पाॅलिटिक्स मधे..काॅलेजची ब्लॅकलीस्ट तर कधी आमच्याविना बनलीच नाही..त्यात मी काॅलेजचा General Secretary..आमचा अभ्यासंच मुळी चालू व्हायचा युनिवर्सिटीच्या महिनाभर आधि...पण पास मात्र आम्ही व्हायचोच...अगदी नेहमी न चुकंता,तेही कोणतेही ग्रेसमार्क्स  न वापरता...तर अशीच आमची युनिवर्सिटीची अंतिम परीक्षा चालू होती...पहिले तीन विषयांचे प्रत्येकी दोन पेपर होऊन केवळ Forensic Medicine चा शेवटंचा ऐक छोटासा पेपर शिल्लंक होता..रात्रभर जागून अभ्यास केला..सकाळी लवकर ऊठून अभ्यासाला बसणार तोच कुठूनतरी बातमी आली की मुंबईवर अतिरेकी हल्ला झालाय..घरी फोन लावून बातमीची खात्री केली..तेवढ्यातून आईने सल्ला दिलाचं,घरातून बाहेर निघू नकोस...मी खेकसलोच तिच्यावर,म्हटलं "  अगं मुंबईवर हल्ला झालाय, कोल्हापूरवर नाही..आणि मी बाहेर नाही पडलो तर काय माझ्या रूमवर येणार आहे का पेपर,सकाळच्या वर्तमानपत्रासारखा...?? " आणि मी फोन ठेवला...
                      ऐव्हाना पूर्ण हाॅस्टेलभर बातमी पसरली होती...सगळीच मुलं ऐकत्र जमली..मुंबईच्या हल्ल्याचं दुःख होतंच पण जो तो आपल्या परीक्षेचं काय याच विचारात व्यस्त होता...कुणालाच काही कळंत नव्हतं..माझं तर डोकंच बधीर झालं होतं...रात्रभर वाचलेलं तर केंव्हाच सपाट झालेलं सगळं..तेवढ्यात मुंबईच्या ऐका मित्राचा निरोप आला की मुंबईत परीक्षा पुढे ढकललीये.."अरे पेपर तर महाराष्ट्रभर ऐकंच असतो..त्यांचा नाही तर आपला पण नाही.." अजून ऐकाचं डोकं चाललं..पण खात्री कशी करायची...मग सर्वानुमते ठरलं की काॅलेजच्या डीनला जाऊन विचारायचं..झालं तर ,आम्ही सगळी मुलं सकाळ सकाळी डीन बंगल्यावर...दाराची बेल वाजवली तर डीन डोळे चोळंत लुंगी सावरंत बाहेर आला..मुंबईवर हल्ला झालाय हेच मुळी त्याला आमच्याकडून कळालं.. " काही कॅन्सल वगैरे नाही परीक्षा..माझ्याकडे जोपर्यंत तशी काही सूचना येत नाही तोवर मी काही सांगू शकंत नाही.." असं म्हणून आम्हाला हाकलून देण्यात आलं..आईशप्पथ सांगतो..त्यावेळी क्षणभर मुंबईवरंच का हल्ला झाला..??   कोल्हापूरवर का नाही..?? असंच वाटलं..सगळेजण मुकाट्याने आपापल्या खोलीत जाऊन वाचंत बसले..पण शेवटी तासाभरातंच अपेक्षीत बातमी आली..संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षा तीन दिवंस पुढे ढकलण्यात आली..
                      ऐव्हाना अभ्यासात बुडालेली मुलं मग मात्र बाहेर पडली..अगदी बिळात पाणी शिरलेल्या उंदरांसारखी..आमचाही आठ-दहा लोकांचा ग्रुप होताच..बसलो ऐकत्र...आता तीन दिवंस काय करायचं...?? मी म्हटलं आजंचा दिवस करू टाईमपास..पुढंचे दोन दिवंस करू परंत अभ्यास...तसं मला मधेच कुणीतरी अडवंत म्हणालं..." केला की आता अभ्यास...आज जर हल्ला नसता झाला तर परीक्षा झाली असती आपली..कितीवेळा वाचायचं तेच तेच...?? फालतु विषंय आहे हा.." आणि ते ऐकून संपूर्ण रूममधै भयाण शांतता पसरली...मी माझ्या दोन्ही बाजूस बघितलं..कुणीच काही बोलायला तयार नव्हतं..मग तिसरा कुणीतरी म्हणाला, " चला गोव्याला...!!.." हे म्हणजे अगदीच थोर होतं..पुन्हा मीच त्याला आडवंत म्हणालो.., " अरे आपण वर्षभर अभ्यास नाहीच ना करंत मग आता निदान ऐन परीक्षेआधी तरी करूयात की थोडाफार..." पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं..ऐव्हाना माझ्याही लक्षात आलेलं की विषंय हाताबाहेर गेलाय म्हणून...पण मी माझ्या मतावर ठाम होतो..आतून कुठेतरी मला हे पटंत नव्हतं.." मी काही येत नाही तुम्ही सगळे जा...!! "मी म्हटलं आणि मी निघून गेलो.. पण आम्हा मित्रांचा ऐक कटाक्ष होता..गेलो तर सगळे ऐकत्र जायचं..,नाहितर कुणीच नाही..मग नानाविध हत्यारं वापरून माझंही मतपरीवर्तन केलं गेलं आणि आम्ही गाड्या काढून गोव्यात दाखल झालो..
                           गोव्याची ऐक खासियंत तुम्हाला मान्य करावीच लागेल...तिथे गेल्यावर तुम्ही तिथलेच होउन जाता..मागे काय घडलंय,ऊद्या काय घडणारे या असल्या फालतु प्रश्नांना गोव्यात स्थान नाही...तीन दिवंस मस्त,तुफान मजा केली..आपण विद्यार्थी आहोत आणि तीन दिवसांनी आपली अंतिम परीक्षा असणार आहे याचाच मुळी आम्हाला विसर पडला.. हे तीन दिवंस भुर्रकन निघूनसुद्धा गेले आणि समोर पुन्हा ऐकदा ऊभी राहिली परीक्षा...झालं ऊद्या सकाळी दहा वाजंता पेपर आणि आदल्या रात्री देखील आम्ही गोव्यातंच पडलोय...मग कुणीतरी पुढाकार घेऊन परंत जायचा विषंय काढला आणि आम्ही खडबडून जागे झालो..नाईलाजास्तव आम्ही सर्वजण आपापल्या सामानाची आवराआवर करून परतीच्या प्रवासाला निघालो...
                               तुम्हाला आश्चर्य वाटेल दहा वाजताच्या परीक्षेसाठी दुचाकीवरून साधारंण दोनैकशे किमी चा प्रवास करंत आम्ही सकाळी आठ वाजंता वसतिग्रुहात पोहोचलो..जेमतेम आंघोळ करून थेट परीक्षेसाठी रवाना व्हावं लागलं..वाचलेलं काहीच आठवेनासं झालेलं,नवीन वाचायला वेळही नव्हता आणि ताकदही..तशाच गलितगात्र अवस्थेत परीक्षा दिली...जे आठवेल ते बरोबर लिहिलं ऊरलेलं चुकीचं का असेना पण तेही लिहिलंच...परीक्षेचा निकाल लागंला..ईतर अभ्यास केलेल्या विषयांपेक्षा जास्त मार्क्स या विषयाने मिळवून दिले...आमचा ऐक मित्र गचकला...वातावरंण थोडंस निराशाजनंक झालेलं पण तोही पुढे re-evaluation मधे महिन्याभरातंच पास झाला...ऐकंदरीत सगळा आनंदी आनंद...
                              आज मागे वळून पाहिलं की स्वतःचंच आश्चर्य वाटतं..कसे काय आलो ईथवर आपण..?? क्षणभर विश्वासंच बसंत नाही स्वतःवर...पुढे पदवी अभ्यासक्रमासाठी खूप अभ्यास करावा लागंला...पण हे mbbs चे दिवंस,मित्रांसोबत केलेल्या टवाळक्या आयुष्यभर लक्षात राहतील....आज बरोबरच्या डाॅक्टर मित्रांना सांगितल्या ह्या गोष्टी तर विश्वासंच बसंत नाहि त्यांचा...कारण त्यांनी पुस्तकं सोडून कधी केलंच नाही काही दुसरं...या सगळ्या मस्तीत mbbs कधी संपलं कळलंच नाही...पुढे काळानुरूप बरेचसे मित्र तुटले...यातले अगदी बोटावर मोजण्याईतके मोजंकेच मित्र आज बोलण्यात आहेत ...प्रत्येकजण आपापल्या अभ्यासात व प्रपंचात अडंकला..काहि वैचारीक मतभेद झाले..काही मला पचले नाहीत तर काहिंना मी....पण या अशा चिरकाल टिकणार्‍या आठवणी दिल्याबद्दल चांगल्या,वाईट,ऊपयोगी व निरूपयोगी  सर्वच मित्रांना हात जोडून अभिवादंन.....!!




                              -©- निरागस


Thursday, 13 July 2017

पोस्टमाॅर्टम

"             नुकतंच mbbs पुर्ण झालं होतं..पदव्युत्तर शिक्षणासाठीची परीक्षा संपवून निकालाची वाट पहात होतो...निकालाला साधारण चार- पाच महिने अवधी होता..mbbs नंतर ऐक वर्ष करावयाची सक्तीची सरकारी नोकरी मानगुटीवर होतीच..म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा निकाल येईपर्यंत ऐखाद्या जवळच्याच सरकारी प्राथमिक ऊपचार केंन्द्रात तात्पुरती नोकरी करू...नोकरीचं ठिकाण शहरापासून तसं जवळंच .,टेकडीवर वसलेलं..दुचाकीवरून जाता येता गंमत वाटायची...रस्त्याच्या दोन्ही बाजूला यथेच्छ हिरवळ,अवतीभोवती प्राणी आणि पक्षांची रेलचेल..कामही तसं बेताचंच..ऐकंदरीत मस्त नयनरम्य ठिकाणी नोकरी सुरू होती....
                      साधारण महिनाभर सगळं व्यवस्थित सुरू होतं..पण तो दिवसंच मुळी सुरू झाला त्रास देण्यासाठीच...सकाळपासून ऐकही गोष्ट मनासारखी होत नव्हती..कसेबसे पेशंट संपवून घरी निघायच्या तयारीत होतो तर तालुका वैद्यकीय अधिकार्‍याचा फोन आला..ऐक ईमर्जन्सी पोस्टमाॅर्टम आहे..जागेवर जाऊन करावं लागेल...!! झालं दुपारी ऐक वाजला होता..मरणाची झोप येत होती त्यात आता हे काम...पण केल्याशिवाय काहि गत्यंतर नव्हतं...mbbs मधे वर्षभरासाठी ऐक विषय होता फाॅरेन्सिक मेडिसिन नावाचा पण प्रत्यक्ष शवविच्छेदनाचा मात्र कधी अनुभव आला नव्हता...थोडावेळ विचार केला आणि परंत तालुका अधिकार्‍याला फोन केला...म्हटलं सर मला अनुभव नाहिये...तसं तो खेकसुनंच म्हणाला..." कशाला लागतोय अनुभव....?? मी बघुन आलोय बाॅडी ...its a clear cut case of murder..चेहर्‍यावर अॅसिड टाकून मारलंय..  विषय पास झालायस ना...?? जा आणि कर..." आणि असं बोलून धाडंकन फोन ठेवला त्याने...ठेवला कसला आदळलाच..नंतर कदाचित माझीच दया येऊन त्यानेच काही वेळाने फोन केला परंत आणि म्हणाला...,दुसरा ऐक सिनिअर डाॅक्टर पाठंवतो सोबतीला, तू जाऊन फक्त ऊभा रहा तिथे..मी सांगतो तसंच लिही नंतर रिपोर्टमधे...ऐकून थोडं हायसं वाटलं...
                 साधारंण दुपारी दोन वाजंता पोलिस चौकीतून फोन आला...समोरून चौकीप्रमुख म्हणाला नमस्कार सर...कधी येताय...?? म्हटलं कुठे..?? तर म्हणाला शवविच्छेदनाला...म्हटलं हो पण नक्की जागा कुठे..?? मग त्याने जागेचं वर्णन सांगितलं...कुठेसं आडजंगलात झाडींमधे म्रुतदेह होता...जागेचं नाव आयुष्यात पहिल्यांदाच ऐकंत होतो...म्हटलं मला ऐकट्याला येणं शक्य नाही गाडी पाठंवा..!! तसं काहीसं नाराज होऊनंच तो म्हणाला, बरं,, ठीक आहे....!! आणि त्याने फोन ठेवला...मग पुढे तास दोन तास नुसतेच सगळ्यांचे फोन येत राहिले...जिल्हा वैद्यकीय अधिकारी,अमुक सरपंच,अमुक राजकारणी वगैरे वगैरे ..पण न्यायला गाडी मात्र आलीच नाही...पाच वाजंता कंटाळून मीच परंत फोन केला चौकीत...म्हटलं गाडी पाठंवताय की मी निघू घरी...कितीवेळ थांबू ईथे ताटंकळंत...तसा समोरून चौकीप्रमुख गयावया करंत म्हणाला , " साहेब गाडीची व्यवस्थाचं होत नाहिये...!! सगळ्या गाड्या कामावर आहैत...ऐक काम करतो मी स्वतःच येतो माझी गाडी घेऊन..." आणि तो म्हटल्याप्रमाणे आलाही अर्ध्या तासात...त्याच्या मागे बसलो आणि निघालो...जाता जाता तोही सागू लागला...म्हणाला सर खूप वाईट मर्डर आहै...अॅसिड टाकून मारलंय वगैरे वगेरे...मग ईकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करंत करंत ऐकदाचा पोचलो जागेवर...
                             जे वैद्यकीय क्षेत्रातले नाहीत त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय...शवविच्छेदनासाठी लागणारी चिरफाड करण्यासाठी सरकारने नेमलेला कर्मचारी असतो...डाॅक्टर सांगेल तसं तो डाॅक्टरच्या सल्यानुसार चिरफाड करंत असतो...मी जागेवर पोचलो तर हा कर्मचारी गायंब...पोलीस हैराण होऊन म्हणाला " नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न आहेत साहेब...आत्ता तर ईथेच होता..." नंतर शोधाशोध झाली पण तो काही कुणाला सापडेचना, सगळेचजण हैराण होऊन त्याची वाट पाहंत बसलेले... अर्ध्या पाऊन तासांनी कुठुनतरी ऐक काॅन्स्टेबल ऐका माणसाची बकोटी पकडून घेऊन आला...म्हणाला हा बघा साहेब तिथे त्या झाडामागे दारू पीत बसलेला...चौकीप्रमुखाने त्याला चांगल्या अस्खलित भाषेत चार पाच शिव्या हासडल्या..आणि माझ्याकडे वळून म्हणाला साहेब आता तरी सुरू करा...तोवर सूर्य दिसनासा होऊन काळा-कुट्ट अंधार पडला होता...मी घड्याळात पहात म्हटलं...सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करणं कायद्याने मना आहै..मी नाही करू शकंत...तसं त्या चौकीप्रमुखाने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला.." साहेब सकाळपासून जेवलो पण नाही..सगळ्यांना घेऊन ये , आणून सोड ह्यातंच सगळा वेळ गेला...मी सोडून जागेवर कुणीच नाही...आज लेकराच्या शाळेत कराचा कार्यक्रम होता...जाता नाहि आलं तिकडेपण...पलिकडच्या गावात दारूबंदी असूनदैखील दारू विकताना कुणीतरी सापडलाय...गावकरी घेऊन आलेत त्याला स्टेशनात...असं नका करू..हवंतर पाया पडतो तुमच्या " म्हणून तो वाकलाच....त्याला मधेच थांबवत मी म्हटलं, ठीक आहे पण लाईटच काय करायच...?? थोडावेळ डोकं खाजवून मग त्यानैच ऊपाय शोधला...दोन पोलीस जीप ऊभ्या करून त्यांच्या लाईट्स सुरू करून दिल्या आणि अशाप्रकारे या क्रुत्रीम प्रकाशात आमचं शवविच्छेदन सुरू झालं...
                        सोबतीला दिलेला सिनिअर डाॅक्टर BAMS  होता...ऐक असा डाॅक्टर मला मार्गदर्शन करणार होता, ज्याने हा विषंय आयुष्यात कधीच अभ्यासला नव्हता...मग म्हटलं जाऊदे स्वतःच सुरूवात करू...मी सांगेल तशी तो कर्मचारी चिरफाड करत होता..आवश्यक त्या गोष्टी माझ्या वहीत मी टिपंत होतो...असं हे साधारण तासभर चाललं..नियमाप्रमाणे मी म्रुतदेहाचा viscera जतन करून पुढे पुण्याला पुढील तपासणीसाठी पाठविण्याची व्यवस्था केली..आणि आवरतं घेतलं..पोलीस चौकीप्रमुखाने पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था केली..त्याचे आभार मानून निघालो..घरी पोचतो तोच तालुकाप्रमुखाचा फोन...काय वाटतंय...?? म्हटलं प्रथमदर्शनी तर अॅसिड हल्ला वगैरे वाटंत नाहिये..decomposition changes होते ते आणि त्यामुळे पूर्ण शरीरावर blisters,रक्त साकळून तयार झालेले काळे डाग वगैरे होते...मग म्हणाला r u sure doctor ?? if u need ny help u can ask me..यावेळी मात्र मीच चिडून म्हटलं त्याला, सर मला गरज नाहिये..खात्री आहे..दोन तीन दिवसात रिपोर्ट जमा करतो..रात्रभर जागून सगळी जुनी पुराणी पुस्तकं चाळून रिपोर्ट तयार केला...बंंद लिफाफ्यातला तो रिपोर्ट दुसर्‍या दिवशी पोलिसांच्या ताब्यात दिला...मी माझा अहवाल दिलाय...पुण्याच्या तपासशाळेचा अहवाल आज पाच वर्षांनंतर अजूनही प्रतिक्षेत आहे...
                       तर मित्रांनो सांगायचा मुद्दा हा की आजही काही मोजकी मोठी वैद्यकीय महाविद्यालयं सोडली तर बहुतेक ठिकाणी शवविच्छेदनातील तज्ञ डाॅक्टरांची वानवाच आहे...पुरेशा सुविधा...म्रुतदेह संवर्धन केंद्रे,रासायनीक तपासणी केंद्रे फक्त आणि फक्त पुणे किंवा मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणीच ऊपलब्ध आहेत...त्यातून त्यांच्यावर पडणार्‍या बोजातून पाच पाच वर्षै त्यांचे अहवालंच पुरवले जात नाहीत....ऐकंदरीत काय तर शवविच्छेदनाचा अहवाल सदोष असू शकतो...ऐखाद्या गुन्हेगाराचं अथवा संपूर्ण केसचंच भवितव्य या अशा सदोष अहवालामुळे पूर्णतः बदलू शकतं....होणार्‍या विलंबाला किंवा चुकीच्या निर्णयांसाठी आपण पोलिस यंत्रणा,न्यायव्यवस्था यांनाच दोषी ठरवंत असतो पण या ईतर अज्ञात पण तितक्याच महत्वाच्या कारणांकडे मात्र सरकारपासून सगळ्यांचंच दुर्लक्ष झालंय....असौ ही व्यवस्था सुधरेल तेंव्हा सुधरेल...वाट बघण्याव्यतिरीक्त सध्यातरी आपण काहीच करू शकंत नाही...पुढे पदव्युत्तर अभ्यासासाठी रूजू होण्यानिमित्त सरकारी नोकरी सोडली...मी केलेलं हे पहिलं व शेवटचं शवविच्छेदन...कायमस्वरूपी अनुभवाच्या गाठोड्यात घर करून राहिलेलं....
                      

                                   -©-निरागस

Saturday, 1 July 2017

अडगळ

मानवी भावनांना,ईच्छा,आकांक्षा अन् ऊमेदीला..
ऐकरूप होऊ पहाणार्‍या मनांना दुभंगणारी जातीची अडगळ....


ईवल्याशा खांद्यांवर ईमारतीऐवढ्या पुस्तकांचं ओझं लादणारी..
कोवळ्या मुलांचं बालपण कोमेजून टाकणारी शिक्षणाची अडगळ....


पोटच्या पिलाच्या पंखातलं बळ कमी करणारी,त्याला स्वतःचं अस्तित्वंच  सापडू न देणारी..
प्रसंगी परावलंबी बनवणारी मायेची अडगळ....


हातात हात घालून भरचौकात मिरवणारी,सूर्य-चंद्राची भूरळ घालणारी..
खर्‍या-खोट्याचा आपसूक विसर पाडणारी,प्रेमाची अडगळ....
                                 -©- निरागस



Tuesday, 13 June 2017

मोरया

                       गणेशोत्सवाला साधारण चार पाच महिने शिल्लक राहिले, की आमच्या घरी तयारी चालू होतै...चर्चा चालू होते ,की यावेळी नेमकं वेगळं काय करायचं..?? कोणती मूर्ती आणायची वगैरे वगैरे..तसा मी अगदी अलिकडे म्हणजे चारऐक वर्षांपासून साजरा करतोय गणेशोत्सव...म्हणजे आधीदेखील करायचो पण घरी मूर्ती आणून वगैरे नाही...ईतरांच्या घरी आरतीला वगैरे जाणं..सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती बघायला जाणं..त्यांनी प्रयत्नपूर्वक बनवलेले देखावे बघणं...त्यातल्या चुका काढणं..ईथवरंच आमचं गणेशप्रेम सीमित होतं...पण आज जवळपास मागील चार - पाच वर्षात माझ्या विचार करण्यात..किंवा मानन्या न मानण्यात ईतका फरंक पडलाय,यावर माझांच कधीकधी विश्वास बसंत नाही...
                      ईतर अनैकविध देव असताना गणपतीच का...?? याचं खरंच काही विशिष्ठ ऊत्तर असेल असं वाटंत नाही मला..पण तरीही आठवून जर सांगायचंच म्हटलं तर...साधारंण चारेक वर्षांपूर्वी ,म्हणजे mbbs संपल्यावर, मी आयुष्याचा गांभीर्याने विचार करणं चालू केलं.. आयुष्य म्हणजे काय..?? देव खरंच अस्तित्वात असतो का..?? आईवडीलांचं आयुष्यातलं स्थान काय..?? माणसाचं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे ..?? वगैरे वगैरे...फार कमी लोकं होती त्यावेळी माझ्या आयुष्यात, ज्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकत होतो या सगळ्याबद्दल...अगदी घरीसुद्धा ईतकी मोकळीक नसायची..ऐकटं वाटायचं अगदीच..अशात मला हा भेटला..मजेशीर वाटायचाचं तो मला पहिल्यापासून..म्हणजे बघा ना माणसाचं धड आणि त्यावर हत्तीचं डोकं..आणि चक्क सोंड सुद्धा..बरं बाकी सगळे देव बघा कसे पीळदिर शरीरयष्टी असलेले..आणि या माझ्या गणूचं मात्र पोट बाहैर आलेलं..अगदी तुमच्या माझ्यासारखं..
                       अभ्यास करताना समोर याला आधी बसवायचो माझ्यासमोर अभ्यासाला...मग वाचायचो रात्रभर...खोड्या काढायचा माझ्या...सोंडेने गुदगुल्या करायचा मला..पण रात्रभर जागायचा माझ्यासोबंत, कोणतीही तक्रार न करता..कोणतं पुस्तंक वाचायचा.. ?? गणितं सोडवायचा की कोडी..? माहिती नाहि..मधैच पेंगायचा..भूक लागली की लोळायचा...ऐकंदरीत काय तर मी या माझ्या मित्राबरोबर मोकळेपणाने बोलू शकत होतो..माझ्या अडीअडचणी,खाजगी गोष्टी,आवडीनिवडी सगळं सगळं सांगायचो याला..आणि याचे कान आणि पोट ऐवढं मोठं, की हा सगळं ऐकून घ्यायचा आणि स्वतःकडेच ठेवायचा..ऐकंदरीत काय तर मला माझ्या आयुष्यभराचा सवंगडी मिळाला याच्यारूपाने..आणि मग दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे आमची मैत्री अशीच बहरंत गेली...आणि  ऐकेदिवशी मी घरी विषय काढला, की याला आपण वाजंत गाजंता घरी आणूयात का..?? वडिलांनी बजावून सांगितलं...गणपती म्हणजे ऊग्र,फार काळजी घ्यावी लागते..तुझाच्याने होणार असेल, तर तू कर..नाहीतर राहूदेत..मला ऐवढंच हवं होतं..मग मी पुढाकार घेतलाआणि पाच वर्षांपूर्वी आमच्या घरी रीतसर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली...
                       त्याला ही गोष्ट कळल्यावर रागावला माझ्यावर..म्हणाला मित्र ना आपण..?? मग ही असली थेरं कशाला..?? मी तुझा हात पकडून तुझ्या शेजारी बसतो रोज..गळ्यात गळा घालून आपण बागडतो ऐकत्र.. मग कशाला मला ऊगाच त्या पाटावर बसवतोस..?? त्या रंगीबेरंगी झालरी,सुवासिक ऊदबत्या,चौरंग यांमधे जीव घुटमळतो माझा..नको तो अत्याचार असं वाटतं..मलादेखील क्षणभर पटलं त्याचं..मग मी समोर बसवलं त्याला..दोन्ही हात हातात घेतले त्याचे आणि समजावलं त्याला..म्हटलं अरे तू ऐवढा मोठा प्रकांडपंडीत,सगळ्या जगाचा रक्षणकर्ता..आमची सगळ्यांची ऐवढी मदत करतोस...म्हणून या तुझ्या ऊपकारांतून ऊतराई होण्यासाठी म्हणून करतो रे आम्ही हे सगळं..तुला पटवून द्यायला..!! की मित्रा आम्ही तुला ग्रुहीत धरंत नाही...तु खरंच खूप महत्वाचा आहेस आमच्या सगळ्यांसाठी..आणि तुलारे काय झालंय..?? गोडगोड मोदंक मिळतात ना तुला खायला..?? मग..?? मोदकांचं नाव काढताचं हसला बिचारा...!!
                           नित्यनेमाने न चुकता दोन दिवस आधिच मी घरी पोचतो..घराची साफसफाई करण्यापासून ते रंगरंगोटी,देखावे सगळं सगळं स्वतः करायचा प्रयत्न करतो..नसेल जमंत ईतरांईतकं चांगलं..पण जसं आणि जितकं जमेल तितकं स्वतः करतो...त्याला घरी आणताना कसलं भारी वाटतं..खरंच..पाच दिवस तो घरी असला की घरातून पाय बाहेर निघंत नाही..रात्री हाॅलमधे त्याच्या समोरंच झोपतो चटई टाकून.. पणतीच्या मंद प्रकाशात त्याच्याकडे ऐकटक बघता बघता झोप कधी लागते कळंतच नाही..असं वाटतं की हे चिरकाल असंच चालू रहावं...संपूच नये कधि...मग असेच बघता बघता ते पाच दिवस संपतात आणि विसर्जनाचा दिवस ऊजाडतो...त्या दिवसाचा प्रत्यैक मिनिट खरंतर तासाऐवढा वाटतो...आता ही गंमत,हे आपलेपण,आईवडील,नातेवाईकांची गजबज सगळं सगळं संपणार...या विचारांनीच मुळी गहिवरून येतं...वडीलांची सकाळपासूनंच घाई सुरू होते..लवकर जाऊयात .!! नंतर गर्दी होईल म्हणून...पण माझं मनंच तयार होत नाहि..शक्य तितका वेळ विसर्जन लांबवण्याचा निष्पाप प्रयत्न मी करतो..पण त्यालासुद्धा जायचीच घाई झालेली असते...त्याला पाण्यात बुडवताना मला मात्र गुदमरल्यासारखं होतं...चुकल्यासारखं वाटतं आणि जड पावलांनी मी माघारी फिरतो...
                     काय बोलायचं या माझ्या मित्राबद्दल...माझ्या प्रत्येक अडीअडचणीत माझ्या हाताला घट्ट पकडून माझ्याबरोबर तो सदैव ऊभा असतो...रस्ता पार करताना माझ्याबरोबर गर्दीत चालतो,भूक लागली की भरवतो मला,रडू आलं की घट्ट मिठी मारतो...देव असतो की नाही मला खरंच माहिती नाही...त्या वादातदेखील मला पडायचं नाही..माझ्यासाठी हाच माझा देव..हीच माझी श्रद्धा आणि हाच माझा आत्मा...!!


                                 -©- निरागस

Saturday, 3 June 2017

पहिला पाऊस...

" पहिला पाऊस असतोच खास..

तो येतोच मुळी कुणाचितरी आठवण करून द्यायला..
गालांवर पडून मातीत घरंगळायला...

पहिला पाऊस असतोच खास...

तो येतोच मुळी तुम्हा आम्हाला लहान करायला..
बालपणीच्या आठवणीत मनसोक्त डुंबवायला...

पहिला पाऊस असतोच खास...

तो येतोच मुळी धरित्रीची त्रुष्णा भागवायला..
डोळ्यांतून ठिबकणारी शैतकर्‍याची आसवं लपवायला..

पहिला पाऊस असतोच खास...

तो येतो तुमच्या क्रुत्रीम आयुष्याला सजीव बनवायला..
तुमच्यातला हरवलेल्या माणसाला जागं करायला..."
                            

                                -©-निरागस


Sunday, 7 May 2017

जय जवान

"               न रहावून मी विचारलं,तुम्ही पहारा देत असताना भूकंप झाला,अथवा शत्रुसैन्याचं आक्रमण झालं.समोर हजारोंच्या संख्येनै शत्रू आणि त्यांच्यासमोर मात्र तुम्ही ऐकटेच आहात,मदतीला आसपास कुणीच नाही..काय कराल..?? काही नाही सर,माघार घेणं शिकवलंच नाही कुणी आजवर,शेवटच्या श्वासापर्यंत लढणार..!!..जीव देणार..!! पण दिलैली जबाबदारी पार पाडणार..!! ,कागल तालुक्यातले माझे मित्र बोलत होते..
                   ईथे आम्ही रात्री जागून lpl बघत असताना,पहिला बाहुबली चांगला होता की दुसरा यावर चर्चा करत असताना,अफजल गुरूची फाशी योग्य अथवा अयोग्य यावर वाद घालत असताना,आमचं हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कुणीतरी आपल्या घरापासून,बायका पोरांपासून ,दूर तिकडे सीमेवर डोळ्यात तेल घालून आमचं रक्षण करत असतो..आणि आम्हाला याची खरंच चाड नसते..कारण आम्ही निर्लज्ज,गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत..हे स्वातंत्र्य आम्ही आमचा जन्मजात अधिकार म्हणून मिरवतो पण त्याचा मोबदला मात्र देण्यास आम्ही तयार नसतो...कारण आमचं दैशप्रेम १५ आॅगस्ट,२६ जानेवारीला जिलेबी खाण्यापुरतंच मर्यादित असतं..वर्षातून दोन दिवस भारत माता की जय म्हणायचं.,पाच वर्षातून एकदा मतदान करायचं की झालो मोकळे भाषास्वातंत्र्य,व्यक्तीस्वातंत्र्य मिरवायला....
                   परवा ऐका जवानाचा video बघितला,रात्रंदिवस जागून आपलं कर्तव्य बजावणार्‍या या आपल्या जवानांना जेवणाच्या नावाखाली काय दिलं जातं याचा भांडाफोड केलेला त्यानै...नंतर सगळी सारवासारव..जवानाला मानसिक रूग्ण वगैरे ठरवून सैन्यातून कमी केलं वगैरे असं ऐकलं...सुट्टीसाठी घरी जाणार्‍या आमच्या जवानाला आम्ही रेल्वैत बसण्यासाठी जागा देऊ शकत नाही...ईतके निर्ढावलोय आम्ही..आणि  ही सगळी जवान मंडळी ,काही मोजके अपवाद वगळता छोट्या गावांमधून,सरकारी शाळांमधून ईथवर पोचलेले असतात..आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आमच्या सरकारी शाळा  जर असे शूरवीर,देशासाठी लढणारे लढवय्ये जवान तयार करणार असतील..तर मग मुंबई,दिल्लीतल्या ऊंच ईमारती,युनिवर्सिटीमधून मात्र काश्मीरच्या स्वायत्ततेची चाड असणारे,भाषास्वातंत्र्याच्या नावाखाली देशाच्या अखंडतेला तडा पोचवणारे विचारवंत कसे तयार होतात..??
                      मग रोज कुठून ना कुठून बातम्या येत राहतात,काश्मीर,सुकुमामधे आमचे जवान धारातिर्थी पडतात..क्षणभर आमचे डोळे पाणावतात..गावात अंत्यदर्शनाला आम्ही झुंडीने ऊपस्थित राहतो..देशभक्तीपर गाणी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात लावून आम्ही स्वतःच बधीर होऊन जातो..ही झिंग ऐक-दोन आठवडे टिकतेदेखील..पण त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या..निव्रुत्त जवानांना याच देशात आपल्या हक्कांसाठी आंदोलनं करावी लागतात,शहीदांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनांच्या,हक्कांच्या पूर्ततेसाठी वर्षानुवर्षै सरकारदरबारी खेटे मारावे लागतात...ऐन ऊमेदीची,तारूण्याची ती २५-३० वर्षै देशासाठी खर्च करून परत गावी आल्यावर मात्र याच जवानांना कधी नव्हे ईतका भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो..याच लोकांसाठी,याच देशासाठी जीव धोक्यात घालत होतो का..?? असं तर वाटंत नसेल ना त्यांना..??
                  स्वप्न फक्त तुमची आमचीच असतात का...?? स्वतःच्या पोराला पायावर ऊभं राहताना बघायचं नसतं का त्यांना..?? आईच्या हातचं चांगलं खाणं,चांगले चित्रपट पाहणं,मित्रांसोबत वेळ घालवणं आवडंत असेल ना त्यांनासुद्धा..?? पण तरीही या सर्व प्रलोभनांपासून दूर कुठेतरी सीमेवर लेकरांची चिंता न करता देशासाठी झोकून देणारी ही तरणीबांड पोरं बघितली, की वाटतं हे खरं प्रेम...कशाचीही अपेक्षा न ठेवणारं,कसलीही तमा न बाळगणारं..कोणत्याही क्षणिक सुखांना बळी न पडणारं निर्व्याज परमोच्च प्रेम...
                      मूठभर लोकांनी देशासाठी जीवावर ऊदार होऊन झटायचं आणि ईतरांनी मात्र भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुंबड्या भरायच्या,देशाच्या अखंडतेला धक्का पोचेल असं वागायचं..हे कुठवर असं चालणार..?? जोवर या देशातला प्रत्येक माणूस स्वतःआगोदर देशाचा विचार करत नाही..स्वतःची संपूर्ण ताकद देशामागे ऊभी करत नाहीत, तोवर काही या देशाची ऊन्नती होणार नाही..ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ..!! "


( तळटीप - सुकुमा मधल्या घटनेनंतर,अचानक या मित्राचा msg आला,की सर आम्ही किड्यामुंग्यांसारखे मरतो..कुणीच दखल घेत नाही,,दोन तीन दिवसांवर कुणाच्याच लक्षात राहत नाही आम्ही..तुम्ही लिहा काहितरी यावर...खरंतर मी व्यक्तिचित्रण लिहिणार होतो..पण मग सैन्यामधे असेपर्यंत अशी ओळखदेखील दाखवू शकत नाहि जाहिररीत्या ..मित्रा तुझ्यासाठी माझे शब्दंच काय, मी स्वतःला गहाण ठेवायला तयार आहे...तुम्ही सगळेजण आहात म्हणून आम्ही आहोत,भारत आहै..ईतरांना मला ऐवढंच सांगायचंय,पडद्यावर दहा गुंडांना खोटंनाटं लोळवणारा आपला हिरो असू शकतो,करोडो रूपयांसाठी खेळणारा खेळाडू आपला हिरो असू शकतो, तर आपल्या देशासाठी आपल्या सगळ्यांसाठी, स्वतःच्या ऊमेदीची ऐशी तैशी करणारे आपले जवान  आपले हिरो का असू शकत नाहीत..??त्यांच्यावर आपण आपला जीव का ऊधळू शकत नाही...?? विचार करण्यासारखी गोष्ट आहे..नाही का ..?? ) "
                                - ©- निरागस

Sunday, 16 April 2017

अन् मान शरमेने खाली जाते

" दिवाळीचे दिवस असतात,घराघरांत फराळाची देवाणघेवाण सुरू असते..घरी आलेल्या आपल्या मित्रमैत्रीणींना,दूरच्या नातेवाईकांना फराळ खाऊ घालण्यात आपण व्यस्त असतो..ईतक्यात दारावरची बेल वाजते..कोण आलंय आत्ता ईतक्यात ?? असं म्हणून आपण दारावरच्या छिद्रातून डोकावून बघतो..रोजचं घरकाम करायला आलेली कामवाली मावशी दरवाजावर असते...दरवाजा ऊघडण्याआगोदर आपण घाईगडबडीने फराळाचे डबे बंद करतो..धावतपळत सगळैचजण स्वयंपाकघरात जातो...सगळं आवरून दरवाजा ऊघडतो , तर मावशी फार कौतुकाने घरून आणलेला फराळाचा डबा ऊघडून समोर धरतै....

अन् मान शरमेने खाली जाते...!!

घाईगडबडीत आॅफीसला जाता जाता बुटाला पाॅलीश करायचं राहून जातं..म्हणून रेल्वेस्थानकाजवळच्या फाटके कपडे घातलेल्या पोर्‍यासमोर आपण आपला पाय सरकावतो..तो पाॅलीश करत असतानाच, आता याला पाच रूपये सुट्टे कुठून द्यायचे..?? छे..!! आता गेली दहाची नोट..याचंच दुःख आपल्याला जास्त असतं..पाॅलीश संपल्यावर काहीसं निराश मनानेच आपण खिशात हात घालतो..आपली अडचण समजून तोच पोर्‍या समोरून आपल्याला म्हणतो,साहेब सुट्टे नसतील तर पुढील वेळी द्या....!! त्याचे ते शब्द कानात शिसंं ओतल्यासारखे आरपार खोलवर रूततात.

अन् मान शरमेने खाली जाते...!!

बापाबरोबर फिरायला म्हणून आपण घराबाहेर पडतो...चौकात आॅफिसातले चार ऊच्चभ्रू मित्र-मैत्रिणी आपल्याला भेटतात... कमी शिकलेल्या,पंचा नेसलेल्या आपल्या बापाची ओळख कशी करून द्यावी..?? या विवंचनेत आपण चार पावलं पुढे जाऊन, बापाकडे पाठ करून मित्रांशी बोलू लागतो..आपली झालेली ही पंचायत ओळखून..बाप आपल्या खिशातला रूमाल काढून आपल्याकडे येत म्हणतो,डाॅक्टरसाहेब हा तुमचा रूमाल खाली मातीत पडला होता...धन्यवाद ऐकायलादेखील न थांबता ,तो तडक तसाच पुढे निघून जातो...

अन् मान शरमेने खाली जाते...!!

बसची वाट बघंत आपण झाडाखाली ऊभे असतो.फोनवर बायकोशी बोलणं सुरू असतं..दोघेही आपापल्या नोकर्‍यांमधे व्यस्त असल्याने छोट्या लेकराला,पोटच्या गोळ्याला वसतिग्रुहात ठेवण्यासंबंधी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असते..अशीच बोलता बोलता नजर भिरभिरंत दूरवरच्या वीटभट्टीवर काम करणार्‍या माऊलीवर जाते..कापडात गुंडाळून पाठीला लटकावलेलं तिचं तान्हं मूल दिसतं..हातातला मोबाईल गळून पडतो..

अन् मान शरमेने खाली जाते...!!

निवडणुकीसाठी म्हणून सरकारने सोमवारची सुट्टी जाहीर केलेली असते..शनिवारची जादा सुट्टी घेऊन तीन दिवस आपण सहपरिवार फिरायला म्हणून जातो..सोमवारी परत येताना चौकातल्या शाळेसमोर , ऐंशी वर्षांचा लखवा मारलेला म्हातारा खुर्चीवर बसून मत टाकण्यासाठी रांगेत ऊभा असलेला आपल्याला दिसतो..आपण मागे वळून बायकोकडे बघतो..तीही नजर चुकवते..

अन् मान शरमेने खाली जाते...!!

ढाब्यावर जेवणासाठी म्हणून आपण गाडी थांबवतो..हात धुवून जेवण सुरू करणार ईतक्यात भूकेने व्याकूळ झालेला भिकारी, फार आशेने हात पुढे करतो..आपण रागाने शिव्यांची लाखोली वाहून त्याला हुसकावून लावतो..जेवण संपवून ऊरलेलं अन्न आपण शहाण्यासारखं कचरापेटीत टाकतो..बील भरून गाडीत बसताना , ऊगाच आपली नजर जाते..तोच भिकारी आपण फेकलेलं ऊष्टं अन्न कचरापेटीत हात घालून शोधून शोधून खात असतो...डोकं सुन्न होतं..

अन् मान शरमेने खाली जाते...!!

नुकतांच आपला वाढदिवस होऊन गेलेला असतो..परिस्थिती नसताना बापाकडे हट्ट करून,रडून,रूसून आपण चार-पाच हजार वसूल करतो, मित्रांना चांगल्या हाॅटेलात पार्टी देतो..मित्रांची वाहवा मिळवून घरी येऊन पायातले मोजे काढंत असतो , तर बाप नवीन साबणाच्या मागील बाजूस ,जुना अर्धवंट संपलेला साबण चिकटंवत असतो..स्वतःःचीच स्वतःःला लाज वाटू लागते..

अन् मान शरमेने खाली जाते...!!


( ता.क. - असे कित्येक हजारो अनुभव रोज आपल्याला येत असतात..माणूस म्हणून सम्रुद्घ करून जात असतात..आयुष्य म्हणजे शेवटी काय आहै..?? ते शिकवंत असतात...)
                                   

                                    -©- निरागस


Sunday, 9 April 2017

जगावेगळा मास्तर

                     "          शाळेतला पहिला दिवस आठवतो काहो तुम्हाला..??,, हो, बालवाडीतला पहिला दिवस..ऊलट्या पायांनी चालत गेलेलो आपण सगळैचजण..रडतरडत..क्षणभरासाठी वाटूनदेखील गेलं मनात, की आई-बाबांना ईतके नकोसे झालोत का आपण.??.तुमच्यापैकी काही विसरलेदेखील असतील हे सगळं, पण मी नाही विसरू शकत...कारण माझ्या मास्तरसारखा हरहुन्नरी मास्तर सगळ्यांच्या नशीबात असूच शकत नाही...
                              माझं बालपण चिपळूण जवळच्या एका खेड्यात गेलं..घरची परिस्थिती सामान्य होती...म्हणजे मुबलक जेवण मिळायचं,अंगभर घालायला कपडे मिळायचे आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासाबाबतीत कोणतीही तडजोड नसायची..सांगायचं कारण असं, की माझ्या शाळेतल्या निम्याहून अधिक मुलांना दोनवेळचं जेवण मिळायची भ्रांत असायची..कुणीतरी राजकारणी निवडणुकीच्या मुहुर्ताला पाच वर्षांतून कधीतरी गणवेशाचं वाटप करायचा...मग पुढील पाच वर्षै चिंध्या झाल्या तरी मुलांना घरातून नवीन गणवेश मिळायचे नाहीत...पण तिथे श्रीमंत गरीब असा भेदभाव नव्हताच मुळी कधी..सगळ्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतंच जायची...हो खरंच..आमच्या गावात आजही ते काय म्हणतात ना junior kg,senior kg हे असले फाजील लाड पसरलेले नाहीत...
                            असो,तर पहिल्या दिवशी माझा बाप मला सोडायला आलेला शाळैत..शाळेच्या आवारात गेलो तर संपूर्ण शाळा शेणाने सारवण्याचा कार्यक्रम चालू होता...टोकदार नाकाचा,घार्‍या डोळ्यांचा, विजार मांडीपर्यंत दुमडलेला एक अनोळखी माणूस हातात खराटा घेऊन मुलांचं नेत्रुत्व करत होता..बाप जवळ जाऊन विचारता झाला..,अमुक अमुक गुरूजी कुठे भेटतील..??,हातातला खराटा बाजूला टाकत, विजार खाली घेत तो माणूस ऊत्तरला,बोला मीच...!! बापाचा लगेच पुढचा प्रश्न.., मुलांना असं कामाला जुंपणं सरकारदरबारी मान्य आहे का..?? साहेब ..!! पोरं स्वतःचं घर समजून करताहेत काम..स्वतःच्या घराची निगा राखणं चुकीचं असतं का कधी..?? बापाचा विश्वास बसला शाळा कशीही असूदे मास्तर अवलिया आहे..आणि बाप माझा हात सोडून घराकडे चालायला लागला..
                           पहिले काही दिवस केवळ रडण्यात गेले..नंतर मात्र ओळखी झाल्या,मित्र,मैत्रिणी झाले..मास्तरशी परिचय झाला आणि मनातली भीती दूर झाली..पहिली ते चौथी चार ईयत्तांना मिळून ऐक मास्तर..विश्वास नाही बसंत..?? पण खरंच...चारही ईयत्तांना तो ऐकटाच शिकवायचा...मध्यभागी स्वतः बसायचा आणि सभोवताली विद्यार्थ्यांना बसवायचा..तल्लीन होऊन शिकवायचा...पोरांना जीव लावायचा..पार जीव ओतून द्यायचा प्रत्येक गोष्टीत..ऐखादी गोष्ट केवळ करायची म्हणून कधीच केली नाही त्याने...दहाची शाळा असायची पण मास्तर आठ वाजताच हजर.., दहा किलोमीटर चालंत यायचा.., सायकल ढकलंत ढकलंत आणायचा पण चालवायला कधीच वर बसला नाही..चालवायची नसते तर आणायचा कशाला ?? आज प्रश्न पडतो मला..तेंव्हा मनात आला असता प्रश्न,तर कदाचित ऊत्तर मिळालं असतं..सायकलला डबा बांधला की निघाला मास्तर..
                           ईतिहास शिकवण्यात मास्तरचा हातखंडा,प्रसंग असे काही वर्णन करून शिकवायचा की  वाटायचं  ऊचलावी तलवार आणि जावं पावनखिंड लढवायला...तो काही फार मोठा ग्रेट शिक्षक म्हणून माझ्या लक्षात नाही..पण तो एक आगळावेगळा,कलंदर,जगावेगळा आणि अदभुत माणूस म्हणून माझ्या लक्षात आहे...शाळैतल्या प्रत्येक पोरावर मास्तरचा विलक्षण जीव..शाळा आणि शाळैतली मुलं यापलिकडे त्याचं जगंच नव्हतं मुळी दुसरं..एखादा मुलगा दोन- तीन दिवस शाळेत नाही आला की मास्तर चौकशी करायला घरी पोचायचा...शाळैचा पट कमी होऊ नये यापेक्षा गावातल्या गरीबांच्या मुलांनी शिकावं यावर त्याची भिस्त जास्त असायची...
                             ऐकदा विज्ञान मेळाव्यात भाग घ्यायला घेऊन गेला जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हा दोघा-तिघांना..काहिबाही करून घेतलेलं आमच्याकडून त्यानं त्याला जमेल तसं..त्याच्या बुद्धीला पटेल तसं...जिल्ह्याचा सरडा येऊन आमची थट्टा करून निघून गेला...आम्ही तिसरी चौथीतली नाकाचा शेंबूड  पुसता न येणारी पोरं काय बोलणार..?? हसं झालं आमचं..मास्तर दूरूनंच पहात होता...पण आज तो काहीतरी वेगळं करणार याची मला आतून चाहूल लागली होती...त्याच्या कपाळावरची धमणी कधी नव्हे ती धडाधडा ऊडंत होती..बक्षिस समारंभ सूरू झाला..बक्षिस वाटपानंतर मास्तर ऊभा राहिला, मला बोलायचंय म्हणाला ऊपस्थित असलेल्या सगळ्यांशी...आणि परवानगी घेऊन बोलायला ऊभा राहिला...आणि काही बोलायच्या आतंच रडायला लागला...मग रडू आवरंत कठोर शब्दात म्हणाला..शाब्बास..!! व्वा काय प्रोत्साहन दिलंय मुलांना...याचा त्यांना त्यांच्या ऊर्वर्रीत आयुष्यात झालाच तर फायदाच होईल...मी ईतिहासाचा शिक्षक आहै,मला नाही कळंत विज्ञानातलं फारसं..सरकारकडून एक छदाम मिळालेला नाहिये आम्हाला मदत म्हणून.. स्वतःची पदरमोड करून घेऊन आलो ईथवर यांना ..जिंकायला नव्हे तर तुमच्यासारखी कागदी माणसं दाखवायला..!! मग आमच्या तिघांकडे बघून म्हणाला,बाळांनो ही अशी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतील,टोचून बोलतील,अपमान करतील ,तेंव्हा हरून जाऊ नका...माझी आठवण काढा, डोळे बंद करा व पुढे चालंत रहा..रस्ता संपत नाही तोवर चालत रहा..!! आवाज ऐकू येत नाही तोवर चालू रहा..!! चालून चालून छाती फुटत नाही तोवर चालत रहा...त्या तिघांपैकी ऐक अवेळीच वारला काहीसा आजार होऊन,दुसरा चिपळूणातल्याच एका मोठाल्या हाॅटेलात भांडी घासायचं काम करतो आणि तिसरा मी आज डाॅक्टर झालोय...
                       नंतर शाळा सुटली तशा भेटीगाठी कमी झाल्या...पण रस्त्यात भेटला की आवर्जून थांबायचा..विचारपूस करायचा..पोरांनो परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही पण तुम्ही मात्र भरपेट शिका..!! सांगायला विसरायचा नाही अजिबात...मग घरापासून लांब कोल्हापूरला आलो mbbs च्या शिक्षणासाठी..मास्तर कुठेसा आजारी होता त्या दरम्यान, सुट्टीवर होता...घरी निरोप ठेवला...आठवणीत होता ,पण भेटीगाठी पूर्णतः थांबल्या होत्या...मग ऐकेदिवशी  मास्तर थेट माझ्या काॅलेजच्या वाचनालयात आला...विचारत विचारत..मला मित्राने फोनवर सांगितलं तुला शोधतंय कुणीतरी..त्याने केलेल्या वर्णनावरून पक्क माहिती पडलं मास्तरंच असणार...!!! अंगावरल्या कपड्यांनिशी जसा होतो तसा धावंत आलो..बघतोय तर मास्तर आंब्याच्या झाडाखाली कापंड पसरवून झोपला होता...घोरत होता..बसलो तिथेच त्याच्या पायाशी तासभर...नाही ऊठवलं...माहिती नव्हतं शेवटचा कधी झोपला असेल ईतका निवांत...त्याचाच पाय लागला मला आणि तो दचकून जागा झाला...दोघांचेही डोळे पाणावले...मी विचारलं मास्तर ईकडे कसं काय..?? तर म्हणाला माझ्या गुरूंकडे न्यायचंय तुला...मला काहीच कळेना...मला घेऊन गेला कुठल्याशा खेडेगावात त्याच्या गुरूंकडे...त्यांच्या हस्ते सत्कार केला माझा..मग त्या दोघांच्या अध्यात्मावरल्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या...मला काहीचं कळंत नव्हतं..मी केवळ मास्तरकडे ऐकटक बघत होतो..अधूनमधून डोळ्यांतल्या अश्रूंना वाट करून देत होतो..
                      डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं..नसेल माझी शाळा माझ्या ईतर मित्रांच्या शाळेऐवढी मोठी..,हो मी शिकलोय शेणाने सारवलेल्या, डोक्यावर पत्रे घातलेल्या शाळेत...पण हे जे काही मी मिळंवलंय ते अद्वितीय आहै...तुमच्या लाखो रूपये डोनेशन घेणार्‍या शाळांमधे हे प्रेम,ही आपुलकी असूचं शकत नाही...माणूस म्हणून घडलोय मी ईथे...आयुष्य काय असतं...ते ईथे ऊमजलंय मला...आजही मास्तरचा मधेच फोन येतो...ऐकायला कमी येतं त्याला आजकाल...पण मनात काळजी असते, आपला विद्यार्थी ठीक तर आहे ना...?? कुठे सापडतात हे असे शिक्षक..?? ही असली मोह,मत्सर,लोभ न शिवलेली माणसं..?? सांगा ना..!!..काय करायचं ह्यांचं.?? कसं सांभाळून ठेवायचं यांना..?? बंदिस्त काडेपेटीच्या डब्यात कोंडलेल्या मुंगळ्यासारखं आयुष्य जगणारे आपण या अशा अद्भुत माणसांकडून काहीतरी शिकणार आहोत का...?? "
                    

                                   -©- निरागस

           

Wednesday, 5 April 2017

मानवी मनाचा क्षुद्रपणा

"   बर्‍याच दिवसांपासून डोक्यात होता विषय.,विषय म्हणजे अनुभवंच म्हणा की..!! बर्‍याच म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी आठ नऊ वर्षै..आज नको, ही योग्य वेळ नाही,ऊद्या बोलू .!! करत करत ईतके दिवस वाया गेले..का तर मित्रांना काय वाटेल..?? तुटणार तर नाहीत ना ?? वगैरे वगैरे...पण हल्ली मनावरंच घेतलंय मी तसं..जे ईतर कुणीही बोलत नाहीत, ते आपण बोलायचं...सगळ्यांच्या फाटक्यात पाय घालायचा..दररोज , दिवसभर वेड्यासारखं वागायचं...लोकं काय म्हणतील ?? ,दुखावली तर जाणार नाहीत ना..?? यासारख्या तकलादू प्रश्नांना मूठमाती द्यायची..आणि म्हणून लिहितोय यावर..
                   बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती..बापाची ईच्छा होती पोराने डाॅक्टरंच व्हावं..आणि मला जे आयुष्यात करायचंय त्यातून माझ्या पोटापाण्याची काही सोय होईल असं मलाही वाटंत नव्हतं ,म्हणून मग आधी डाॅक्टर होऊ नंतर आपलं काय ते करू, या निर्धाराने मुंबईत दाखल झालो...मुंबईत विले-पार्लै भागात महिना दोन महिने बापाने राहण्याची सोय केली होती..आता खरी गोष्ट सुरू..सोसायटीमधे बहुतांश नव्हे तर सगळैच ब्राह्मण...खोली भाड्याने देतानाच बजावण्यात आलं होतं मांस,मासे घरात आणून खाल्लेले चालणार नाहीत वगैरे वगैरे..मीही अभ्यासासाठी आल्याने या क्षुल्लक अटी मान्य केल्या आणि अभ्यासाला सुरूवात झाली...mbbs ला प्रवेश मिळवायचा याच ईर्षैने अभ्यास सुरू झाला...
                        शेजारी कोण राहतं कळायला पंधरा-वीस दिवस गेले..दोन शेजारी लाभलेले...ऐक महाप्रौढी आणि दुसरा तितकाच समंजस...आणि या दोघांमधे राहणारा,घरातून पहिल्यांदा बाहेर राहणारा, सतरा अठरा वर्षांचा मी..घरी आईने जशा चांगल्या सवयी लावल्या, तशा वाईट सवईदेखील जडवल्या..जसं आजही मला जेवण नावाचा प्रकार बनवता येत नाही...maggy बनवण्यापुरतंदैखील पाककौशल्य आमच्यात नाही...कपड्यांना ईस्त्री करतो कशीबशी पण त्यांची घडी घालता येत नाही वगैरे वगैरै..आलं असेल लक्षात तुमच्या...तर अशा या माझा अभ्यास करत करत ईतर गोष्टी करतानाचा संघर्ष शेजारच्या काकूंच्या लक्षात आला..तू आमच्याकडे जेवायला येत जा..!! असं त्यांनी मला स्वतःहून बजावलं...मी नको म्हटल्यावर म्हणाल्या डब्याचे पैसे आम्हाला देत जा हवं तर..!! जर तुला पटंत नसेल तर..मग मीदेखील विचार केला..घरचं जेवण मिळणार असेल तर काय वाईट आहै..आणि हळू हळू जेवणासकट,कपडे धुणे,ईस्त्री वगैरे वगैरे माझ्या गरजेच्या सार्‍या गोष्टी त्या काकू करू लागल्या...त्याचा मोबदलादेखील घेत होत्या...एकंदरीत कसं छान सुरू होतं...
                  मग अचानक ऐके दिवशी त्यांनी बोलावून सांगितलं..की ऊद्यापासून जेवण वगैरे देता येणार नाही तुला...मला काही कळायला मार्ग नाही..न रहावून मी विचारलं माझं काही चुकलं का...?? त्या काही न बोलताचं निघून गेल्या...दोनैक दिवसानंतर त्यांच्या मुलाकडून मला कळलं ,की मी ब्राह्मण नसल्यामुळे त्यांनी माझे कपडे धुवू नयेत किंवा माझी ईतर कामे करू नयेत वगैरे  त्यांना सोसायटीतल्या लोकांकडून बजावण्यात आलं होतं..आणि यावर चक्क चर्चा होत होती सोसायटीमधै..किती बिनडोक लोकं असू शकतात नाही का..?? .क्षणभर डोकं सुन्न झालं..रडावसं वाटलं..जातीभेदाबद्दल ऐकलं होतं,वाचलं होतं पण तो अनुभवला नव्हता ,कधीच...कधी विचारदैखील केला नव्हता की हे असं ईतकं भयंकरपणे आजही रूजवलं आणि पोसलं जातंय...सोसायटीत काहीही कार्यक्रम असेल तर मला सोडून सगळ्यांना बोलावलं जायचं...हातात दिलेल्या निमंत्रण पत्रिका मी ब्राह्मण नाहिये म्हटल्यावर काढून घेतल्या जायच्या...या व अशा अनेक गोष्टी...
                   आत्ता हिंमत करावी कुणी,दात घशात घालीन..पण तेंव्हा लहान होतो...फार विचित्र वाटायचं...आपल्यासारखीच दिसणारी  पण आपल्यातली नसणारी माणसं,पदोपदी त्यांच्या तुच्छतापूर्ण नजरा, पचवणं किती अवघड होतं त्याकाळी..मग काही दिवसांनी शेजारच्या काकूंच्या मनाला पुन्हा पाझर फुटला आणि त्यांनी पुन्हा जेवणासाठी विचारलं..पण यावेळी मात्र मी साफ नकार दिला...स्वतःचे कपडे स्वतः धुवायला,ईस्त्री करायला लागलो...जेवणासाठी बाहैर खाणावळ बघितली...आणि अभ्यास केला..स्वतःचं अस्तित्व सिद्ध  करण्याच्या ईर्षैनै..
                        गणरायाच्या क्रुपेने आज डाॅक्टर आहै..पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे वैचारीक गोष्टींवर बोलू अथवा विचार करू शकतो..मी जात पात मानत नाही..धादांत खोटं आहे हे...मूठभर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी बहुतांश लोकांना वेठीस धरण्याचा त्यांच्या ईच्छा,आकांक्षा दडपण्याचाच हा प्रकार आहै..तसा मी खुल्या प्रवर्गात मोडतो...मलाच जर या गोष्टींचा ईतका त्रास सहन करावा लागत असेल तर वर्षानुवर्षै वाळीत टाकलैल्या,मंदिरात देवाचं दर्शन,विहिरीत पिण्याचं पाणी नाकारलं गेलेल्या माझ्या ईतर बांधवांचं दुःख आपण कधीतरी समजून घेऊ शकतो का..??आजच्या भारतात जातीयवाद नाही असं म्हणणारे ऐकतर गाढव आहैत किंवा अज्ञानी आहेत...आणि यात केवळ ऐकाच समाजाला दोष देण्यात अर्थ नाही...मराठ्यांचे आरक्षणासाठी निघणारे मोर्चै,त्याला प्रत्युत्तर म्हणून निघणारे दलितांचे मोर्चै हेदेखील तितकेच जातीयवादी आहेत...माझ्या संदर्भात म्हणाल तर मला कमीपणा दाखवणारे जसे ब्राह्मण होते तसेच किंवा त्याहून अधिक ब्राह्मण केवळ माझी गैरसोय न व्हावी म्हणून मला स्वतःच्या घरी जेवायला वाढणारे होते..मूठभर नालायक लोकांच्या अनुभवावरून संपूर्ण समाजाला दोषी ठरवायचं, की चांगल्या लोकांकडे अधिक लक्ष देऊन चांगल्या प्रव्रुत्ती अधिकाधिक पुढे न्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न...!! "
( तळटीप - ब्राह्मण्यवादाला विरोध आहे,ब्राह्मणांना मुळीच विरोध नाहि )
   
                           -©- निरागस