Wednesday, 5 December 2018

मरम्मत मुकद्दर की करदो मौला

"                            परवा रविवारी मित्राचे नातेवाईक रूमवर आल्याने कंटाळून रुमबाहेर पडलो,पण जायचं कुठे...?? थोडाथोडका नव्हे तर दोनेक तास वेळ वाया घालवायचा होता...मग काय ईथल्याच जवळच्या ऐका हनुमान मंदिरात जाऊयात म्हटलं...मंदिराबद्दल ऐकून होतोच,पण वर्ष दीडवर्षात कधीच जाणं झालं नव्हतं...म्हणून मग म्हटलं चला आज जाऊयात बजरंगबलीच्या दर्शनाला...मंदिरात जाऊन दर्शन घेतलं व नंतर तिथल्याच ऐका पारावर जाऊन बसलो...
                               हळूहळू लोकं जमा होत गेली आणि पारावर माझ्या अवतीभोवती आठ-दहा वयोव्रुद्ध लोकांचा घोळका जमला...छान हास्यकल्लोळ सुरू होता..माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने मीही मग खिशातील HeadPhone काढून त्यावर गाणी वगैरे ऐकत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला...मग त्यांच्यातल्या ऐकाने सगळ्यांसाठी चहा मागवला,चहाचं निमित्त झालं आणि मी चहा पीत नाही हे सांगायला म्हणून मी कानातले HeadPhone काढले...
                               तर त्या घोळक्यातले सगळ्यांची फिरकी घेणारे राणे नावाचे ऐक सद्ग्रस्थ अलगद माझ्याशेजारी येऊन बसले आणि त्यांनी माझी विचारपूस केली...कुठून आहात..?? नाव काय...?? अरे वाह,डाॅक्टर असून मंदिरात कसे...?? तेही ईतका वेळ वगैरे वगैरे शंभर प्रश्न त्यांनी मला विचारले..मीही केवळ हसून सगळ्या प्रश्नांना निव्वळ टाळायचा प्रयत्न केला...मी सहसा कुण्या अनोळख्या माणसाबरोबर ऊगाच आपलं ज्ञान पाजळायला जात नाही,पण ईथे समोरूनच प्रश्नांचा ऐवढा भडिमार होता की दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता...
                              मग त्यांनी स्वतःची ओळंख करून दिली...मी कणकवलीचा,राणे...म्हणजे ९६ कुळी मराठा...पूर्वाश्रमीच्या सो काॅल्ड " राणा " घराण्यातील वगैरे वगैरे जाहीरातबाजी त्यामागून आपसुकंच आली..तोंडातून निघणार्‍या प्रत्येक शब्दातून स्वतःच्या जातीबद्दलचा अहंकार ऊसासे घेऊन बाहेर पडंत होता...माझ्यापुढे ऐकण्याचं ढोंग करण्यावाचून काहीऐक पर्याय शिल्लक नव्हता..आणि खरं विचाराल तर मला या अशा नतद्रष्ट लोकांच्या मनातील भावविष्व जाणून घ्यायला खरंच खूप आवडतं...कुणाच्या मनात काय चुकीचं चाललंय ..?? हे माहिती झाल्याशिवाय त्यावर ऊपाय तरी कसा शोधून काढणार...??
                            मग आम्ही आजवर आमचं खानदान कसं प्युअर ठेवलंय...आत्ता नुकताच आमच्या ऐका दूरच्या पाहुण्याने आंतरजातीय विवाह करुन आम्हा सर्वांचं नाव कसं धुळीस मिळवलं आणि आम्ही सर्वांनी त्याला समाजातून बहिष्क्रुत करुन  कसा धडा शिकवला वगैरे गोष्टी ते अगदीच समरस होऊन मला सांगत होते...ऐव्हाना माझी हे सगळं ऐकण्याची सहनशीलता संपत आली होती पण केवळ त्यांच्या वयाचा मान ठेवून व माझ्या अडचणीमुळे मला घरी परतता येत नसल्याने , मी त्यांची ही असंबद्ध बडबड ऐकत होतो... कदाचित त्यांनीही माझ्या चेहर्‍यावरील भाव ओळखले,थोडीशी विश्रांती घेऊन दबक्या आवाजात त्यांनी मला विचारलं,सर तुम्ही कोणत्या जातीचे...??
                                   ईतका वेळ मी मला बोलायची संधी कधी मिळतेय या विचारात होतो,आणि हा तर माझ्यासाठी सरळ सरळ फुलटाॅसंच होता..याला ग्राऊंडच्या बाहेर टोलवणे अगदीच गरजेचे होते...नव्हे ते मी माझे आद्य कर्तव्य समजतो...हातातला मोबाईल खिशात ठेवंत मी त्यांना म्हणालो,काका मी डाॅक्टर आहे आणि माझ्या पाहण्यात डाॅक्टरला जात वगैरे नसते...मी माणसाची योग्यता पहातो आणि माणसाची योग्यता त्याच्या विचारांवरून ठरते जातीवरून नाही....
                           ऐव्हाना काका बधीर झाले होते,ते तोंड वाकडं करून पायात चपला घालंत घालंत पुढे म्हणाले,जाऊद्या तुम्हाला नाही कळणार,आरक्षणामुळे आम्ही किती सहन केलंय ते ...त्यांच्या पायातील त्या फाटक्या चपलांकडे पाहंत मी म्हणालो,काका मी पण तुमच्याच जातीचा आहे..पण मी मेहनंत करतो,रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो..चांगल्या लोकांमधे रहातो,चांगली पुस्तकं वाचतो आणि चांगले विचार जोपासण्याचा प्रयत्न करतो..मग तर ते अवाक् होऊन माझ्याकडे पहातंच बसले...भोवळ येऊन जमीनीवर पडायचे काय ते बाकी होते...त्यांच्याशी अधिक काही वाद घालायच्या भानगडीत न पडता मी तडंक मंदिरातून बाहेर निघून आलो....
                             अंगात चुरगळलेला सदरा,पायात फाटकी चप्पल घातलेला माणूस ,स्वतःच्या जातीचा ईतका माज करून किती सहजरीत्या दुसर्‍यांना कमी लेखंत असतो नाही का..??आणि याचंच मला अतिशय आश्चर्य वाटतं...ईतरांनी कष्ट करून मिळवलेलं यश यांच्या जातीसमोर येऊन सपशेल फोल ठरतं...कीव येते मला अशांची...ही अशी लोकं स्वतः आयुष्यात काहीही करीत नाहीत आणि आपलं अपयश झाकून ठेवण्यासाठी ते दरवेळी षंढासारखे आपल्या जातीच्या मागे जाऊन लपंतात...
                            ही केवळ ऐक प्रातिनिधीक स्वरूपाची गोष्ट झाली,असे नग तुम्हाला पावलोपावली पहायला मिळतील...तर अशांना मिळतील तिथे,शक्य तितक्या वेळा अपमानित करा...त्यांना त्यांची पात्रता दाखवून द्यायला अजिबात कमी करू नका...समाजसुधारणा केवळ पुस्तकं लिहून अथवा वाचून होत नसते,त्यासाठी स्वतः  हाती झाडू घेऊन गटारात ऊतरावं लागत असतंय....!!
                                                   -©- निरागस


  

Monday, 3 December 2018

रात्र


स्वप्नं माझी आजकाल माझ्याशीचं बोलंत नाहीत,
रात्र जाते संपून,कोरडे ऊसासे मात्र संपत नाहीत...

डोळ्यांतून या अश्रूधारा ,कोरंड पडते घशाला,
चांदणं आहे मैतर माझं आणि रात्र समजूत काढायला...

खायला ऊठलेला ऐकांत ,अन् सोबतीला हंबरणारी कामधेनु,
विसरू कसं ?? कपाळावर आट्या विणणारं भररात्रीचं ते ईंद्रधनु...??

कुस बदलता बदलता रात्र जाते संपून,
निपचिप या पापण्यांमागे बुब्बुळं माझी जाती थकून...

काळ्याकुट्ट आकाशात आयुष्याचा हिशोब मी मांडतो,
बाकी नेहमी शुन्यच कशी...?? या विचारांनी मग मी हिरमुसतो...
        
                                                 -©- निरागस


Saturday, 27 October 2018

आरक्षण - काल आज आणि ऊद्या

                               ५८ मूकमोर्चे काढून संपूर्ण मराठा समाज आपल्या न्याय्य मागण्या घेऊन रस्त्यावर ऊतरला, महाराष्ट्र सरकार गुढग्यावर रांगंत चर्चेसाठी आलंच पण संपूर्ण  देशानेच नाही तर जगाने कौतुक केलं...ईतिहासात यापूर्वी असं कुठेही झालं नव्हतं आणि कदाचित यापुढेही होणार नाही...सगळंच कसं " न भूतो न भविष्यती..!! " अशा प्रकारचं वातावरण..जिकडे बघावं तिकडे भगवा महासागर..मुंबईतल्या मोर्चात मीही सहभागी झालो,फेसबूकवर लिहीत राहीलो,विरोधकांचं बौद्धिक घेत राहिलो आणि अनेकांच्या भूवया ऊंचावल्या....डाॅक्टर आपलं तर शिक्षण पूर्ण झालं,चांगली नोकरीही आहे हाती आता कशाला हवंय आरक्षण आपल्याला...?? म्हणून हा लिखाणाचा प्रपंच
                              आधी मुळापासून विषंय समजून घेऊयात...मराठा ही ओळंख मला कुणी दिली...?? जन्मतःच मला याबद्दल काही माहिती होतं का ...?? तर नाही, माझ्या घरातही मला असं कुणीही कधी सांगितलं नाही ,कारंण घरात अशा विचारांची वाच्यताच कधी झाली नाही...ईयत्ता चौथीपर्यंत परीक्षेचे फाॅर्म्स सुद्धा शाळेतला मास्तरंच भरायचा आणि त्यामुळे तोवरही यासगळ्याचा कधीच काहीच संबंध आला नाही...आजूबाजूला शिकणारी सगळीच मुलं ऐकसारखी असायची..जेवणाच्या सुट्टीत ऐकत्र बसून जेवताना,मधल्या सुटटीत ऐकत्र खेळताना,दंगा मस्ती करताना कोण कुठल्या जातीचा,धर्माचा अथवा पंथाचा आहे याची पुसटशीदेखील कल्पना आली नाही..सगळीकडे कसा आनंदीआनंद...
                                 मग असाच सरकत सरकत ईयत्ता पाचवीमधे गेलो..कागदावर मोठा झालो ,शाळा बदलली आणि पहिल्यांदा प्रवेश घेण्यासाठीच्या फाॅर्मवर जात आडवी आली...मला आजही आठवतंय, घरी जाऊन मी वडिलांना प्रश्न विचारला होता,ईथे काय लिहू म्हणून...? कारंण काही माहितीच नव्हतं यातलं...ईथवर येताना कधी संबंधच आला नाही या असल्या गोष्टींशी किंवा गरंजही पडली नाही...मग तिथून पुढे पुन्हा काही दिवंस जात हे प्रकरंण दरवर्षी फक्त परीक्षेच्या फाॅर्मवर लिहिण्यापूरतंच संकुचित राहून गेलं...नाही म्हणायला वर्गातल्या काही मुलांना पुस्तकं मोफंत मिळायची,त्यांची परीक्षेची फी माफ व्हायची,गरंज नसताना, न मागता त्यांना स्काॅलरशीपही मिळायची....कधीकधी वाटायचं आपल्याला कधीच कसं काही मिळंत नाही...?? आपण शिक्षकांचे नावडते वगैरे आहोत का...?? असा प्रश्न नेहमी पडायचा..पण ऐका बाजूला मित्रांसाठी आनंदही वाटायचा...हे असं अगदी बारावी पर्यंत चाललं...आरक्षण,सरकार,जातीव्यवस्था यांचा तोवरही कुठे संबंध आला नव्हता...त्यासाठी mbbs ऊजडावं लागलं...
                                     मेहनत करून जीवापाड अभ्यास केला...२॰॰ गुणांची परीक्षा असायची आमच्यावेळी.. १८६ गुण आणले,कोल्हापूरच्या सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला...माझ्या कित्येक जवळच्या मित्रांना १८२-१८४ गुण असूनही mbbs ला प्रवेश मिळाला नाही...त्यांचं सांत्वन केलं आणि माझा डाॅक्टरकीचा प्रवास सुरू झाला...वर्गात असणारे सगळेच आमचे मित्र,तेंंव्हाही होते ,आजही आहेत...मग ऐकेदिवशी ऐका मित्राबरोबर बोलता बोलता सहंज त्याला त्याचे गुण विचारले,तर किती असावेत गुण ११॰...२॰॰ पैकी अवघे ११॰...दीड हजारचा मोबाईल घेऊन द्यायला जेंव्हा माझ्या बापाला जड गेलं होतं,तेंव्हा याच्याकडे तीस तीस हजारांचे फोन असायचे,आणायला आणि सोडायला गाडी असायची..घरी नोकरचाकरांची रेलचेल...माझ्या पायाखालची जमीनच सरकली डोक्यावर आभाळ तेवढं कोसळायचं शिल्लंक राहिलं होतं..
                          माझे अनेक मित्र कष्टातून वर आलेले,शेती करंत ,हमाली करंत ,हाॅटेलात भांडी घासंत शिकणारे होते,पण त्यांची अभ्यासक्रमाची फी कधी माफ झाली नाही,त्यांना कधीही मोफंत पुस्तकं मिळाली नाहीत ,की कमी मार्कांमधे प्रवेशही मिळाला नाही.. असे अनेक मित्र सरकन माझ्या डोळ्यांसमोरून गेले आणि त्यावेळी  मला आरक्षणा नावाच्या या विषयाची सर्वप्रथम जाणीव झाली...मग पुढे प्रत्येक क्षणी,पावलोपावली अनेकविध द्रुष्टांत झाले आणि ऐकंदरीत सगळं प्रकरण डोळ्यांसमोर स्पष्ट झालं....यातल्या कित्येक मुलांनी नंतर वेळोवेळी mbbs करता करता गटांगळ्या खाल्या...काही दोन दोन वेळा परीक्षा देऊन पास झाले तर काहींच्या वार्‍या अजूनही सुरूच आहेत...तर असो..!! वर म्हटल्याप्रमाणे आजही ते माझेच मित्र आहेत आणि आजही मला ते तितकेच जवळचे आहेत...कुणाला कमी लेखणे हा माझा हेतू नसून,जातीव्यवस्था समूळ नष्ट करणे हा आणि हाच माझा ऊदात्त हैतू आहे....
                           mbbs पास झालो आणि पुढच्या शिक्षणालादेखील तेच झालं,पुन्हा तेच आरक्षण..या अशाच स्पर्धैमधून पुढे शिकलो स्त्रीरोगतज्ञ झालो, तर परंत नोकर्‍यांमधे आरक्षण....म्हणजे प्रत्येक ठिकाणी जातीनिहाय वर्गवारी अनिर्वाय....तू अमक्या जातीचा,तू अमक्या धर्माचा म्हणून आमच्यात वेळोवेळी वर्गवारी..याला काय अर्थ आहे...?? म्हणजे आधी MBBS ला प्रवेश घेताना आरक्षण,नंतर PG ला प्रवेश, घेताना आरक्षण,त्यानंतर नोकरी मिळंवताना,नोकरीमधे बढंती मिळंवताना आरक्षण आणि दुसरा ऐखादा होतकरू विद्यार्थी ज्याला दोनवेळ जेवायची भ्रांत,अभ्यासाला धड पुस्तकं नाहीत की डोक्यावर नीट छप्पर नाही..त्याला मात्र सरकारकडून कोणतीही मदंत नाही...माझ्या बुद्धीच्या बाहेर आहे सगळं हे...
                                 सगळ्यांनाच मुळात जातीनिहाय आरक्षण चुकीचं आहे हे पटतंय, पण कुणी त्याविरूद्ध बोलायला धजावंत नाहीये..याची कारणं तशी अनेक आहेत,पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राजकारण्यांना असलेली मतांची भीती..वर्षानुवर्षे सुरू राहिलेलं जातीनिहाय आरक्षण बंद करून राजकारणी लोक ठराविक मतदारांचा रोष पत्करायलाअजिबात धजावंत नाहीत...मग यातून सरळ साधा मधला मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे,जो मागेल त्याला आरक्षण...!! पण कोर्टाच्या किंवा संविधानाच्या कसोटीवर हा निकष ऊतरणारा आहे का..?? याचा कोणीही विचार करीत नाही...निवडणुका जवळ आल्या की अध्यादेश,वटहुकूम काढून लोकांची निव्वळ फसवणुक केली जाते...तेवढ्यापुर्ती मतं मिळवायची आणि नंतर मात्र सारं खापंर कोर्टावर ढकलून मोकळं व्हायचं हे आता फारकाळ चालणार नाही.. महाराष्ट्रात मराठा,तिकडे हरियाणात गुर्जर,गुजरातेत पाटीदार समाज रस्त्यावर ऊतरण्यामागची कारणं राजकीय नसून सामाजिक विषमतेत आहेत..यावर काहीतरी ठोस मार्ग आपल्याला काढावाच लागेल नाहितर ऐक ना ऐकदिवस लोकांच्या सहनशीलतेचा अंत होईलंच आणि मग जो ऊद्रेक होईल त्याची जबाबदारी कोण घेईल कोर्ट की सरकार..??
                                      सरकारी महाविद्यालयातून शिकताना,किंवा शिकल्यानंतर नोकरी मिळविताना आरक्षणाच्या नावाखाली जो भेदभाव केला जातौ तो मी स्वतः अगदी जवळून अनुभवलाय,पण तरीही आजही मला कुणाविरोधात काहीही म्हणायचं नाहिये..ज्यांना ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी ऊपलब्ध झाली अशांचं मी अभिनंदनच करतो ,मग ते श्रीमंत असौत वा गरीब,कारण आपापसात भांडणं किंवा ऐकमैकांना कमीपणा दाखवून हीन वागणूक देणे हा अजिबात माझा ऊद्देश नाही..सगळे आपलेच आहेत..पण मला काळजी वाटते ती अशा गरीब विद्यार्थ्यांची की ज्यांना दिवसभर श्रम केल्याशिवाय दोनवेळचं जेवण मिळंत नाही,अभ्यासाची पुस्तकं खरेदी करण्याची ज्यांची ऐपत नाही आणि जे जातीने मराठा,ब्राह्मण अथवा ईतर सो काॅल्ड खुल्या वर्गात मोडंत असल्याने ज्यांना आरक्षणही ऊपलब्ध नाही...अशा गरजुंनी आयुष्यात शिकायचंच नाही का..?? अशांनी आयुष्यभर गरीबीतंच खितपत पडायचं का..?? खुल्या वर्गातील या अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं कधी ऊघडणार..??ईतरांसारख्या समान संधी या वर्गातील गरीबांना का ऊपलब्ध करून दिल्या जात नाहीत...??
                                     गरीब,मागासलेल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा आणि हाच आरक्षणाचा मुख्य हेतू होता आणि तोच असायला हवा...पन्नास शंभर वर्षांपूर्वी कदाचित मागासलेपण जातीनिहाय वर्गवारीनुसार ठरवलं जाऊ शकंत असेल,पण आजच्या जगात मागासलेपणाचं मोजमाप जातीनिहाय करणं किती संयुक्तिक आहे..?? कित्यैक लोकांनी आरक्षणाचा फायदा घेऊन यशाची अनैकविध शिखरं पादाक्रांत केली..कुणी डाॅक्टर,ईंजिनिअर झालं,तर कुणी सरकारी नोकरीत मोठ्या हुद्यांवर पोहोचलं,आनंदच आहे..पण त्यांच्या मुलांना,त्यांच्या मुलांच्या मुलांना आरक्षणाची खरंच गरज आहे का..?? त्यांच्याऐवजी आपल्याच समाजातील ईतर गरीबांना मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे, अशांना आरक्षण देण्याबाबत आपण थोडातरी विचार करणार आहोत की नाही..??

बघा पटतंय का...?? आपल्यासमोर मुद्दा मांडणं , आपल्याला विचार करायला भाग पाडणं हाच नेहमी माझा ऊद्देश असतो,विचार करा आणि पटलं तर या मोहिमेत नक्की सहभागी व्हा..!!
                                               -©- निरागस

                               
           

Friday, 24 August 2018

कभी कभी लगता है साला अपुनीच भगवान है

                                      आजही अगदी नीट आठवतंय...मे महिन्यातला कोणतासा शुक्रवार होता...ANC Day (गर्भार महिला तपासणीचा दिवस) असल्याने सकाळी लवकर ऊठून,आवरून धावंतपळंत ओपीडीत गेलो होतो..ज्युनियरने काही मोजकेच रूग्ण माझ्यासाठी बाजूला काढून ठेवले होते...तेवढे तपासता तपासता ऐक वाजंला.. मग वाॅर्ड राऊंडसाठी ऊठणार ,ऐवढ्यात ऐक पेशंट कपाळावरचा घाम पुसंत आत आली...मी थोडं चिडूनंच विचारलं..." ईतक्या ऊशीरा का येता...?? वेळेत येता येत नसेल तर दुसरा डाॅक्टर बघा..." मग थोडीशी घाबरूनंच ती म्हणाली.."sorry डाॅक्टर मुलीचा शेवटचा पेपर होता,तिला शाळेत सौडून आत्ता तशीच तडंक ईकडे आलेय " आणि असं म्हणून हातातल्या पिशवीतून काही रिपोर्ट काढून तिने माझ्यासमोर धरले...
                              रिपोर्ट पाहिले,तक्रार ऐकून घेतली..रक्तस्त्राव जास्त होत होता..तिसर्‍या चौथ्या महिन्यात ईतका रक्तस्त्राव पाहून माझ्या कपाळावर आट्या पसरल्या आणि माझ्या कपाळावरील आठ्यांचं जाळं पाहून तिच्या तोंडातून शब्द फुटेना...प्राथमिक ऊपचार करून लागलीच तिला तात्काळ सोनोग्राफीसाठी पाठवलं आणि मी निघालो....रूमवर येऊन  डब्याचं झाकंण ऊघडणार, ईतक्यात ज्युनिअरचा फोन आला,तिने फोनवरूनंच रिपोर्ट कळंवला..Incomplete Abortion झालेलं होतं आणि चालू असलेला रक्तस्त्राव थांबवण्यासाठी लगेचंच आॅपरेशन करावं लागणार होतं...मी तात्काळ वाॅर्डमधे पोहोचलो..तिला सांगितलं भरती व्हावं लागेल,तेही अगदी आजच्या आज नव्हे आत्ताच्या आत्ता...ज्युनिअरला सांगितलं, लगेचंच हिची पूर्वतयारी पूर्ण करून हिला Operation Theatre मधे हलवा मी आलोच.. तिने नवर्‍याकडे पाहून थोडे आढेवेढे घेतले,पण शेवटी तयार झाली...
                                       आता आॅपरेशन करायचं म्हणजे रक्त हातात हवं...त्यात हिचा रक्तगट आला O (— Ve), अख्या मुंबईत कुठेही या रक्तगटाची सोय झाली नाही...याआधीदेखील तिने कोणत्याही तपासण्या केलेल्या नसल्याने ऐकंदरीत सगळाच सावळा गोंधळ होता,अगदी माझ्याकडेही पहिल्यांदाच आलेली...काय करणार...?? क्षणभर मनात विचार आला,हिने काही आपल्याला याआधी कधीही दाखविलेलं नाही,कोणत्याही तपासण्या केलेल्या नाहीत, हिला सरळ दुसर्‍या हाॅस्पीटलमधे पाठवुयात...पण का कुणास ठाऊक.. मी नाही पाठवलं दुसरीकडे,स्वतःच आमच्या रूग्णालयामधे आॅपरेशन करावयाचा निर्णय घेतला...सगळ्या तपासण्या ईतक्या तातडीने करणं शक्य नव्हतंच,म्हणून मग काही मोजक्या शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक तपासण्या करून व रक्त तयार ठेवून आॅपरेशन करण्याचा निर्णय घेतला...Incomplete Abortion नंतर लागणार्‍या आॅपरेशनला Dilatation and Curretage असं म्हणतात,यामधे पेशंटला Short General Anaesthesia म्हणजेच थोड्या कालावधीसाठी पूर्ण भूल दिली जाते व तज्ञांना या आॅपरेशनसाठी १५ ते २॰ मिनिटांचा अवधी लागतो...छोटेखानी असलं तरी Life Saving आॅपरेशन म्हणून ते खूप महत्वाचं आहे...
                                     साधारंण अशी छोटेखानी शस्त्रक्रिया आमच्या रूग्णालयात ज्युनिअर डाॅक्टर करतात..त्याप्रमाणे याही शस्त्रक्रियेची जबाबदारी मी माझ्या ज्यूनिअर डाॅक्टरवर सोपवली..आजवर अशा अनेक शस्त्रक्रिया यापूर्वी तिने केलेल्या असल्याने मी तसा निर्धास्त होतो.पण मी आॅपरेशन थिएटरमधे अर्थात ऊपस्थित होतोच....झालं भूल दिली गेली आणि प्रत्यक्ष आॅपरेशनला सुरूवात झाली..बघता बघता सफाई संपली आणि ज्युनिअर डाॅक्टरने मला जोरात हाक मारली..." sir,shes bleeding profusely " मी अगदी तिथेच ऊपस्थित असल्याने, दुसर्‍या क्षणाला टेबलजवळ पोहोचलो..तिला बाजूला व्हायला सांगून मी तिच्याजागी आलो..ऐव्हाना आॅपरेशनची सगळी सुत्रे मी स्वतःच्या हातात घेतली होतीच...बघतोय तर अक्षरशः  नळाची तोटी ऊघडी राहिल्यावर जसं पाणी वहातं तितका रक्तस्त्राव चालू होता....दोनेक मिनिटं रक्तस्त्राव थांबवायच्या अजून काही प्राथमिक ऊपचारपद्धती म्हणजे pressure tamponade,bimanual massage वगैरे करून पाहिलं,रक्तस्त्राव थांबवणारी औषधं ऐव्हाना भूलतज्ञाकडून दिली गेली होतीच...पण कशाचाही गुण येत नव्हता...
                                     Atonic Uterus नावाचा ऐक प्रकार असतो...साधारणतः डिलिवरी नंतर, अथवा गर्भपातानंतर गर्भपिशवीचे स्नायू आकुंचन पावतात व आतल्या रक्तवाहिण्या त्यामधे दाबल्या गेल्यामुळे रक्तस्त्राव नैसर्गिकरीत्या थांबवला जातो,काही काही रूग्णांमधे हे स्नायू काही केल्या आकुंचन पावंत नाहीत आणि परिणामी या रूग्णांना अतिरीक्त रक्तस्त्राव होतो..त्याला Atonicity of Uterus असं म्हणतात...अगदीच नाईलाज झाल्यास अशा रूग्णांमधे गर्भपिशवी काढून टाकावी लागते...तर असौ
                                  भूलतज्ञाला बोलवलं,रक्तस्त्राव दाखवला...त्याच्या तर पायाखालची जमीनंच सरकली....दोघांनीही दोन क्षण नुसतं ऐकमैकांकडे पाहीलं आणि मला काय म्हणायचंय हे नेमकं त्याला कळालं...न बोलता त्याने पुढची तयारी सुरू केली...गर्भपिशवी काढावयाचं आॅपरेशन करावं लागणार होतं...त्याची तयारी होईपर्यंत मी ज्युनिअरला तिच्या नवर्‍याशी बोलावयास सांगितलं...लागणार्‍या आॅपरेशनची त्याला थोडक्यात माहीती देऊन त्याची संमती घेतली आणि दोनंच मिनिटांत पुढील आॅपरेशन सुरू केलं....आॅपरेशन सूरू करेपर्यंत पेशंट पांढरी फटंक पडली होती...नातेवाईक ब्लड घेऊन यायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता..ईकडे दीड दोन लीटर रक्तस्त्राव अवघ्या पाचेक मिनिटांत झाला होता..पेशंटचं Blood Pressure  60 पर्यंत खाली गेलं होतं,व Pulse तर अगदी प्रयत्न करूनदेखील लागतंच नव्हता...थोडक्यात काय तर हातात अवघी काही मिनिटे काही सेकंद ऊरले होते.
                                  पोटावर incision घेऊन अगदी दोनंच मिनिटांत दोन्ही बाजूंच्या Uterine Arteries क्लॅम्प केल्या...रक्त येईपर्यंत ईतर कामचलावू IV Fluids देण्यात आली...Arteries क्लॅम्प केल्याने रक्तस्त्राव थोडासा कमी झाला...पण ईथून पुढचं आॅपरेशनही अगदी कमी वेळात करणं आवश्यक होतं....साधारण दहा ते पंधरा मिनिटांतच गर्भपिशवी यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात यशस्वी झालो...आता रक्तस्त्राव पुर्णतः थांबलेला असूनही ब्लड मात्र अजूनही हाती लागलं नव्हतं...साधारण पाच किंवा दहा मिनिटं मेंदूला आॅक्सीजनचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला नाही, तर Irreversible Brain Damage होण्याची शक्यता असते...त्यामुळे यशस्वी आॅपरेशन होऊनदेखील रूग्णाची तब्येत कशी राहील याची खात्री देता येत नाही...ऊरलेलं आॅपरेशनही अगदी कमीत कमी वेळात संपवून पेशंटला Operation Theatre मधून बाहेर आणण्यात आलं...आॅपरेशनपूर्वी रूग्णाचं Hb 12  होतं ते आॅपरेशन नंतर म्हणजे केवळ अर्ध्या तासांत अवघं दोन इतकं कमी झालं होतं...म्हणजे अगदीच कमी...ईतक्यात रक्ताची ऐक पिशवी नातेवाईकाने आणली .ती तिला चढविण्यात आली,आता जेवढं करता येण्यासारखं होतं ते करून झालं होतं...रात्रभर आम्ही सर्वांनी जागून अख्या मुंबईतल्या सार्‍या रक्तपेढ्यांना विनवण्या करून रक्त ऊपलब्ध करून रूग्णाला ते चढवलं...ज्युनिअर सिनिअर ,नर्स किंवा डाॅक्टर हा भेद विसरून सगळेच तिच्या जीवासाठी खांद्याला खांदा लावून रात्रभर लढले...
                                    मला तर रात्री झोप येणं शक्यंच नव्हतं...तिथेच वाॅर्डमधे खुर्ची टाकून बसून राहिलो...मीच बसून राहील्यामुळे ईतरांना जागेवरून हलण्याची मुभा नव्हतीच....साधारंण चारेक तासानंतर Blood Pressure आणि Pulse हळूहळू नाॅर्मल होऊ लागली...सकाळी सहा सातच्या सुमारास पेशंटला शुद्ध आली,तिने नवर्‍याला हातानेच ईशारा केला आणि आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला...तरीही ऊरलेले चार पाच दिवंस वाॅर्डबाॅय पासून ते सिस्टर्स पर्यंत सार्‍यांनीच तिची मनापासून काळजी घेतली..ऐरव्ही दिवसातून ऐकदा वाॅर्ड राऊंड घेणारा मीही दिवसातून चार पाच वेळा वाॅर्डात चकरा मारून तिच्या तब्येतीची विचारपूस करायचो....मग पाचव्या दिवशी ड्रेसिंग केलं ऐकदम छान आणि Healthy टाके असल्याने तिला डिस्चार्ज करावयाचा निर्णय घेतला,तसं तिला सांगितलं...डिस्चार्जचं नाव ऐकलं तरी रूग्णांचा चेहरा कसा स्मितहास्याने फुलून जातौ, पण हिचा मात्र अगदीच धीरगंभीर झाला... मी म्हटलं " काय झालं...??" तशी म्हणाली ,"काही नाही डाॅक्टरसाहेब ,आता मी परंत कधीही आई बनू शकणार नाही या विचारानेच मी अर्धमेली झालेय...." मी अगदी समजावणीच्या सुरात तिला म्हणालो आधीच्या दोन मुली आहैतंच की त्यांची नीट काळजी घे....तशी हात जोडून धन्यवाद म्हणाली," सांगितलं माझ्या नवर्‍याने मला,तुम्ही नसता तर नसते जगले मी म्हणाला...." मी तिच्या या बोलण्याकडे हसून दुर्लक्ष केलं ,आठवडाभरानंतर ये दाखवायला असं म्हणून निघून गेलो...
                                      आठवडाभरानंतर तीच पेशंट अगदी आरामात चालंत मला भेटायला आली....लांबूनंच मी तिला ओळखलं,चाळीस पन्नास रूग्ण होते तिच्या आधी पण मावशींना पाठवून तिला आधीच आत बोलावून घेतलं...तिला असं स्वतःच्या पायावर चालताना पाहून माझा ऊर किती भरून आला असेल ,याची आपण सर्व कल्पनादेखील करू शकणार नाही...म्हटलं सांगावं हिला की काय थोर नशीब घेऊन जन्माला आलीये ही....अगदी थोडक्यात जीव बचावलाय हिचा,हिच्यासाठी दोन दिवंस अगदी प्रत्येकानेच कशी जीवापाड तहान भूक विसरून मेहनंत घेतलीये...पण मग नाही सांगितलं,म्हटलं हेच तर आपल्याला आयुष्यात करायचं होतं...याचसाठी तर केला होता हा अट्टाहास...यासाठीच तर रात्ररात्र जागून अभ्यास करीत ईतवर आलो...मग यात ऐवढा काय मोठेपणा..??
                             मी पुढे काही बोलायच्या आतंच तिने पेढ्यांचा बाॅक्स समोर ठेवला आणि म्हणाली," सर माझ्या लेकीचा पहिला क्रमांक आला शाळेत....तिलासुद्धा तुमच्यासारखंच डाॅक्टर बनवीन म्हणते..." तिच्या त्या लेकीकडे मी क्षणभर पाहीलं आणि माझे डोळे भरून आले...अवघं सात आठ वर्षांचं पिल्लू ते...चापून चोपून तेल लावून,लाल रिबीनी बांधून वेण्या घातल्या होत्या तिने..,काय केलं असतं हिने आईविना...?? या ईतक्या कोवळ्या वयात कशी काय सामोरी गेली असती ऐकटीच या जगाला ...?? शेजारी तिचा नवरा हात जोडून मंद हास्य करीत होता....खूप काही बोलण्यासारखं होतं, सांगण्यासारखं होतं पण आवरलं स्वतःला...डोळ्यांतून चटंकन अश्रूंचे दोन थेंब ओघळले...मग त्या चिमूरडीच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं,चांगले पैसे मिळतात म्हणून डाॅक्टर होऊ नको,लोकांसाठी झटायची ईच्छा असेल तर आणि तरंच डाॅक्टर हो...दुसर्‍या हाताने अलगद पुढील रूग्णाला हात करून आत बोलावलं आणि त्या चिमुरडीचा निरोप घेतला....त्यानंतर दर महिन्या दोन महिन्यांनी तीच रूग्ण कुणा ना कुणा नातेवाईकांना घेऊन येते माझ्याकडे आणि दोन्ही पायांवर चालणार्‍या तिला पाहुन माझा मलाच खूप अभिमान वाटतो...

                                                   -©- निरागस


Monday, 28 May 2018

लाभले आम्हास भाग्य

"                          सोमवारपासून काही दिवंस सुट्टी घ्यायचं नक्की केलं होतं,घरी निघणार होतौ...पुढील आठवड्यात काही सर्जरीज होत्या पोस्ट केलेल्या ,त्या आता माझी सहयोगी डाॅक्टर करेल..तर आज दोन पेशंट त्यांचे रीपोर्ट दाखवायला आले असता, तसं त्यांना सांगितलं की मी नाहिये ऊद्यापासून दुसर्‍या डाॅक्टर मॅडम आहेत, त्या करतील आपलं आॅपरेशन...
                            तर त्यातली ऐक रडायलाच लागली..पश्चिम बंगालची पेशंट,लग्नानंतर मुंबईत आलेली,धड हिंदी बोलता येत नव्हतं..मराठी किंवा ईंग्रजी बोलणं तर लांबची गोष्ट, समजंत ही नाही तिला...याआगोदर चार वेळा प्रेग्नन्सी राहूनदेखील काही ना काही कारणाने abortions झालेली...blood pressure जास्त,thyroid च्या तपासण्या बिघडलेल्या आणि हे ईतकं कमी होतं म्हणून की काय घरी अठरा विश्व दारिद्र्य,नवरा दारूडा कुठेसा वाळू ऊपसायला जायचा...
                             पण ही मात्र समझदार होती...नवर्‍याच्या खिशातून अलगंद पैसे काढून स्वतःच्या केसपेपरला वाचवून ठेवायची..वेळच्यावेळी दाखवायला येणार..रात्री दहा बारा कितीही वाजता blood pressure मोजायला बोलवा ,अगदी वेळेत यायची...ऐक मूल होऊद्या नीट डाॅक्टर ..!! बाकी काहीच नको म्हणायची...बाहेर कुठे दाखवायची ऐपंत नाही,ईथेच जेवढं होईल तेवढे ऊपचार करा...प्रयत्न करूयात ..!!  बघू काय होतंय..?? म्हणून ऊपचार सुरू केले...काही महागाची औषधे द्यावी लागणार होती...कधी स्वतःकडील दिली, तर कधी Medical Representative लोकांना बोलवून ती सगळी त्यांना sponsor करायला लावली..,बघता बघता दिवस पूर्ण झाले...blood pressure चा त्रास असल्यामुळे व ईतर गोष्टी बघून डिलिवरी आॅपरेशनद्वारे करावयाचं नक्की केलं...तसं तिला सांगितलं...खूष होती बिचारी..
                                  सोमवारची तारीख ठरली होती,पण नेमकं सुट्टीसाठी सोमवारीच घरी जाणं ठरलं...आज तसं बोलून दाखवलं ,तर रडायलाच लागली...म्हणाली की ,' सर तसं असेल तर मग आजंच करा,किंवा तुम्ही आल्यावर करा मी वाट पाहीन....!! 'मी समजावून पाहिलं की , दुसरे डाॅक्टरही चांगले आहेत,त्यांच्याकडून करून घे,चांगलंच होईल तेही..पण अगदीच गयावया करायला लागली...ऐव्हाना डोळ्यांत पाणी भरलेलं...बंगालीमधून काही बाही बोलून विनवण्या करीत होती...मी दरडावून सांगितलं , ' प्रत्येकाप्रमाणे सुट्ट्या अॅड्जस्ट करावयाच्या म्हटलं, की मग आम्ही सुट्या घ्यायच्या तरी कधी आणि कशा..?? ' आणि सिस्टरना सांगितलं,' यांना बाजूला करा आणि पुढचा पेशंट आतमधे पाठवा...!!" तशी पाणावलेले डोळे घेऊन मग opd  बाहेर जाऊन बसली..
                                opd संपवून मी निघालो ward चा राऊंड घ्यायला,तर ही तिथेच बसलेली..मला पाहीलं आणि ऐकदम पायाच पडली..काय बोलावं काहीच सुचेना..वरकरणी कितीही कडंक वाटंत असलो तरी ऐखाद्याची आगतिकता माझ्याच्यानं पहावली जात नाही...म्हटलं,या हिच्या आगतिकतेपेक्षा माझी सुट्टी जास्त महत्वाची आहे का...??  ' बरं ठीक आहे,हो अॅडमीट रविवारी संध्याकाळी , बघूयात कसं काय जमतंय ते..!! '  हाताखालच्या ज्युनिअर डाॅक्टरला सांगितलं ऊर्वरीत तपासण्या करायला...रविवार संध्याकाळचे बाहेर जाण्याचे सारे प्लॅन्स रद्द केले आणि रात्री ऊशीरा जागून केलं सीझर...आॅपरेशन ऐकंदरीत चांगलंच झालं...कधी नव्हे ते तिचा नवराही आलेला,दोघांनी हात जोडून धन्यवाद दिले आणि त्यांच्या सद्भावना सोबंत घेऊन मी सुट्टीवर निघालो..
                                    जेंव्हा डाॅक्टर व्हायचं ठरवलं ,तेंव्हा काही मोजके प्रथितयश डाॅक्टर डोळ्यांसमोर होते,त्यांना मिळणारा आदर,त्यांनी कमावलेला पैसा दिसंत होता...त्यामागील त्यांची मेहनंत मात्र दिसंत नव्हती...आज स्वतः डाॅक्टर झाल्यावर कळतंय,की हे वाटंत होतं, दिसंत होतं , तितकं सोप्प नाहिये...कित्येकदा रूग्णांसाठी तुमचे स्वतःचे निर्णय बदलावे लागतात,रात्र रात्र जागावं लागतंय ..केवळ त्यांनी टाकलेल्या विश्वासापोटी...!! आज मान मिळतोय,आदर मिळतोय...ऊद्या कदाचित पैसाही मिळेल पण त्यासाठी अमाप कष्ट करावे लागणार आहेतंच...
पण खरं सांगु का...?? त्रासात असलेला रूग्ण आपल्यामुळे बरा होऊन उपचार संपवून हसंत खेळंत जेंव्हा घरी जातो ना,  तेंव्हा मिळणारा तो आनंद हे सगळे कष्ट सोसण्याची ऊमेद अलगंद देऊन जाते.....
                                               -©- निरागस




                            

Monday, 21 May 2018

शिवाजी अंडरग्राऊंड ईन भीमनगर मोहल्ला

                                बर्‍याच दिवसांपासुन ऐकून होतो या नाटकाबद्दल,मला आजही आठवतंय.., सहा वर्षांपूर्वी जेंव्हा हे नाटंक रंगभूमीवर आलं,त्यावेळी काही प्रमाणात वादंग निर्माण झालेच होते,त्यावर मग दिग्दर्शक नंदू माधव,लेखंक राजकुमार तांगडे यांच्या मुलाखती व दिली गेलेली स्पष्टीकरणं ऐकून ऐकंदरीतंच खूप ऊत्सुकता निर्माण झाली होती नाटकाबद्दल..पण त्याकाळात  कोल्हापूरला काही हे नाटंक  आलं नाही व नंतर मी व्यस्त होऊन गेलो आणि नाटंक  काहीसं माझ्या स्म्रुती पटलामागे गेलं... काल मुंबईत मित्राकडून कळलं की नाटंक होणार आहे माटुंग्याला, मग मात्र वेळात वेळ काढून नाटंक पहायला गेलो...बर्‍याच लोकांनी ऐकलेलं असेलंच नाटकाबद्दल,तर काहींनी मुद्दामहून विनंती केली नाटकाबद्दल लिहिण्याची ,म्हणून केलेला हा प्रपंच...
                                  तर ऐकंदरीत नाटंक तुफान जमलंय...दोन अंकी असलेलं हे नाटंक सुपीक दिग्दर्शनामुळे अक्षरशः मनावर गारूड घालतं..नाटकाच्या लेखनाबद्दल माझे काही आक्षेप आहेतं,ते मांडीनंच मी पुढे, पण तरीही संहितेतील काही ढोबंळ  चुका सोडल्या ,तरी लेखंनही चांगलंच म्हणावं लागेल..आता येऊया नाटकातील पात्रांकडे..शिवाजी महाराजांना त्यांच्या विचारांसहित देवलोकी घेऊन ये, असं सांगून ईंद्रदेव यमाला प्रुथ्वीलोकावर पाठवतो आणि त्यांना शोधता शोधता यमाला कोणकोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं,ते या नाटकात ऊद्ध्रुत करण्यात आलंय..राजांचं नाव वापरून राजकारण करणारे,पैसे कमावणारे लोक कसे भेटतात,शिवाजी महाराज हा विचार जातीभेदाच्या पलीकडे जाऊन समाजामधे किती दूरवर रूजला आहे,हिंदू,मुस्लिम,बौद्ध सारेच लोक या लोकराजाला कसं आपलं मानतात हे पटवून सांगण्याच्या  अवतीभोवती या नाटकाची संहिता फिरते...          
                                 काही मोजक्या ईतिहासकारांनी शाहिस्तेखान,अफजलखान,बाजीप्रभू देशपांडे,पन्हाळा,राजगड,राज्याभिषेक ईतक्याच स्वतःच्या फायद्याच्या गोष्टींपुरता ईतिहास रंगवून सांगितला..समर्थ रामदास महाराजांचे गुरू,दादोजी कोंडदेव महाराजांचे प्रशिक्षक वगैरे असत्य गोष्टी नकळंत ईतिहासाच्या नावाखाली आमच्या माथी मारल्या गेल्या आणि शिवा काशीद,ईब्राहिम खान,सिद्धी हिलाल यांना केवळ अनुल्लेखानं मारलं गेलं...महाराजांचं धोरण हे मुस्लिमांविरोधात कसं होतं हे वारंवार ऐतिहासिक पुस्तकांतून ,अगदी शालेय पाठ्यपुस्तकांतूनही आम्हाला वरचेवर सांगण्यात आलं..या चुकीच्या लिखाणावर या नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय,भाष्य नव्हे ,तर आसूड ओढण्यात आलेत असं म्हणायलाही हरकंत नाही...शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर त्यांचं नाव न घेता केलेली टीकादेखील सभाग्रुहात खच्चून टाळ्या मिळवून गेली, यावरूनंच लोकांच्या या मोडतोड करून सांगितलेल्या ईतिहासाबद्दल भावना किती तीव्र आहेत हे स्पष्टपणे सांगतात....
                                     महाराजांचं नाव घेऊन केला जाणारा बाजार,राजकारण व खोटेनाटं महाराजांचं नाव घेऊन, त्यामागून रेटवला जाणारा राजकीय पार्ट्यांचा हिंदू अजेंडा काही आम्हाला नवीन नाही...या नाटकाच्या निमित्ताने त्यावर परखड मत मांडण्यात आलंय..आणि त्यात लेखकाला यशही आलंय..नाटकात दोन शाहीरांमधली जुगलबंदी दाखविण्यात आली असून,त्यातला ऐक शाहीर ऊच्चवर्णीय हिंदू,  तर दुसरा बौद्ध धर्माचा असुन ऊच्चवर्णीय शाहीराचे अतर्क्य व ईतिहासाला धरून नसलेले ऐतिहासिक दावे तो आपल्या अभ्यासू व्रुत्तीने कसे परतावून लावतो,त्याच्या बोलण्यावर घातली घेतलेली बंधनं झुगारून ,त्याच्या स्वतःच्या भीमनगर मोहल्यामधे तो ऊच्चवर्णीय शाहीराचं आव्हान लिलंया कसं परतावून लावतो हे खरंच खूप प्रेक्षणीय पद्धतीने रंगविण्यात आलंय..या सगळ्या झाल्या नाटकाच्या जमेच्या बाजू..आता तर्काला न पटणार्‍या बाजू..
                                  संपूर्ण नाटकाची थीम ब्राह्मणविरोधी असून,आमच्यावर ब्राह्मणांनी कसा अत्याचार केला व आमचं कसं शोषंण करण्यात आलं हा आणि हाच नाटकाचा गाभा आहे...शिवाजी महाराजांच्या ईतिहासाच्या विद्रुपीकरणाचं नाव पुढे करून, ब्राह्मण समाजावर थेट टीका करण्याची कोणतीही संधी लेखकाने वाया घालवलेली नाहि...शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर नाव न घेता केलेली टीका मी समजू शकतो,पण ऐवढ्या मोठ्या व्यासपीठावर हजारो लोकांच्या साक्षीने विशिष्ठ समाजाचं थेट नाव घेऊन टीका करणं माझ्यासारख्या जातीभेद न मानणार्‍या माणसाला पटलं नाही,आणि हे संपुर्ण नाटकात वारंवार झालं किंवा ठरवून करण्यात आलं...सामाजीक जीवनात जातीभेद करणं जर गुन्हा असेल, तर हे असं विशिष्ठ समाजाचं नाव घेऊन संपूर्ण समाजालाच दूषंण देणं तरी आपण कसं आणि का योग्य मानायचं..?? जातीयवादाचं हे ओगाळवाणं प्रदर्शन तुर्तास संविधानाच्या चौकटीत जरी बसंत असलं, तरी नैतिकतेच्या चौकटीत बसणारं नव्हतं...आपला मुददा बरोबर असेलही कदाचित ,पण व्यक्त होण्याची पद्धत काही ठिकाणी अतिशय चुकीची होती...अशाप्रकारची जातीयवादी टीका मराठ्यांवर केली असती ,तर निश्चित तोडफोड झाली असती,नाटंक बंद पाडलं असतं,ईतरांवर टीका केली असती तर भसाभस अॅट्राॅसिटीचे गुन्हे दाखल झाले असते,ब्राह्मण समाजावर नाव घेऊन थेट टीका करूनदेखील, हे नाटंक आज सहा वर्षै रंगभूमीवर आहे हा या समाजाचा समजूतदारपणा नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल..
                                  दुसरी गोष्ट, शिवरायांचं नाव घेऊन जसं राजकारंण केलं जातं, तितकंच किंबहूना त्याहून अधिक राजकारंण बाबासाहेबांचं नाव घेऊन केलं जातं,त्यावर दुर्दैवाने नाटकामधे ऐकही अवाक्षर काढण्यात आलेलं नाही..सगळ्याच जाती धर्मामधे महापुरूषांच्या नावावर चालणार्‍या राजकारणावर भाष्य करण्याची ऐक चांगली संधी लेखकाने या निमित्ताने वाया घालवली, असं मला वाटतं आणि त्यामुळेच काही काही ठिकाणी हे नाटंक मला अगदीच ऐककल्ली 'ब्राह्मण झोडा ' या चळवळीचा भाग वाटतं आणि म्हणूनंच ईतकं चांगलं नाटंक, आजही समाजातल्या सर्व थरांमधे सर्वदूर पोहोचलेलं नाही ,हे पहायला जमलेल्या लोकांवर ऐक नजंर टाकली की लगेच कळेल...शिवरायांच्या काळातील मुस्लिम समाजातील शूरवीर सरदारांची ऊदाहरणं देऊन मुस्लिम समाज हिंदूविरोधी नसल्याचा व शिवरायांची युद्धनीती ही मुस्लिमविरोधी नव्हती हे पटवून देण्यात मात्र लेखंक कमालीचा यशस्वी झालाय ही त्यातल्या त्यात जमेची बाजू...
                                      संभाजीमहाराजांना औरंगजेबाने हालहाल करून मारलं,त्याची कारणं वेगळी होती...त्यांची जीभ कापणे,कानात शिसं ओतणे,डोळे फोडणे या सार्‍या गोष्टी, त्यांचं व पर्यायाने त्यांच्यासाठी लढणार्‍या मराठी मावळ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी केल्या गेल्या...त्याचा वैदिक पद्धतीशी संबंध जोडणार्‍या विचारधारेचा प्रा संजय सोनवणींसारख्या अनेक ईतिहासकारांनी प्रखरतेने विरोध केलाय....ईतकं मोठं साम्राज्य हाकणारा मुस्लिम हुकुमशहा औरंगजेब संभाजीराजांचा खून काही तात्कालीन ब्राह्मणवर्गाचं ऐकून वैदिक पद्धतीने करेल, असा तर्क लावणं म्हणजे अगदीच ओढूणताणून शब्दांशी बुद्धिबळ खेळण्यासारखं आहे आणि याला कोणताही ऐतिहासिक पुरावा ऊपलब्ध नाही...चुकीचा ईतिहास खोडून काढणं गरजेचं आहेच ,पण ऐका चुकीच्या ईतिहासाला खोडण्यासाठी दुसरा चुकीचा ईतिहास पुढे रेटणं, ही अक्षम्य चूक या नाटकात लेखकाकडून झालीये...
                                 जाता जाता फक्त ऐवढंच सांगतो...चारशे वर्षांपुर्वी भारंत हा देश अस्तित्वात नव्हता,१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत नावाचा देश अस्तित्वात आला आणि २६ जानेवारी १९५॰ साली तो संविधानाने बांधला गेला...संविधानानुसार जातीभेद अमान्य असून प्रत्येक भारतीय नागरीकाला समान हक्क,अधिकार व कर्तव्ये बहाल करण्यात आली आहेत....१९४७  सालापुर्वी झालेल्या अन्यायाचा,शोषणाचा या देशाशी काहीही संबंध नाही. राजेराजवाड्यांची वर परलोकी भेट झाली की त्यांच्याकडून याचा हिशोब मागा...क्रुपा करून शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या हेवेदाव्यांची,झालेल्या हेळसांडीची ऊत्तरं या संघराज्यात शोधू नका...कारण यातून साध्य काहीच होणार नाही,ऊलंट जातीभेद वाढीस लागून आपापसातलं सौहार्द्य नष्ट होईल...
या सगळ्या जमेच्या व कमकुवंत बाजू असूनही नाटंक मात्र प्रेक्षणीय व आवर्जून पहाण्यासारखं मात्र नक्कीच झालंय...बघा तरं काय म्हणायचंय लेखकाला...!! its a real must watch..
                                             -©- निरागस


Wednesday, 4 April 2018

या शिक्षणाच्या आईचा घौ

                                        दोनेक महिन्यांपूर्वी बहिणीकडे गेलो होतो, निवांत सुट्टी टाकून आठवडाभरासाठी...भाच्याची परीक्षा सुरू होती,म्हणून मग बहीणंच म्हणाली, घे आता याचा अभ्यास...ईनमीन तिसर्‍या ईयत्तेत शिकणारं पिल्लू ते...पण त्यानं त्याचं दप्तर ऊघडलं आणि मला भोवंळंच आली....पंधरा वीस पाठ्यपुस्तकं आतमधे....ईंग्लिश काय,Environmental Scince काय,चित्रकला काय,ज्या वयात आकड्यांची अथवा भाषेची जुजबी ओळंख असणे अपेक्षित आहे, त्या वयात ईथे मात्र संपूर्ण ब्रह्मांड या कोवळ्या मनांवर कोरण्याचा प्रयत्न चालू आहे..आणि या प्रत्येक विषंयाच्या परीक्षा घ्यायच्या...दर आठवड्याला काही ना काही प्रोजेक्ट्स,परीक्षा...धुरंळा ऊडवून दिलाय नुसता..पण मग माझ्याच मनात विचार आला,की या सगळ्याची खरंच आपल्याला गरंज आहे का..??
                               म्हणजे बघा ना बॅकेत गेल्यावर आजही अर्ध्याहून अधिक गोष्टी आम्हाला माहिती नसतात,काही मोजकी जीवनावश्यक औषधं,आजार आम्हाला माहिती नकोत का..?? ,स्वतःच्याच शरीराबद्दल आम्हाला विशेष असं काही ज्ञान दिलंच जात नाही...तुम्हाला खोटं वाटेल पण हे काॅमर्स किंवा आर्ट्स विषयातले पदवीधर तर opd मधे अशा शंका घेऊन येतात,की मला खरंच खूप वाईट वाटतं...वाटतं की हा माणूस महिन्याला लाखो रूपये कमवंत असेलही, पण याला ही ईतकी साधी गोष्ट माहिती नसावी...पण यात त्याची तरी काय चूक...?? त्याला शिकवलंच गेलं नाही हे कधी..अगदी तसंच आम्हा विज्ञान क्षेत्रातील पदवीधरांचं..बॅंकामधले साधे फाॅर्म आम्हाला कसे भरायचे माहिती नाहीत,किंवा काॅम्पुटर क्षेत्रातलंही आम्हाला ओ की ठो काही कळंत नाही  ,शेअर मार्कैट,शेती,कला यातलं किमान जुजबी ज्ञान तरी आम्हाला हवं की नको...?? ऊगाच त्या अवघड आणि कीचंकट अशा भूमितीच्या प्रमेयांऐवजी ही अशी life sciences का नाही शिकवंत तुम्ही आम्हाला...??
                                   म्हणजे बघा ना आज मी डाॅक्टर आहे...गणिताशी माझा दूरदूरवर काहीही संबंध नाही,पण तरीही मी दहावी,अकरावी,बारावी मधे नसते पॅराबोला,हायपरबोला शिकावं अशी यांची अपेक्षा का बरं असते....?? अरे मुर्खांनो काय करू मी या अनावश्यक ज्ञानाचं..?? लोणचं घालू का..??   का केलात माझा अगणित छळ गणित नावाचा विषंय शिकवण्याच्या नावाखाली ..? त्याचा कुठेतरी माझ्या उर्वरीत आयुष्यात मला ऊपयोग होणार आहे का...?? sin,cos,tan आणि ऐकंदरीतंच trigonometry नावाची गोष्ट किती बेचंव आणि बिभत्स...?? पण ज्याला आयुष्यात चित्रकार व्हायचंय,लेखंक व्हायचंय,कवी व्हायचंय त्यांनीही हे शिकलंच पाहिजे का..?? ऐखाद दिवशी डोकं फिरलं, तर खरंच केस करेन या अभ्यासमंडळांवरतीच आणि या असल्या भंपक, नाही त्या आचरंट गोष्टींवर निरर्थक खर्ची घातलेला माझा वेळ परंत द्या म्हणून ठणकावून सांगेन
                                 खरं सांगू का..?? अगदी मनापासून सांगतो....भारतात शिक्षण दिलं ,अथवा घेतलं जातं तेच मुळी पोट भरण्यासाठी अथवा नोकर्‍या मिळवण्यासाठी...शिक्षणातून लोकांचं आयुष्य सम्रुद्ध व्हावं,त्यांची विचारसरणी बदलावी ,किंवा समाज म्हणून असलेलं त्याचं अस्तित्व अधिकाधिक प्रगल्भ व्हावं ,असं ना सरकारला वाटतं ना तुम्हा आम्हाला...  नाक्यावर ऊभे राहून पचापचा गुटख्याच्या पिचकारी मारणारे,सिगारेटच्या पाकिटावर मोठ्या अक्षरांत लिहिलेला धोका वाचू न शकणारे,वाहंन चालंवताना आपल्याचसाठी असणारे सिग्नल फाट्यावर मारणारे,किंवा वंशाचा दिवा हवाय म्हणून स्त्रीभ्रुणहत्या करणारे सुशिक्षित लोक्स पाहिले की मला कीव येते आपल्या शिक्षणपद्धतीची...दर सहा महिन्याला मोबाईलंच नवीन वर्जन काढणारे आम्ही भारतीय शिक्षणपद्धतीमधे मात्र किचींतही बदंल करण्यास ऊत्सुक नाही....
                                 कुठेतरी, कुणीतरी यावर बोलावयास हवं,हे असंच सुरू राहिलं तर मात्र काही खरं नाही...जातीच्या,धर्माच्या नावाखाली द्वेश करायला शिकवणारी शिक्षणपद्धती काय कामाची...?? स्वतःलाच नेमून दिलेलं काम वेळेत करण्यासाठी टेबलाखालून पैसे घेणारे अधिकारी निर्माण करणारी शिक्षणपद्धती काय कामाची..?? हे कसंकाय बदलणार...?? कोण बदलणार...?? आणि कुणी काही बोललंच, तर मग आम्ही आर्यभट्ट,सी वी रमण यांच्याकडे बोटं दाखवतो...या महान लोकांनी त्यांच्या आयुष्यात जे साध्य केलं ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केलंय..त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेखाली आपल्या शिक्षणपद्धतीचं नागवेपण लपवणं क्रुपया थांबवा...आपली शिक्षणपद्धती जर ईतकी ऊच्चप्रतीची असतीच, तर मग आजवर ईतक्या वर्षांत काही मोजके हाताच्या बोटांवर मोजता येण्याईतपत अपवाद वगळता ईतर विद्वान का तयार झाले नाहीत...??  खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे...
                                आता तुम्ही म्हणाल नुसते प्रश्न विचारून,दुषणं देऊन कसं चालेल..?? हे बदलायचा काहीतरी मार्ग सांगा.....तर सांगतो मित्रांनो...मी काही तज्ञ वगैरे नाही या विषंयातला पण माझ्याकडे काही कल्पना आहेत...काही सूचना आहेत...
१) सगळ्यात पहिलं म्हणजे शिक्षणपद्धती बदलायची म्हणजे काही ऐक दोन लोकांचं किंवा ऐकदोन दिवसांचं काम नाही...ती ऐक कीचकट आणि खूप वर्षै चालणारी प्रक्रिया आहे...त्यात सरकारच्या बरोबरीनेच,या विषयातले तज्ञ लोक व तुम्ही आम्ही सगळ्यांचाच समावेश असायला हवा
२) आज बारावीला करीअरची वाट निवडण्यासाठी जे महत्व आहे ते दहावी किंवा त्याआधीच देण्यात यावं...यातून वाचलेली वर्षै त्यांना त्यांच्या आवडत्या विषंयांतलं अधिक ज्ञान मिळवण्यासाठी वापरता येतील
३) मूल्यशिक्षणाच्या नावाखाली आज जे थातूर मातूर पुस्तकी शिक्षण दिलं जातंय ते संपूर्णतः बंद करून, त्याऐवजी संपूर्ण अभ्यासक्रमंच मूल्यशिक्षणावर आधारीत ठेवावा आणि त्यात फिल्ड विझिट्स,विविध विषयांवरील चर्चासत्रे,वादविवाद स्पर्धा,प्रोजेक्ट्स यांचा समावेश असावा
४) अभ्यासक्रमामधे life sciences च्या नावाखाली आरोग्य,बॅंकिंग,वर्तमान राजकारण यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचा मुबलंक प्रमाणात समावेश करण्यात यावा
५) परीक्षापद्धती अधिकाधिक conceptual करण्यात यावी....मुलांना काय येत नाही, यापेक्षा त्यांना काय चांगलं येतं हे शोधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करून त्यांना त्याच विषयांमधे अधिकाधिक प्रगती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात यावं...
६) चित्रकला,गायन,खेळ यांसारख्या कला यांचा अभ्यासक्रमात विषंय म्हणून समावेश व्हावा..पण हे विषंय ऐच्छिकंच असावेत...सगळ्यांवर लादण्यात येऊ नयेत
७) प्रत्येक व्यावसाईक कोर्समधे communication skills किंवा survival skills शिकविण्यात यावीत..ऊदा -डाॅक्टरांना केवळ आजारांबाबत माहिती न देता रूग्णांशी बोलावं कसं,त्यांच्या भावनांना कसं हाताळावं याचं प्रशिक्षण देण्यात यावं किंवा त्यांच्या अभ्यासक्रमात अधिक्रुतरीत्या याचा सामावेश करण्यात यावा...
८) दरवर्षी ऊपलब्ध शिक्षकांचा व त्यांनी मुलांवर केलेल्या मेहनतीचा आढावा घेण्यात यावा...त्यांच्या अडचणी समजून त्यांना अधिकाधीक प्रोत्साहन देण्यात यावा..
९) दरवर्षी सरकारच्या बजेटमधील शिक्षणखात्यावरील खर्च वाढविण्यात यावा आणि दरवर्षी प्राधान्याने यामधे व्रुद्धि करण्यात यावी...
१॰) नवनवीन शाळा,महाविद्यालये,काॅलेजेस,व्यावसाईक शिक्षण देणार्‍या आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्था मुलांसाठी ऊपलब्ध करून देण्यात याव्यात...
                                      या काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या सूचना माझ्यावतीने मी मांडल्या आहेत...आपणही सगळेच या शिक्षणपद्धतीतूनच बाहेर पडला आहात...आपणाकडे कदाचित याहूनही अधिक चांगले ऊपाय असतील...नक्की सुचवा....यावर ऊघडपणे चर्चा झाली पाहिजे....कारंण अशा विधायंक चर्चांमधूनच मार्ग सापडतात....कोणताही बदंल घडवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतौ आहोत हे आधी मान्य करायला शिकलं पाहिजे....बघा पटलं तर नक्की विचार करा....
                                             -©- निरागस


Thursday, 15 February 2018

ती सध्या काय करते - २

हसू बनूनी कधी ओठांवर ती ऊमलते,
                    सहवास तिचा हवा असतो भाबड्या शब्दांना..
पदर सावरून मनात दाटून ती येते,
                    गंध येतो तिचा निष्पाप मुक्या आसवांना....!!
रवि बनूनी कधी क्षितिजावरी ती ऊगवते,
                     किरणांमधुनी करते स्पर्श ती सर्वांगाला..
लहानगी बनूनी बागेत यथेच्छ ती बागडते,
                     हेवा असावा वाटंत तिचा फुलपाखराला....!!
पहिली सर पावसाची बनूनी धरित्रीवर ती येते,
            म्रुदगंध बनूनी जगास व्यापून टाकायला ..
तर कधी सोनचाफा बनूनी परसात ती ऊमलते,
            निपचिप ऐकाकी माझ्याशी गुजगोष्टी करायला..!!
                    
                    
कधी सागराची अजस्त्र लाट बनूनी,
          गिळू पहाते ती माझ्या कोवळ्या भावनांना..
ऊगाच व्यक्त होत रहातो मी तिच्या आठवणींमधूनी,
          ती मात्र चटकन् दूर सारते सार्‍या रूणानुबंधांना..!!
                                                 


                                      -©- निरागस


                    

Wednesday, 14 February 2018

ती सध्या काय करते - १

कधी बनते ती कवडसा
            खिडकीमधूनी डोकावणारा,
माझ्याच घरात डोकावून
            मलाच परकं करून जाणारा....!!
कधी बनते ती चुंबळ
             घागरीला सांभाळणारी,
घागरीला सांभाळता सांभाळता
              माझ्याच मनाला सुरूंग लावणारी....!!
कधी बनते ती झोका हवेचा
               मंद झुळझुळ वाहणारा,
नकळत वाहता वाहता
               आठवणींवर फुंकर घालणारा....!!
कधी बनते ती फुलपाखरू
                निरागस स्वच्छंद बागडणारं,
स्वच्छंद बागडता बागडता
                निरर्थक वास्तव डोळ्यांसमोर मांडणारं....!!
              
कधी बनते ती रेती
               मुठीत कधीही न मावणारी,
मुठीतून निसटता निसटता
               आयुष्याची ऊकल कोकलून सांगणारी....!!
                                              


                                  -©- निरागस



             
           
              

Saturday, 27 January 2018

माझी दिनचर्या

"                  आजचा दिवसंच काहीतरी विलक्षण आहे, पहाटेच्या गोड थंडीत स्वप्न पडलं, काय तर बकासुराच्या ऊरावर बसून कुणीतरी त्याला मद्यप्राशनाचे तोटे समजावून सांगत होतं..तुमच्याईतकंच मलाही आश्चर्य वाटलं आणि स्वप्नातंच हे स्वप्न आहे ,खरं नाही याची जाणीव झाली..डोळे चोळंत ऊठलो आणि तसाच अजून अर्धातास अंथरूणात लोळंत पडलो...मग काहीशा कारणाने अंथरूणातून ऊठावं लागलं,मच्छरदानीची घडी घालता घालता लक्षात आलं आज आपल्याला सुट्टी आहे म्हणून,दिवसातल्या ऊरलेल्या १२-१५ तासांचं घट्ट नियोजन केलं आणि ऊठलौ...
                                    पायात चप्पल सरकावली,कोपर्‍यात अस्ताव्यस्त पसरलेला कपड्यांचा पसारा ऊचलून कपाटात भिरकावला आणि कपाटाचा दरवाजा लावून घेतला...दोन मिनिटांत आवरलेल्या पसार्‍याचा अभिमान बाळगून कोपर्‍यातून खिडकीत गेलो..खिडकीतून खाली वाकून बघितलं तर OPD मधे येणार्‍या पेशंटची लगबग दिसली,त्यातले कित्येक चेहरे ओळखीचे होते..याला हा आजार होता ना..?? परंत का आलाय तो...?? तिला तर शुक्रवारी बोलवलं होतं वगैरे वगैरे विचारांनी लागलीच डोक्यात घर केलं आणि मी लगेच खिडकी बंद केली...बंद खिडकीआड मी अजूनही ऐखादा १५-२० वर्षांचा कोणतीही जबाबदारी नको असलेला मुलगा असल्याचा फील येतो मला...
                               खिडकी बंद करून मग अभ्यासाची पुस्तकं मांडलेल्या टेबलपाशी गेलो,काल कुठवर वाचून झालं..?? आज किती वाचायचंय...?? याची ऊजळणी करून पुस्तक मिटलं आणि तडंक आरशासमोर ऊभा राहिलो...श्या महिना झाला दाढी करुन..देवाने ईतरांसारखी नीट दाढी आपल्याला का बरं दिली नसेल..?? यावर मोजून पाच मिनिटं विचार केला पण सहाव्याच मिनिटाला सगळ्यांना सगळंच मिळंत नसतं असं म्हणून स्वतःचीच समजूत काढली आणि दाढीचा ब्रश ऊचलला...पुढची दहा मिनिटं भादरण्यात गेली...दाढी केल्याकेल्या आठवण आली  ब्रश करावयाचा राहूनंच गेला होता..अलगद पावले बाथरूमकडे वळली आणि पुढचा तासभर प्रातःविधी ऊरकण्यात गेला....
                                 आंघोळ केल्यावर दोन मिनिटे डोळे मिटून गणपतीसमोर नतमस्तंक झालो,आईला फोन केला..आईचे आपले नेहमीचेच ठरलेले प्रश्न वेळेवर जेवंत जा,रस्ता सांभाळून पार करंत जा वगैरे वगैरे,मग वैतागून मीच म्हणालो बरं आता ठेवतो मी,करतो नंतर फोन परंत...ईतक्यात मनात विचार आला सुट्टी घेऊन करायचं तरी काय..?? त्यापेक्षा चार रूग्ण जास्तीचे तपासूयात...नजंर भिरभिरंत भिंतीवरील घड्याळाकडे गेली रोजच्यापेक्षा थोडा जास्तंच ऊशीर झाला होता...कपड्यांना ईस्त्री करावयाची अजून बाकी होती..मग लगबगीने ईस्त्रीमधे पाणी भरलं आणि कपड्यांना व अॅप्रनला कडंक ईस्त्री केली..पुन्हा दोन मिनिटं आरशासमोर ऊभा राहिलो,केस विंचरले आणि तयार झालो..पायातली चप्पल सरकवली व मोजे घातले,बूट घालायची ईच्छा होत नव्हती पण तरीही नाईलाजाने घालावे लागले..घोटभर पाणी प्यायलो आणि दरवाजा ऊघडून बाहैर निघालो..ऐव्हाना जबाबदारीपासून दूर पळणारा मुलगा ऐक जबाबदार डाॅक्टर झाला होता...
                                      ओपीडीत पोचता पोचता रोजचेच लोक दिसंत होते,ओळखीच्या नर्सैस,security guards,ओळखीचे रूग्ण सगळ्यांना ओळंख दाखवत दाखवत लगबगीने ओपीडीत पोहोचलो..ज्युनिअर डाॅक्टरांनी माझ्यासाठी म्हणून थांबवून ठेवलेले रूग्ण मन लावून लक्षपूर्वक तपासले..झालं पुढचे तास दोनतास रूग्णांसोबंत कसे गेले कळलंच नाही..त्यानंतर सगळ्यांसोबंत वाॅर्डमधे गेलो..ज्युनिअर डाॅक्टर,स्टाफ नर्सेस बरोबर ward round घेतला...तिथे काहीबाही कारणाने भरती झालेले रूग्ण तपासले,ऊपचारांबाबत रूग्णांना तसेच त्यांची काळजी घेणार्‍या नातेवाईकांना मार्गदर्शन केलं...दुसर्‍या दिवशी आॅपरेशनसाठी कोणते रूग्ण ठेवायचे,त्यांच्या कोणकोणत्या तपासण्या करायच्या वगैरे सगळं सांगून तिथून निघालो,रूमवर जाताजाता कुणाचातरी फोन आला,meeting आहे आपल्याला बोलावलंय...मग तसाच तडंक आमच्या मुख्य अधिकार्‍यांच्या दालनात गेलो,काहीतरी फालतू कारणावरून गदारोळ होऊन त्यावर चर्चा सुरू होती..विषंय माझ्या डोक्याच्या बाहेरचा होता,रूग्णांशी निगडीत नव्हता, त्यामुळे त्यात डाॅक्टर म्हणून मी काय बोलावं ..??हैच मुळी मला कळंत नव्हतं,मोबाईल काढला दिवसभरात आलेले काॅल्स व मेसेजेस तपासले,अधूनमधून मला ऊद्देशून झालेल्या संभाषणात त्रोटंक सहभाग नोंदवला आणि अगदीच कंटाळा आल्यावर जेवणाचं निमित्त सांगून मिटिंगमधून ऊठून  निघून गेलो...
                            रूमवर पोहोचता पोहोचता संध्याकाळचे चार वाजले होते..डबा ऊघंडला अधूनमधून सतत फोन चालूच होते...जेवणात कोणती भाजी आहे ..?? हे समजेपर्यंत डबा संपला होता,बंद डबा दाराबाहेर ठेवून दार लावून घेतलं..कपडे बदलले आणि अंथरूणावर पडलो..पडल्या पडल्या झोप लागली,अर्धा ऐक तास झाला असेल,पुन्हा फोन वाजला,कुठल्यातरी पेशंटला डिलिवरीमधे त्रास होत होता त्यासाठी ज्युनिअर डाॅक्टरांचा फोन..त्यांना गरजेचं मार्गदर्शन केलं,पुन्हा झोपायचा प्रयत्न केला,पण नाही जमलं...तणतणंत ऊठलो,पुन्हा आरशासमोर ऊभा राहिलो,तोंडावर पुन्हा ऐकदा पाणी मारलं,स्वतःला निरखून पाहिलं...आरशासमोर डोळ्यांच्या व भुवयांच्या चित्रविचित्र हालचाली करून पाहिल्या व खुर्चीत येऊन बसलो..पुस्तकं समोरंच पडली होती,पण ऊचलायची ईच्छाच होत नव्हती मग शेवटी धीर करून त्यातलं ऐक पुस्तंक ऊचललं आणि वाचू लागलो...दोन अडीच तास अभ्यास केला..अजूनही अधूनमधून फोन चालूच होते...
                       यातंच रात्रीचे आठ वाजले,व्यायामशाळेत जायची वेळ झाली..आवरून रस्त्याच्या डाव्या बाजूने चालंत निघालो...येणार्‍या जाणार्‍या गाड्या,हातात हात घालून फिरणारी मुलं यांचं अवलोकंन करंत करंत व्यायामशाळेत पोहोचलो..मग पुढील दोन तास दिवसभरातला सगळा राग या क्रुत्रीम ऊपकरणांवर काढला,अंगातल्या रागाला मोकळी वाट करून दिली..दहा वाजता तिथून निघालो,पुन्हा रूमवर आलो,डबा येऊन पडला होता..तो ऊघडून पुन्हा ऐकदा कसाबसा संपवला व रिकामा डबा दाराबाहेर ठेवून दार लावून घेतलं...ऐव्हाना दिवस संपायला आला होता..मग mbbs च्या माझ्या खास मित्रांना फोन केला,सगळेजण मिळून तासभर छान गेम खेळलो,ऐव्हाना झोप अनावर होत होती,मित्रांचा निरोप घेतला...पुन्हा ऐकदा मच्छरदानी लावली आणि अंथरूणावर पहुडलो...झोपता झोपता शाहरूखची दोन तीन गाणी You Tube वर पहायची फार जुनी सवंय आहे आपल्याला..आजही ते सोपस्कार पार पाडले आणि झोपी गेलो...
( रात्री फोन येणारंच होते,ऊठून आॅपरेशन करायला अथवा पेशंट तपासायला खाली जावंच लागणार होतं..पण या सगळ्या चिंता बाजूला ठेवून शांत झोपलो... )

                                                 -©- निरागस


                                 

Thursday, 11 January 2018

डोंबलाचा पुरोगामी

       






"                            चला नव्या वर्षाची सुरूवात आम्ही चांगली केली..गाड्या फुंकून,ऐकमेकांची डोकी फोडून अजून आमच्यातला लढवय्यापणा शाबूत आहे, याची प्रचिती आम्ही जगाला आणून दिली.नवीन येणार्‍या प्रत्येक वर्षागणीक आपण अधिकाधिक समाजाभिमुख व्हायला हवं,ऐकमेकांच्या अधिक जवळ यायला हवं,पण कुठलं काय..आम्ही व्यस्त आहोत ऐकमेकांच्या नाकात जातीची वेसन घालण्यात..होय मी भीमा कोरेगाव बद्दलंच बोलतोय..भीमा कोरेगावमधे जो काही जातीय तणावाचा भडका ऊडाला,परीणामतः जी काही जाळपोळ ,हाणामारी झाली ,ती या पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच भूषणावह नव्हती..पण हे सगळं का झालं..?? यामागचा खरा ईतिहास काय आहै..?? खोट्या ईतिहासामागून जातीय स्वार्थ रेटून कसा पुढे नेला जातोय...?? या सर्व गोष्टींची शहानिशा करण्यासाठी मीच स्वतः या चिखलात ऊतरायचं ठरवलं..ईतरांवर चिखलफेक करण्याआधी स्वतः त्या चिखलात ऊतराव लागतं म्हणतात अगदी त्यातला प्रकार..संवेदनशील विषयावर प्रतिक्रीया द्यायची म्हटल्यावर अभ्यास महत्वाचा,अभ्यासाबरोबरंच ऐकंदर समाजव्यवस्था त्यांच्यामधले खाचखळगे सगळेच माहिती हवेत..म्हणून मागील दहा दिवस कुठेही काही लिहिलं नाही,की बोललो नाही...मित्रांनी प्रतिक्रिया विचारली, पण ती देण्याचीही कोणतीही घाई किंवा गडबड केली नाहि..काही नेमकी पुस्तकं ऊलगडली,फेसबुकच्या कट्यांवरल्या चर्चांमधे मूकपणाने वावरलो,थोरा मोठ्यांच्या मनातले विचार जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि  आज मोठ्या आत्मविश्वासाने या जटील आणि किचकट अशा प्रश्नाला मी सामोरा जातोय...मी जे लिहिलंय, ते केवळ आणि केवळ सत्य आहे,पुराव्यांवर आधारीत आहे,पण मी जे लिहिलंय तेवढं आणि तेवढंच सत्य आहे असं अजिबात नाही..ईतिहास हा ज्ञानाच्या कसोटीवर ऊतरणाराच असला पाहिजे,जो समाज सामाजीक अथवा जातीय प्रतिष्ठा जपण्यासाठी खोट्या ईतिहासाचा आधार घेतो, तौ वरकरणी जरी भक्कम दिसंत असला तरी, आतून तौ तितकाच तकलादू असतो...शाहू,फुले,आंबेडकरांचा जप करणारा सध्याचा महाराष्ट्र हे त्याचं मूर्तिमंत ऊदाहरण आहे...
                            हजारो वर्ष पारतंत्र्यात असणार्‍या या प्रदेशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्याचं ऐक सोनेरी स्वप्न पडले..त्यांच्या नेत्रुत्वाखाली मराठ्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला..भारतवर्षाच्या ईतिहासात क्वचितंच ऐखाद्या राजाच्या वाट्याला ईतकी लोकप्रियता आली असेल..शिवरायांबद्दल आज अधिक लिहित नाही,कारण ऐकतर ते सर्वज्ञात आहे आणि आजच्या आपल्या या विषयाला अनुसरून नाहीये..तर शिवरायांनंतर गादीवर आलेले छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा साम्राज्याचा अधिक जोमाने व जोशाने प्रसार केला..भीमा कोरेगाव समजून घेण्यासाठी आधी आपणाला संभाजी महाराजांपासून पुढचा मराठा साम्राज्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे सर्वमान्य छत्रपती होत..त्यांचा जन्म १४ मे १६५७ साली पुण्याजवळील पुरंदर या किल्यावर झाला. शिवरायांनंतर ९ वर्षै संभाजीराजांनी समर्थपणे स्वराज्याची धुरा वाहिली..या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुघलांबरोबरंच,पोर्तुगीज,सीद्धी आदींची  अनेक आक्रमणे परतावून लावली.ऐन ऊमेदीच्या काळात अंतर्गत फंदफितुरी व दगाफटक्यामुळे संभाजी महाराज संगमेश्वरजवळ बेसावध असताना औरंगजेबाच्या तावडीत सापडले,संगमेश्वरमधून त्यांना बहादुरगडावर नेऊन नंतर ११ मार्च १६८९ रोजी वडू-बुद्रुक येथे महाराजांची निर्घ्रुण हत्या करण्यात आली.त्यांचं शीर भाल्यावरून गावोगावी मिरविण्यात आलं,जीभ छाटण्यात आली,शरीराचे शेकडो तुकडे करण्यात आले...त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार तिथल्याच स्थानीक लोकांनी केले,पण ते नेमके कोणी केले..?? कशापद्धतीने केले यासंदर्भात मात्र कोणतेही संदर्भ आपणास ऊपलब्ध नाहित..त्यासंदर्भात ज्यांनी त्यांच्या शरीराचे तुकडे अंत्यसंस्कारापूर्वी वेचले, त्यांना वेचले पाटील व ज्यांनी ते तुकडे शिवले त्यांना शिवले पाटील, अशी नावं पडली अशी आख्यायिका आहे,पण याला ईतिहासात कोणताही संदर्भ नाही..अशा ईतरही अनेक आख्याईका रूढ आहेत ज्या निव्वळ भाकडकथा असून सत्यापासून कोसो दूर आहेत..
                                 असो, तर संभाजी महाराजांच्या म्रुत्यूनंतर त्यांचे सावत्र बंधू राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणून गादीवर बसले.राजाराम महाराजांना शत्रूपेक्षा स्वतःच्या तब्येतीनेच अधिक बेजार केलं आणि यातंच १७॰॰ साली ऐन तारूण्यात राजाराम महाराजांचा म्रुत्यू झाला.राजाराम महाराजांच्या म्रुत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी महाराणी ताराराणींनी स्वराज्याची सारी सुत्रे आपल्या हाती घेतली आणि मराठेशाहीची घोडदौड पुढे चालू ठेवली..यातंच १७॰७ साली औरंगजेबाचा देहांत झाला..मराठा साम्राज्याचे खरे वारसदार व संभाजीराजांचे चिरंजीव शाहू महाराज ऐव्हाना मुघलांच्या ताब्यात होते.औरंगजेबाच्या म्रुत्युनंतर मुघलांनी मराठा साम्राज्यात दुफळी माजवण्यासाठी शाहू महारांची सुटका केली..शाहू महाराज राज्यात परंत आले,अपेक्षेप्रमाणे त्यांनी राज्यावर आपला हक्क सांगितला,संभाजीराजांवर श्रद्धा असणारे अनेक मराठा सरदार त्यांच्या बाजूने ऊभे राहीले व यानिमित्ताने मराठा साम्राज्यात ऊभी फूट पडून सातारा व कोल्हापूर अशा मराठ्यांच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या..सुरूवातीच्या काळात या दोन गाद्यांमधे आपापलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी लढायादेखील झाल्या..तर मित्रांनो शिवरायांचा जन्म ते  शाहू महाराजांचा सातारच्या गादीवरला अभिषेक , हा मराठा साम्राज्याचा काळ म्हणून आळखला जातो..शाहू महाराज अगदी तरूणवयात गादीवर बसल्यामुळे राजकारणात नवखे होते..अनेक वर्षे मुघलांच्या कैदेत राहिल्यामुळे मराठा साम्राज्याची पाळेमुळे व डावपेच त्यांना माहिती नव्हते..अशातंच स्वराज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथ यांची त्यांनी नेमणुक केली..बाळाजी विश्वनाथांनी शाहूंना मुघलांच्या व जनतेच्या मनात स्वराज्याचे खरे छत्रपती म्हणून मान्यता मिळवून दिली.तसेच १७१९ साली शाहूंच्या मातोश्री येसुबाई यांचीसुद्धा मुघलांच्या तावडीतून सुटका केली..पण हे करता करता पेशवा शाहूंना डोईजड झाले आणि ऐकप्रकारे मराठा साम्राज्य  पेशव्यांच्या हाती गेले...
                                      ११ मार्च १६८९ ते १७१५ सालापर्यंत ,म्हणजे शाहू महाराज गादीवर बसल्यानंतरदेखील काही वर्षे वडू-बुद्रुक येथे संभाजीराजांची समाधी बांधली गेली नव्हती.. म्हणजेच ऐका अर्थाने या महाराष्ट्राला या महान योद्ध्याचा ऐकप्रकारे विसरंच पडला होता.शाहू महाराजांची पहिली काही वर्षे ही स्वराज्याची घडी बसवण्यात गेली आणि त्यामुळे कदाचित हा ऊशीर झाला असावा..१७१५ साली शाहूमहाराजांनी संभाजी महाराजांच्या प्रित्यर्थ वडू-बुद्रुक येथे व्रुंदावन बांधले व त्याची देखभाल करण्यासाठी गोसावी व कुलकर्णी नावाच्या ग्रुहस्थांच्या नावाने सनदा काढल्या व त्यांना त्यांच्या प्रपंचासाठी म्हणून काही भाग बक्षीस म्हणून दिला.१७२३ मधे शाहू महाराजांनी व्रुंदावनाचा सेवेकरी म्हणून गोविंद गोपाळ ढगोजी मेघोजी  यांची नेमणूक केली व त्यांना पाबळच्या रानात काही जमीन बक्षीस म्हणून दिली.येथे ढगोजी व मेघोजी या शब्दांचा अर्थ म्हणजे महार समाजाचे गुरू असा होतो..महार समाजातील तत्कालीन पूजा अर्चा व ईतर प्रथा हे लोक करीत असंत.म्हणजे संभाजी महाराजांच्या म्रुत्यूनंतर किमान ३४ वर्षे गोविंद गायकवाड या नावाचा साधा ऊल्लेखही ईतिहासात आढळंत नाही..गोविंद गायकवाडांनी संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले अशा काही विशिष्ठ समाजाकडून केल्या जाणार्‍या प्रचाराला काडीचाही पुरावा ऊपलब्ध नाही,ऊलटपक्षी सारे पुरावे हे धादांत खोटे कसे आहे हे पटवून सांगतात..यासंदर्भात पुरावे म्हणून काही दस्तावेज ईथे जोडंत आहे.





                                 बाळाजी विश्वनाथांपासून सुरू झालेला पेशव्यांचा मराठेशाहीमधील प्रभाव ऊत्तरोत्तर वाढंतच गेला.ईतका की छत्रपती हे केवळ नाममात्र राहिले व मराठा साम्राज्याचा सारा गाडा पेशव्यांनी हाकण्यास सुरूवात केली..मराठेशाहीमधे अगदी तुरळंक प्रमाणात असणार्‍या जातीयवादाने पेशव्यांच्या काळात पुन्हा ऐकदा ऊचंल खाल्ली..ब्राह्मण्यवादाने पेशवाईमधे चरंम सीमा गाठली..अतिशयोक्तीपणाने काही ईताहासकारांनी लिहून ठेवलंय की पेशवाईमधे दलितांची अवस्था ईतकी वाईट होती की त्यांच्या गळ्यात माठ व कमरेखाली झाडू बांधला जायचा, त्यांना समाजाच्या कोणत्याही महत्वाच्या गोष्टींमधे स्थान नसायचं,मंदिरात जायची परवानगी नसायची वा विहिरीवर पाणी भरायची मुभा नसायची..
शिवरायांनी व ईतर मराठा छत्रपतींनी या ऊपेक्षीत वर्गाला आपल्या राजकारभारात व ऐकूणंच समाजव्यवस्थेत सामावून घेतलं होतं व त्यामुळेच समाजाची घडी टिकून राहिली होती..पण पेशव्यांच्या काळात ही घडी ऊसवली गेली...परिणामतः ऐका मोठ्या समाजामधे राज्यकर्त्यांविरोधात ,म्हणजेच पेशव्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला..ईंग्रजांनी आपल्या फायद्यासाठी या असंतोषाचा यथोचित फायदा करून घेतला व १८१८ साली ईंग्रजांना सामील झालेल्या महार सैनिकांनी ईंग्रजी सैन्याच्या मदतीने पेशव्यांचा पराभव केला..ईंग्रजांनी त्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ तिथे दीपस्तंभ ऊभारला...तर मित्रांनो बाळाजी विश्वनाथांपासून ते १८१८ मधे ईंग्रजांकडून हरण्यापर्यंतचा काळ हा पेशवाई म्हणून ओळंखला जातो..१८१८ ची ही लढाई शोषितांची शोषण करणार्‍यांविरोधातली लढाई होती.पेशवाई आगोदर मराठा साम्राज्यात वा स्वातंत्र्यानंतर महार रेजीमेंटच्या रूपाने महार समाजाने ईथल्या प्रदेशाच्या अस्मितेसाठी अतिशय दैदिप्यमान असा पराक्रम गाजवला आहेच...त्यामुळे केवळ जातीय विषमतेपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पेशव्यांसमोर ऊभे ठाकलेल्या या समाजाला तुम्ही दोषी ठरवू शकंत नाही ,तर त्यांच्यावर ही परिस्थिती का आली हेदेखील आपणाला तपासून पहावं लागेल..
                                      तर मित्रांनो हा झाला भीमा कोरेगावचा ईतिहास..आता आपण जाणून घेऊयात की दरवर्षी शांततेत पार पडणार्‍या विजयोत्सवाला यावर्षी गालबोट का लागल.??? तर यावर्षी १ तारखेला या विजयोत्सवाला २॰॰ वर्षे पूर्ण होणार असल्याने ,यावर्षी कित्येक पटीने अधिक जनसमुदाय तेथे ऊपस्थित होता..२५ ते २६ डिसेंबरच्या दरम्यान " स्वतःच्या राजाचे अंत्यसंस्कार करू शकले नाहीत,हे कसले भैकड मराठा " अशा प्रकारचे फ्लेक्स वडू-बुद्रुकमधे समाजकंटकांकडून ऊभारण्यात आले..त्यातून दोन समाजांमधे तणाव निर्माण होऊन गोविंद गायकवाडांच्या समाधीवरील छत्रीची नासधूस करण्यात आली,२८ ते २९ डिसेंबरच्या दरम्यान ४९ लोकांवर अॅट्राॅसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले..त्यातंच १ जानेवारीरोजी विजयोत्सवाचं निमित्त झालं आणि सरकारचा गाफिलपणा कारणीभूत झाला आणि दंगल ऊसळली..नंतर विविध राजकीय संघटणांनी ऐकमैकांवर आरोपांची धुळधाण ऊडवली व सगळा गिचमीट काला झाला....
                                    झालं ते झालं,पण या झाल्या प्रकरणातून आपण काहीतरी शिकणार आहोत का...?? ऐखाद्या समाजाची खोटी सामाजीक प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण खोटा ईतिहास नव्या पिढीच्या माथी मारणार आहोत का..?? कितीदिवस जातीची ही वल्कलं घालून आपण मिरवणार आहोत..?? या अशा दंगली भडकवणार्‍या समाजकंटकांना आपण किती दिवस जातीच्या सदर्‍याखाली लपवून ठेवणार आहोत...?? स्वातंत्रोत्तर काळात कित्येक वर्षे आम्हाला संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे हे माहिती नव्हतं,वा. सी. बेंद्रे नामंक सद्ग्रुहस्थांनी अथंक प्रयत्नांनी ती जगासमोर आणली,शिवरायांच्या समाधीचंही तसंच महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली नसती तर...?? तर आम्हाला कळलंच नसतं कधी की आमचा राचा कुठे अस्त पावला ...?? यातून आपणास काय दिसतं,तर आम्ही आमच्या महापुरूषांचा केवळ स्वार्थासाठी मर्यादित वापर करतो..त्यांचा फक्त ऊदो ऊदो करतो,त्यांच्या विचारांना मात्र सोयीस्कररीत्या फाट्यावर मारतो...प्रत्येक जातीचा ईतिहास गौरवशाली आहै..अहो शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे काही  केवळ मराठ्यांचं होतं का..?? तिथे शिवरायांसोबत जसे आमचे बाजीप्रभू देशपांडे लढले तसेच जीवा महाला,शिवा काशीदही लढलेच की  ?? आणि तो तर चारशे वर्षांपूर्वीचा काळ,मग आज काॅम्पुटरयुगात ही कोणती अवदसा पाळतोय आपण..?? माझी श्रद्धा आहे महाराज  नक्की वरून निमूटपणे पहात असतील,मूकपणे अश्रू ढाळंत असतील आणि स्वतःलाच विचारंत असतील, याचसाठी केला होता हा अट्टाहास..?? बघा अजूनही वेळ गेलेली नाहिये,या जातीयवादाच्या कीडेला समाजातून वेळीच हद्दपार करा नाहितर ती संपूर्ण देशाला पोखरून नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही..                    "
                                                   -©- निरागस